Thursday, September 13, 2012

       

7th Abhanga 7 :दुडीवरी दुडी । Date 13/9/12 : On true nature of Yearning for God.
इंग्रजी स्पष्टीकरणा नंतर  पुढे मराठी स्पष्टीकरण दिलेले आहे.

दुडीवरी दुडी । चाले मोकळी गुजरी ॥ १ ॥
ध्यान लागो ऐसें हरी । तुज चरणीं तैशापरी ॥ २ ॥
आवंतण्याची आस । जैसी लागे दुर्बळास ॥ ३ ॥
लोभ्या कळांतराची आस । बोटें मोजी दिवस मास ॥ ४ ॥
तुका म्हणे पंढरीनाथा । मजला आणिक नको व्यथा ॥ ५ ॥

Transliterated Version :

duDIvarI duDI | chaale mokaLI gujarI || 1 ||
dhyaana laago aise harI | tuja charaNI taishayaaparI || 2 ||
aavaNtaNYaachi aasa | jaisI laage durbalaasa || 3 ||
lobhyaa kaLaNtaraachI aasa | boTe mojI divasa maasa || 4 ||
tukaa MhaNe paNdharInaathaa | majalaa aaNika nako vyathaa || 5 ||


Verbatim Meaning:

The Gujarati ladies carry water in many vessels which are kept one over the other on their heads . Their hands are free but their mind is concentrated on the vessels they are carrying.|| 1 ||
O Hari , like this ; let my mind be meditative  with concentration on your holy feet || 2 ||.
An alms-seeker always hopes and desires for an invitation for a sumptuous lunch .|| 3 |
A greedy moneylender who lives on the the interest; always is counting on his fingers the days and months for getting the interest.|| 4 ||
Tuka says the O (Viththla) Pandharinathaa ; let my mind have yearning only for you., and let it not think about anything else. || 5 ||
Note : The last line of this Abhanga is the most important one. This line appears to be a prayer to Sri. Panduranga by Sant Tukarama.

Background Information to understand the significance of this line:

We have seen in an earlier Abhanga that Sant Tukarama Maharaj has stressed on the need to put efforts by a person who desires and aims to achieve the coveted goal of God Realization.(मुमुक्षु )

This Abhanga shows the way or direction in which our efforts are to be put.. It describes the attitude one should have. Main objective here is to have a pure mind which is always thinking only about the God. .

Bhagvan Patanjali has said that it is the Mind which binds one or liberates one.

One of the qualities/ attributes of our mind is that it can think of Only One thing at a time. A word used for this quality in Marathi is एकदेशी ’ For example . If we think of Tasty food then at the same time nothing else occurs in our Mind.

Another quality /attribute is the Memory. It is the memory that really plays the whole game. Because of this memory we are able to do our day today activities, live in this world ,perform good or bad deeds.

Many of us tend to live in the past during the part of our day. We remember the harms/ insults etc done by others to us and become unhappy in the present. Or some times we feel happy and try to do the same actions again to get more happiness. Sometimes we feel love and gratitude for some person because we remember what he had done for us. The list of actions we do because of memory is endless and can go on and on.

Some of these thoughts drive us to perform various actions .
And as long as our actions are done with “ I “ or “ Me “ in the center ; the rule of this material world “ One gets the fruits of ones deeds “ is always applicable to us.
This causes us to suffer either Physically of Mentally or both either in the present or in future. Some times we will suffer in our next birth as well .
In short we ourselves are responsible for our own future.

We must also note that :
Our Seers and Saints have defined the meaning of sin as “All those (our actions ) are sins (पापकर्मे) when these are performed while forgetting the basic truth that “ God is the Door” .i.e. with Self at the center. अहंकार . Naturally these result in the sufferings.
Since these results our getting entangled in the cycle of death-birth-death..

The grief or sufferings are of three types.
देहेंद्रियप्राणेन सुखं दु:खं च प्राप्यते । इम्माध्यात्मिकं तापं जायते दु:खं देहिनाम ।
सर्वभूतेन संयोगात सुखं दु:खं च जायते । द्वितिय तापसंताप: सत्यं चैवाधिभौतिकं ॥
शुभाशुभेन कर्मणा देहांते यमयातना । स्वर्गनरकादि भोक्त्व्यमिदं चैवाधिदैविकम ॥
  1. आध्यात्मिक: Experience of pain without contact with external objects. For Examples Body ache. or various diseases,
  2. आधिभौतिक sufferings due to contact with outside objects . For example a snakebite or electric shock
  3. आधिदैविक sufferings / pleasures experienced after the death.
In this material world the rule is to get fruits of ones good or bad actions. All are the results of our own doings in this or earlier births. No one knows when the fruits of our actions will realize.


It is said that when One suffers in the life then he looks for the Saviour . (संसारें दु:खवला । त्रिविधतापें पोळला । तोचि येक अधिकारी जाला । परमार्थासी ॥)

Also we should remember that “We are presently living in the state of Duality where we think that God and we ourselves are separate from each other..Thus one feels in such situation that only God is the Saviour.” Since He is Almighty only He can reduce the severity of these sufferings.
Such a person yearns for the GOD. It is at this stage the journey of spirituality starts.

Teachings of the Abhanga :

This Abhanga explains to us how the true yearning for the god should be. What is the nature of this yearning for God.

Tukarama Maharaj says that one can perform difficult daily tasks but at the same time one should be concentrated on God. For explaining this point; he has given the examples of the ladies in Gujarat who carry a number of water vessels on their heads easily, or that of a Moneylender who is always thinking of the Interest money he will be earning on the loam given. And there is an example of a alms seeker who is interested only in the sumptuous food.

The point being stressed is “ One should have really true yearning for God”.
Therefore the true yearning is the key . This yearning has a special word in Sanskrit. ध्यास. Nearest word in English is Passion.
In spirituality on need to have this passion .The flame has to be kept burning by regularly practicing and directing our mind to remember God. Besides this one must also have Grace of god . Then only the practice and efforts will bear the desired fruit of liberation.

Sri. Ramakrishna Paramahansa who was the Guru of Swamy Vivekananda says that true yearning is the combination of three aspects or shades.
  1. The Yearning by a child for his mother,
  2. The Yearning felt by a greedy person for the worldly things
  3. The Yearning of Husband or wife towards the spouse.

Tukarama Maharaja (in this abhanga ) is praying to God to bless him with this kind of yearning. .

This abhanga is in my opinion throwing throws full light on the nature of true yearning.

I would like end with a question which we all must ask ourselves.

The question is “ Do I have such a yearning for God ? The answers may be very surprising. But we should not get discouraged after we find the answer ourselves.

Tukarama Maharajsa's abhangas will be guiding us further.

Comment from Sri.M jayaram. Date 13th Sept 12.
very good description.
I would like to add
When you are depressed, you think of the past.
When you are anxious you worry about the future.
When you are happy, you are living in the present.

येथून पुढे येथे मराठी स्पष्टीकरण दिलेले आहे


       

Abhanga 7 : Date 13/9/12 : On true nature of Yearning for God.

दुडीवरी दुडी । चाले मोकळी गुजरी ॥ १ ॥
ध्यान लागो ऐसें हरी । तुज चरणीं तैशापरी ॥ २ ॥
आवंतण्याची आस । जैसी लागे दुर्बळास ॥ ३ ॥
लोभ्या कळांतराची आस । बोटें मोजी दिवस मास ॥ ४ ॥
तुका म्हणे पंढरीनाथा । मजला आणिक नको व्यथा ॥ ५ ॥

अभंगाचा शब्दार्थ :
गुजराथी स्त्रीया डोक्यावर एकावर एक रचलेल्या अनेक घागरी पाणी वाहून नेतात . त्यांचे दोनही हात मोकळे असतात पण लक्ष मात्र घागरींवरच असते. ॥ १ ॥
हे हरी तुझ्या चरणांठायीं असेच ध्यान लागो ॥ २॥
जशी गांवजेवणासाठी दुबळा मनुष्य आंस लागलेली असते ॥ ३ ॥
किंवा जसा लोभी सावकार येणाîrÉÉ व्याजाची आतुरतेने वाट पहात असतो व त्यासाठी बोटांवर दिवस, महिने मोजत असतो ॥४।।
तसेच हे भगवंता तुझ्या भेटीची मला आंस लागली आहे, मला आणखी कांहिही उपाधी नको आहेत.॥ ५॥
Note: शेवटच्या चरणांवरून हे स्पष्टच आहे की तुकाराम महाराजांनी पांडुरंगाला ही प्रार्थना केली आहे.

अभंगाचा अर्थ स्पष्ट होण्यासाठी लागणारी माहिती व भूमिका :

जो मुमुक्षु झालेला आहे म्हणजेच ज्याला भगवंताच्या भेटीची तळमळ लागली आहे त्याला कायकाय प्रयत्न करावे लागणार आहेत त्याच्या मनाची कशी अवस्था असायला हवी त्याचेच ह्या प्रार्थ्ने द्वारे मार्गदर्शन येथे वाचायला मिळते. मुख्यत: सर्वप्रथम चित्तशुद्धी महत्वाची असते. शुद्ध चितामधे नेहमीच भगवंताचे बद्दल विचार मनामधे येतात.

भगवान पतंजली म्हणतात की माणसाचे मनच त्याला बंधनात अडकविते व मनच बंधनांमधून सोडविते.

मनाचा एक उत्तम गुण हा आहे की ते एकावेळी एकाच गोष्टीचा विचार करू शकते. मन " एकदेशी " आहे असे म्हणुनच म्हटले जाते. उदाहरणार्थ: जर चवदार खाद्य पदार्थाची आठवण झाली तर तोच मिळावा असे दुसरा कांही विचार मनांत येईतोपर्यंत मनास वाटते.

मनाचा दुसरा पैलू म्हणजे आपली आठवण ठेवण्याची शक्ती हा आहे. विचार केला तर हे आढळते की ह्या आठवणीमुळेच आपले सर्व व्यवहार ह्या जगांत चालले आहेत. आथवणीमुळेच कधी आपण योग्य वर्तन करतो तर कधी अयोग्य वर्तन पण आठवणीमुळेच घडते.
आपल्यापैकी बरच जण तर जुन्या अठवणींवरच जणू जगत असतात. कांही जण भूतकाळांत घडलेल्या घटना आठवतात व वर्तमानकाळांत दु:खी होतात. कधी आपल्याला पूर्वीचा भोगलेला आनंद आठवतो व तोच आनंद परत मिळावा म्हणून आपण तेच प्रयत्न पुन्हा पुन्हा करतो. कधी आपल्याला दुसîrÉÉ कडून मिळालेल्या प्रेममय वागणुकीची आठवण होते व त्या व्यक्ती बद्दल कृतज्ञता वाटते. जर अशांची यादी करायचे म्हटले तर हि यादी कधी न संपणारी होईल.
हा सर्व आपल्यामधील आठवण शक्तीचा खेळ आहे. आपल्या निरनिराळ्य़ा केलेल्या कार्याचे मूळ आठवणच असते.

जोपर्यंत असे कोणतेही कार्य ( कर्म) आपल्यांतला " मी" किंवा "अहंकार " हे धरून केले असेल तर ह्या दृश्य सृष्टीच्या नियमा प्रमाणे केलेल्या कर्माचे फळ भोगावेच लागते. कधी ते मात्र सांगता येणार नाही.
मिळणारे फळ कधी शरीर व मनाला आनंद देणारे, कधी दु:ख देणारे असते. ते कधी कधी ताबडतोब मिळते तर कधी भविष्यांत. कांही फळे भोगण्यासाठी पुधे एखादा जन्म पण घ्यावा लागतो.
थोडक्यांत म्हणजे आपणच आपल्या जीवनाचे भविष्य घडवत असतो

येथे आपण खालील मुद्याची नोंद घेणे जरूरीचे आहे :

आपल्या संतसज्जन मंडळींनी पापाची व्याख्या अशी केली आहे की " आपण भगवंत हाच खरा कर्ता आहे हे विसरून केलेली सर्व कर्मे पापकर्मे असतात. " ; कारण ह्या कर्मांआगे "मी केले" हा अहंकार जागा असतो. मग अर्थातच केलेल्या कर्मांचि फळे भोगणे हे पण आलेच. त्यासाठी जन्म-मृत्यू चक्रामधे आपले अडकणे पण आले. ताप भोगणे आले.

शास्त्रांमधे तीन तापांचे वर्णन आहे.

देहेंद्रियप्राणेन सुखं दु:खं च प्राप्यते । इम्माध्यात्मिकं तापं जायते दु:खं देहिनाम ।
सर्वभूतेन संयोगात सुखं दु:खं च जायते । द्वितिय तापसंतापसत्यं चैवाधिभौतिकं ॥
शुभाशुभेन कर्मणा देहांते यमयातना । स्वर्गनरकादि भोक्त्व्यमिदं चैवाधिदैविकम ॥
  1. आध्यात्मिक ताप: बाह्य वस्तूंशी संपर्क न येता वाट्याला आलेले दु:. उदा अंग दुखणे, निरनिराळे रोग होणे.
  2. आधिभौतिक ताप : बाह्य वस्तूंशी संपर्क झाल्याने शरीराला होणारे दु:.
    जसे सांपाचे चावणे, विजेचा झटका .
  3. आधिदैविक ताप : म्रुत्युनंतर भोगाव्या लागणाîrÉÉ यमयातना


समर्थ रामदास स्वामी म्हणतात की
(संसारें दु:खवला । त्रिविधतापें पोळला । तोचि येक अधिकारी जाला । परमार्थासी ॥)
जो अशा त्रिविध तापांनी पोळला जातो तोच परमार्थ करण्यासाठी अधिकारी होतो.

तसेच आपण हे पण लक्षांत घ्यायला हवे की आपण सध्या द्वैतामधे जगतो आहोत. देव व आपण वेगळे आहोत असे आपल्याला वाटत आहे म्हणून हे द्वैतात जगणे आहे. ह्यामुळे आपल्याला भगवंत हा सर्व तापांतून मुक्त करणारा त्राता आहे असे वाटते. असे वाटण्याचे कारण म्हणजे तोच सर्वशक्तिमान आहे ही मनाची समजूत असणे होय.
असे ज्याला जाणवते तोच भगवंताच्या भेटीसाठी आतूर होईल. ह्या ठिकाणी माणुस परमर्थाकडे वाटचाल करायला लागतो.

अभंगाची शिकवण::

ही भगवद्‍भेटीची तळमळ आतुरता कशी असावी /असते तेच ह्या अभंगाद्वारे आपल्याला शिकता येते.
तुकाराम महाराज ह्या अभंगामधले गुजराथी स्त्रीयांचे, लोभी मणसाच्या मन:स्थितीचे दृष्टांत देऊन हेच सांगत आहेत की माणसाला संसारातली कामे करणे व भगवंताचे स्मरण राखणे हि दोन्ही एकच वेली मनाच्य़ा साह्याने करता येतात. मुख्यत: मन भगवंताठायी ठेवणे महत्वाचे आहे.

मुद्दा हा अहे की मनामधे भगवंताच्या भेटिची आत्यंतीक आंस , तळमळ असायला हवी. अशी टोकाची आत्यंतिक तळमळ असणे म्हणजेच भगवंताचा ध्यास लागणे होय. इंग्रजी भाषेत त्यालाच Passion ह शब्द त्यातल्यात्यात जवळचा आहे.

भक्ती मधे हा ध्यासच सर्व कांही करतो. ह्या ध्यासाची ज्योत सतत प्रयत्नपूर्वक पेटलेली ठेवावी लागते. त्यासाठी नामस्मरणाद्वारे मन भगवंताकडे लावावे लागते. ह्याशिवाय हे सर्व हातून होण्यासाठी ईश्वराची कृपा पण हवीच. अशी कृपाच शेवटी मोक्षाचे फळ देणारी होते.
तळमळ कशी असावी ह्याबद्दल श्री. रामकृष्ण परम्हंस ( स्वामी विवेकानंदांचे सद्‌गुरू) म्हणतात की अशी खरी तळमळ म्हणजे प्रेमाचे तीन रंग (भाव) एकाच ठिकाणी एकाच वेळी असणे.
) बाळाचे आईवर असणारे प्रेम.
) लोभी माणसाचे पैश्यावरचे प्रेम.
) पतीचचे पत्नीवर व पत्नीचे पतिवरचे प्रेम.
असा प्रेमभाव माझ्या मनामधे राहॊ अशी तुकाराम महाराज भगवंताकडे ह्या अभंगात प्रार्थना करताहेत.. .



माझ्या मते ह्या अभंगामुळे खरी तळमळ कशी वा ध्यास कसा असावी ह्यावर प्रकाश टाकणारा आहे.
आपण प्रत्येकाने स्वत:लाच हा प्रश्न विचारायला हवा:
प्रश्न: मला खरच कां अशी भगवंतभेटीची तळमळ लागली आहे?
आपल्याला मिळणारे उत्तर धकादायकच असेल. पण तरीही निराश होण्याचे कारण नाही. कारण देव भावाचाच भुकेला असतो .
तुकाराम महाराजांचे अभंग आपल्याला मार्गदर्शन करतीलच.

ह्या वर श्री. जयराम १३ ता. च्या comment मधे म्हणतात :-
वाचून आनंद झाला .मला येथे म्हणावेसे वाटते की
जेंव्हा तुम्ही निराशा होता तेंव्हा तुम्ही भूतकाळांत जगत असता.
जेंव्हा तुम्ही चिंताग्रस्त असता तेंव्हा तुम्ही भवोष्याविषयी चिंताकरत असता.
जेंव्हा तुम्ही आनंदी असता तेंव्हा तुम्ही वर्तमानात जगत असता.

When you are depressed, you think of the past.
When you are anxious you worry about the future.
When you are happy, you are living in the present.







0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home