Thursday, October 18, 2012

           12th Abhangaपराविया नारी माउली समान ।  posted on " Dt. 18-10-12 at
blog address : http:// tukaramasteachings.blogsopt.com .
Reader may give his comments in the comments field or mail it to rgphadke@gmail.com
मराठी स्पष्टीकरण इंग्रजी स्पष्टीकरणानंतर दिलेले आहे.
पराविया नारी माउली समान । मानिलिया धन काय वेचे ॥ १ ॥
न करीतां परनिंदा परद्रव्य अभिळस । काय तुमचें यास वेचें सांगा॥ २ ॥
बैसलिये ठायीं म्हणतां रामराम । काय होय श्रम ऐंसे सांगा ॥ ३ ॥
संतांचे वचनीं मानितां विश्वास । काय तुमचें यास वेचे सांगा ॥ 4
खरें बोलतां कोण लागती सायास । काय वेचें यास ऐंसे सांगा ॥ 5
तुका म्हणे देव जोडे याचसाअठीं । आणिक ते आटी न लगे कांहीं ॥ 6

Transliterated Version.

Paraaviyaa naarI maaUlIsamaana | maaniliyaa dhana kaaya veche?| || 1 ||
na karitaa paraniMdaa paradravya abhiLaasa | kaaya tumache yaasa veche saaMgaa|| 2||
baisaliye Thayi mhaNataa raamaraama | kaya hote shrama aise saaMgaa || 3 ||
saMtaaMche vachanI maanitaa vishvaasa | kaaya tumache yaasa veche saaMgaa || 4 ||
khare boolataa kaNa laagatI saayaasa | kaaya veche yaasa aise saaMgaa|| 5 ||
Tukaa mhaNe deva joDe yaacha saaaThI | aaNika aaTI na lage kaaMhI || 6 ||


Verbatim Meaning :

What do you loose if you treat every woman as Mother?|| 1 ||
Please tell ( me ),what do you loose if you live without ( doing paranimda) and without having desire for the wealth belonging to the others. || 2||
Tell ( me) what tiring efforts are there in Chanting “ Rama Rama “ sitting where ever you are?|| 3 ||
Tell ( me) what do you loose by believing the sayings of the seers ans saints,( and living in the fashion they advise) ? || 4 ||
Tell (me) what efforts are required to speak truthfully, what have you to pay ( to speak truthfully) ?|| 5||
Tuka says that there is no extraordinary efforts required to find the Gog. You will get Him by following this way of living.

Background information :

This Abhanga does not require any specific background information . Though knowledge of the life of various saints would be preferable. This is because these Liberated Personalities lived what they preached.

Meaning of the Abhanga:

The stanzas 1, 2 and 5 in this abhanga are self explanatory.
Still  for the purpose of completeness and continuity the meaning is  written here.

In the first stanza Tukarama Maharaj tells us to view every women as our Mother.
This will remove any undesirable thoughts that may involuntarily arise in the mind .
Sri. Ramakrishna Paramahansa has given the guidance that when you see a woman; think about your Mother , see her feet first. Then the attraction to opposite sex will become zero.    ( Reference : Gospel Of Sri.Ramakrishna pp 701 “ One must worship Adyashakti. She must be propitiated. She alone has assumed all female forms. Therefore I look on all women as mother. The attitude of looking on all women as mother is very pure. In this attitude there is not the slightest trace of sensual enjoyment”)

In the second stanza Tukarama  Maharaj is telling us to guard against the feeling of Jealousy which sometimes can disturb the mind. The Jealousy can arise when we see the display of wealth. This feeling generates a seed for the next birth hence probably Tukarama Maharaj is asking us to guard against it's rise in the mind.
Also Maharaj is telling us not to speak ill about anybody. What happens when one speaks about any  bad traits; our subconscious mind is contaminated and it start involuntarily thinking about the bad aspects . Then these may manifest in ourselves sometimes or may get stored as seeds in the memory. By not thinking and talking , this  is prevented.

In the third stanza Tukarama Maharaj has brought to our notice the fact that “ Reciting the name of God ( Saying Ramarama or any other name ) does  not requires any extraordinary efforts. All one has to do is say the Name in mind, or in whatever fashion we like, continuously. This develops into a habit and then like background music in videos ,the remembrance of God and His name happens automatically in our mind.

The fourth stanza is the one which have some special teachings.
In this stanza Maharaj is advising us to believe what the saints have told.

Who are the Saints is best described in the below given stanzas of Sri.Dasabodha : A book written by Samarth Ramadas ( Shivaji Maharaja's Guru.) These are given in the chapter named as (संत स्तवन) “ Praise of Saint “.
जे वस्तु परम दुल्लभ। जयेचा अलभ्य लाभ। तेंचि होये सुल्लभ। संतसंगेकरुनी॥
Getting the knowledge of Paramatma is very rare. But , because of the association with saints it becomes very easy.
माहाराजे चक्रवर्ती। जाले आहेत पुढे होती । परंतु कोणी सायोज्यमुक्ति। देणार नाही ॥
जे त्रैंलोकी नाही दान। तें करिती संतसज्जन। तयां संतांचे महिमान। काय म्हणोनी वर्णावे॥
Up-till now there were many Kings . There are many present now also. All of them
have been giving gift of wealth to many. But nobody can give the gift of Liberation in this very birth. Only the saints can do this. How can we describe their greatness. Word are not enough.

Giving knowledge and liberating someone  is possible for only a saint since He is “ Jeevanmuktas i.e. one who has attained the Liberation .Such a person is also called BrahmadynanI.(ब्रह्मज्ञानी) He has transcended the viscous cycle of Death- Birth . In Short He is the God in Human form. He is called “Avatatra” since the (अव्यक्त) God without any form has assumed the body form .

One point is very clear that is Whatever such a saint  says is the “( परमेश्वरी वाणी )” is Divine speech.
We all are living in this four dimensional World( Length, breadth, height, time) .We can understand the language etc spoken in this world only. Therefore the saints come down to our level and show l us the way to achieve the Liberation.
For this reason Tukarama Maharaj says that “ You do not  loose any thing if you keep faith in the words of such a saint.”

 Further as per the opinion of many saints the path of भक्तिमार्ग path of devotion is easy to follow,. In this path the नामस्मरण is still easy. Hence Sant Tukarama says to recite “ RamaRama” i.e. To perform NamasmaraN Bhakti., in the fourth line of the abhanga.

In the fifth stanza he is advising us to speak truthfully.
In the fifth stanza he is advising us to talk truthfully. Dharmaraj Udhisthira spoke only once a half truth and he had to see the Naraka before he went to heaven. For a person desiring of liberation , speaking truth is one of the most important quality.
All these are the part s covered under Dhama, Dama, Pratyhara in the path of knowledge.
But practicing same is important in Bhaktimarga also .
And at the end of the Abhanga ( sixth stanza) he has given an assurance  that there is no need to do any other extraordinary effort in order to meet the God ; all one has to do is to follow what he has advised in this abhanga



येथून पुढे मराठी स्पष्टीकरण आहे.
11th Abhanga posted in " Abhanga a week of Sant Tukarama." Dt. 18-10-12 at
blog address : http:// tukaramasteachings.blogsopt.com .
Marathi explaination part:
पराविया नारी माउली समान । मानिलिया धन काय वेचे ॥ १ ॥
न करीतां परनिंदा परद्रव्य अभिळस । काय तुमचें यास वेचें सांगा॥ २ ॥
बैसलिये ठायीं म्हणतां रामराम । काय होय श्रम ऐंसे सांगा ॥ ३ ॥
संतांचे वचनीं मानितां विश्वास । काय तुमचें यास वेचे सांगा ॥ 4
खरें बोलतां कोण लागती सायास । काय वेचें यास ऐंसे सांगा ॥ 5
तुका म्हणे देव जोडे याचसाअठीं । आणिक ते आटी न लगे कांहीं ॥ 6

अभंगाचा शब्दार्थ :-
जर परनारीला आईसमान मानले तर त्यांत तुमचे काय जाते? ॥ १॥
मला सांगा की परनिंदा, परद्रव्याची अभिलाशा न धरण्यात तुमचे काय नुकसान होते?॥ २॥
एके ठिकाणी बसून राम राम म्हणाण्यास तुम्हाला काय श्रम होतात? ॥ ३॥
संतांच्या वचनांवर विश्वास ठेवण्यांत तुमचे काय धन खर्च होते?॥ ४॥
खरे बोलण्यास तुम्हाला काय प्रयत्न करावे लागता. खर्रे बोललण्यांत तुमचे काय जाते? ॥ ५॥
तुका म्हणतॊ की ( जसे ह्या सर्वासाठी कांहीही खरच करावा लागत नाही तसेच ) भगवंताशी
नाते जोडण्यास पण कांही श्रम लागत नाहीत॥ ६॥

ह्या अभंगात तुकाराम महाराज हेच सांगताहेत की भगवद्‌भेटीसाठी फारसे
श्रम करावे लागत नाहीत. हे कसे ते पुढे लिहिलेल्या विवरणात येते.

अर्थ समजण्यासाठी लागणारी अभंगमागची भूमिका व माहिती :-
अभंगाच अर्थ समजण्यासाठी खरेतर कांहिही माहिती आवश्यक नाही. पण जर संतांची चरित्रे वाचनांत असतील तर ते जरूर उपयोगी पडेल. संतांचे आचरन "जसे बोलणे तसे वागणे" असे असते एवढे जरूर लक्षांत घेणे योग्य राहील.

अभंगाचे अर्थ स्पष्टीकरण :-
अभंगाच्या १, २ व ५ ह्या चरणांचा अर्थ सोपा आहे .
१ ला चरणा :- तुकाअराम महाराज येथे उपदेश देताहेत की प्रत्येक परक्या स्त्रीला ती आई आहे ह्या भावनेनेच पहावे. अशी दृष्टी असली की स्त्रीला पाहून मनामधे ईतर वाईट विचारच येत नाहीत. श्री. रामकृष्ण परमहंस हे सुद्धा म्हणत की जेंव्हा एखादी स्त्री दृष्टीस पडेल तेंव्हा तुम्ही आईला ( जगन्मातेला) आठवा , मग तिच्या पाऊलांकडे प्रथम बघा. असे केले की तुमच्या मनांमधे स्त्रीबद्दल वाईट विचारच येणार नाहीत. ( संदर्भ: The gospel of sri. Ramakrishna page 701) . ते पुढे म्हणतात कि आदिशक्तीनेच सर्व स्त्रीरूपे धारण केलेली आहेत. म्हणुनच मी सर्व स्त्रीयांना आई जगदंबा म्हणून पाहतो. आई हे स्त्रीरुप सर्वांत शुद्ध स्वरूप आहे . ह्या ठिकाणी कोठेही थोडेही पंचेद्रियांना आकर्षण वाटावे असे अंश नाहीत.

अभंगाच्या २व्या कडव्यांत महाराज म्हणतात की माणसाने मत्सर ह्या भावनेच्या प्रगट होण्याकडे विषेश लक्ष केंद्रित करावे. जेंव्हा कोणाचे संपत्तीचे प्रदर्शन आपण पाहातो तेंव्हा परोत्कर्ष द्वेष, मत्सर, हेवा ह्या भावना जन्म घेतात. आपल्याला पण असे वैभव मिळायला हवे हे बीज तयार करतात व वैभव मिळावे म्हणुन पु:न जन्म घेण्याची तजवीज नकळत तयार होते. म्हणून या बाबतीत अत्यंत जागरूक रहा असे महाराज म्हणतात.
कॊणाचीही निंदा करूनका असे पण महाराजांनी पुढे सांगितले आहे. जेंव्हा कॊणी निंदात्मक बोलतो तेंव्हा स्वत:च्याच अंत:करणामधे तो द्वेषाच्या भावनेला थारा देत असतो. ह्या बीजाचा वृक्ष होण्यास फार वेळ लागत नाही व मग माणुस नको ते करतो. त्याचे फळ कधीतरी भोगावेच लागते. म्हणुन निंदा न करण्यामधे हे सर्व होणे टाळले जाते.

तिसîrÉÉ कडव्यांत तुकाराम महाराजांनी हेच आपल्या लक्षांत आणुन दिले आहे की " नामस्मरण करण्यासाठी ( रामनाम किंवा कोणतेही दुसरे नाम ) कांहीही कठीण प्रयत्न करावे लागत नाहीत. फक्त नामजप मनांत करायचा, किंवा कॊणत्याही
पद्धतीने नाम सतत घ्यायचे एवढे पुरे. ह्यामुळे नामस्मरण करण्याची आपल्याला सवय होते. मग कोठेही , जसे गाणी ऐकताना, टेलिव्हिजन पाहाताना भगवंताचे नामस्मरण करणे सहज होते.

अभंगाचा चौथा चरणाकडे मात्र अधीक लक्ष देणे आवश्यक आहे कारण येथे मह्त्वाची शिकवण आहे.

येथे महाराज म्हणतात की संत जे सांगतात त्यावर विश्वास ठेवावा.

शिवाजी महाराजांचे सद्‌गुरू स्वामी समर्थ रामदास यांच्या दासबोध ग्रंथाच्या " संतस्तवन " समासामधे संतांचे यथार्थ वर्णन आहे.
त्यातली खालील ओवीचरण संतांचे वर्णन करणारी आहे .
जे वस्तु परम दुल्लभ। जयेचा अलभ्य लाभ। तेंचि होये सुल्लभ। संतसंगेकरुनी॥
माहाराजे चक्रवर्ती। जाले आहेत पुढे होती । परंतु कोणी सायोज्यमुक्ति। देणार नाही ॥
जे त्रैंलोकी नाही दान। तें करिती संतसज्जन। तयां संतांचे महिमान। काय म्हणोनी वर्णावे॥
ह्यांचा शब्दार्थ जरी पाहिला तरी संतांचा महिमा कळतो.
ह्या ओव्यांचा एकून अर्थ खालील प्रमाणे आहे.
परमात्मवस्तू ( परब्रह्मप्राप्ती) अतिशय दुर्लभ आहे. ती मिळणे हाच अलभ्य लाभ आहे. ती दुर्लभ वस्तू संताच्या संगतीने सुलभरीतीनें लाभते. आजपर्यंत जगामधें कित्येक महाराजे, चक्रवर्ती राजे झाले, सध्याही आहेत. पुढेही होतील. पण यांपैकी कोणीही सायुज्यमुक्ति देऊं शकणार नाही. संत विलक्षण दानशूर असतातव आपले सामर्थ्य उदारपणे दुसîrÉÉला सहाय्य करण्यासाठी वापरतातत. त्रैलोक्यांत शोधलें तरी सापडणार नाही असे अलौकिक दान संत देतात. त्या संतांचा थोरपणा कोणत्या शब्दांत वर्णन करायचा? वर्णन करताच येत नाही.
हे संतांना कां शक्यहोते ह्याचे कारण म्हणजे संत जीवन्मुक्त असतात. त्यांना आपण ब्रह्मज्ञानी म्हणुन ओळखतो.
असे हे ब्रह्मज्ञान फक्त संतच देऊ शकतात. संत स्वत: ब्रह्मज्ञानी असतात. जन्म-मृत्युवर विजय मिळवलेले असतात. थोडक्यांत सांगायचे झाले तर संत हे मनुष्यरूप घेतलेले प्रत्यक्ष परब्रह्मच असतात. अव्यक्त परब्रह्मच संतरूपाने अवतरित झालेले असते.

एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे अशा संतांचि वाणी म्हणजेच परमेश्वरी वाणी होय.

आपण सगळेचजण द्वैता मधे आहोत. आपल्याला कळेल असे शब्दाअंचे साधनच भवपार करू शकते. त्यासाठीच संत अवतरित होतात व आपल्याला समजेल अशा भाषेंत उपदेश करून मोक्ष अर्थात ब्रह्मज्ञान मिळवण्याचा मार्ग दाखवतात.
म्हणूनच अभंगाच्या ४थ्या चरणामधे तुकाराम महाराज म्हणतात की " रामराम म्हणा, नामस्मरण करा. त्यासाठी फक्त तुमची संतवचनांवर श्रद्धा हवी".

अभंगाच्या ५ व्या चरणात महाराज आपल्याला नेहमी खर बोला असे सांगताहेत. तएच ६व्याचरणांत शेवटी तुकाराम महाराजंनी खात्री दिली आहे की इतर कांहि प्रयत्न करण्याची तुम्हाला गरजच नाही. फक्त ह्याअभंगाप्रमाणे आचरण केले तरी पुरे आहे. .
धर्मराज युधिष्ठीराला अर्धसत्य बोलल्यामुळे नरकाचेव दर्शन घडले. जर आपण नेहमी खोटे बोललो तर आपल्याला पण नरक पाहावा लागेल. त्या पेक्षा खरे बोललेलेच बरे.


हाच उपदेश इतर अनेक संतांनी केलेला आहे. भक्तिमार्गामधे नामस्मरणाला महत्व आहे कारण नामस्मरण हा एक सोपा मार्ग आहे.

अभंगाचा अर्थ व शिकवण : ही वरील प्रमाणे असावी असे मला वाटते.







0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home