Saturday, August 4, 2012

1st Abhanga : available at http://www.blogger.com/blogger.g?blogID=5916127941578823809#editor/target=post;postID=6295479155339746201

         Post no 1: का  रे  नाठविसी कृपाळू देवासी । First Abhanga 

का  रे  नाठविसी कृपाळू देवासी । पोसितो   जनासी  एकला तो || 1 ||
बाला  दुध कोण करिते उत्पत्ती । वाढवी  श्रीपती सवे दोन्ही  ||  2  ||
फुटती तरुवर उष्णकालमासी । जीवन  तयासी  कोण घाली || 3 ||
तेणे  तुझी  काय  नाही  केली चिंता । राहे त्या अनंता आठवूनी  || 4 ||
तुका म्हणे ज्याचें  नांव  विश्वंभर । त्याचें  निरंतर  ध्यान करी || 5|| 

Verbatim Meaning : 
O Man! Why are you not remembering the all compassionate merciful God? He alone is taking care of  the welfare of all the beings in this universe.|| 1  || 
Think again! Who created the milk for a new borne baby? He whom we call as Shripati takes care of both the mother and the child.||  2  ||
The trees and Plants grow even in the summer times.Who  waters  the plants and trees for their survival in the scorching hot summer days?||  3  ||
Is He not taking care of your welfare.? Live this life remembering that Infinite Consciousness || 4 || .
Tuka says that his name is Viswambhar . Always meditate on Him. ||  5  ||

Background Information that will help us to understand the teaching of this abhanga:
a) For whom is this Abhanga addressed?:-
If we observe  the life style of the people living around us,it can be seen that almost everybody is concerned only about four main  aspects of life namely Food, Sleep, Fear and Sex drive.meaning that the major wants or desires are for the Material Wellness i.e.Material wealth, enjoyments for the body pleasures, attachment to one's family and one's body as well. Nothing else generally matters . 

However one also experiences that all his/her desires and wants are never satisfied. In fact the pleasures or pains both are short lived. Everyone naturally wants only the pleasure and never the pains. This is a peculiar characteristic of all the desires. We do not notice it .

The result is that whole lifetime is spent in chasing the different desires appearing in our mind from time to time.
Some  people do have the concept of GOD. They   remember  God since they expect that the God will give them whatever they desire., remove all the sufferings.

Our Shastras call the persons by the name " बद्ध "  meaning " Bounded One" .Living the lifetime this way causes one to get bounded in the unending cycle of Birth-death-Birth-death .... and so on.
This Abhanga is addressed to all such persons.
b) Who is the GOD addressed in this Abhanga?
To get answer to this question , let us consider the Universe around us, experienced by us.
First take an example of a simple Wristwatch>
The creator of the watch is someone who knows a) How the watch should function. b) How long it will last .
c) What processes one has to employ to make the watch. d) what materials have to be used. and soon.
This watch creator is knowing everything  about watch.
creatSimilarly our Universe which we experience thru the five sense organs and our intelligence, must have been createded by some unknown entity. This universe is very very large.It contains a number of stars, galaxies. Our Sun is just one small object in the infinite universe.Our home planet Earth is like a spec of dust with respect to the size of the universe.  Astronomers have used the objects such as Hubble Telescope to measure the depth of our universe and have concluded that measuring the size is beyond the capability of Man.
The creator of our universe is the one  whom we call GOD. .What we have just discussed is also called " Infinite " i.e. "विराट स्वरूपी  " of God..Though this name is for the visible attribute, there are innumerable attributes of God..
The complete operation of the universe is happening with a set of rules. Stars don't collide.The sun rises at the same time everyday. That is why God is called Omniscient (सर्वज्ञ )
 We also experience the devastating effects of Storms, Tsunamis etc.The force of these is brutally very strong.Since God controls these he is called Omnipotent( सर्वशक्तिमान ).
The third aspect of God is Omnipresent( सर्वव्यापी ) meaning that he is present everywhere.
Since we can not perceive Him with our limited senses ( we can not even see the complete spectrum of light. we can not see Infrared rays or Ultraviolet rays) He is said to be Without Shape. ( निराकार) .

Sant Tukarama's other Abhangas tell us that the God is Formless ( निर्गुण ) as well as With form.( सगुण) . We will be reading some of these in future pages.

At this stage it is sufficient to know that "
There are innumerable attributes and thus the God has innumerable names.The name of the God is also called "Nama". It is the Nama that enables us to communicate with the God..

As can be seen the name Vishwambhara"  विश्वंभर  " is one of the many names. But it aptly represents one of the many of the the true aspects of the God namely Omnipresent attribute.(सर्वव्यापी ).
Tukaram Maharaj has therefore addressed Him as " Vishwambhara and  Anant "( विश्वंभर  and  अनंत ) in this abhanga.

Teaching of this abhanga is now clear and is as follows.:
Tukaram Maharaj is advising us that we should always Meditate on this Vishwambhara ( The Omnipresent God) .

A simple method to do this day in and day out is 
a) To recite  any one of His nama such as  "ओम  नम : शिवाय , श्रीराम जयराम  जय जय राम , or any name we like.   
b) Always think that everybody else is also our Lord .Treat Him accordingly with respect.
c) Remember that God only inspires us for every action we take.Our inner voice always guides us properly. Learn to listen to that Inner Voice.
d) Do every work as a Prayer or Offering to the God. Since He is Omniscient ( सर्वज्ञ ) . He will give us what we need. Accept that result  with Pleasure.
Further text is the meaning in Marathi .



का रे नाठविसी कृपाळू देवासी । पोसितो जगासी एकला तो ॥ १॥
बाळा दुध कॊण करिते उत्पत्ती । वाढवी श्रीपती सवे दोन्ही ॥ २॥
फुटती तरूवर ऊष्णमासकाळी । जीवन तयांसी कोण घाली ॥ ३॥
तेणें काय केली नाही तुझी चिंता । राहे त्या अनंता आठवूनी ॥ ४॥
तुका म्हणे ज्याचें नांव विष्वंभर । त्याचें निरंतर ध्यान करी ॥ ५॥

अभंगाचा शब्दार्थ :-

अरे सज्जन माणसा तू कृपाळू देवाला कांआठवित नाहीस?\ तोच सर्व जगाला पोसतो आहे॥ १॥
मला सांगा की नवजात बाळासाठी आईकडे दुधाची उत्पत्ती कोणबरे करते? श्रीपतीच आई व बाळ दोघांनाही वाढ्वित आसतो॥ २॥
प्रखर उन्हाळा असताना तरुवरांना पालवी फुटते. त्यांना पाणी कोण बरे घालते? ॥ ३॥
त्याला ( भगवंताला ) काय तुझी चिंता वाटत नाही? त्या अनंताला आठ्वून जीवन जगावे॥ ४॥
तुका म्हणतो की त्यचे नांव विश्वंभर आहे . त्याचे नेहमी ध्यान करावे ॥ ५॥

अभंगाचा अर्थ समजण्यासाठी लागणारी कांही माहिती :-
) हा अभंग कोणासाठी लिहिला आहे?
जर आपण लोकांची जीवन जगण्याची पद्धती पाहिली तर असे आढळते की बहुतेक सर्वच जण जेवण ( भोजन) झोप (निद्राभीती (भय) व प्रजोत्पत्तीचे साधन विषय व त्याचा आनंद घेणे ; ह्यातच आपले सर्व जीवन व्यतीत करत असतात. ह्याच सर्वांच्या मुख्य वासना असतात. या शिवाय संपत्ति मिळावी, जगातली सर्व सुखे भोगण्यास मिळावी हीच सर्वाना असणारी वासना असते. सर्वच जण स्वत:चे कुटुंब , शरीराला भोग देणे , ह्या सर्वासाठी पैसा मिळवणे ह्यातच गुंग असतो
म्हणजेच मुख्य गरजा ह्या भौतिक संपत्तीसाठी अथाक प्रयत्न करणे , शरीराला ज्याद्वारे आनंद मिळेल ते करणे, फक्त स्वत:वर व स्वत:च्या कुटुंबावर प्रेम असणे ह्या असतात व त्यामुळे इतर कसल्याचबाबींचे महत्व नसते( इतर बाबींवर फारसा विचारच केला जात नाही .
ह्याचा परीणाम म्हणजे अशी माणसे जन्मभर  ह्या सर्वांचीच चिंता करत जगतात. सतत निर्माण होत असलेल्या वासनापूर्तीसाठीच जन्म वाया घालवतात,.
अशा लोकांपैकी कांहींना देवाची कल्पना असते. साधारण पणे देव हा आपल्या सर्व ईच्छा पुर्ण करणारा, आपल्याला संकटसमय़ी मदत करणारा , आपली सर्व दु:खे दूर करू शकणारा असा आहे हीच कल्पना देवाबद्दल असते. ह्यासाठीच देवाची पूजाअर्चा , होमहवन ईत्यादि अनेक कर्मे लोक करताना दिसतात..

अशा वासनापुर्तीसाठीच जगणारे जे असतात त्यांना आपल्या शास्त्रांमधे "बद्ध" असे म्हटलेले आहे. बद्ध म्हणजे बंधनात असलेला. हे बंधन जन्म-मृत्यु-जन्म -मृत्यु ह्या चक्रामधे अडकल्याले आलेले असते. ज्या वासना व ईच्छा ह्या जन्मामधे पूर्ण होत नाहीत त्या पूर्ण व्हाव्या म्हणून जीवाला पुन:पुन: जन्म घ्यावे लागतात. नव्या जन्मामधे नव्या वासना निर्मान होतात व चक्र सुरू राहते.
तुकाराम महाराजांचा हा अभंग अशा बद्धांसाठीच लिहिलेला आहे.

) देव म्हणजे कोण? देव ह्या कल्पनेचा अर्थ काय आहे?
वरील प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसणाîrÉÉ , अनुभवास येत आहे त्या जगाचाच विचार करणे सोपे असते. तसा आता करूया.

प्रथम, आपण रोज वेळ मोजण्यासाठी वापरतो;  त्या घद्याळाचेच उदाहरण येथे घेऊया.
हे घड्याळ कोणितरी निर्माण केले आहे. त्या घड्याळाच्या निर्मात्याला हे ठावूक असते की १) घड्याळ कसे चालेल! घड्याळ किती काळापर्यंत टिकेल? ) घड्याळ निर्मितिसाठी कोणती सामग्री, यंत्रे वापरावी लागतील? ) घड्याळ तयार झाले की कसे दिसेल? ईत्यादी घड्याळाच्या बद्दलची पूर्ण व सर्व माहीती घड्याळाच्या निर्मात्याला असते.
थोडक्यांत म्हणायचे झाले तर असा घड्याळाचा निर्माता हा घड्याळाबद्दल " सर्वज्ञ" असतो.

ह्याच दृष्टांताचा उपयोग करून आपण हेच प्रश्न ह्या दृश्य जगाबद्दल पण करू शकतो.
आपण ह्या जगाचा अनुभव आपली पंचेंद्रीये व मेंदू, बुद्धी, मन यांच्याद्वारे सतत घेत असतो. जर आकाशाकडे नजर टाकली तर आपल्याला हे आढळते की आकाशांत अनेक ग्रह, तारे आहेत. आता आपल्याला विज्ञानामुळे हे पण कळले आहे की आपला सूर्य हा असाच एक अगदी छॊटासा तारा आहे. खगोल शात्रज्ञांनी "हबल " दुर्बीणीद्वारे आकाशाचा वेध घेतला तेंव्हा हे पण समजले की आपली पृथ्वी ही ह्या पसाîrÉÉत एखाद्या मोहरीएवढी लहान आहे. शास्त्रज्ञाना हे पण कळले आहे की आपल्याला विश्वाच्या आकाराबद्दल कल्पनाच करता येणार नाही.

हे विश्व ज्याने निर्माण केले आहे त्यालाच आपण " देव" असे संबोधत असतो. देव हा ह्या विश्वापेक्षा आणखी मोठा आहे हे ओघाओघाने आलेच. त्याच्या ह्या दृश्य स्वरूपालाच " विराट " ही संज्ञा शास्त्रे वापरतात असे ढोबळपणे म्हणता येते.
तसेच हे पण लक्षांत घ्यायला हवे की विश्वाचे सर्वच व्यवहार कांही ठराविक नियमांप्रमाणेच चालत असतात. सुर्य नियमितपणे एकाच वेळी उगवतो. ग्रहतात्यांच्या आखलेल्या कक्षांमधेच फिरत असतात व एकमेकांवर आदळत नाहीत.
हे नियम देवानेच केले आहेत व त्याला म्हणुनच " सर्वज्ञ " म्हणतात.

आपल्याला त्सुनामी , वादळे यांच्या मुळे होणारे नुकसान केवढे मोठे असते ते नेहमीच पहायला मिळते. निर्सगाच्या ह्या शक्तीचा ठावच लागत नाही . त्यांच्या निर्मात्या देवास म्हणुनच " सर्वशक्तिमान " असे पण विशेषण आहे.

असा हा देव ,म्हणजेच भगवंत सर्वत्र आहे. तो अव्यक्त स्वरूपात आहे व आपल्याला आपल्या पाचही इंद्रियांद्वारे त्याला पाहाता / जा्णता येत नाही. आपण साधे अतीनील ( Ultraviolet Rays) किरण xÉÑ®É पाहू शकत नाही. ½ÉirÉÉcrÉÉ uÉæÍzÉwœÉqÉÑVåû irÉÉsÉÉ “ ÌlÉUÉMüÉU” AxÉå mÉhÉ qWûhÉÉiÉÉiÉ.
pÉaÉuÉÇiÉ WûÉ AÉMüÉU ÌuÉMüÉU UÌWûiÉ AÉWåû qWûhÉÑlÉ irÉÉsÉÉ “ ÌlÉaÉÔïhÉ “ AxÉå mÉhÉ qWûhÉiÉÉiÉ. WåûcÉ ÌuÉzÉåwÉhÉ iÉÑMüÉUÉqÉ qÉWûÉUÉeÉ irÉÉÇcrÉÉ CiÉU ApÉÇaÉÉqÉkÉå pÉaÉuÉÇiÉÉxÉÉPûÏ qWûhÉiÉÉiÉ/ uÉÉmÉUiÉÉiÉ. mÉhÉ MüÉÇWûÏ ApÉÇaÉ mÉÑढे MåÇüuWûÉiÉUÏ mÉÉWûhÉÉUcÉ AÉWûÉåiÉ.

सध्यापुरते एवढेच म्हणणे पुरेसे आहे की pÉaÉuÉÇiÉÉsÉÉ ½É iÉÏlÉ ÌuÉzÉåwÉhÉÉDzÉUå AÉåVûZÉhrÉÉcÉå mÉërÉ¦É MüUiÉÉ rÉåiÉÉiÉ.
pÉaÉवंÇiÉÉcÉå AxÉÇZrÉ aÉÑhÉ AÉWåûiÉ. त्याला आपण आपल्या सोयी साठी सगुण रूपामधे पाहातो. त्याची सगुणरुपातली  अनंत नावे आहेत. भगवंताचे कोणतेही नांव आपल्याला त्याच्याशीच  जोडते.

ह्या अनेक नांवांमधलेच एक नांव " विश्वंभर " हे आहे. हे नांव भगवंतच सर्वत्र आहे हे दर्शवणारे आहे .त्याचे सर्वव्यापित्व पण हेच नांव दाखवते.. तुकाराम महाराजांनी म्हणुनच अभंगामधे त्याला विश्वंभर व अनंत ह्या  नामांनी संबोधले आहे.

ह्या पार्श्वभूमीकेवरून आता आपल्याला अभंगाचा अर्थ व शिकवण पाहाता येते.

अभंगाची शिकवण :-
तुकाराम महाराज आपल्याला हेच सांगत आहेत की आपन भगवंताला कधीही विसरू नये. त्याचेच  विश्वंभर हे रुप धरून त्याचे ध्यान व स्मरण नित्य करावे.

हे करण्याची सोपी पद्धत खालील प्रमाणे आहे असे म्हणता येते.
) त्याचे कोणतेही नांव घेऊन  त्याचे स्मरण करावे. जसे "ॐ नम: शिवाय" , श्रीराम जय राम जय राम " किंवा आपल्याला आवडते ते कोणतेही नाम घेतलेले  चालेल.
) सर्वांभूति तोच नटला आहे हे समजून सर्वांशीच प्रेमाने वागावे.
) भगवंतच आपल्याला कोणतेही कार्य करण्याची प्रेरणा व शक्ती देत असतो. आपल्या
अंतर्मनाद्वारे तो नेहमीच आपल्याला योग्य ती दिशा दाखवत असतो. म्हणुन अंतर्मनाचा आवाज ऐकावा.
) प्रत्येक काम हे त्याची पूजाच आहे ह्या भावनेने करावे. तो सर्वज्ञ आहे त्याला तुमची अशी पूजा आवडते. आपले भले कशांत आहे हे तोच जाणतो म्हणुन जे मिळेल ते फळ आनंदाने स्विकारावे.

अभंगावर आलेले मतप्रदर्शन :
श्री. अजित देशमुख  म्हणतात :-
तिनही अभंगामधे तुकारामाने reciting म्हणजे "ॐ नम: शिवाय" , श्रीराम जय राम जय राम किंवा Sharavana( श्रवण) Manan( मनन ) Nididhyaasa ( निदिध्यास) perform the worship in the form of namasmarana (नामस्मरण ) सांगितले आहे. कुठेही पूजापाठ करण्याचा उल्लेख नाही (ज्याच्यात बराच वेळ जातो )

श्री.. जयराम म्हणतात की :-
आपल्याकडे मोक्षा चे फार महत्व आहे जणु बाकी सर्व क्रिया करणे चूकच आहे असा समज असल्यासारखे. एका गुरुजींनी मला सांगितले , दाखवून दिले की हिंदु धर्माच्या तत्वज्ञाना प्रमाणे धर्म , अर्थ, काम हे पुरुषार्थ केल्यानंतर चौथ्या पुरुषार्थाची म्हणजे मोक्षाची पाळी येते. पहिले तीन जीवनाचा पाया भक्कम करतात. त्यातील पहिला क्रमांक धर्माचा. धर्म नीती न्यायाने जगणे शिकवतो. धर्म हाच स्वस्थ समाजाचा मुख्य आधार होय. ह्यानंतर अर्थाचा क्रमांक लागतो. जीवन समृध्द होण्यासाठी अर्थाचा पाया भक्कम हवा. शरीर पण तंदुरुस्त हवे त्यासाठी पण अर्थ साथ देतो. काम भावना ही सहज भावना आहे. कामापासून पाठ फिरवणे कठीण कार्य असते. जसे एखादा म्हणेल की मी दारू पीत नाही पण मनामधे मात्र पिण्याची इच्छा असते तसेच कामाचे आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात की थोडेसे ह्यांच्या आहारी गेले तर हरकत नाही पण त्यांच्यावर ताबा असायलाच हवा. असे करणे जमले तरच माणसाला मोक्षाचा विचार करून त्यासाठी प्रयत्न करता येतात. मोक्षाच्यामागे लागून बाकीच्याकडे दुर्लक्ष करणे अयोग्यच आहे.
मी संत-महात्म्यांच्या वचनांवर टिका करीत नाहिये. त्या सर्वांचे जीवनचरीत्र आपल्याला हेच शिकवते की माणसाने खरे जागे व्हावे, पहिल्या तीन पुरुषार्थांकडे पाठ फिरवू नये तसेच मोक्षालाही विसरू नये.

वर लिहिलेल्या मतांवर माझे मतप्रदर्शन खाली देतो आहे :-
) मलापण असे वातत होते की आपण पूजा पाठामधे उगाचच व्यर्थ वेळ वाया घालवतो. पण कोणतीही साधना ही नियमितपणेच करायला हवी हे पण खरे महत्वाचे आहे. त्यासाठी विशिष्ठ वेळ रोजच द्यायला हवा. सकाळची वेळ ही साधने साठी सर्वोत्तम असते. तसेच आपण कोणाची पूजा करतो आहोत हे समजणेपण तितकेच महत्वाचे असते. आपण पुजा करतो ती एखाद्यामूर्तीची, एखाद्या चिन्हाची करतो. ( जसे ॐ) . पुजेमधे काय किंवा ध्यानात काय आपले मन भगवंतावर स्थिर झाले पाहीजे. स्मरणभक्तीत असे सातत्याने भगवंतावर मन ठेवणे सोपे जाते. पण मनास इकडे तिकडे धावण्याची खोड असते. त्यावर ताबा मिळवणे तसे कठीणच असते. ह्यासाठीच पुजा पाठ करा असे आपले पूर्वज व शास्त्रे सांगतात.

खरेतर येथे मला समर्थ रामदास स्वामींनी नामस्मरणाबद्दल काय सांगितले ते आठवले. पण ते लिहायचे झाले तर ३- ४ पानांचा मजकूर होईल. हा भाग पुढच्या post मधे लिहावा कां? वाचकांनी आपले मत कळवावे हीच येथे विनंती.

) मला हे म्हणणे पटते की "जागे व्हा" ही हांक, ज्यांनी धर्म , अर्थ, काम ह्यांना जीवनांत योग्य स्थान दिले आहे त्यांच्यासाठीच आहे.
भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणुनच अर्जूनाला सांगतात की युद्ध कर . तेच तुझे कर्तव्य आहे.
पण ही भुमिका बरच जण विसरतात. कदाचित्‌ त्याची जीवनशैली हे त्याचे कारण असेलआपल्या देशावर मोगलांनी मोठ्या क्रौर्याने राज्य केले. शंकराचार्य, ज्ञानेश्वर महाराज होऊन गेल्यावर मोगल आले. जवळजवळ  १६०० सालापर्यंत ५ शाह्या ( मोगल, बिदरचि शाही, कुतुबशाही, अदिलशाही, निजामशाही ) देशावरती राज्य करीत होत्या. लोकांना धर्मपालन करणे कठीण होऊन गेले होते. त्यामुळेच कदाचित मोक्षाच्या कल्पनेला महत्व आले असावे. नंतर तीच मनोवृत्ती झाली. मोक्ष मिळाला तरच ह्या जुलमी राज्यातून सुटका होईल अशी कल्पना असेल. अजूनही म्हणुनच सर्वांना मोक्षाचेच आकर्षण वाटते.

वैदिक धर्माप्रमाणे पहिले तीन पुरुषार्थ केल्यानंतरच माणसाला वानप्रस्थाश्रमात जायची परवानगी आहे हे विसरता येत नाही.
सध्याच्या दिवसांत वनांत जाण्याची आवश्यकता नाही. म्हातारपण आले की स्वत:ला अलिप्त ठेवले की झाले. विवेकानंदांप्रमाणेच महाराष्ट्रात समर्थ रामदास होऊन गेले. ते म्हणतात की माणसाने प्रथम स्वत:च्या प्रपंचातली सर्व कर्तव्ये नीटपणे करावी ( ह्यांत कुटुंब व देशासाठीची कर्तव्ये येतात) तसेच simulteneously   परमार्थाकडे  पण माणसाने लक्ष द्यावे. तरच जन्माचे सार्थक होईल.
हे कसे करायचे ते आपण अभंगाच्य़ा शिकवणीत पाहिलेच आहे.











0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home