Thursday, October 25, 2012

Added 13th  Abhanga सकळ चिंतामणी शरीर । on 26th OCt 2012
blogaddress :http:// tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com
 मराठी स्पष्टीकरण इंग्रजी नंतर दिलेले आहे
Abhanga 13 for 25th Oct 12

सकळ चिंतामणी शरीर । जरी जाय अहंकार समूळ आशा ।
निंदा हिंसा नाही कपट देहबुद्धि। निर्मळ स्फटिक जैसा ॥ १ ॥
मोक्षाचे तिर्थ न लगे वारानसी । येती तयापासीं अवघें जन ।
तीर्थासी तीर्थ जाला तोचि एक । मोक्ष तेणें दर्शने ॥ २॥
मन शुद्ध तया काय करीसी माळा । मंडित सकळा भूषणांसी ।
हरिच्या गुणें गर्जताती सदा । आनंद तया मानसीं ॥ ३ ॥
तन मन धन दिले पुरुषोत्तमा । आशां नाहीं कवणाची ।
तुका म्हणे तो परिसाहूनि आगळा । काय महिमा वर्णूं त्त्याची ॥ ४ ॥

Verbatim Meaning :

When the Ego is gone , all the seeds of desires and wishes are gone .The body becomes pure .
When there is no wish for speaking defamatory words about someone( निंदा), no thought of using Hurting words (हिंसा ) , Wickedness (कपट) in the mind , the mind is not tied with the worldly things, then it becomes pure like a crystal || 1 ||

Then such a person is Holiness personified. People call upon Him ( to get advise from him for relief from various problems, for advise on liberation etc). There is no need to go to Varanasi because meeting him ( दर्शन)gives them liberation || 2 ||

When the mind is so pure, then there is no need for decorating body with any ornaments such as strings of Pearl beads etc. Such a person is himself  an Ornament personified. . Such Pure persons always are singing the praise of the lord. Their mind is full with the Bliss. || 3 ||

Such persons offer their Body, Mind and Wealth ( Everything) to the Lord .They do not have any desires.

Tukarama says that such a person is far far better that the stone the touch of which converts Iron to Gold. (परीस)! How can one describe the greatness of such a person ?|| 4 ||

Background Information :

We have seen in that a saint or liberated person is very unique. .
This abhanga describes some important attributes of such a saint.

Meaning of the Abhanga :
A saint has a very pure mind. All his desires and wishes are gone and are replaced by the love for God, and pure Bliss. He is free of all Ego. Thus there are no feelings such as (काम) desires, (क्रोध) Anger , (मोह ) Attachments, (मद) Pride , (लोभ) attachments for worldly things, (मत्सर) jealousy, envy etc. When all these are absent and there is only thought of Self Being ; then only the mind can be called as pure mind.
In our country it is believed that a mere visit to meet and hear the sayings of such a person will wash away all the sins( like going to places of pilgrimage to wash away the Sins.)
There is a belief that when a person dies in Varanasi, he gets liberation. That is the importance of the place like Varanasi. These are called ( तीर्थक्षेत्र) holy-places.
Tukarama maharaj says that if you can meet such a person then there is no need to go to Varanasi. Mere visit and sight of such a divine person ( दर्शन) will liberate you.

Generally , in order to impress the others; we dress well , use ornaments etc in order to appear smart, and attractive.

However the real beauty is in pure mind. A liberated pure minded person has all the divine beauty which surpasses all the physical attributes of beauty. In fact if such a person wears some ornaments , the ornaments get beauty because of association with such a person.

Such a divine person is always talking about God and His attributes. Being known to be a liberated person; the people come to listen to his talks.
Such a saint has devoted himself to God, he does not have any attachments for material things. He has surrendered everything to His God. He views everything as God. He is compassionate for the sufferings of the mankind

Sant Tukarama says that such a person is far far better that the stone which just converts iron to gold by mere it's touch.
Association and contact with a liberated person will cause one to know the real purpose of having this rare Human form. This association turns a worldly person to a divine personality. Tukarama Maharaj therefore at the end of the abhanga says that he does not have enough words to describe the greatness of such a divine personality.

Note :
This Abhanga is the summary of various important attributes of a saint. Even in our time there were and are such saints . Only it is very difficult to recognize them.
Those who get such an association are therefore called very lucky.
The biography of many saints are available in the printed book form.
A biographical record describing the life of a few saints are available .Reading these gives us an understanding their teachings.
In Mahyarashtra Sant Gondavalekar Maharaj , Sri. Gajanan Maharaj of Shegaon, Sant Saibaba of Shirdi are famous. In west Bengal Sri. Ramakrishna Paramahansa is well known. A book by name “ Gospel Of Sri. Ramakrishan has day to day description of How He talked etc. It is a very unique record .
In south India Sri Ramana Maharshi, Sri. Shnakaracharya of Sringery (Swanmy Chandrasekahar sarawati ) , sri Aurobindo are well known saints .All of them lived the life in the  way this abhanga describes.

येथून पुढे मराठी स्पष्टीकरण दिलेले आहे


Abhanga 13 for 25th Oct 12

सकळ चिंतामणी शरीर । जरी जाय अहंकार समूळ आशा ।
निंदा हिंसा नाही कपट देहबुद्धि। निर्मळ स्फटिक जैसा ॥ १ ॥
मोक्षाचे तिर्थ न लगे वारानसी । येती तयापासीं अवघें जन ।
तीर्थासी तीर्थ जाला तोचि एक । मोक्ष तेणें दर्शने ॥ २॥
मन शुद्ध तया काय करीसी माळा । मंडित सकळा भूषणांसी ।
हरिच्या गुणें गर्जताती सदा । आनंद तया मानसीं ॥ ३ ॥
तन मन धन दिले पुरुषोत्तमा । आशां नाहीं कवणाची ।
तुका म्हणे तो परिसाहूनि आगळा । काय महिमा वर्णूं त्त्याची ॥ ४ ॥

अभंगाचा शब्दार्थ:-

जेंव्हा अहंकाराचाव आशांचा नाश होतो तेंव्हा सर्व शरीर शुद्ध होते.चिंतामणी सारखे रत्न रूप होते.॥ १॥ .
जेंव्हा निंदा, हिंसा , कपटिपणा व हे देणारी देहबुद्धी, हे सर्व नसतात तेंव्हा मन स्फटिकाप्रमाणे निर्मळ होते ॥ २॥
असा जो माणुस असतो तेहेच सर्व तीर्थे वास करत असतात. मग ज्याला पापक्षालन करायचे असेल त्याला वाराणशीला जाण्याची जरुरी नाहि. अशा माणसाकडे सर्व लोक त्यचे द्दर्शन घ्यायला येतात.॥ ३॥
तो स्वत:च तीर्थरूप असल्याने त्याच्या दर्शनानेच मोक्ष मिळतो.॥ ४॥
ज्याचे मन असे शुद्ध असते त्याला बाह्य अलंकार माळा वगैरेंची आवश्यकता नसते. ति स्वत:च जणू अलंकार असतो.॥ ५॥
असे संतपुरुष नेहमी हरीनामाच गजर करत असतात व हरीनाम म्हणण्याचा आनंद लुटत असतात.॥६ ॥
त्यांचे तन , मन सर्व पुरुषोत्तमास अर्पण केलेले असते.त्यांना कसलीच आश वासना मनांत नसते.।॥७॥
तुका म्हणतो की असा पुरुष परुइसापेक्षाही श्रेष्ठ असतो . त्याची थोरवी किती म्हणून वर्णावी॥ ८॥


अभंगाचा अर्थ स्पष्टीकरणासाठी लागणारी माहिती, अभंगाची भूमीका

आपण आतापर्यंत हे पाहिलेच आहे की ब्रह्मज्ञानी संत कसे असतात. हा अभंग अशा संताची कांही वैशिष्ठ्य प्रगट करतो.
अभंगाचा अर्थ :

भगवंतासाठी फक्त प्रेमाने भरलेले असे संताचे अंत:करण हे अत्यंत निर्मळ असते. त्यांच्यामधे अहंकाराची नाम्व निशाणीही उरलेली नसते. त्यामुळे मनामधे काम, क्रोध,आसक्ती, लोभ, मद व मत्सर हे षडरिपू कधीच नसतात. व खरेतर मन उन्मनीमधे असते. अर्थातच फक्त शुद्ध ब्रह्मानंद अशा संताच्या ठायी असतो.
असे जेंव्हा मन असते तेच खरे शुद्ध असते असे म्हणता येईल.

आपल्या देशामधे असे समजतात की अशा संताची भेट झाली व त्यांचा उपदेश ऐकायला मिळाला तर जो असा लाभ घेतो त्याची सर्व पापे नष्ट होतात. ( जणू त्याने गंगेसारखा पापक्षालक नदीमधे स्नानच केले आहे तसे.)
आप्ल्याकडे असाही समज आहे की जे वाराणशीला देहत्याग करतो त्याला अनायसे मुक्ती मिळते. असे वारणशी( सध्याचे नाव काशी) ह्या तिर्थक्षेत्राचेचे माहात्म्य आहे. अशी अनेक तीर्थक्षेत्रे आपल्या देशामधे आहेत. तुकाराम महाराज म्हणतात की सत्पुरुषाचे दर्शन घेणे असे तीर्थक्षेत्रास जाऊन येण्यासारखेच असते. अशा पुरुषाकडे जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले तर मग इतर कोठल्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. संताचे दर्शन सुद्धा मोक्षदाय़िच असते.
आपले रोजचे वागणे पाहिले तर आपण चांगला पोषाख करतो, त्याव कधीकधी अलंकार पण घालतो. हे सर्व आपण लोकांना हुशार, व आकर्षक दिसावे म्हणुन करतो.
पण मनाचे सौन्दर्य हेच खरे सौंदर्य असते. ब्रह्मज्ञानी पुरुषाचे मन सर्वांपेक्षा अत्यंत सुंदर असते. त्याची तुलना कोठल्याच सौन्दर्वंत वस्तूशी करने अश्क्यातली गोष्ट आहे. तरीही जर एखाद्या अशा सर्वज्ञानी व्यक्तिने जर कांही अलंकार धरन केले तर असे म्हणावे लागेल की "अलंकारानाच शोभा आली आहे.”

अशी ब्रह्मज्ञानी व्यक्ती नेहमीच भगवंतमय तनामनाने झालेली असते व भगवंतावुषयीच बोलताना आढळेल. जनसामान्याला अशा व्यक्तीचे महात्म्य ठावूक असल्याने ते अशा व्यक्तिंचे दर्शन घेण्यास , त्यांचे बोलणे ऐकण्यास गर्दी करतात. अशा व्यक्तीला बाह्य संपत्ती, देखावा, भोग इत्यादी कशाचीही ईच्छा वा वासना नसते. भगवंतास संपूर्ण शरणागत झाल्याने व ब्रह्मरूपता आल्यामुळे त्यांना सर्वत्र भगवंतच भरून आहे हाच अनुभव सतत येत असतो. सर्वांभूती भगवंत पाहिल्याने तो सर्वांचे भले व्हावे ह्याचीच चिंता करतो.

संत तुकाराम म्हणतात की असापुरुष हा कोठल्याही परीसापेक्षा जास्त श्रेष्ठ असतो.
परीस फक्त लोखंडाचे सोन्यामधे रुपांतर करतो. पन अशा पुरुषाचे सांनिध्य, सहवास, हे अत्यंत बद्धालाही ब्रह्मपदावर नेणारे असते. अर्थता परीसाची उपमा अशा प्रुरुषाला कंमीच पडते.
म्हणुनच महाराज अभंगाच्या शेवटी म्हणतात की अशा पुरुषाच्या थोरवीचे वर्णन करण्यास
शब्द अपुरेच पडतात.

टीप: ह्या अभंगामधे सत्‌पुरुशांच्या मधील गुणांचे वर्णन आहे. आपण आहोत ह्या शतकांत पण असे सत्‌पुरुष होऊन गेले आहेत. अर्थात असे सत्‌पुरुष ओळखण्यास भाग्यच हवे. ज्यांना अशा व्यक्तिंचा प्रत्यक्ष सहवास लाभत असतो ती मंडळी खरोखरच भाग्यवान म्हटली पाहिजेत. असो..

आता अशा व्यक्तींची चरित्रे पुस्तक रूपात वाचायला मिळतात. ही चरित्रे वाचल्याने सुद्धा संत काय सांगतात ते समजायला मदत होते.
महाराष्ट्रामधे गोंदवलेकर महाराज , गजानन महाराज , शिरडिचे साईबाबा , बंगालचे श्री. रामकृष्ण परमहंस हे संत ह्या शतकात होऊन गेले. श्री. म लिखित Gospel of Shri.
Ramakrishna “ ह्या पुस्तकामधे तर त्यांच्या एका भक्ताने ते कसे बोलले इत्यादीची
रोजनिशी लिहिली आहे. दक्षीण भारतातले श्री .रमण मह्र्षी , ष्रूंगेरी मठाचे स्वामी चंद्रशेखर सरस्वती शंकराचार्य , योगी अरवींद हे प्रसिद्ध संत होऊन गेले आहेत.



0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home