Thursday, September 6, 2012

 


6th ABHANGA 6 :आता तळमळ । केली पाहिजे सीतळ ॥  Date 6th September 2012

अभंगाचे मराठीत स्पष्टीकरण ईंग्रजी स्पष्टीकरणानंतर दिलेले आहे.

आता तळमळ । केली पाहिजे सीतळ ॥ १ ॥
करील तें पाहें देव । पायीं ठेवुनिया भाव ॥ २ ॥
तोचि अन्नदाता । नाहीं आणिकांचि चिंता ॥ ३ ॥
तुका म्हणेव दासा । नुपेक्षील हा भरंवसा ॥ ४ ॥

Transliterated Version.

Aataa taLamaLa | kelI paahije sitaLa || 1 ||
karIla te paahe deva | paayI Thevuniyaa bhaava || 2 ||
tochi annadaataa | naahI aaNikaMchI chimtaa || 3 ||
tukaa mhaNe daasaa | nupekSila haa Bharavasaa || 4 ||

Verbal Meaning ( शब्दार्थ ) :

O ' my friends , you should now put efforts to make your mind quite( worry less) || 1 ||
Surrender at the Divine feet's of God and watch whatever He is doing with quiet mind.|| 2 ||
He is the one who provides everything for everyone. He is the one and only one King
( सत्ताधीश )3
Tuka says that He will never disappoint you ( by Taking care of your every need) .
This is definitely certain and sure .|| 4 ||

Background Information required for understanding this abhanga:

All our Sages and saints behave as they preach. Sant Tukarama is no exception for this and in fact there is another Abhanga in which he says “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले " meaning one should salute the ones who follow in their life , what they preach.

This Abhanga is written most probably after Sant Tukarama attained Liberation. Naradaa Bhakti sutras lists Nine Ways of Devotion. नवविधा भक्ति" . A Bhakta ( Disciple) is the one who has unconditional love for the God and who has surrendered himself to God.

All Bhaktis ultimately lead to the ninth on called “Atmanivedana” आत्मनिवेदन भक्ति". Srimad Bhagavadgeeta has a famous shloka which is as follows.
अनन्या श्चिंतयंतो माम ये जना: पर्युपासते। तेषां नित्याभि युक्तानां योगक्षेमं वहाम्यहम ॥
This shloka also stresses on the attitude of “ Complete Surrender “ संपूर्ण शरणागती ".. One who has thus surrendered completely automatically follows the ultimate bhakti  which is named “ aatmanivedana “ आत्मनिवेदन "meaning “ Offering oneself to God.” .

There are 3 ways in which the “ Atmanivedan “ happens in the life of the bhakta (Disciple )
  1. ( जड आत्मनिवेदन ): to have an Attitude “Whatever is there; all belongs to Him and not me.” He is the owner, not me” and to live with the attitude “ He is the doer , and I am just the medium thru which he does the things in this world “ Sri. Ramakrishna Paramhansa states “ He is the Driver and I am the Machine “ .
  2. (चंचळ आत्मनिवेदन ): To live with knowledge that the God is everywhere in every thing live or not live.( In the book Autobiography of A yogi by Swamy Paramahansa Yoganand has narrated the incident when he met the famous scientist Prof Jagadishchandra Basu and How the Prof. Demonstrated that proof the everything is alive.)
  3. (निश्चळ आत्मनिवेदन ): to understand that “All that is experienced by us is going to be destroyed some times,this includes our self also. Only God is Permanent
    शाश्वत. This is my real Swarupa.( सच्चिदांनन्द स्वरुपो अहम) .

The real seer actually continuously experiences all above and rest of us have to keep on reminding ourselves of the above points. That effort is definitely required to be put continuously with श्रध्धा Faith and one should be ready to wait for the golden moment to arrive (सबुरी.)

Teaching of this abhanga :

If we are sure and certain that our beloved God is taking care of every need of ours ; then naturally our mind will not get disturbed because somethings do not happen the way we want. Similarly if somethings happen the way we want we will not get overly disturbed because of happiness.
In fact we have to think and meditate upon the points above ;by looking at every incident in our life to get convinced of the truthfulness of the above details of Atmanivedana ( आत्मनिवेदन points listed.
This as per my own experience definitely makes the mind calm even if it gets disturbed for some time. ( If we see the incidents in Sant Tukaramas life it can be seen that He lived like this)

It is very easy to understand that God provides Food for every living being. For Man he has provided with the power of reasoning and thinking. Thus the Mankind has more responsibility for the aspects of provision of food for every living being. That is why
( दान ) giving something to the needy ( who do not have capability to earn their food themselves ) is given a very High status in the list of ( पुण्य कर्म ).


It is a very open truth that when we were born we did not bring along with us any material wealth . Also when we die we do not take any material wealth with us. All the wealth like various precious stones, Gold, etc is creation of God. So He is the real owner. He decides how  one earns and retains the so called material wealth. Classic example is of the Communist revolution in this century . Many landlord lost all their wealth . The story of Dr. Zivago is famous.Thus only He is the the real Owner of all the wealth is easy to understand.
It is our experience that many a times even if we have properly planned and executed the plan, the results are not as per our expectations.Many times we just give up and allow the things as they happen. If we understand that the whole  happens as per the will and wish of God, then at least we will not feel bad or unhappy.
In fact in Sri. Bhagavad-Geeta  Bhagvan Srikrishna preaches  Nishkama ( निष्काम कर्मयोग ) for this reason . Of course one should do his best and put all his efforts must not be forgotten.

Tukarama Maharaj says that if we surrender to Him totally the He never leaves his such Disciple.
This is a very wonderful subject and more we think more revelations come to the mind. There is no end for this process.

ह्यापुढे मराठीत स्पष्टीकरण दिलेले आहे.

ABHANGA 6 : Date 6th September 2012

आता तळमळ । केली पाहिजे सीतळ ॥ १ ॥
करील तें पाहें देव । पायीं ठेवुनिया भाव ॥ २ ॥
तोचि अन्नदाता । नाहीं आणिकांचि चिंता ॥ ३ ॥
तुका म्हणेव दासा । नुपेक्षील हा भरंवसा ॥ ४ ॥

अभंगाचा शब्दार्थ :
अहो सज्जनहो, आता आपले मन तळमळ रहित म्हणजे शांत केले पाहिजे.॥ १॥
( त्याकरता) भगवंतच सर्वकर्ता आहे हा भाव भगवंताच्या ठायी ( चरणांपायी ) ठेवा॥ २॥
तोच सर्वांचा अन्नदाता आहे म्हणून इतर कसलीही चिंता करू नका ॥ ३ ॥
तुका म्हणतो की जो असा दासभाव ठेवतो त्याची उपेक्षा तो करणार नाही ही खात्री बाळगा ॥ ४॥

अभंगाचा अर्थ समजण्यासाठी लागणारी कांही माहिति ( अभंगामागची भूमिका)
जसे लोकांना सांगतो (बोलतो) तसेच बोलल्यासारखे वागणे ही आपल्या सर्वच संतांची पद्धत होती व असते. तुकाराम महाराजच एका दुसरया अभंगामधे म्हणतात " बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.” अर्थात असे वागणाऱ्यला नहमीच वंदन करावे असे ते सांगत आहेत.

माझ्या मते हा अभंग बहुतेक तुकाराममहारांजांना आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर त्यांच्य तोंदून बाहेर पडला असावा. नारदभक्तीसुत्रंमधे नवविधाभक्तींची नांवे येतात. म्हणजेच भक्ति करण्यचे नऊ मार्ग नारदांनी सांगितले आहेत. भक्त तोच असतो जो भगवंताठायी अनन्य भावाने ( तुझ्याशिवाय माझा दुसरा कोणीही नाही, हा भाव ) भगवंतास पूर्णपणे शरण गेलेला असतो.

ह्या सर्व भक्तींतील सर्वोच्य भक्ती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती. बाकी सर्व भक्तींचा शेवट आत्मनिवेदनामधे होतो. ह्याबद्दल श्रिमद् भगवद्‌गीतेमधील खालील श्लोक प्रसिद्ध आहे.
अनन्या श्चिंतयंतो माम ये जनापर्युपासते। तेषां नित्याभि युक्तानां योगक्षेमं वहाम्यहम ॥

ह्या श्लोकामधे भगवंतानी संपूर्ण शरणागतीवरच भर दिलेला आहे. संपूर्ण शरणागत होणे म्हणजे स्वत:चे सर्वस्व भगवंतास अर्पण होण्याची प्रक्रिया आहे. जेंव्हा भक्ताकडून आत्मनिवेदन घडते तेंव्हा ही क्रिया आपोआपच होते. ही मनाची अत्यंत सुंदर स्थिति असते. आत्मनिवेदन ह्या
शब्दाचा अर्थच स्वत:ला भगवंतार्पण करणे हा आहे.

आत्मनिवेदनाचे वरवर पाहाता तीन प्रकार आहेत जे भक्ताच्या जीवनामधे प्रगट होतात.
    ) जड आत्मनिवेदन
    ह्या जगामधे मी जे जे माझे आहे असे म्हणतो त्या सर्वाचा खरा मालक भगवंतच फक्त आहे हा भाव मनामधे असणे . तसेच भगवंतच खरा कर्ता आहे व तो माझ्याकडून सर्व कार्य करवून घेतो आहे ही भावना असणे. श्री. रामकृष्ण परमहंस यांच्या शब्दांत " मी एक यंत्र आहे व ह्या यंत्राचा चालक भगवंत आहे " हीच भावना स्पष्टपणे प्रगट होते.
    ) चंचळ आत्मनिवेदन:
    सर्वत्र भगवंतच भरलेला आहे मग वस्तू चल (प्रत्येक प्राणीमात्र ज्यांमधे चैतन्य आहे ते सर्व) असो किंवा अचल ( ज्यांमधे चैतन्य नाही असे भासते ) असो.
    एका योग्याची आत्मकथा ( Autobiography of a Yogi ) ह्या स्वामी परमहंस योगानंदांच्या पुस्तकांत खालील प्रसंग येतो. स्वामीजी जेंव्हा सर जगदीशचंद्र बोस ह्यांना भेटले होते. त्यावेळी बसूंनी स्वामिजींना त्यांचे यंत्र दाखवले. बसूंनीच प्रथम हे सिद्ध केले की
    " वनस्पतींमधे सुद्धा चैतन्य आहे " . बसुंनी ह्या यंत्राद्वारे लोखंडाच्या पत्र्यामधे पण चैतन्य आहे हे स्वामीजींना प्रात्यक्षिक करून दाखविले होते.
    निश्चळ आत्मनिवेदनt
    फक्त भगवंतच ( परब्रह्मच ) काय ते शाश्वत आहे व बाकी कोणतीही वस्तु अशाश्वत आहे . हे शाश्वतच माझे खरे स्वरूप आहे हा भाव असणे . सच्चिदांनन्द स्वरुपो अहम .

ब्रह्मज्ञानी व्यक्तिच्या बाबतीत ह्या तीनही जाणीवा सतत जागृत असतात. आपण बाकीच्या सर्वांना यामधील कांही जाणीवा कधीकधी अनुभवास येतात पण फारच अल्पकाळच अशी जाणीव टिकते . करेतर याचे स्मरण प्रयत्नपूर्वक श्रद्धा ठेवून करावे लागते. शिवाय योग्यवेळी मला हा अनुभव येईल ह्या श्रद्धेने आपले प्रयत्न सतत चालू ठेवावे लागतात. सबूरीने रहावे लागते.

अभंगाची शिकवण :
जर आपल्याला ही खात्री असेल की भगवंत आपली सर्व काळजी घेतो आहे व आपल्या आवश्यक त्या सर्व गरजा पण पुरवतो आहे ; तर मग मनाप्रमाणे कांही झाले नाही तरी दु:ख वाटणार नाही. तसेच जर सर्व कांही मनाप्रमाणे झाले तरी गर्वाने मन फुलून जाणार नाही. आनंद अर्थातच होईल पण त्याच वेळी भगवंताबद्दल कृतज्ञतेने मन भरून जाईल.

ह्या मुद्द्यांवर आपण खरेतर मनन, चिंतन केले पाहीजे. ह्यासाठी जीवनांतील प्रत्ये घटनेकडे ह्या दृष्टीने जर आपण पाहीले तर आत्मनिवेदना बद्दल जे कांही मुद्दे वर येथे लिहिले ते योग्य आहे हे पण मनास पटेल. असा विचार केला तर मन ( जर कांही कारणाने उद्वीग्न झाले असेल तर) शांत होते. तुकाराम महाराजांच्या चरीत्रामधे अनेक घटना आहेत ज्या वाचल्या की स्पष्ट होते की महाराज केवढे मोठे सत्‌पुरुष होते व ह्या अभंगात सांगितल्या प्रमाणेच वागत होते.

This as per my own experience definitely makes the mind calm even if it gets disturbed for some time. ( If we see the incidents in Sant Tukaramas life it can be seen that He lived like this)

भगवंत प्रत्येक प्राणीमात्रांची काळजी घेत असतो, प्रत्येकाचा योगक्शेम तोच वाहतोआहे हे सहज समजू शकते. आपल्याला ( फक्त मनुष्याला) त्याने सारासारविवेक बुद्धी ,विचार करण्याची शक्ती दिलेली आहे. अर्थात म्हणूनच माणसावर जबाबदारी पण आहे. ती म्हणजे गरजूंना ( ज्यांना स्वत:कष्ट करूनही पुरेसे मिळत नाही ) अशांना दान करणे विशेषत: अन्नदानाला मोठे पुण्यकर्म मानले जाते.

आपण जन्माला येतो तेंव्हा बरोबर फक्त संस्कार घेऊन येतो व मृत्युनंतर संस्कारच घेऊन जातो. ईतर कांही बरोबर येते नाही. निरनिराळी रत्ने, संपत्ती, सोने नाणॆं, हे सर्व कांही भगवंतानेच निर्माण केलेले आहे. म्हणजेच तोच खरा ह्या सर्वाच स्वामी मालक आहे. तोच ठरवत असतो की कोणाजवळ असलेली संपत्ती त्याच्यापाशी किती वेळ रहावी. ह्याचे उदाहरण म्हणजे कम्युनिस्ट क्रांतीच्या वेळी अने्क लोकांची संपत्ती जणू क्षणभरांतच नष्ट झाली. डॉ. झिवागो ह्या कादंबरीत ह्या सारख्या प्रसंगांचे वर्णन आहे.
थोडक्यांत भगवंतच सर्व संपत्तीचा एकमेव स्वामी आहे, हे स्पष्टच आहे.

तसेच आपल्याला असा अनुभव अनेक वेळा येतो की जरी योग्य योजना केली व कांही कार्य केले तरी त्याचे परिणाम कांही योजल्याप्रमाणे मिळत नाहीत. अनेक वेळा आपण जे व्हायचे ते होऊ देतो. जर आपण विचार केला तर हे लक्षांत येये की सर्व कांही भगवंताच्या ईच्छेनुसारच घडले तर मग मनास दुख: होणार नाही ; पण प्रयत्न मात्र योग्य ते केलेच पाहीजेत हे विसरायला नको.
गीते मधे भगवंतानी हे कसे जमावे ह्यासाठी निश्च्काम कर्मयोग करा असे सांगितले आहे.

म्हणुनच तुकाराम महाराज ह्या अभंगाद्वारे उपदेश देताहेत की भगवंतास अनन्यभावे शरण जावे. भगवंत अशा भक्तांची उपेक्षा कधीही करत नाही.
हा विषयच एवढा सुंदर आहे की जितका विचार करावा तितका स्पशःतच नव्हे तर मनास आनंद व शांती देणार आहे असे आढळते.











0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home