Thursday, November 15, 2012

          Added 15th Abhanga करावी तें पूजा मनेचि उत्तम ।for Abhanga a week of Sant Tukarama.
          blogaddress :http:// tukaramasteachings.blogsopt.com
         Contact e-mail address is rgphadke@gmail.com

अभंगाचे मराठी स्पष्टीकरण इंग्रजी नंतर दिलेले आहे.
         Abhanga 15 Date 15th Nov 2012

करावी तें पूजा मनेचि उत्तम । लौकिकाचे काम काय असें ॥ १ ॥
कळावें तयासी कळे अंतरिचे । कारण ते साचे साच अंगीं ॥ २॥
अतिशयाअंतीं लाभ किंवा घात । फळ देते चित्त बीजाऐसे ॥ ३ ॥
तुका म्हणे जेणे राहे समाधान । ऐंसे ते भजन पार पावी ॥ ४ ॥


Verbatim Meaning :

One should rather perform worship in mind. (मानसपूजा) Then there is no need for the ritualistic worship . || 1||

Such a worship , done with full concentration of mind is the true worship | When one worships God like this then He knows this ( because He can understand the thoughts in the mind.)|| 2 ||

Any activity when done intensely ; results (gives) either some benefits or some Losses., it all depends upon what the intention is there in the mind || 3||

Tuka says that one should do the worship which give satisfaction to the mind . Such worship results in Liberation|| 4 ||

Back ground Information:

Generally when a person understands meaning of some major attributes of God such as (Omniscient, Omnipresent, Omnipotent सर्वज्ञ ,सर्वव्यापी, सर्वशक्तिमान, ), then one looks upon the God as His Father, or Mother or Friend, or Child, or Lover as per the likes of the individual. The relationship thus develops between the devotee and the God. It is not possible to imagine the God without form( निर्गूण ) and therefore it is one does the worship of the Form of God he/She most likes. ( Such Srirama, Srikrishna, Goddess Lakshmi , Swastika, , etc ) Sri.Ramakrishna Paramhansa says that Body and Shadow both are the same.

We have seen earlier that there are Nine ways one can worship the God ( नवविधाभक्ति).
One of these is Archanbhakti ( अर्चनभक्ती) in which the devotee worships the God in some form .Here the devotee offers to his God all that generally is offered to a VIP( Very Important Person) when such a VIP visits the house.

This is a popular form of Image worship .( मूर्तीपूजा) , sometimes the images are replaced with symbolic objects such as , shaligramaa, shivalingaa etc. In our country many families have the practice of performing the worship daily . One major advantage is that , we at least remember Him during this worship.

To perform the worship our Shastras have prescribed some specific method namely Worship with 16 steps,( षोडशोपचार पूजा ) The . There is a shorter version in which five steps are followed..(पंचोपचार पूजा) .However we need many material objects such as flowers, Lamp, Incense Sticks, Betel leaf and nut, cloths, etc. and of cource the food articles. This type of worship is External and is said to be necessary since it leads to concentration. When the concentration becomes deep then external rituals drop off themselves .

Internal worship is called ( मानसपुजा)manasapuja. It is actually meditation which may be a simple process of contemplation on the God with form.

Sant Tukarama is praising this form of worship in this abhanga.

Meaning of the Abhanga:

In the beginning itself Tukarama Maharaj is saying that Manasapuja is better . It does not require any external objects. All one has to do is contemplate on God.

He further says that God knows what is there in your mind. He will give you whatever you want . ( However , we must remember here that there is a need of complete surrender to Him. Then only it becomes clear and accepted by our mind that all that happens is for our welfare only.)

The third stanza of this abhanga is very important. Here Tukarama maharaja says that when one prays to the God with intense desires , it may result in getting some benefits, or it may result in some losses. However both are of temporary nature. It is far superior worship where one is not asking anything from our God except love for Him and for all that he has created. Gita calls it ( निष्काम भाव) . It leads to pure satisfaction for the devotee. The devotee then accepts whatever happens around him without getting disturbed. His love for God does not diminish due to problems he faces.

In Srimad Bhagavad gita the Lord has assured that He takes care of such a devotee.

That is why in the last stanza Sant Tukaram maharaj is advocating that this kind of Meditation ( internal worship ) is the best and one should follow it.



MarathI version of the Abhanga 15 Date 15th Nov 2012
करावी तें पूजा मनेचि उत्तम । लौकिकाचे काम काय असें ॥ १ ॥
कळावें तयासी कळे अंतरिचे । कारण ते साचे साच अंगीं ॥ २॥
अतिशयाअंतीं लाभ किंवा घात । फळ देते चित्त बीजाऐसे ॥ ३ ॥
तुका म्हणे जेणे राहे समाधान । ऐंसे ते भजन पार पावी ॥ ४ ॥


अभंगाचा शब्दार्थ :
माणसाने उत्तम पद्धतीने मानसपूजा करावी. त्या साठी कसलीही सामग्री वगैरे लागत नाही ॥ १॥
भगवंताला तुमच्या मनात काय आहे ते सर्व कळते. तो अंतर्यामी आहे. तुम्ही पुजा कां करताआहत त्याचे खरे कार्णपण तो जाणतो. ॥ २॥
जसे चितामधे असेल त्या बिजरूपाप्रमाणे कर्माचे फळ मिळते. अतिशय लोभाचा अंत शेवटी घातच करतो॥ ३॥
तुका म्हणतो की असे भजन करा की जेणेकरून तुमच्या मनामधे समाधान राहील. असे भजन्च तुम्हाला भवसागराम्तून पार नेईल. ॥ ४ ॥

अभंगामागची भूमिका व अर्थ स्पष्टीकरणासाठी लागणारी माहिती :

जेंव्हा माणसाला भगवंताच्या कांही मुख्य गुणांचा म्हणजे सर्वज्ञ, सर्वशक्तीमान, व सर्वव्यापी ह्या गुणांचा अर्थ कळतो तेंव्हाच त्याला हे पटते की भगवंताच्या बरोबर आपण कांही नाते जोडून त्याची भक्ती करावी. मग माणूस त्याच्या स्वभावानुसार भगवंताशी व्डील, आई, सखा, प्रियकर असे कोणतेतरी नाते ठरवतो व भगवंताला त्याभावाने पाहातो व हळूहळू हे नाते दृढ होत जाते. भगवंत हा खरेतर निर्गूणच आहे. पण तो सगूणही आहे. सगून रुपाशीच आपण प्रथम नाते जोडू शकतो.( ष्रीराम, श्रीकृष्ण, लक्ष्मीदेवी,
स्वस्तिकचिन्ह, ॐकार ईत्यादी सर्व भगवंताची सगूण रुपे आहेत.) श्री. रामकृष्ण परमहंस म्हणतात की जसे शरीर व सावली ही एकाचीच रूपे आहेत तसेच.

आपण हेहीपाहिले आहे की सगूणाची भक्ति करण्याचे नऊ प्रकारा आहेत. त्यांनाच नवविधा भक्ति म्हणतात.
ह्या नवविधाभक्तिंपैकी एकीचे नांव आहे अर्चनभक्ती. ह्या प्रकारामधे भक्त देवाची पूजा करतो. पूजेमधे देवाला ते ते सर्वकांही अर्पण केले जाते जे आपल्याकडे एखादी अत्यंत महत्वाची व्यक्ति पाहूणा म्हणून येते तेंव्हा अशा पाहूण्याला अर्पण केले जाते. येथे आपण भगवंताला त्याच्या मूर्तीमधे पाहतो.
अर्चनभक्ती हा मूर्तीपूजेचा सर्वांत लोकमान्य व सर्वांना आवडणारा असा प्रकार आहे.
कांही ठिकाणी भगवंताच्या मूर्ती ऐवजी ॐकाराचे चित्र, शालिग्राम, शिवाची शाळुंका शिवलिंग, अशी चिन्हरूपेपण देव म्हणुन पूजेला घेतात.
आपल्या देशांत बरच जण रोजच देवपूजा करतात. पूजा केलीजाते तेंव्हा कमीतकमी त्यावेळेपुरते काम होईना भगवंताची आठवण , स्मरण घडते.

आपल्या शास्त्रांनी पुझेच दोन प्रकार पद्धती सांगितल्या अहेत. ) षोडशोपचार पूजा . ह्या पुजेमधे भगवंताला १६ उपचारानी (आवाहन आसन, आचमन , स्नान, अभिषेक धूप, दीप नैवैद्य, विडा देणे इत्यादि ) पूजिले जाते. ) पंचोपचार पूजा. ह्या पुजेच्या दुसîrÉÉ पद्धतीत फक्त ५ उपचार केले जातात.

पण दोनही पुजा करायच्या तर निरनिराली साधन सामग्री जसे गंध, फुले, दीप, उदबत्ती, विड्याचे पान व सुपारी, कपडे, इत्यादी व शिवाय नैवेद्यासाठई फळे, व भोजनसामग्री हे सर्व लागते. अर्थात पैसा पण खर्च करावा हा लागतो.
ह्या बाह्य उपचारांच्या पुजेच मुख्य फायदा हा आहे की मन भगवंताकडे एकाग्र होते. म्हणूनच जेंव्हा मनाची एकाग्रता ह्या सर्व बाह्य उपचारांविना होऊ लागते तेंव्हा साहजिकच बाह्य उपचारांनी पूजा करणे बंद होते.
ह्या नंतर आपण मनानेच सर्व उपचार करून पूजा करू शकतो. अशा अंतर्यामी केलेल्या पूजेला " मानसपूजा " असे नांव आहे. ध्यान करणे ही पण एक वेगळ्या पद्धतीची मानसपूजाच असते असे म्हणता येईल.

अभंगामधे संत तुकाराम महाराज ह्या मानसपूजेचेच कौतुक करीत आहेत.

अभंगाचा स्पष्टिकरण करुन अर्थ :
अभंगाच्या सुरवातीलाच तुकाराम महाराज म्हणतात की मानसपूजा करणेच खरतर उत्तम पूजा करणॆ होय. ह्या पूजेसाठी कांहिही बाह्य सामग्री लागत नाही .लागते ते भगवंताचे ध्यान .

पुढे महाराज म्हणतात की भगवंतास तुमच्या मनामधे काय विचार चालले आहेत ते कळते. तुम्हाला काय पाहिजे आहे ते पण कळते. तो नक्कीच तुम्हाला जे काय आवश्यक असेल ते ते सर्व देईलच ह्याची खात्री बाळगावी. ( पण हे ही लक्षांत घेणे आवश्यक आहे की त्याला अनन्यभावे शरण जायला हवे. अशी शरणागती पत्करली असेल तरच तुम्हाला हे पण पटेल की तो जे जे कांही करतो ते तुमच्या भल्यासाठीच करत आहे.) ह्या शिवाय अशी पूजा तुम्हाला मोक्षा कडे पण नेते हा मोठा फायदा आहेच.

अभंगाचा तिसरा व चौथा चरण दोन्ही अत्यंत मह्त्वाचे आहेत. येथे तुकाराम महाराज म्हणतात की जेंव्हा कोणी भगवंताची अत्यंत तीव्रभावाने प्रार्थना करत्तो , तेंव्हा त्याला कांहितरी फायदा हा नक्कीच अनुभवास येतो पन कधीकधी कांहीच फायदा न होता उलट नुकसान झाल्यासारखे भासते.फायदा काय वा नुकसान काय दोनही अशाश्वतच, फार काळ न टिकणारे असतात.
त्यापेक्षा वरच्या दर्जाची पूजा म्हणजे भगवंतास कांहीच न मागंणे , त्याच्याकडून कसलीच अपेक्षा न धरता करणे व फक्त त्याच्यावरील प्रेमामुळे, त्याच्या सर्व निर्मितीचे कौतुक म्हणून करणे ही होय. भघवद्‌गीतेमधे ह्यालाच निष्काम भाव म्हटलेले आहे.
जर पूजा कांही फळाशा धरून केली तर त्या लोभाचे फळ हे मिळेलच पण हा फलाशेचा भावच आपल्याला जन्म-मृत्युच्या फेîrÉÉ मधे अडकवतो व जन्मोजन्मी दु:खे भोगायला लावतो हे विसरू नये हे अभंगाच तिसरा चरन सांगतो.
असा भाव भक्ताला शाशवत समाधानचा अनुभव देतो. असा भक्त त्याच्यावरआलेल्या कोणत्याही संकटांमुळे, विचलीत होत नाही. ट्याचे भगवंतावरचे प्रेम सर्व स्थितींमधे कायमच राहते, कमी होते नाही.
श्रीमद्‍भगवद्‍गीते मधे भगवंतांनी ही खात्री दिली आहे की भगवंत अशा भक्ताचा योगक्षेम स्वत: चालवतात. ह्या कारणास्तव तुकाराम माहाराज अभंगाच्या शेवटच्या कडव्यांमधे अशा आंतरिक मानसपूजेचाच सर्वोत्तम पूजा म्हणुन स्विकार करताहेत.

अशी मानसपूजा आपल्या सर्वांकडून घडॊ हीच भगवंतास प्रार्थना करूया..







0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home