Thursday, August 30, 2012

  
      
5th ABHANGA आनंदाचे डोहीं आनंद तरंग । 5th Date 30th Aug. 2012
मराठीत ह्या अभंगाचे स्पष्टीकरण ईंग्रजी स्पष्टीकरणानंतर दिलेले आहे.

आनंदाचे डोहीं आनंद तरंग । आनंदचि अंग आनंदाचे ॥
काय सांगो झालें कांहिचिया बाही। पुढे चाली नाही आवर्जून ॥
गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा । तेथिचां जिव्हाळा तेथे बिंबे ॥
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा जाला ॥

Transliterated version :

aanaMdaache DohIM aanaMda taraMga | aanaMdachi aMga aanaMdaache ||
kaaya saaMgo jhaale kaamhichiyaa baahI | puDhe chaalI naahI aavarjUna ||
garbhaache aavaDI maatachaa DohaaqLaa | tethichaa jivhaaLaa tethe biMbe ||
tukaa mhaNe taisaa otalaase Thasaa | anubhava sarisaa mukhaa aalaa ||

Verbatim Meaning :
( I have become) a deep pool of Bliss. In this pool the waves of Bliss are moving. My whole body is filled with nothing but Bliss. || 1 ||
It is not possible to describe what kind of happiness I am experiencing..All my desires are existing no more because of this experience of happiness. || 2 ||
In case of an expectant mother , what ever is the liking of the child in the womb; same is the craving felt by the mother. i.e.She craves for the same thing what the child in the womb likes to have.
This is because the nature of the child becomes the nature of the mother.|| 3 || .
Tukaramaa says that “ I am giving this example about my ( experienced ) feeling of Bliss .” I am expressing these impressions thru these words ( my speech ) || 4 ||

Background Information :
This abhanga is probably written by Sant Tukarama after his experience of the Divine. This is a very rare and UNIQUE experience. Here the Experiencer and Experienced are not present in the dual state. (We all others are living in the dual state where the GOD ( परमेश्वर ) is separated from us ( This is as per our experience.) This is the ultimate state of Knowledge as advocated by Vedas and Shastras , and all the Seers.

The personalities who attain this state , are called Jeevanmukta” (जीवन्मुक्त ).
Jeevanmukta ( जीवन्मुक्त ) generally is said to be living in the 4th state of body called Turiya Avastha (तुर्यावस्था ). In this state there is awareness of one's true nature (सच्चिदानंद स्वरुप ) and the waking state i.e. awareness of the surrounding world ( दृश्य )
When such a personality speaks something , the words spoken, written are the direct utterances of GOD( परमेश्वर ) . These are uttered for our welfare only and that too for helping us to become free from the bondage of Death-Birth-Death... cycle.



For us ( the otherwise Bonded ones,) Sant. Tukarama has described his own experience of Blissful state. We are Lucky to have this abhanga available for us.

What is the real nature of Bliss ? An enquiry made to get the answer leads us to get some idea about it. I am trying to write what I understood in the further paragraphs.

We are living in this world . Our body , when able to receive and recognise the information of objects in the external world thru five sense organs(eyes, ears, nose, skin and tongue) is said to be in the waking state.

To start with we can say that we experience five kinds of pleasures because of the information received thru these sense organs and due to the association of mind with these sense organs. .
Thus:
Thru eyes we see the beauty of things and that gives us a feeling of pleasure
Thru our nose we get smell . Some smells arise within us a feeling of pleasure.
Also thru our Touch sense organs we get different pleasures.
Thru our Tongue we get taste of the food we eat. That also gives us pleasure.
Thru our ears we enjoy nice music which also gives pleasure.
.
However some objects give us pleasure for more than one senses.
For example
An attractively arranged , decorated and nicely smelling food gives pleasure to our eyes,
nose and ofcource the tongue.( three different sense organs get pleasure almost at the same time.

One misconception is to think that the objects give us the pleasure. Some of the objects
such as a Rose flower, or Cake are physical in nature; while some objects like Music are not Physical objects .But one characteristic that is common is “All the objects are external to our senses. Music producing sound waves are external objects only .

Who is the real experincer/enjoy er ? :-
The real enjoy er is the Atman within us. In fact His nature is सत, चित, and आनंद
This clarifies why the same object does not give pleasure to everybody.

For example The western Rock music is enjoyed by many but not all. Those who have grown in the environment of hearing Hindustani Music many time are seen to criticize the same Rock music as “ NOISE” . This is because the Rock Music does not awaken in them the sense of pleasure.
Actually when the real feeling of Ananda ( आनंदा ) gets manifested in our heart , we experience pleasure. Happiness, Joy , etc are just different shades of the pure Bliss.



What Sant Tukarama is telling us thru this abhanga:-

Tukarama was a BrahmhdynanI (ब्रह्मज्ञानी) and only such a personality experiences the pure Bliss.. This is because He is free from all the fears ( including that of death). He is free of the cycle of transmigration ( cycle of birth-death-birth …), He loves every l living being This love does not demand anything in return. He is also in a position of controlling events occurring in the world. However he will not interfere in the general order of the world.
Most important is the literature that is spoken / written by Him .It serves as a guide to many generations on Righteous path and Right way of living. That is the nature of Sant Tulkaramas abhangas we are reading.

As per my interpretation of this Abhanga , Sant Tukarama is telling us that we can also attain/ experience this state of pure bliss in this very birth .

ह्या पुढे मराठीत ह्याच अभंगाचे अर्थस्पष्टीकरण दिलेले आहे.

ABHANGA 5th Date 30th Aug. 2012

आनंदाचे डोहीं आनंद तरंग । आनंदचि अंग आनंदाचे ॥१॥
काय सांगो झालें कांहिचिया बाही। पुढे चाली नाही आवर्जून ॥२॥
गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा । तेथिचां जिव्हाळा तेथे बिंबे ॥३॥
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा जाला ॥४॥

अभंगाचा शब्दार्थ :
मी पूर्णपणे आनंदाने भर्लो आहे. जणू आनंदाच डोहच झालो आहे. ह्या माझा आनंदाने भरलेल्या अंत:करणामधे उठ्णारे तरंग आनंदाचेच आहेत.. माझी स्थिती काय आहे हे सांगणे अशक्य आहे. आता कॊणतीच ईच्छा अंत:करणांत उरलेली नाही. गर्भीणी मातेला तेच खावेसे वाटते जे आंतल्य़ा गर्भाला हवे असते.कारण आई आणी मूल दोन्ही एकरूप झालेली असतात.तुका म्हणतो की मी माझ्या आनंदाचे वर्णन करतो आहे. शब्द पुरेसे नाहीत म्हणून दॄष्टांत देतो आहे ..

अभंगाचा अर्थ लागण्यासाठी आवश्यक कांही माहीती:

तुकाराम महाराजांनी जीवन्मुक्ति मिळाल्यावर त्या स्थितीत हा अभंग बहुतेक लिहीला असावा. जीवन्मुक्त साधू हे तुर्यावस्थेमधे नेहमी असतात. तुर्येमधे परब्र्हमाची जाणीव असतेच व शिवाय दृश्याचीही जाणीव जागी असते असे तुर्यावस्थेचे वर्णन आहे. ह्या अवस्थेतले साधू जे कांही बोलतांत ती साक्षांत परमेश्वरी वाणी असते. ही वाणी आपल्यासारख्या बद्ध जीवांचा उद्धार व्हावा जन्ममृत्यूचक्रामधून बद्धांची सुटका व्हावी म्हणूनच प्रकट झालेली असते.
तुकाराम माहाराजांनी ह्या शुद्ध आनंदमयी अनुभवाचे वर्णन ह्यासाठी केले आहे की आपल्यासारख्यांना योग्य प्रयत्न करून असा अनुभव घ्यायची ईच्छा व्हावी व मोक्ष मिळावा.

ह्या आनंदाचे स्वरूप काय व कसे आहे ? ह्या प्रश्नाचे उत्तर शोधायला लागल्यावर जे थोडेसे समजले तेच मी येथे पुढे लिहित आहे

आपण दृश्यामधे वावरतो आहोत. येथे आपल्याला ह्या दृश्याचे आपल्या पांच इंद्रियांद्वारे ज्ञान होते .ह्या अवस्थेला जागृतावस्था म्हणतात.

ह्या पंचेंद्रियांमुळे आपल्याला पांच वेगवेगळे आनंद मिळतात. खरतर बह्या सृष्टितली माहीती पंचेंद्रियांद्वारे आंत जाते . मन , अंत:करणाच्या कार्यामुळे आपल्याला विषयांचा आम्नंद अनुभवायला मिळतो.
डोळ्यांमुळे सौंदर्याचे ज्ञान व त्यामुळे आनंद मिळतो. नाकाद्वारे सुगंधाचे ज्ञान व आनंद मिळतो. त्वचेद्वारे स्पर्शाचा आनंद मिळतो. जीभेद्वारे ( रसना ) निरनिराळ्या रसांचा आनंद मिळतो. कानांद्वारे श्रवणीय संगीत भाषणे इत्यादीचा आनंद मिळतो.

कांही वस्तु अशा असतात की ज्या आपल्या एकापेक्षा जास्त इंद्रियांना आनंद देतात.
उदाहरणार्थ : उत्तम पिवळे धमक सुगंधी श्रीखंड डोळे, नाक व रसनेला आनंद देते.
अशा अनेक स्थूल वस्तुंपासून आपणाला आनंद मिळतो.

कांही वस्तु ह्या दृश्य म्हणजे स्थूल नसतात. त्या पण इंद्रियांना आनंद देतात. उदा: श्रवणीय गाणे, किंवा भजन सुद्धा कानांना आनंदच देते.

पण एकच वस्तू सर्व पाचही इंद्रियांना आनंद देते ती म्हणजे ब्रह्मानंद. बाकी कोणत्याही कडुन पाचही इंद्रियांना आनंद मिळू शकत नाही. हे ब्रह्मानंदाचे वैशिष्ठ्य आहे. असो.

हा आनंद कोणाला मिळतो ? कोण भोगतो?
ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे आपला अंतरात्मा च हा आनंद भोगणारा आहे. ह सत्‌ चित्‌ व आनंद स्वरूप आहे.
तसेच एखाद्या वस्तुपासून एखाद्याला आनंदाच लाभ होतो तर त्याच वस्तुपासून दुसरा  आनंद घेऊ शकत नाही .
कारण आनंद हा खरेतर आंतच असतो व वस्तुच्या निमित्तने तो बाहेर प्रगट होतो एवढेच
म्हणूनच आलापकारी हिंदुस्थानी संगीत एखाद्याला खूप आनंद देते पण ज्याला संगीतात रस नाही त्याला तेच संगीत आवडत नाही. आनंद प्रगटला तर आवडते अन्यथा नाही. असेच इतर भावनांबद्दल म्हणता येते. प्रेम, आनंद, वात्सल्याची भावना ईत्यादी सर्व आत्म्याच्या आनंदाचीच अनेक रूपे आहेत.

ह्या अभंगाची शिकवण :
तुकाराम महाराज हे ब्रह्मज्ञानी होते व अभंगात वर्णन केलेला आनंद हा ब्रह्मानंदच आहे यात काहीच संशय नाही. ब्रह्मज्ञानी हा जीवन-मुक्त असतो. मृत्युभय त्याला ठावूक नसते. तो जन्मम्रूत्यूच्या चक्रातून सुटलेला असतो. त्याला सर्वत्र भगवंतच आहे हा अनुभव सातत्याने येत असतो. ह्यामुळे तो सर्व विश्वावर प्रेमच करतो. हे प्रेम निश्च्काम असते.
ह्या प्रेमामुळेच तुकाराम महाराजांनी ह्या निखळ आनंदाचे वर्णन करुन तुम्ही पण प्रयत्न करा , ब्रह्मज्ञानी व्हा व असा आनंद अनुभवा हे सुचविण्यासाठी हा अभंग केला आहे

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home