Thursday, September 20, 2012

         
         

8th Abhanga जन्मा येणे घडे पातकाचे मूळ । posted in " Abhanga a week of Sant Tukarama." Dt. 20-09-12 at
blog address : http:// tukaramasteachings.blogsopt.com .
                इंग्रजी स्पष्टिकरणानंतर पुढे मराठी स्पष्टिकरण दिलेले आहे.
Abhanga 8 : Date 20-09-2912 Cause for Birth
Readers may give their comments in the field provided in the blog or send email on address :- rphadke45@yahoo.co.in.

जन्मा येणे घडे पातकाचे मूळ । संचिताचे फळ आपुलिया ।। १ ॥
मग वांयाविण दु:ख वाटो नये । रुसोनिया काय देवावरी ॥ २ ॥
ठाउकची आहे संसार दु:खाचा । चित्ती सिण याचा वाटू नये ॥ ३ ॥
तुका म्हणे त्याचे नाम आठवावे । तेणें विसरावे जन्म दु:ख ॥ ४ ॥

Transliterated text:

janmaa yeNe ghaDe paatakaache mULa | saNchitaache phaLa aapuliyaa || 1 ||
maga vaayaaviNa dukhaH vaaTo naye | rusoniyaa kaaya d4evaavarI || 2 ||
ThaukachI aahe sansaara dukhHaachaa | chittI sINa yaachaa vaaTu naye || 3 ||
tuka MhaNe tyaache naama aaThavaave | teNe visaraave janmadukhaH || 4 ||

Verbatim Meaning :

We take birth ( जन्म ) in order to experience the effects of our deeds.(संचित) || 1 ||
Hence there is no point in getting angry with the God for our sufferings || 2 ||
O'Man You know that the nature of this world is pain and grief only,and therefore you should not feel bad about this pain or grief you experience. || 3 ||
Tuka says that the only method to avoid the grief is to remember His name || 4 ||

Background Information :

1) In the beginning of the Abhanga Sant Tukarama maharaj is referring to most widely used word in Hinduism (संचित). This is a subset of another most widely used word ( कर्म ) “Karma” meaning  actions done by an individual.

As per our Philosophy , the Karma has potential to produce its fruits. These fruits are classified as (संचित = Fruits accumulated over several past lives ), (प्रारब्ध = Fruits which have begun to bear the results in this present birth ) and (आगामी = Deeds or actions that are being performed now and will be performed in future).

Our Sages with their own experience have also said that “Only when one gets the Ultimate Spiritual Wisdom ( आत्मज्ञान) ; then only the total destruction of ones ( संचित and आगामी ) takes place”., meaning that these become incapable of bearing any fruits .
Example is given that of a burnt seed which can not bear a tree.
Prarabdhddhakarma (प्रारब्ध कर्म ) has to be exhausted through experiencing the fruits it bears in the present birth for such a liberated soul.

Adi Shankaracharya in his famous Bhajagovindam says in the last stanza :-
कुरुते गंगा सागर गमनम्‌ । व्रत परीपालन अथवा दानम्‌ ॥
ज्ञानविहीनं कर्म अनेन । मुक्तिर्नभवती जन्म शतेन This stanza has the
meaning that without true knowledge of ones true nature , there is no possibility for liberation.
The same view has been also expressed in Srimad Bhagvadgeeta (श्रीमद भगवद्गीता)
Sant Tukarama also is of the same view.
.
2) As seen in the earlier Abhanga ( Abhanga 7 ) , we are always going through the cycles of Happiness or Pain ( Unhappiness ) during our living. Our shastras have an explanation for this state of ours. It is as follows.

Since we have been doing all our actions with our “ I “ ( “ अहं ") at the center ( during our present life as well as during the past lives ), therefore with subtle expectation of the fruits for our actions; we are experiencing grief, pains

This is because the rule of our world ( दृश्य जगत) is the famous Law of Karma.
We can say that the ill actions reap troubles and pain. The results of the actions may occur in the same birth, or in in some other future birth.

Similarly one gets the body which is suitable to enjoy/ suffer the desires that were not fulfilled at the time of death in the previous birth. . The Jeevatma thus takes birth in Manava, Rakshasa or Deva or even a lowly body forms such as animals , insects etc.

Teaching of the Abhanga :
Tukarama Maharaj therefore says in the first line that “ Getting / Taking birth in this material world means that one has to experience the pains, griefs etc.

All saints and Seers say that the mistake we have committed is “ Forgetting our True Nature”

We live in the dual state where the God is separate for us. Thus forgetting the God is the main Sin. This causes us to get bounded in the unending cycle of Birth-death and birth .

As we have seen earlier controlling our mind is the trick to be used.
All of us have the habit of finding the cause and effect for every event. However many a times we can not really conclude what the real cause of a particular event is. Thus it is a worthless exercise to try to find the cause for everything. It is generally sufficient to understand that the real cause might be our own action in the past. Certainly it not the God who is causing us to suffer. He has made the rules for the whole world. He can never be partial to any particular being. It is purely a misconception to think that the God is causing troubles for us.


Tukarama Maharaja is putting stress on this point in the first and second lines of the Abhanga. Further he says in the third line that we should understand the above said points, and do not feel unhappy , should not grieve,  etc since this is the characteristic of our worldly living.

One question that appears in mind is :- Since our Sanchita is causing all these pains, troubles etc; what is place for Effort in one's life? Is there no other way to overcome or reduce the intensity of pain? In short can one not put any efforts? Will such efforts be useless?

Sant Tukarama Maharaj tells us in the last lines of the Abhanga to recite the name of God( नामस्मरण ) for this purpose.
Incidentally Sri.Sharadamata of Belur Math ( Ramakrishna Mission ) in her saying has said that “ By doing namasmarana( नामस्मरण ) definitely the intensity of troubles will reduce. You may get a pinprick instead of a major injury from an Axe.)

Else where Sant Tukarama Maharaj has also advised us to put efforts since mind is controlling our every emotion. Doing Namasmarana ( नामस्मरण) is one such efforts . In fact Sri.Samartha Ramadasa is of the opinion that putting the efforts in the right direction is most important whether that is for Material welfare or For Spirituality is individuals choice.

In my opinion the nature of this effort to be put by us is something like this :

We all have experienced that sometimes we do some actions such as loose talk, or lifting a heavy weight beyond our capacity, or giving commitment for doing something . But then we fail in doing the assured task . We are then rebuked or blamed as well. And this brings mental agony or pain.to our mind.
There can be many examples like this.
After facing this kind of situation , we think and say to ourselves later “ Oh! I should not have done this.
“. But once the Arrow leaves the Bow , the damage is certain to happen.”

Classic example is of King Dasharatha giving two promises to his wife Kaikai . He regretted that action when she asked that lord Sri Rama should go away for 14 years.

However if we develop a habit of thinking about the results before doing an action many troubles and regrets will be avoided.

We have been blessed by God with the special faculty of thinking before doing any action. Most of us would not have not paid much attention to develop this habit. If we develop this habit then certainly we will use it to the maximum. This certainly requires great efforts to be inputted by us. It is not a one time process but will have to be practiced throughout our lifespan. This effort may avoid some of the problems and troubles

But still the troubles do come and hence the last two lines of the abhanga give the necessary guidance of doing every action along with NamasmaraNa
( नामस्मरण ) and leave the results for Him to decide.

This appears to be the teaching this abhanga gives us.

ह्या पुढे अभंगाचे मराठी स्पष्टीकरण दिलेले आहे.

8th Abhanga posted in " Abhanga a week of Sant Tukarama." Dt. 20-09-12 at
blog address : http:// tukaramasteachings.blogsopt.com .

Abhanga 8 : Date 20-09-2912 Cause for Birth
Readers may give their comments in the field provided in the blog or send email on address :- rphadke45@yahoo.co.in.

जन्मा येणे घडे पातकाचे मूळ । संचिताचे फळ आपुलिया ।। १ ॥
मग वांयाविण दु:ख वाटो नये । रुसोनिया काय देवावरी ॥ २ ॥
ठाउकची आहे संसार दु:खाचा । चित्ती सिण याचा वाटू नये ॥ ३ ॥
तुका म्हणे त्याचे नाम आठवावे । तेणें विसरावे जन्म दु:ख ॥ ४ ॥

अभंगाचा शब्दार्थ :
आपण आपल्याच संचिताची फळे भोगण्यासाठी जन्म घेतो.॥ १॥
म्हणुन जर कांही दु:ख वात्याला अले तर देवावर रागावण्यात काय अर्थ आहे ?॥ २॥
तेंव्हा हा संसार दु:खमय आहे याचा विचार मनात आणून उगाच कष्टी होऊ नये ॥ ३॥
तुका म्हणतो की ज्याला जन्म दु:ख विसरायचे असेल त्यान नामस्मरण करावे ॥ ४॥

अभंगामागची भूमिका :
अभंगाच्या सुरवातीलाच तुकाराम महाराजांनी "संचित " हा शब्द उपयोगांत आणला आहे. ह्या शिवाय अनेक ठिकाणी कर्म हा शब्द सुखदु:खावर विवरणांमधे येतो. कर्म म्हणजे व्यक्तीने केलेल सर्व कार्य.
तत्वज्ञानाप्रमाणे प्रत्येक कर्माचे फळ हे अवश्य मिळते.
अनेक जन्मांमधे एकत्र साठलेली अशी कर्मफळे म्हणजे संचित असे म्हणता येते. ह्यांपैकी प्रारब्ध म्हणजे जे फळ आपल्या ह्या जन्मांत मिळते ते आणी आगामी म्हणजे जे कर्म केल्यावर फळ भविष्य़ात मिळ्ते ते कर्म.

आपल्या सर्व संतांनी सांगितले आहे की जेंव्हा माणसाला आत्मज्ञान होते तेंव्हा त्याच्या संचित व आगामी कर्मफळभोगांचा नाश होतो. अर्थात आत्मज्ञान झाले की संचिताची व आगामीची फल देण्याची शक्ति संपते.
ह्यासाठी भाजलेल्या बी चा दृष्टांत आहे. भाजली गेलेली बी कधीही नवे रोप जन्मास घालू शकत नाही तसेच आत्मज्ञान झाल्यावर संचिव आगामी दोन्ही फळे देवू शकत नाहीत.यांचे होते. उरते ते ते प्रारब्धाचे फळ. ते मात्र मृत्यूपुर्वी भोगून संपते. मग कांहीच उरले नसल्याने जन्माचे कारणच रहात नाही . ह्यालाच मोक्ष म्हणतात.

प्रसिद्ध भजगोविंदम्‌ स्तोत्रमधे आचार्य शंकराचार्य म्हणतात
कुरुते गंगा सागर गमनम्‌ । व्रत परीपालन अथवा दानम्‌ ॥
ज्ञानविहीनं कर्म अनेन । मुक्तिर्नभवती जन्म शतेन ॥ This stanza has the
जोवर आत्मज्ञान होत नाही तोवर मुक्तिची शक्यताच नाही. हेच सत्य श्रीमद्‍ भगवद्‌गीतेमधे पण सांगितले आहे. संत तुकारामांचे पण हेच मत आहे.

आधीच्या अभंगाचे विवरण पाहीले ( अभंग ७) तर हा मुद्दा तेथे पण आला होता. आपण सतत सुख व दु:खाच्या चक्रामधे फिरत असतो. आपली शास्त्रे ह्याचे कारण काय सांगतात तो भाग खालील प्रमाणे आहे.

आपल्या सर्व कृती ह्या स्वत:च्या " मी" म्हणजे मी कर्ता ह्या विचारांत घडत असतात. असेच आपण पुर्वीच्या अनेक जन्मांमधे करत आलो आहोत. केलेल्या कर्मफळाच्या ईच्छेनुसार संचित निर्माण झाले. त्याची बरीच फळे आपण ह्या जन्मात दु:ख रुपाने भोगत आहोत.


कर्माचा हा सिध्दांतच आहे की प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ भोगावेच लागेल. सर्व कांही ह्या नियमानुसार आपल्या ह्या दृश्य जगामधे चाललेले आहे आपण कांही फळे ह्या जन्मी भोगतो तर कांही फळे पुढे केंव्हातरी नक्कीच भोगावी लागणार आहेत. त्यासाठी कोणतातरी जन्मपण घ्यावा लागणारच हे उघड आहे.

असेही शास्त्रे म्हणतात की जशा वासना म्रूत्युसमयी उरलेल्या असतात त्यावासनापुर्तीसाठी जे शरीर तसे शरीर जीव धारण करतो व मग कर्मफळे भोगतो. जीवात्मा माणसाचे, राक्षसाचे अथवा कोठ्ल्यातरी किडे वा प्राण्याचे शरीर अशा कारणांमुळे धारण करतो
अभंगची शिकवण :
तुकाराम महाराज म्हणूनच पहिल्याच चरणामधे म्हणतात की जन्म घेतला की सुख दु:ख हे भोगावेच लागणार आहे.
तसेच सर्वच संतपुरुष म्हणतात की आपल्याला "मी कॊण आहे ? “ ह्याचे म्हणजे स्वस्वरूपाचे विस्मरण झाले आहे व हीच सर्वांत मोठी चूक आपल्याकडून घडली आहे.
त्यामुळे आपण स्वत:पेक्षा भगवंत हा वेगळाच समजत आहोत. हरकत नाहि पण भगवंताला विसरणे हे मुख्य पाप आपण करत आहोत. स्वत:ला वेगळे समजण्यामुळेच आपण जन्म-मृत्यु चक्रामधे अडकलेलो आहोत.

मागे पाहिल्याप्रमाणे आपले मनच आपल्याला मदत करणारे असते. सर्वसाधारणत: प्रत्येक घटने मागे कांहीतरी कारण नक्कीच असते अशी आपली समजूत असते . पण बरेच वेळा कारण काय असावे हे आपल्याला प्रयत्न करूनही कळत नाही. खरेतर अशी कारणे शोधणे व्यर्थ असते. आपल्या पूर्वी केलेल्या कांही कर्मामुळे सुद्धा घटना घडलेली असू शकते. एवढे नक्कीच म्हणता येईल की भगवंत कांही मुद्दाम आपल्याला दु:ख देत नसतो. तो तर सर्व विश्वाचा निर्माता आहे. सर्व विश्वाचा कारभार त्याच्या नियमांप्रमाणे चालत असतो व आपण सारी त्याचीच मुले आहोत म्हणून तो कोणा एकावरच रागावला हे शक्यच नाही.
तुकाराम महाराज ह्याच मुद्द्यावर प्रथम भर देत आहेत. ते पुढच्या चरणामधे म्हणतात की माणसाने हे समजून घ्यावे व दु:खामुळे व्यथित होऊ नये. ह्या जगाच्या नियमानुसार आपल्यालापैकी प्रत्येकस हे सर्व दु:खभोग भोगावे लागतात.

येथे एक प्रश्न मनामधे येतो तो हा की : - जर संचिता प्रंमाणेच सर्व कांही दु:खे येत असली तर मग त्यामधून मुक्त होण्यासाठी प्रयत्नांचे मह्त्वच राहात नाही!. मग कांही उपायच उपलब्ध नाही कां? कमीतकंमी दु:खाची तीव्रता कंमी होईल असातरी उपाय आहे कां? थोडक्यात म्हणायचे झाले तर प्रयत्न करायचेच नाहीत का? प्रयत्न केले तर त्यांचा कांही उपयोग होतो कां?

संत तुकाराम महाराजांनी ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर अभंगाच्या शेवटच्या चरणामधे दिले आहे.
ते म्हणतात की उपाय आहे तो म्हणजे नामस्मरण करणे
श्री.रामकॄष्ण संघाच्या श्री.शारदामातेने पण हाच " नामस्मरणाचाच" उपाय सांगितला आहे माताजी म्हणतात की " नामस्मरण केले तर होणाîrÉÉ दु:खाची तीव्रता कमी होते. जर मोठ्या शस्त्राचा धाव होणार असेल , त्या ऐवजी सुई टोचेल व तुमचा भोग संपेल.

इतर अनेक अभंगांमधे तुकाराम महाराज सांगतात कि प्रयत्नपूर्वक मनावर ताबा ठेवा . सर्वात उत्तम नामस्मरण करणे होय. संत रामदास स्वामी तर म्हणतात की योग्य प्रयत्न करणे मह्त्वाचे मग ते ऐहीक सुखासाठी असोत वा पारमार्थिक कारणासाठी असोत. काय करायचे व कशासाठी हे निवडण्याची प्रत्येकाला मुभा आहे.
माझ्या मते हे प्रयत्न साधारणत: खालीलप्रमाणे असायला हवेत :-

आपण अनेक वेळा नकळत भारी वजन उचलतो व पाठीस दुखणे स्वता:वर ओढवून घेतो, कधी नको ते बोलतो व त्यामुळे दु:ख भोगतो, किंवा गरज नसताना कांही करण्यचे आश्वासन देतो व नंतर याचा पश्चाताप होतो कारण दिलेला शब्द पाळता येत नाही. मग अर्थातच लोकांचे शिव्याशाप ऐकावे लागतात..
कोणी रागवले ते ऐकून घ्यावे लागते. अनेक उदाहरणे देता येतात.
.असे घडले की आपण स्वता:लाच सांगतो की असे व्हायला नको होते. पण धनुष्यामधून सुटलेला बाण परत घेता येत नाही हेच खरे.

दशरथ राजाने असेच तीन वर कैकेयीला विचार न करता दिले व पुढचे रामायण घडले. रामप्रभूंना १४ वर्षे वनवासात जावे लागले.
पण जर आपण पुढे काय होईल ह्यावर विचार करून काम केले तर असे बरेचसे प्रसंग टळता येतात.
ही विचार करण्याची सवयच लावून घ्यावी लागते. भगवंताने म्हणुनच माणसाला विवेक बुद्धी दिलेली आहे. पण आपण त्याकडे पुरेसे लक्षच दिले नव्हते. ही विचार करण्याची सवय लावण्यास पण बरेच प्रयत्न करावे लागतात. जन्मभर हे प्रयत्न सातत्याने सुरू ठेवावे लागतात.

अर्थात तरीहि दु:खे ही येतातच व म्हणूनच नामस्मरण करणे आवश्यक आहे. त्याचे जे फळ मिळायचे ते भगवंत देईलच ही श्रद्धा धरूनच नामस्मरंण करावे असे हा अभंग शिकवतो अशी माझी धारणा आहे.

.





.




1 Comments:

At September 23, 2012 at 3:40 AM , Blogger Ravindra G.Phadke. said...

A question was raised as follows:-

" Can you elaborate on Agami Karma.I am getting confused on this one.How can the Agami Karma get accumulated , when no action is done or thought of."

Answer:

Agami Karma are the Karmas Actions that will be done in future. These have not been done at the moment. These are all actions that will/may happen in future as the situations will demand.

When a person has been liberared: then any actions which he does after attaining the liberation are not going to cause any binding for such a liberated person. thus the fruits of all the Agami Karmas do not get accumulated for a liberated soul.Thus liberation is the most coveted state.

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home