Sunday, January 20, 2013


Abhanga postयुक्ताहार न लगे आणिक साधन ।on  23 rd. Date 20th Jan 2013


Added new post for Abhanga a week of Sant Tukarama.
 blogaddress :http:// tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com

 अभंगाचे  मराठीत स्पष्टीकरण ईंग्रजी स्पष्टीकरणानंतर दिले आहे.

युक्ताहार न लगे आणिक साधन । अल्प नारायणे दाखविले || १ ||
कलियुगामाजी करावें कीर्तन । तेणें नारायण देईल भेटि ॥ २ ॥
न लगे लौकिक सांडावा वेव्हार । घ्यावें वनांतर भस्म दंड । ३ ॥
तुका म्हणे मज आणिक उपाव । दिसती ते वाव नामेंविण ॥ ४ ॥

Verbatim Meaning :

Narayana has shown me that one need to take just enough food, there is no need to do any other sadhanaa || 1 ||
Man should narrate and praise deeds of Gods this Kaliyuga. Because of this act the God Narayana will meet such a divotee.|| 2 ||
There is no need to renounce one's worldly duties There is no need to renounce the world || 3 ||
Tuka says that except Namasmarana ( remember the name of God ) all other methods of worship are not required || 4||

Background Information :

Our Shastras have prescribed many methods ( for example : worship the God such as Navavidhaabhakti( Nine ways of doing the worship) , Follow the Path of knowledge that is Searching for the answers to the questions such as “ Who am I ? What is my relation with God ?, Following the discipline of Yoga ( Hathayoga ) Renouncing the world and it's attachments , Doing pilgrimages meaning Visiting various holy places, Performing different Pujas or doing various Yagnaas etc.) to attain the coveted goal of Liberation.

One is required to spend lot of energy, time and money while following these methods and in this process one is likely to abandon his own responsibilities and duties..
Thus the path to find god appears to be very difficult to tread upon.
We have seen in our earlier Abhangas that in different times the method that are followed are different.
Presently we are living in the Kaliyuga which started just after the great war of Mahabharata ( about 4500 years back). In these times the man will be more occupied with the problems of looking after his family and will not get time to follow the methods describes in the above paragraphs.
Because of this he is likely to forget the purpose of Human birth and waste the precious opportunity of getting this Human form.

Tukaram maharaj has understood this issue and has given us the assurance in this abhanga.

Meaning of the Abhanga :

Tukaram Maharaj says that one need not become worried or disoppointed , thinking that he can not do the worship of the God if he is doing his worldly duties.
तुकाराम महाराज म्हणतात की देवाच्या भेटीसाठी काळजी करण्याची किंवा निराश होण्याची आवश्क्यता नाही
Samartha Ramadasa who also lived in the same times as that of Sant Tukarama gives the following advise .
येथे तुकाराम महाराजांचे समकालीन समर्थ रामदास स्वामींचे ह्या विषयावरचे विवेचन खुलासा करणारे आहे.
आधी प्रपंच करावा नेटका। मग घ्यावे परमार्था विवेका। येथे आळस करू नका विवेकी हो ॥
One should perform his worldly duties and also simultaneously follow the path of worship or discrimination . O'wise one do not ignore this point and delay your efforts . || 1 ||
प्रपंच सांडून परमार्थ कराल। तेणे तुम्ही कष्टी व्हाल। फ्रपंच परमार्थ कराल |तरी तुम्ही विवेकी॥ If you ignore your worldly duties , then you will suffer in this world. If you do your worldly duties and also put efforts for getting liberation , then only you can be addresses as Wise ones.
प्रपंच साडून परमार्थ केला। तरी मिळेना अन्न खायाला। मग तया करंट्याला। परमार्थ कैसा|| If one spends time only for getting Liberation , then he will have to remain Hungry. Then how can he attain the goal of liberation?
परमार्थ सांडुन प्रपंच करिसी । तरी तू येमयातना भोगिसी । अंती परम कष्टी होसी
येमयातना भोगिता ॥ But if you pay attention to only your worldly duties , then at the end you will suffer not only in this life but afterward as well .( Not only this; but you will suffer because of getting entangled in the cycle of Birth-death )

The message here is quite simple and straight forward.

The man should pay attention to both the worldly duties and at the same time he should also pay equal attention to put the efforts for attaining the goal of Liberation.

Many of our saints for example :Tukaramaa maharaj, Ekanath,Namdev Maharaj and many others were house holders themselves. The fact “They attained the goal of Liberation while living as a Householder is also well known.

In this abhanga Sant Tukaram maharaj is telling us to follow the path of Bhakti. ( Love for God) He specifically recommends here the bhakti of reciting the holy name of God , remembering Him at every moment .This is called “ Namasmarana”
in the shastras.

When one starts “Namasmarana “ it first happens at the level of verbal speech
( वैखरि वाणी). One can hear the words said by the reciting person. However
continuing to do this , one slowly moves to the level of doing Namasmaranaa
at whispering speech level ( मध्यमा वाणी) when others can't hear but the reciter can hear himself. As the love for God increases and the intensity of desire to meet Him increases ; due to this love and intensity; the Namasmarana goes to the level
of rewcitation and remembrance at more subtle level of speech (पश्चंती वाणी)

At this stage the Namasmarana is done in the mind and at the same time one is
able to do all the worldly duties.
Teaching of this abhanga :

Tukarama maharaja says that he finds that only Namasmarana is the way and all
other methods are not necessary.
I feel that Sant Tukarama Maharaj is indirectly asking us to put all our efforts to
us to come to this level and one can come to this level only by repeated practice.

This is what this abhanga is teaching:

Below is the same meaning written in Marathi Language.


युक्ताहार न लगे आणिक साधन । अल्प नारायणे दाखविले || १ ||
कलियुगामाजी करावें कीर्तन । तेणें नारायण देईल भेटि ॥ २ ॥
न लगे लौकिक सांडावा वेव्हार । घ्यावें वनांतर भस्म दंड । ३ ॥
तुका म्हणे मज आणिक उपाव । दिसती ते वाव नामेंविण ॥ ४ ॥



शब्दार्थ :
नारायणाने मला हे दाखविले आहे की फक्त युक्ताहार म्हणजे आहार अगदी कमी नको वा फार जस्त नकॊ नसावा॥१॥
कलियुगा मधे नारायणाचे किर्तन केले तरी तो भेट देतो ॥ २ ॥
त्याच्या भेतीसाठी आपला लौकिक व्यवहार सोडावा लागत नाही किंवा जंगलात जाऊन भस्म दंड म्हणजे सम्न्यास घ्यावा लागत नाही ॥३॥
तुकाराम महारज म्हणतात की मला नामस्मरना शिवाय दुसरा उपाय ( नारायणाच्या भेटीसाठी) आढळत नाही ॥ ४॥

अभंगाचा अर्थ समजण्यासाठी लागणारी कांही माहिती :

आपल्या शास्त्रांमधे ईश्वरप्राप्ती साठी निरनिराळ्या पद्धती मार्ग सांगितले आहेत. ( उदाहरणार्थ : नवविधा भक्ति मार्ग , ज्ञान मार्ग ज्यामधे आपण "मी कोण आहे ? माझे खरे स्वरूप काय आहे? माझे आणी ईश्वराचे काय नाते आहे? अश्या प्रश्नांची उत्तरे शोधतो ), योग्मार्ग म्हनजे हठयोगाचामार्ग, संन्यास घेणे, निर्निराळ्यातीर्थयात्रा करणे, निर्निराळ्या पूजा व यज्ञ करणे इत्यादी ). हे सर्व मार्ग एकाच ध्येयाच्यापूर्ती साठी म्हणजे मोक्षप्राप्तीसाठी सांगितले आहेत.
ह्या सर्व मार्गांमधे मानसाला शक्ति, वेल व पैसा खर्च करावा लागतो. संसारातली कामे पाथीशी असल्यामुळे माणूस निराश होऊन आपला अभ्यासच सोडण्याचा येथे संभव आहे. थोडक्यांत असेच म्हणता येईल की परमार्थसाधना कर्णे संसार करतांना कठीण होते.

आधी पाहिलेल्या अभंगाचा अर्थ लावतांना आपण हे पाहिले होते की निरनिराळ्या युगांमधे निरनिराळी साधना केली जात असे. सध्या आपण कलियुगामधे आहोत. साधारणत: ४००० वर्षांपूर्वी महाभारत युद्ध संपल्याच्या वेळेपासून कलियुग सुरु झाले. कलियुगामधे सर्वसाधारण मनुष्य हा स्वत:च्या संसारामधे गुंतलेला असतोव आहे. त्याला परमार्थसाधनासाठी वर वर्णन केली मार्ग चोखाळणे कठीण होऊन बसले आहे. ह्यामुळेच तो जन्म-मृत्यु चक्रांमधे अडकलेला असतो.
दिलासा देताहेत.
.
येथे तुकाराम महाराजांचे समकालीन समर्थ रामदास स्वामींचे ह्या विषयावरचे विवेचन खुलासा करणारे आहे.
समर्थ म्हणतात :
आधी प्रपंच करावा नेटका। मग घ्यावे परमार्था विवेका। येथे आळस करू नका विवेकी हो ॥ 1 || प्रपंच सांडून परमार्थ कराल। तेणे तुम्ही कष्टी व्हाल। फ्रपंच परमार्थ कराल |तरी तुम्ही विवेकी॥२॥ प्रपंच साडून परमार्थ केला। तरी मिळेना अन्न खायाला। मग तया करंट्याला।परमार्थ कैसा|| ३॥ परमार्थ सांडुन प्रपंच करिसी । तरी तू येमयातना भोगिसी । अंती परम कष्टी होसी | येमयातना भोगिता ॥४ ॥
ह्या ओव्यांचा सलग अर्थ:
विचारवंत मानसाने प्रपंच व परमार्थ विवेकाने नीति न्यायने वागून सुव्यवस्थितपणे करावा. ह्याबाबतीत मुळिच आळस करू नये. जर तुम्ही फक्त परमार्थाकडेच लक्ष दिले व प्रपंचाकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला नीट जेवायला सुद्ध मिळणार नाही. तसेच जर फक्त प्रपंचच कराल तर तुम्हाला यमयातना भोगाव्या लागतील. ( जन्ममरणाच्या चक्रामधे अडक्ल्याने माणसाला अनेक जन्म ह्या अश्या यातना भोगाव्या लागता हे आपण पुर्वी पाहिलेच आहे!) नेटका प्रपंच म्हणजे जरूरीपुरता प्रपंच करणे.
य़ेथे आपल्याला हाच संदेश आहे की तुम्ही व्यवाहार व परमार्थ दोन्हीकदे सारखेच लक्ष द्यायला हवे. यामुळे व्यवहारत यश मिळेल आणि पर्मार्थामधे आपले मोक्षाचे ध्येय पण साध्य होईल.
अनेक संतमंडलींनी उदा. तुकारम महाराज, एकनाथ , नामदेव व असे अनेक संत गृहस्थाश्रमी होते पण त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले. म्हणुनच संसार सोडणे आवश्यक नाही; संसाराची आसक्ती सुटणे महत्वाचे आहे हेच स्पष्ट होते.
संसारात राहूनही भगवंताची भक्ती करता येते व म्हणुनच तुकाराम महाराजांनी आपल्याला ह्या अभंगामधे " नामस्मरण भक्तीच मला योग्य वाटते" हे अभंगाच्या शेवटच्या चरणा मधे सांगितले आहे.
जेंव्हा मनुष्य नामस्मरण सुरु करतो तेंव्हा ते प्रथम वैखरी वाणी मधे करणे सोपे असते. वैखरीतले नामस्मरण दुसîrÉÉला ऐकू येते. पण असे स्मरण करणे जर चालू ठेवले तर हळूहळू स्मरण मध्यमेमधे म्हणजे पुटपुटल्य़ाप्रमाणे होते. जसा जसा देवाविष्यी प्रेम, भक्तिभाव वाढू लागतो तसेतसे स्मरण पश्चंती म्हणजे मनात सुरु होते.
ह्या स्थितिमधे आपण स्वत:ची व्यवहारामधली कामे करू शकतो व स्मरणक्रिया पण चालू राहते.
अभंगाची शिकवण :
तुकाराममहाराजांना असेच स्मरण असावे असे बहुधा म्हणायचे असावे. ही स्मरणाची स्थिति सतत प्रयत्नांनीच येऊ शकते . ह्यासाठीच सरावाचे महत्व महाराजांनी ह्या अभंगामधे सांगितले आहे.
निदान मला तरी ह्या अभंगाचा असाच अर्थ आहे असे वाटते

1 Comments:

At January 23, 2013 at 12:17 AM , Blogger Dr R W Khare said...

Your effort is highly laudable. The systematic and thorough approach has always been your hall mark. But there can be a possible objection to your approach. You are so steeped in Samarth literature that you see everything from that perspective. Then people will title your blog as "Tukarams Abhangs as seen by Samarth bhakt".
The normal approach which will also do a lot of good to you personally is to interpret and explain using examples and citations from literature of Tukaram only. Then you become a real student of Tukaram's literature and your writing becomes authentic and more meaningful or gets the depth because you are really trying to put yourself in to the shoes of Tukaram to understand him better. You may then write second part as "similar thoughts from other sources" one of which may be from Samarth.
This is not meant to be criticism. You are doing a wonderful job. Please do not stop it because of this comment. But do munch over what I have said.

Khare

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home