Thursday, October 11, 2012

    

Abhanga 11 न करी रे संग राहे रे निश्चळ । : Date 11-10-2012 on Developing steady Mind
Readers may give their comments in the field provided in the blog or send email on address :-  rgphadke@gmail.com

अभंगाचे मराठी स्पष्टीकरण इंग्रजी स्पष्टीकरणानंतर दिलेले आहे.
blogaddress :- http:// tukaramasteachings.blogsopt.com
     
Special Note for this Abhanga:

I have dared to select this Abhanga though I am aware of my meager knowledge about the thoughts described in this abhanga. Therefore to explain its meaning;  is like trying to explain the text for Masters degree by a person who is in fifth or sixth standard.

It is my humble request to the readers to excuse me for the omissions, misinterpretations. But do let me know about my shortcomings.


न करी रे संग राहे रे निश्चळ । लागो नेदी मळ ममतेचा ॥ १ ॥
या नांव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान । अनुभवा वाचून बडबड ॥ २ ॥
इंद्रियांचा जय वासनेचा क्षय । संकल्पाहि न ये वरी मन ॥ ३ ॥
तुका म्हणे न ये जाणीव अंतरा । अंतरी या थारा आनंदाचा ॥ ४ ॥

Transliterated Version.
         na karI re saMga raahe re nischaLa| laago nedI maLa mamatechaa|| 1||
         yaa naaMv advaita khare brahmdynaana | anubhavaa vaachUna baDabaDa || 2||
         Indriyaamchaa Jaya vaasanechaa kShaya | sankalpaahi na ye vari mana|| 3||
         Tukaa Mhane na ye JaNIva aMtaraa| aMtarI yaa thaaraa aanaMdaachaa|| 4||

Verbatim translation.
Do not get attached, remain steady . Do not allow the stains of attachment to stick you. || 1 ||
This is called Advaita (Non-duality अद्वैत) and this is the true knowledge . Without experience all is an empty talk . || 2 ||
Wining over the senses means winning over the desires.( When this happens ) the mind  does not even attempt to do any intentions(संकल्प) .|| 3 ||
Tuka says that in such condition there is no existence  of “ I “.;  the only experience is that of pure Bliss. || 4 ||

Background Information

This abhanga describes the state of mind of a (जीवन्मुक्त )a liberated person at it's end and also it describes what is to be done , what effort one has to put to attain this state in this birth itself.

We have seen in the earlier Abhangas that Total Surrender , Chanting His name(हरीनामस्मरण) and remember Him always are the major aspects of (साधना) the physical efforts one has to put  to attain the coveted state of liberation .

One of the difficulties is that our mind is not stable. It always is thinking of doing something,. If that thinking is converted to action then we are required to face / enjoy the fruits of our action. Net result is bonding  .

Patanjali yogasutra says मन एव मनुष्याणां कारण बंध मोक्षयो: meaning “ Mind is the cause of liberation or of the state of binding”

Mind is always seeking Happiness because that is the true nature of Self. 

However the Bliss or pleasure gets manifested due to association of the mind with some Physical or Mental objects.( Physical objects such as Beautiful Scenery or Mental object like a melodious song gives us pleasure too.). In fact our mind gets attached to all these objects .Also it remains attached to the memories of the pleasure or pain experienced.

Our Mind is also capable of recalling these memories at its will and wish. Recalling the memories can also be the cause of some pleasures or pains and other feelings.

With this background , we are able to understand the methodology Sant Tukarama is advising to us to follow as stated in the the first three lines of the abhanga.

The whole world thus runs only because the mind is getting attached. That is how the MAYA shakti runs the affairs in this world as well as for the individual soul.

It is this Individual Entity which is seeking liberation.

Meaning of the abhanga :

In the first line Maharaj has used the words ( संग = Attachment and association with worldly ties) , ( मळ = Stain) ( ममता = Love for the worldly pleasures, and objects ) and ( निश्चळ= unmoving , stable) , It is important to understand the usage of these words in the context of the background. 
These word are best understood when we look at some of our common experiences as examples.. let us see a few ones. One can go on extending these examples and the meaning becomes more and more clear.

Our mind can get  attached to different kinds of  objects ( Physical or Mental ones). 
1) Attachment to the Physical Objects
We get attached to our Family, House, wealth, Body etc. This is very easy to understand. This is called (Mamata) . We love all these objects and the thought of separation is very painful for everybody. Hence just one example of food is enough.

1st example ) Food articles are the objects which definitely bind us . Take the example of Diabetic people who are not supposed to eat sweet articles. I have seen many such persons who definitely feel sorry for themselves for not being able to eat what they desire. It is unpleasant feeling. Food has colour, form, smell, taste . Any of these singularly or in combination can trigger the desire for food.
The desire if not fulfilled takes the form of seed and when the death occurs such desires are taken by our Subtle Body( Astral Body) with it Then the search for a suitable body takes place and then one is born again. The cycle can continue.

Though at start the object was  Physical object; the memory of it even  triggers  the same desires.
We should not forget that those desires which are not satisfied may become the seed for next birth .

2) Mental Objects:  These are not seen but act in the same fashion. These are the bursts of our memory. Most of us have the habit of remembering and dwelling on the past events. Our tendency is to remember the unhappy events more and happy events comparatively less. Thus the memories are the mental objects to which we are attached. 

2nd   Example:- If the event was bad , then obviously it's memory brings nothing but regrets , sometimes feeling of anger, depression , fear etc. If the persons who were the cause of that event , are still present ( alive) we feel extremely dangerous feelings such as hatred , anger . Then based on these feelings ; sometime we do the actions for which the results are disastrous. Then we get entangled again .

3rd  example ) Some times the memory gets triggered due to some external cause such as a melodious song. However the cause of trigger is unknown sometimes. If the memory is of Pleasure experienced, it momentarily gives us the some pleasure but later on we feel sad and say to ourselves” Oh! Those were the good days”. The memories of childhood are mostly of this nature. We want to relive the gone old good days. Again the desire is generated unknowingly and result is known to us.


4th Example : Many a times we remember some comments made by others about ourselves, and these Mental objects are also the cause of Distress .Some memories which we have not had come to us through the litterateur , and that makes our blood boil.

5th Example : Many time some events happen in our life. We do not trigger these. They just happen .These are called Accidents in which we loose somethings dear to us. The reactions to such events are the questions asked with distress such as Why this happened in my case? I have not done anything wrong!Why? Why? The only answer is our (प्रारब्ध) . We get attached to the sufferings and that is also a worldly knot..

All these are the examples of the association , attachment of our mind to the worldly things. ie. (संग) in this abhanga.. It is the fives senses and their associated objects in different form , which are the things we get associated with. 

Our Ego (अहंकार=I ) “ Doer, Enjoy-er , Sufferer” gives birth to all the attachments.

The Shastras call all this as the play of MAYA . She binds us by this game. to the cycle of death-birth-death is well known. But she has given us the power to think  which Sant Tukarama is advising us to use..

Note : However there are some special exceptions : These are experiences of pleasure or Bliss. But these are spiritual in nature( Mental objects) . They always take us near God due to intense feeling of love and (आनंदा) . for Example : Seeing our Guru or God we love in the dream. Dream of performing a pilgrimage. Meeting Seers and sages in dreams etc.. These experiences do not cause Binding rather these are treated as milestones indicating our progress in the spiritual path.

Tukarama Maharaj advises us that we should avoid this association.( संग). He compares the  attachment to the stains on a clean cloth. Stain = Attachment and cloth = Mind. therefore he says in the first line that " Do not allow the stains of this attachment ( ममतेचा मळ) to your Mind. And for this reason learn to be very stable , steadfast निश्चळ). The  meaning is  you should not get disturbed by any attachments..In my opinion indirectly he is telling us to remain steady in our mind to the following thought. 

one of the ways for doing this is as given below.  
1)Remember that He is the Doer and we are his instruments only.
 2) All that happens is as per his desires (after we make our efforts which are done due to inspiration given by Him). 
3) We can  remember Him by chanting his Holy Name.

This is probably the main reason why every saint is giving emphasis on the  (नामस्मरण) remembering Him by reciting any of the names of the Lord is useful.

Sri. Ramakrishna Paramahansa has given the example of an “ Anvil” of a blacksmith. The Anvil never gets affected by the hammering it receives. It never retaliates the hammering. It's place position (Where it is placed) is never disturbed by the impact of the hammer. Our devotion to God should like the example of Anvil. Never should it get disturbed by the problems , or by the attractions of worldly things, or by bitter words spoken by others . Even a thought to retaliate should not arise in it.
Our mind should have the only thought of our beloved Lord. At the most one of the above said point can be immediately thought so that above described state of mind is achieved.
The unwavering mind thinking of only Lord is the desirable state here.
Mind can have only one thought at a time. Thus if it is only thinking of God then it's all other actvities stop. This is called ( उन्मनी अवस्था) Thoughtless state. It is the state of body and mind where the devotee( भक्त) and his God( भगवंत) are one and the same.
The state of (अद्वैत)oneness. Since in this state is ultimate , what one fees is the pure Bliss. This is the state in which a liberated (ब्रह्म ज्ञानी पुरुष) person. This is what Sant Tukarama says in the last three lines.( 2,3,4)

Tukarama Maharaj also says in these lines that until then  all the words are just like empty shells. What is important is the true experience. When this state is reached what is left is only the Bliss.

This is the meaning we get from this abhanga.but we should not stop here.

Probably Sant Tukarama has described his own state in this abhanga. This is all I am able to say here.
in fact there is further guidance for us.
The Abhanga has also described the process of both the Yoga of Knowledge( ज्ञानयोग) as well as the yoga of Devotion (भक्तियोग). The part of putting efforts to make our mind like an anvil ( only thinking of God etc described in earlier paras) is the yoga of Devotion(भक्तियोग).
And the other part describing the Winning over the desires and demand of our Sense organs thereby killing the desires is the yoga of Knowledge.

It also clarifies his Insistence on नामस्मरण भक्ति the path of Remembering any of His Holy name which does not-have any limitations of space, time state of health etc.

Therefore we should follow this path of Devotion is the conclusion .
This appears to be the meaning of this abhanga.

॥ॐ तत्‌ सत्‌ ॥


अभंगाचे मराठी स्पष्तीकरण येथून पुढे दिले आहे.
Abhanga 11 : Date 11-10-2012 on Developing steady Mind
Readers may give their comments in the field provided in the blog or send email on address :-  rgphadke@gmail.com

blogaddress :- http:// tukaramasteachings.blogsopt.com
     
ह्या अभंगाबद्दल महत्वाची टीप :

ह्या अभंगाची निवड करताना मी धारिष्ठ्य़च दाखवले आहे. ह्याचे कारण म्हणजे ह्या अभंगातले विचार अत्यंत उच्च कोटीचे आहेत., व माझासारख्य़ा अनपढ माणसाला त्यांचा अर्थ स्पष्ट करून सांगणे म्हणजे पाचवी सहावीमधे शिकत असलेल्या मुलाने उच्च शिक्षणांतले प्रमेय सोडविण्यासारखे आहे..

म्हणून वाचकांना माझी नम्र विनंती आहे की जर कांही चुका झाल्या असतील तर त्यांबद्दल वाचकांनी मला उदार अंत:करणाने क्षमा करावी. पण माझी काय चूक झाली आहे ते मात्र जरूर सांगावे.

न करी रे संग राहे रे निश्चळ । लागो नेदी मळ ममतेचा ॥ १ ॥
या नांव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान । अनुभवा वाचून बडबड ॥ २ ॥
इंद्रियांचा जय वासनेचा क्षय । संकल्पाहि न ये वरी मन ॥ ३ ॥
तुका म्हणे न ये जाणीव अंतरा । अंतरी या थारा आनंदाचा ॥ ४ ॥

अभंगाचा शब्दार्थ :

हे सज्जन हो मन स्थिर ठेवा व कसल्याही गोष्टीचा स्वत:ला संग लावू नका ॥ १॥
ह्या असे राहण्यालाच अद्वैतात असणे म्हणतात. अद्वैत हेच खरे ब्रह्मज्ञान आहे. बाकी जे कांही बोलले जाते ती अनुभवावाचूनची अर्थहीन बडबड आहे॥३॥
इंद्रियांवर जय मिळवणे म्हणजे वासना क्षीण करणे होय. असे जमले की मन संकल्प करण्याचे सोडून देते॥ ४॥
|तुका म्हणतो की असे घडले की "मी" पण अंतरांत रहात नाही. मग अंतरात उरतो तो फक्त निर्मळ आनंद ॥ ५॥

अभंगाच्या मागची अर्थ स्पष्टिकरणासाठी असलेली भूमिका :-


हा अभंग जीवन्मुक्ताच्या मनाची स्थिती तर दर्शवणारा आहेच , शिवाय ह्या अभंगाद्वारे ह्याच जन्मी आपण जीवन्मुक्त होण्या साठी कोणते प्रयत्न करायला पाहिजेत ते पण सांगितले आहे.

आधी घेतलेल्या कांही अभंगात आपण हे पाहिले की " संपूर्ण शरणागती" हरीनामस्मरण " आणी भगवंताला नेहमीच आठवून सर्व कांमे करणे ही साधनेची महत्वाची अंगे आहेत. असे प्रयत्न करूनच आपल्याला आपले सर्वोच्च असे मोक्षाचे साध्य गांठता येईल.

ह्या प्रयत्नांमधे येणारा मुख्य अडथळा म्हणजे आपले अस्थिर मनच आहे. मन सतत कांहीतरी करण्यासाठी प्रयत्नशील असते. सतत कोणतेतरी विचार मनामधे येतच असतात. जर त्या विचारंनुसार आपण कार्य केले तर त्यांचे फळ मिळते. हे फळ कधी आनंद देते तर कधी दु:ख देते. दोन्हिंचा परिंणाम शेवटी एकच असतो तो म्हणजे बंधनांत आपले अडकणे.

Patanjali yogasutra says meaning “ Mind is the cause of liberation or of the state of binding”
भगवान पतंजली त्यांच्या योगसूत्रांमधे म्हणतात ,” मन एव मनुष्याणां कारण बंध मोक्षयो : “
अर्थात मनच बंधनाचे कारण आहे व मनच मोक्षाचेही कारण आहे " आपले मन सतत आनंदासाठी धडपडत असते ह्याचे कारण म्हणजे " आनंद हेच आपले खरे स्वरूप आहे ".

आपल्याला अनुभवास येतो तो आनंद प्रगट होण्यास मन व कांहितरी बाह्य उपलब्ध असलेली वस्तू असते. ही वस्तु कधी जड स्वरूप असते तर कधीकधी अव्यक्त असते.( उदाहरणार्थ ; सुंदर निसर्गाअला पाहून आनंद होतो. येथे निसर्ग ह जड स्वरूप , आपल्या डोळ्य़ांनी दिसतो. पण एकादे गोड गाणे आपल्याला दिसत नाही , ते अव्यक्तरुपात असते. ) मुख्य मुद्दा हा की मन त्या वस्तुशी संलग्न होते व आपल्याला आनंदाच अनुभव देते. ह्या शिवाय आठवणीच्या द्वारे मन ह्या वस्तूंशी नंतर पण जोडलेले राहते. सुख वा दु:खाच्या आठवणी मनामधे अनंतकाळापर्यंत राहतात.

मनामधल्या आठवणी कधीही परत डोके वर काढू शकतात. तसे करण्याचे मनास सामर्थ्य देवाने दिलेले आहे. अशी आठवण झाली की मन कधी कधी परत आनंदी होते , कधी कधी क्षॊभित पण होते किंवा इतर कांही भावना मनात जाग्या होतात.

मनाचे हे व्यापार कसे चालतात हे आपण पाहीले व आता यांच्या मागोव्याने आपल्याला तुकाराम महाराज आपण काय करायचे जे सांगतात तेही स्पष्ट होईल. ह्या भूमिके वरून अभंगाचा अर्थ स्पष्ट होतो.

खरेतर सर्व सृष्टीचे सर्वच व्यवहार मनाच्या असे वस्तू व आठवणींशी जोडले जाण्यामुळे (संग होण्यामुळे) घडत असतात. ह्यालाच अध्यात्मात "मायाशक्तीचे कार्य " असे म्हणतात . ह्यामुळेच जग चालू राह्ते. व तसेच व्यक्ती कार्यरत राहातात .
ह्यां पैकी माणूस हा (व्यक्तीगत स्वरूपांत ) मोक्ष मिळावा म्हणून प्रयत्न करत असतो.
अभंगाचे अर्थ स्पष्टीकरण :

अभंगाच्या पहिल्याच ओळींत तुकाराम महाराजांनी " संग " हा श्ब्द वापरला आहे. संग म्हणजे आपली दृश्यांतल्या वस्तू, प्राणीमात्र, घरदार संपत्ती, बायकॊमुले , पती, आईवडील भाऊ इत्यादी सरवांविषयी असणारी आसक्ती , ममता, माया, मोह हा आहे. ही आसक्ती जडवस्तूंचीच नव्हे तर अव्यक्ताची पण असते.
) जडा बद्दलची आसक्ती : आपले घरदार, संपत्ती, देह म्हणजे शरीर (स्वत:चे व आपल्या नातेवाईकाअंचे, बायको मुलांचे शरीर हे जडामधेच येते) . ह्या आसक्तीला ममता हे नांव आहे . ह्या शिवाय निरनिराळ्य़ा खाद्यपदार्थांची आवड म्हंणजे पण जडाचीच आसक्ती होय. जड पदार्थ नाशवंत असतात हे आपण नेहमी अनुभवत असतोच.
उदाहरण १) खाद्यपदार्थांची आसक्ती सुद्धा आपल्याला बंधनात टाकते. एखाद्या मधुमेही माणसाचे उदाहरण घेऊया. मधुमेही व्यक्तीने जर साखरचे गोड खाल्ले तर रोग बळावतो. हे ठाऊक असूनही गोड खाता येत नाही म्हणुन दु:ख उद्वेग करणारी अनेक माणसे आपण रोज पहात असतो. ही भावना नक्कीच आनंददायी नाही हे सहज समजते. खाद्यपदार्थ निरनिराळ्या रंगाचे, चवीचे व सुगंध असलेले असतात. ह्यांपैकी कोणत्याही एकाची आठवणसुद्धा खाण्याच्या वासनेला वर आणायला पुरेशी असते.
मग ही वासनापुर्ती झाली नाही की ती मनामधे आठवणीच्या रुपाने बीजरूप होते. चित्तामधे ही आठवण साठते. जेंव्हा मृत्युहोतो तेंव्हा आपले सूक्ष्म शरीर ह्या सर्व पूर्ण न झालेल्या वासनांना, तसेच बीजरुपाने साठवलेल्या वासनांना बरोबर घेऊन स्थूल शरीराबाहेर पडते. मग ह्या वासना कोठे शमवल्या जातील असा देह शोधून पुन: नवा जन्म घेते. नव्या जन्मामधे नवी वासना निर्मिती होते व हे चक्र सुरू राहते.

म्हणजे जरी सुरवातीला जड पदार्थ होता तरी बीज हे सुक्ष्मरुपातच आठवणी म्हणुन साठवले गेले. त्या आठवणीचेच ओझे आपण खांद्यावर घेतले व पुढच्या जन्माची तयारी केली असे म्हणता येईल.

) अव्यक्त रुपांतील वस्तूंचे उदाहरण :
१ ले उदाहरण :वस्तू अव्यक्त असेल पण परिणाम जडाप्रमाणेच असतात. साधारणत: उगाचच कांही आठवणी मनांत उसळी मारुन बाहेर येतात. आपल्यापैकी सर्वांनाच जुने मान अपमान आठवतात. कांहीजण त्यांच्यावर विचार पण करतात. ह्याचा परिणाम म्हणजे ज्याने अपमान केला त्याचा बदला घ्यावा , त्याचे वाईट व्हावे इत्यादी भावना जन्म घेतात. थोडक्यांत म्हणायचे झाले तर आपल्या आठवणीच इतरही वस्तुंप्रमाणे आपल्याला सुखदु:खाचे अनुभव देतात . अर्थात त्यांना मन चिकटून राहते. नंतर जर आलेल्या आठवणीप्रमाणे वासना पूर्ती झाली नाही तर परत एकदा जन्ममृत्युच्या चक्रामधे आपण अडकतो.
२रे उदाहरण : समजा एखादी घटना वाईट दु:/ क्षोभदायक मागे कधीतरी घडली असेल ( अपमानास्पद प्रसंग, कॊणाचे टोचून बोललेले आठवणे वगैरे), तर अशा घटनांची कधीकधी कांही कारणास्तव किंवा उगाचच जर आठवण झाली तर आपल्या क्रोध, नैराश्य, भीती, द्वेष अशा भावनांचा उद्रेक होऊ शकतो. ह्या भवनांच्या अंमलाखाली गेल्याने आपण वर्तमानात नकॊ तसे वागतो. परिणाम घातक होतात. व कधी पश्चाताअप होतो. पण असे वागल्याने आपण पुन: जन्म-मृत्युचक्रामधे स्वत:ला गुंतवत असतो.
३रे उदाहरण : कधीकधी बाह्या कारणामुळे आठवण जागृत होते.जसे एखादे गोड गाणे ऐकले तर होते तसे. त्यामुळे त्यावळी भोगलेल्या आनंदमय दिवसांची आठवण तसेच दिवस पुन: यावे असा विचार मनामधे आणते. बालपणीच्या आठवणी असे विचार नेहमीच मनामधे निर्माण करतात. ह्या मुळे नकळत नवी वासना निर्माण होत असते. वासनापूर्ति तर शक्य नसते. मग परिणाम काय हे सहज लक्षांत येऊ शकते.
४थे उदाहरण : बरेच वेळा कोणी बोललेले आठवते व मनाला अत्यंत वाईट वाटते. आठवणीच नव्हे तर एखाद्या पुस्तकामधले / वर्तमानपत्रातले वर्णन ऐकूनही मन क्षुब्ध होते. काहीतरी करावेसे वाटते.
५वे उदाहरण : ध्यानी मनी नसताना एखादा अपघात होतो व आपले भयंकर नुकसान होते. असे घडले की लोक शोकाने म्हणतात की " माझी काय चूक होती म्हणून मला हे भोगावे लागत आहे ? कां? कां? असे घडले? अशा रश्नाचे उत्तर एकच आहे ते म्हणजे आपले "प्रारब्ध".
तरीही आपण नकळत अशा दु:खात व्यस्त होतो व कांहितरि असे काम करतो की पुन: जन्ममृत्यु चक्रामधे अडकतो..
वर पाहिलेली सर्वच उदाहरणे , आपण " संगामधे " म्हणजेच नाशवंताच्या आसक्तीमधे कसे गुंततो ते स्पष्ट करतात. आपल्या पंचेंद्रियांच्या माध्यमाद्वारे आपण असे करत असतो. . आपल्यामधला " अहंकार " “मीपणा " अपल्याला आसक्ती ममते मधे बांधत असतो.. हेच खरे कारण आहे.

आपल्या शास्त्रांप्रमाणे हा सगळा मायेचा खेळ आहे. मायेमधे आपल्याला जन्म-मृत्यु चरामधे बांधण्याची खूप मोठी ताकद आहे. पण हे विसरून चालणार नाही की मायाच आपल्याला सारासार विवेक बुद्धी पण देते. तुकाराम महाराज आपल्याला ह्या अभंगामधे ही विवेकबुद्धीची देणगी नीटपणे वापरायला सांगत आहेत.

टीप: वर पाहिलेल्या उदाहरणांमधे कांही बद्दल अपवाद पण असतात. विषेशत: आनंदाच्या अनुभवांचे. जेंव्हा आपल्याला भगवंताच्या कांही लीला इत्यादिचे वर्णन ऐकून आनंद होतो तो सात्विक असतो. असा आनंद झाला की भगवंबद्दल प्रेमाची तीव्र भावना उत्पन्न होते. अशी भावना आपल्याला भगवंताकडेच नेणारी असते व आपल्यामनामधे भगवंतभेट व्हावी अशी आसक्ती निर्माण करते. अशी आसक्ती जन्म-मृत्यू बंधनात बांधत नाही उलट मोक्षाकडेच नेते. असे भवनांचे असणे म्हणझे आपण योग्य मार्गावर वाटचाल कर आहोत हे दर्शवणारे मैलाचे दगडच असे म्हणता येते. असा संग चांगला असतो.

तुकाराम महाराज म्हणुनच सांगत आहेत की " संगत्याग" करा. संग म्हणजे जणू शुभ्र कापडावरचा काळ्य़ा रंगाचा डाग. अशा डागाच दृष्टांत अभंगात आहे. येथे कापड म्हणजे आपले मन व डाग म्हणजे ममता आसक्तीचा मनाला लागलेला मळ. असा मळ मनास लागू नये म्हणून सावध राहणे हेच " राही रे निश्चळ " ही ओळ सांगते. ह्या ओळीद्वारे महाराज आपल्याला विवेकबुद्धी जागी ठेवून मनाला असा मळ लागू देऊ नका असेच सांगत आहेत.
हे प्रत्यक्ष जीवनात कसे करायचे त्याचेवर खाली दिलेले मुद्दे आहेत, ते आपल्या आचरणांत आणायचे आहेत.
) नेहमी हे लक्षांत ठेवावे की भगवंत हाच कर्ता आहे व मी त्याचे कार्य करणारे यंत्र आहे.
) सर्वकांही भगवंताच्या ईच्छेप्रमाणेच घडत आहे . ( तोच काम करायची प्रेरणा देतो, म्हणुन प्रत्येक काम नीट होईल असा प्रयत्न मी केला पाहीजे.
) भगवंताची आठवण सतत त्याच्याच नांवाचे स्मरण करुन ठेवावी.
तुकाराम महाराज नामस्मरनावर कं भर देतात ह्याचे कारण कदाचित हेच असावे. आपन भगवंताचे कॊणतेही नांव घेऊन त्याचे स्मरन करू शकतो.

श्री.रामकृष्ण परांमहंसांनी मन स्थ्र कसे ठेवावे यासाठी एक उदाहरण " लोहाराच्या ऐरणी " दिले आहे. ऐरणीवर लोहार सतत हातोडीने लोखंडाच्या वस्तुंना ठोकत असतो. पण ऐरणीवर ह्याचा कांहिही परिणाम होत नसतो. ऐरण जागच्याजागी स्थिरच असते.
असेच आपले भगवंतावर प्रेम व भक्तीभाव हवेत. आपले मन नेहमी ह्या भावांत असले की मग जगामधे घडणारे सर्व कठीण प्रसंगी माणूस स्थिरबुद्धिने जे होईल ते सहन करू शकतो. त्याला सृष्टितल्या सुंदर वस्तूंची भूल पडत नाही. तसेच कठोर बोलही तो सहन करू शकतो. मना मधे बदल्याची भावना सुद्धा असे बोल ऐकले तरी येणार नाहीजर स्थिर बुद्धि असेल तर. फक्त बगवंताचेच बद्दल विचार अशा माणसाच्या मनामधे येतील. समजा वर लिहिलेल्यापैकी एखादा प्रसंग जर आला तर विवेकाने माणूस योग्य तेच कर्म करेल.
भगवंतावर असे मन लागणे ही मोठी भाग्याची स्थिती आहे . ज्याला मोक्ष हवा अहे त्याला अशी स्थिती हवीहवीशीच वाटते. कारण जर फक्त भगवंताच मनात असेल तर मग मनामधे दुसरे कांहीही नसेल.
अशा मनाच्या अवस्थेला "उन्मनी " अवस्था असे नांव आहे.
ह्या अवस्थेमधे भक्त व भगवंत वेगळे उरत नाहीत. ह्य़ालाच अद्वैतामधे जाणे म्हणतात. ह्या अव्स्थेमधे राहतो तो ब्रह्मानंद . फक्त ब्रह्मज्ञानी पुरुषाचीच अशी अवस्था होते.
हेच तुकाराम महारजांनी अभंगाच्या शेवटच्या २,,४ ह्या कडव्यांमधे सांगितले आहे.

महाराज पुढे म्हणतात की अशी अवस्था जोवर येत नाही तोवर शब्द एखाद्या रिकाम्य़ा कवच्याप्रमाणे आहेत. प्रत्यक्ष अनुभवच महत्वाचा आहे. असा अनुभव येतो त्याला ब्रह्मानंद मिळतो.

असा ह्या अभंगाच अर्थ असाव असे मला वातते. असो.
तुकाराम महाराजानी ह्या अभंगात स्वता:चीच ब्रह्मस्थिति वर्णन केली आहे असे पण मला वाटते.

अभंगाची शिकवण : अभंगाची शिकवण पण आहे ती खालील प्रमाणे असावी.

अभंगामधे ज्ञानयोगातील प्रयत्नांचे वर्णन आहे . मनास ऐरणीप्रमाणे करणे हे ज्ञान योगामधले प्रयत्न आहेत. तसेच वासना जय व पंचेद्रियांवर ताबा हे ज्ञान योगातले प्रयत्न आहेत.
तसेच भगवंताकडेच सतत मन लावणे हे भक्तीयोगातले प्रयत्न आहेत.

नामस्मरणावर तुकाराम महाराजांनी भर कां दिला आहे ते पण येथे स्पष्ट झाले. नाम
स्मरणासाठी कसलीच आडकाठी ( जाग, वेळ , तब्बेत इत्यादी ) येत नाहीत.
म्हणुन आपण भक्तीयोगाचे मार्गावर जाणे सोईस्कर आहे हे महाराज सांगत आहेत.
असा पण अर्थ असावा असे मला वाटते.

॥ॐ तत्‌ सत्‌ ॥









1 Comments:

At October 11, 2012 at 11:46 PM , Blogger mjayaram22 said...

Brilliant

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home