Added 17th Abhanga ऐसा हा लौकिक कदा रखावेना । for Abhanga a week of Sant Tukarama.
blog address
:http:// tukaramasteachings.blogsopt.com
Contact
e-mail address is rgphadke@gmail.com
इंग्रजी अर्थस्पष्टीकरणानंतर पुढे मराठी स्पष्टीकरण दिलेले आहे.
Abhanga
17 Date 29th Nov
2012
ऐसा हा लौकिक कदा
रखावेना । पतितपावना देवराया
॥ १ ॥
संसार करितां
म्हणती हा दोषी । टाकितं आळसी
पोटपोसा ॥ २॥
आचार करितां
म्हणती हा पसारा । न करितांनरा
निंदिताती ॥ ३॥
संतसंग करितां
म्हणती हा उपदेशी । येरा
अभाग्यासी ज्ञान नाहिं ॥ ४ ॥
धन नाही त्यासी
ठायींचा करंटा । समर्थासी
ताठा करिताती ॥ ५ ॥
बहु बोलोंजाता
म्हणती वाचाळ । न बोलतां सकळ
म्हणती गर्वीं ॥ ६ ॥
भेटिसि न जातां
म्हणती हा निष्ठूर । येता
जातां घर बुडविलें ॥ ७ ॥
लग्न करूं जातां
म्हणती हा मातला । न करितां
जाला नपुंसक ॥ ८ ॥
निपुत्रिका
म्हणति पहा हो चांडाळ । पातकाचे
मूळ पोरवडा ॥ ९ ॥
लोक जैसा ओक धरिता
धरवेनां । अभक्ता जिरे ना
संतसंग ॥ १० ॥
तुका म्हणे आतां
आइका हे वचन । त्यजुनियां जन
भक्ति करा ॥ ११ ॥
Verbatim
Translation :
O' all purifying Lord, it is very difficult to follow
the ways of this world and the society || 1||
If One pays attention to his worldly duties, people
blame him and if one does not do so then they call such a person as
lazy and self centered || 2 ||
If one works hard and earns wealth then people say
that he has unnecessarily increased his liabilities., and if this
is not done then also they condemn him.|| 3 ||
If one follows the teachings of the Sages then people
say that he preaches, and if one does not do this then they say that
he is unfortunate not to have knowledge|| 4||
If one does not have wealth then he is called
unfortunate , and for a wealthy person they say that He is proud of
his wealth and is showing it off.|| 5 ||
If one mingles with the people he is called as
talkative, if one does not mingle then the society says that he is
arrogant || 6 ||
If a person does not meet the visitors he is termed
as Heartless, but if he welcomes everyone then he is said to be one
who is wasting his wealth and bring poverty to the household || 7 ||
If a person shows interest to get married then he is
not appreciated , if he does not marry then he is called impotent ||
8 ||
If a person is childless he is condemned, if he has
many children then this is treated as the main reason for committing
all wrongdoings || 9 ||
No body can not hold the vomited food in hands,
similarly the people who do not believe in God and worship can not
tolerate the company of good persons || 10 ||
Tuka says that listen to what I say. Forget all what
the society approves of or disapproves, and worship the God. || 11
||
Background information :
It is very clear that we have to live in the society.
Each society has it norms for living. The nature of the Human
beings is the same whether they are Indians, Westerners or from any
other region on the earth.
Most
of the societies have certain norms for a person living in the
society.
However
some individuals differ in their opinion.
They are more inclined towards spirituality.
The
Vedic Dharma insists that one should follow the fourfold path in individuals viz.
One
should first do his duties (धर्म),
earn money in rightful ways( अर्थ
)for looking after one's family, Live the
normal life of a householder ( marry to continue the race ) and do
the duties of a householder ( काम)
and also strive for the ultimate goal of Liberation.(मोक्ष).
This
Abhanga is applicable for those who want to start the efforts for attaining the goal of Liberation ( मोक्ष)
Teachings
of this Abhanga :
It
is generally seen that many a times some persons in the the society
or family are not happy when an individual starts his efforts in the
direction of spirituality.
The reasons may vary. Some
family members may be feeling fear that the individual will not
pay enough attention for the welfare of the family. There may be
many reasons.
The
meaning of the first 8 stanzas is very clear and straightforward.
and
therefore is not discussed here.
What
Tukarama Maharaj says in the last two stanzas is very important.
He
says that do not pay attention to what all others say as far as you
want to start efforts for attaining your goal of liberation. (This
is because it is only the change of attitude of an individual that
matters most).
As
long as you have love for the God in your mind, and as long as you
are not going to abandon your duties , do your worship of God. Do
not worry of what the society says or thinks about your worshiping the God.
अभंगाचा
अर्थ समजण्यासाठीची माहीती
:
आपण
प्रत्येकजणाला सभोवतालच्या
समाजातच रहायचे आहे.
कोठेही
गेलो तरी हेच आढळते की सर्व
माणसांचा स्वभाव कांही बाबतीत
सारखाच असतो,
मग
तो भारतीय असो वा पाश्चिमात्य
असो किंवा पृथ्वीवर च्या
कोठल्याही पर्देशांतला असो.
ह्या
सर्व समाजांच्या जीवन जगण्याबाबत
कांही विशिष्ठ पद्धती असतात.
पण
कांही जणांना अध्यात्माबद्दल
आपुलकी असते.
वैदिक
धर्मा मधे माणसाने चार
आश्रमांप्रमाणे जीवन जगावे
असे अपेक्षित आहे.
पहिले
म्हणजे त्याने आपली कर्तव्ये
सर्वप्रथम योग्य रीत्या
करावी.,
आपल्या
कुटुंबाला जगण्या करता लागणारा
पैसा अडका नीती न्याय्य मार्गाने
मिळवावा ,
गृहथाने
वंशवृध्दीसाठी कामाला पण
जीवनांत योग्य स्थान द्यावे
व शिवाय मोक्षप्राप्तीसाठी
सुद्धा जरूर यत्नशील असावे.
हा
अभंग अशा प्रत्येकासाठी आहे
ज्याला मोक्षाची कामना आहे.
अभंगाची
शिकवण :
बरेच
वेळा असे दिसते की जर एखाद्याने
परमार्थसाधना सुरु केली तर
समाजाला वा त्याच्या कुटुंबातल्या
माणसांना ते आवडत नाही.
ह्याचे
कारण म्हणजे त्यांना वाटते
की हा आता आपल्या कर्तव्याला
विसरेल व घरातल्या मंडळींचे
हाल होतील.
अनेक
कारणे असू शकतात.
ह्या
संदर्भानुसार अभंगाच्या
सुरवातिच्या चरणांचा अर्थ
अगदी स्पष्ट आहे.
सोपा
आहे म्हणून येथे त्या भागाचे
स्पष्टीकरण दिलेले नाही.फक्त
तो भाग सध्याच्या मराठीमधे
लिहिला आहे.
ऐसा
हा लौकिक कदा रखावेना । पतितपावना
देवराया ॥ १ ॥
हे
देवा मला तुझी भक्ति करायची
आहे व त्यामुळे लौकीक पध्दतीने
मला जगता येत नाहि आहे.
मला
माहीत आहे की तूच माझ्यासारख्या
पतिताला पावन करणारा आहेस.
संसार
करितां म्हणती हा दोषी । टाकितं
आळसी पोटपोसा ॥ २॥
जर
मी स्वत:ची
कर्तव्ये केली नाहीत व तुझे
भजन करत राहिलो तर लोक मला
आळशी फुकटखाऊ म्हणतील.
आचार
करितां म्हणती हा पसारा । न
करितांनरा निंदिताती ॥ ३॥
जर
संसाराकडेच लक्ष दिले तर निंदा
करून म्हणतील की हा स्वार्थी
आहे व स्वत:च्या
भल्या साठी ह्याने हा सर्व
पसारा व्याप वाढविलेला आहे.
संतसंग
करितां म्हणती हा उपदेशी ।
येरा अभाग्यासी ज्ञान नाहिं
॥ ४ ॥
जर
संतसंग धरला तर ंहणतील की हा
लोकांना उपदेश करतो जणू कांही
बाकिच्यांना कळतच नाही असे
ह्याला वाटते.
धन
नाही त्यासी ठायींचा करंटा
। समर्थासी ताठा करिताती ॥ ५
॥
जर
जवळ धन संपत्ती नसेल तर मग
करंटा म्हणतील व असेल तर म्हणतील
की
ह्याला पैशाचा मद चढलेला आहे.
बहु
बोलोंजाता म्हणती वाचाळ । न
बोलतां सकळ म्हणती गर्वीं ॥
६ ॥
जर
लोकांमधे बोलत सएल तर म्हणतील
की हा वाचाळ आहे,
व
न बोलल्यास गर्विष्ठ म्हणतील.
भेटिसि
न जातां म्हणती हा निष्ठूर ।
येता जातां घर बुडविलें ॥ ७
॥
जर
कोणाशी फार जवळीक ठेवली नाही
तर म्हणतील की हा निष्ठूर
काळजाचा आहे व जनसंपर्क वाढवला
तर म्हणतील की लोकांचे करून
ह्याने घर बुडविले.
लग्न
करूं जातां म्हणती हा मातला
। न करितां जाला नपुंसक ॥ ८ ॥
लग्न
करु म्हटले तर म्हणतात की हा
मातला आहे व गुढ्घ्याला बाशिंग
लावून बसला आहे.
व
न केले तर म्हणतात की हा नपुंसक
आहे.
निपुत्रिका
म्हणति पहा हो चांडाळ । पातकाचे
मूळ पोरवडा ॥ ९ ॥
ज्याला
मुलेबाळे नाहीत त्याला चांडाळ
म्हणतात व ज्याला आहेत त्याला
म्हणतात की ह्याने पोरवडा
वाढवला कारण अनेक मुले असल्यानेच
माणूस पातकी होतो.(
त्यांचे
पालन पोषण करण्याकरीता पातके
करतो)
लोक
जैसा ओक धरिता धरवेनां । अभक्ता
जिरे ना संतसंग ॥ १० ॥
ज्याप्रमाणे
ओकारी हातांमधे धरता येत नाही
त्याच प्रमाणे ज्याला संतसंग
हवा असतो त्याला संसारांत
मग्न झालेल्याची संगत धरवत
नाही.
फक्त
शेवटच्या दोन चरणांमधे तुकाराम
महाराजांनी महत्वाचे जे कांही
सांगितले आहे तेवढा भागच येते
स्पष्टीकरणासाठी घेतलेला
आहे.
महाराज
म्हणतात
जर
तुम्हाला मोक्षाची वाटचाल
करायची ईच्छा झाली
असेल
तर मग ईतर मंडळी काय म्हणतील
त्या कडे लक्ष देऊ नका.
व
प्रयत्न
सुरू करा.
( कारण
येथे व्यक्तिगत भाव व साधानाच
महत्वाची आहे.
)
जोवर
तुमच्या माअमधे भगवंताविषयी
प्रेम व श्रद्धा आहे,
जोवर
तुम्ही स्वत:ची
कर्तव्ये
न विसरता बिनचुकपणे करता (
त्यांच्या
कडे दुर्लक्ष करत नाहॊ आहात;
तर
मग भगवंताची मनापासून भक्ती
करा.
कोण
काय म्हणतो ह्याकडे दुर्लक्ष
करा
)
हीच
शिकवण ह्या अभंगामधे दिलेली
आहे.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home