Saturday, November 10, 2012



Abhanga 14कन्या सासु़ऱ्यासी जाये ।  : Date 10th Nov 2012:
Readers may give their comments in the blog,in the field provided for this purpose. Or they may email their comments on the address : rgphadke@gmail.com

अभंगाचे मराठी स्पष्टीकरण इंग्रजीनंतर दिलेले आहे.

कन्या सासु़ऱ्यासी जाये । मागे परतोनी पाहे ॥ १ ॥
तैसें जाले माझ्या जीवा । केंव्हा भेटशी केशवा ॥ २ ॥
चुकलीया माय । बाळा हुरुहुरु पाहे ॥ ३ ॥
जीवनावेगळी मासोळी । तैसा तुका तळमळी ॥ ४ ॥

Verbatim Meaning :-

The daughter ( after marriage) keeps on looking back to her .while she is going to her husband's house || 1 ||
My condition has become like this . O' Keshavaa when will you meet me ?|| 2||
The child becomes restless when it's mother gone out of sight. || 3 ||
Tuka is restless like a fish taken out of water || 4||

Meaning of this abhanga:

In this abhanga, Sant Tukarama maharaj is expressing the condition of his mind . Her has given the examples of the newly wedded girl leaving her father's house where she has spent all her maiden life until her marriage. She keeps on looking back to the house which she is leaving to start her new life of a householder.
In another example Tukarama maharaj has given the mental state of a child who is separated from it's mother. . For the child all the world is it's mother . It can not tolerate her absence even for a short time.
Also at the end of Abhanga Maharaj has given the example of the fish taken out of water. The fish out of water can not survive . All it wants is water and water only and nothing else.
Tukaram Maharaj is restless like this due to his longing for the God. All he desires is the meeting with his beloved Panduranga whom he has addressed as Keshavaa.

Teaching of the abhanga :-

When the mind desires only the God and nothing else , then only he reveals to such a devotee (दर्शन).Sri.Ramakrishna Paramahansa has explained this as follows..

Sri. Ramakrishna Paramahansa says in the Gospel ( ref page 85) that
God reveals Himself to a devotee who feels drawn to Him by the combined force of three attractions; the attraction of worldly possessions for the worldly man, the child’s attraction for his mother, husband's attraction for his chaste wife. Add together these forces of love, these three powers of attraction, and give it all to God. Then you will certainly see Him.”

It is necessary to have this kind of longing for Him.; is the teaching here. .


Marathi version:

Abhanga 14 : Date 10th Nov 2012:
Readers may give their comments in the blog,in the field provided for this purpose. Or they may email their comments on the address : rgphadke@gmail.com

कन्या सासु़ऱ्यासी जाये । मागे परतोनी पाहे ॥ १ ॥
तैसें जाले माझ्या जीवा । केंव्हा भेटशी केशवा ॥ २ ॥
चुकलीया माय । बाळा हुरुहुरु पाहे ॥ ३ ॥
जीवनावेगळी मासोळी । तैसा तुका तळमळी ॥ ४ ॥

अभंगाचा शब्दार्थ :
ज्यावेळी नवी नवरी आपल्या पतीबरोबर सासरी जाण्यासाठी निघते ; त्यावेळी ती आपल्या माहेरच्या मंडळींकडे पुन:पुन: वळून पाहाते ॥ १॥
माझीही स्थिती अशीच झाली आहे. हे केशवा तू मला केंव्हा भेटशील रे! ॥ २॥
आई न दिसल्याने जसे मूल अस्वस्थ होते,॥ ३॥ पाण्यामधून बाहेर काढलेली मासोळी जशी तडफडते ॥ ४ ॥ तशी माझी स्थिती झाली आहे.

अभंगच्या अर्थाचे स्पष्टीकरण :
ह्या अभंगामधे तुकाराम महाराजांनी स्वत:च्या मनाची होत असलेली तळमळ व मन:स्थिती व्यक्त केलेली आहे. महाराजांनी ह्यासाठी पतीबरोबर सासरी निघालेल्या नववधूच्या मनस्थितीचे उदाहरण दिलेले आहे. विवाहापर्यंतचे तिचे आपले सर्व बालपण , आयुष्य ज्या घरी घालवले ते सोडायची वेळ आलेली आहे. मायेच्या माणसांची भेट परत कधी होईल ही हुरहूर तर मनांत आहेच व शिवाय नवे वैवाहिक जीवन सुरू करण्याची उत्सुकता पण आहे. म्हणुनच अशी नववधू घरातून निघताना पुन: पुन: मागे वळून पाहाते.
अभंगातले दुसरे उदाहरण आई दिसत नसल्यामुळे होणारी बालकाची स्थिती जशी असते त्याचे दिले आहे. . आईहेच बाळाचे सर्व कांही जग असते. आईचा विरह ताटातूट लहान बाळाला क्षणभरही सहन होत नाही
अभंगाच्या शेवटी पाण्यामधून बाहेर काढलेल्या मासोळीचे आहे. मासोळी पाण्याविना जिवंतच राहू शकत नाही. त्यामुळे तिची पाण्यामधून बाहेर काढल्याव अत्यंत तडफड होते हे आपण सर्वानी पाहिलेच आहे.

भगवंताची भेट होण्यासाठी तुकाराम महाराजांची मन:स्थिती ही शीच झालेली आहे. त्यांन फक्त एकच गोष्ट हवी आहे ती म्हणजे त्यांच्या पांडूरंगाची भेट. अभंगात महाराजांनी पांडुरंगालाच केशवा अशी हांक मारलेली आहे.

ह्या अभंगाची शिकवण :
जेंव्हा माणसाला फक्त भगवंतच हवा असतो व बाकी कसलीही ईच्छा आसक्ती रहात नाही , तेंव्हाच तो अशा भक्ताला दर्शन देतो. श्री. रामकृष्ण परमहंसानी ह्यासाठी खालील लिहिलेला दृष्टांत दिलेला आहे.

श्री. रामकॄष्ण परमहंस ह्यांच्या बद्दलच्या प्रसिद्ध ग्रंथांत ( कथा चरितमृत ) The gospel of Sri Ramakrishana ( English version page 85) म्हणतात की " जेंव्हा लोभी माणसाचे संपत्तीवरचे प्रेम, लहान बाळाचे आईवरचे प्रेम व पुरुषाचे पतिव्रता पत्नीवरचे प्रेम ह्या तीनही प्रेमभावना भगवंताविषयी एकाच वेळी एकत्रपणे , एकाद्यामधे एकाचवे ळी प्रगट होतात ; तेंव्हाच भगवंत अशा व्यक्तीकडे आकर्षित होतो आणी म्हणून त्याला दर्शन देतो "
भगवंतासाठी मनामधे अशी व्याकुळता असायला हवी हेच हा अभंग आपल्याला शिकवतो.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home