Thursday, November 22, 2012

    16th Abhanga Added post  बळें बाह्यात्कारें संपादिलें सोंग। for Abhanga a week of Sant Tukarama.
     Date 23 rd Nov 2012.
    blogaddress :http:// tukaramasteachings.blogsopt.com
    Contact mail address is rgphadke@gmail.com
अभंगाचे मराठी स्पष्टीकरण इंग्रजी स्पष्टीकरणानंतर दिलेले आहे.

           बळें बाह्यात्कारें संपादिलें सोंग। नाहीं जाला त्याग अंतरींचा॥ १ ॥
ऐसें येतें नित्य माझ्या अनुभवा । मनासी हा ठावा समाचार ॥ २ ॥
जागृतीचा नाहीं अनुभव स्वप्नीं । जातो विसरूनि सकळही ॥ ३॥
प्रपंचाबाहेरी नाहीं आलें चित्त । केले करी नित्य वेवसाव ॥ ४ ॥
तुका म्हणे मज बहुरुप्याचि परी । जालें सोंग वरी आंत तैसें ॥ ५ ||

Verbatim Translation :

Many a persons forcefully assume ( show to the world) the appearance of a person who has no desires | Actually their mind has not given up the desires || 1 ||
I am experiencing this continuously | My mind is fully aware of this state of mine || 2 ||
When I sleep and go to dream-sleep state then I forget the experience of the world in the waking state (I do not have awareness of the waking state)|| 3 ||
The mind has not come out of the illusion of visual world | It keeps on doing it's work ( of doing some resolve and then doubting it ) || 4 ||
Tuka says that my present state is like that of an actor. | Whatever is seen outside ; same is the condition inside || 5 ||

Meaning of the Abhanga :

In this Abhanga Sant Tukaram Maharaj is describing the condition of the fraudster sages ( those who deceive the world by external show for their own benefits).
And he has also described his own state of mind in the second and the last stanza of the abhanga.

In the first stanza : He says that there are some kind of persons who just show that they have no desires. However they have not ( in their heart ) abandoned any of the desires.

In the second Stanza He says that I am continuously aware of this state of mind .
There are three major types of desires a man has .1) The desire for Name and fame लोकेषणा, 2) Desire for wealth वित्तेषणा ३) Desire for wife, children sex.दारेषणा) . Tukarama maharaj here is indirectly telling us to keep away from such fraudsters.

Indirectly he is also telling us to abandon the desires. How to abandon the desires is a big question . Partial answer for this question is in the third stanza.

In the next line itself i.e. is in the third stanza he says that he is fully aware of his own state of mind meaning that our mind knows where we are .

Thus a person who is desirous of God Vision should examine whether his mind still has the desires for worldly things. If it is so then the mind still needs purification.

The third stanza directly touches the thoughts described in detail in the Vedanta ( especially in the Maandukya Upanishad ) . Contemplation on this thought enables one to develop asceticism ( वैराग्य ) i.e. indifference to the worldly desires .

Tukarama Maharaj here says that one forgets the experience of the visual world (experienced when one is awake); when one goes to dream state of sleep. I am describing this thought briefly here.

We know that in the dream state we ourselves create the whole world . In this world we have people , various things such a houses, trees etc. everything that we experience in the waking state. We may get a lottery and will feel very happy too in the dream.
However when we come back to the waking state i.e, when we are awake then we realize that it was just a dream. Therefore then we do not cry over the loss of lottery money . Why? Because it was just a dream.
The Vedanta says that the waking state is also a dream only. This is the dream of the Parasmeshwara. Thus we are not different from Him. And Thus realized; we really should not get attached to the world and cry for loss of any worldly thing be it wealth, or our near and dear ones and even our own body.
Also it means that everything is done by Him as per His plan ; using our body as His instrument. ( He is the doer not me.)

In both the states the experiencer is the same. He is the Atman. He does not die . That is our true nature.

As stated in the fourth stanza , however most of us forget the above described basic fact. And because of this we always think that this world is true, our body is true. Thus we run behind the bodily pleasure and totally forget that the death can strike us any time.But if we look about every incident or happening in our life it enables us to develop  detachment and reduce the grief we may feel because of any loss.


The last stanza again describes what is the state of mind of Sant Tukarama. Himself. He confirms here that he is same both outside and inside. That is the true sign of a saint


अभंगाचे मराठी स्पष्टीकरण :-

बळें बाह्यात्कारें संपादिलें सोंग। नाहीं जाला त्याग अंतरींचा॥ १ ॥
ऐसें येतें नित्य माझ्या अनुभवा । मनासी हा ठावा समाचार ॥ २ ॥
जागृतीचा नाहीं अनुभव स्वप्नीं । जातो विसरूनि सकळही ॥ ३॥
प्रपंचाबाहेरी नाहीं आलें चित्त । केले करी नित्य वेवसाव ॥ ४ ॥
तुका म्हणे मज बहुरुप्याचि परी । जालें सोंग वरी आंत तैसे ॥ ५ ॥

अभंगाचा शब्दार्थ :-
मला हा रोजच अनुभव येतो आहे की अनेक जण बाह्यत: वैराग्याचा आव बळजबरीने आणतात. पण खरेतर त्यांनी मनाने कसलाच त्याग केलेला नसतो. ॥ १॥
हा अनुभव येत आहे हे मला सतत जाणवत असते . मला माझे मन कसे आहे तेही ठाऊक आहे ॥ २॥
जेंव्हा मी झोपी जातो व स्वप्नावस्थेत जातो तेंव्हा जागृत अवस्थेमधे जाणवलेल्या सृष्टीचा मागमूसही उरत नाही. सर्व कांही विसरले जाते. ॥ ३॥
माझे चित्त अजूनही प्रपंचामधून निवृत्त होत नाही आहे व मी त्यामुळे नित्य व्यवहार करतोआहे ॥ ४॥
तुका म्हणतो की माझे वागणे बहुरुप्याप्रमाणे आहे. जसा मी दिसतो तसाच अंतर्यामी पण आहे ॥ ५॥

अभंगाच्या अर्थाचे स्पष्टीकरण :
ह्या अभंगामधे तुकाराम महाराजांनी ढोंगी साधूचे वर्णन केलेले आहे.( असे लोक स्वत:च्या फायद्याकरीता बाह्यत: आपण मोठे निर्लोभी असल्याचे दाखवतात व त्यामुळे लोकांची फसगत होते.)
अभंगाच्या दुसîrÉÉ व शेवटच्या चरणांमधे महाराजांनी स्वता:ची खरी स्थिती काय आहे तेही
निर्भीडपणे माडले आहे.
अभंगाच्या पहिल्याच कडव्यामधे महाराज म्हणतात की कांही लोक असे असतात जे जगाला आपण अगदी नि:स्प्रूह, निर्लोभी असल्याचे सोग करतात. पण प्रत्यक्षांत त्यांच्या मनामधील वासना, ईच्छा मुळीच कंमी झालेल्या नसतात.

अभंगाच्या दुसîrÉÉ कडव्यांत महाराज म्हणतात माझे मात्र असे नाही. माझ्या चितामधे काय चालले आहे ते मी जाणुन आहे.
माणसांमधे तीन प्रकारच्या वासना ( ईषणा) साधारणत: असतात. ) उदो उदो व्हावा, नांव व्हावे , कीर्ती मिळावी अशी ईषणा . हिलाच लोकेषणा म्हणतात. ) वित्तेषणा म्हणजे भरपूर पैसा, संपत्ती मिळावी ही ईषणा ३) दारेषणा म्हणजे स्त्रीबद्दल आसक्ती.
महाराज आपल्याला ह्या तीन ईषणां असणाîrÉÉ ढोंगी साधूंपासून दुरच रहा हेच ह्या अभंगामधे सुचवीत आहेत.
तसेच तुम्ही पण ह्या ईषणांपासून दूर रहा हे पण सांगत आहेत.
पण प्रश्न असा पडतो की हे कसे करायचे ? अभंगाच्या तिसîrÉÉ कडव्यांत ह्याव थॊडासा उलगडा केलेला आहे.
तिसîrÉÉ कडव्यांत ते म्हणताहेत की त्यांना स्वत:च्या मन:स्थितीची पूर्ण कल्पना आहे. म्हणजेच आपल्या मनाला आपण कोठे आहोत ते कळते.
म्हणून ज्याला भगवंताचा साक्षात्कार हवा असेल त्याने प्रथम स्वत:च्या मनाची पूर्ण तपासणी करावी व पहावे की आपल्याला अजूनही बाह्य सृष्टीतल्या नाशवंत वस्तूंबद्दल आसक्ती, प्रेम आहे कां ? जर उत्तर हो असे असेल तर आपल्याला स्वता:चे मन शुद्ध करून घेणे जरूरीचे आहे.

अभंगच्या ह्या भागांत वेदांताचा ह्या दृश्याबद्दलचा (मांडुक्य उपनिषदातला) विचार प्रगट होतो.
ह्या विचारावर मनन केले तर माणसाच्या मनांमधे वैराग्य उत्पन्न होऊ शकते. वैराग्यचा अर्थ हाच की दृश्यांतल्या सर्वच वस्तुमात्रांचे नाशवंतच खरे आहे हे लक्षांत आल्याने त्याची आसक्ती सुटणे हा घेता येतो. वैराग्यामुळे वासना क्षीण होतात.

तुकाराम महाराज म्हणतात की आपण झोपी गेलो की जागृत अवस्थेमधे अनुभवास येते त्या सर्वाचाच पूर्ण विसर पडतो. शरीर स्वप्नावस्थेत गेलेले असते त्यामुळे हे घडते. ह्या विचाराचे थोडक्यांत विवरण पुढे केलेले आहे.

आपल्या स्वप्नावस्थेत आपणच स्वत:ची एक वेगळी सृष्टी निर्माण करतो. ह्या स्वप्नातल्या जगामधे माणसे असतात, पशू, पक्षी, घरे , ईमारती , झाडे वगैरे सर्व कांही असते व आपल्याला ते त्या वेळी खरे आहे असेच वाटत असते. जागृतावस्थेव मधे जे जे व्यवहार आपंण करतो तेच ह्या स्वप्नामधेपण घडतात. ह्या शिवाय आपल्या जागृतीत मनामधे आलेल्या कांही ईच्छा सुद्धा पूर्ण होतात. उदाहरणार्थ आपल्य़ाल लोटरी लागून पैसे पण मिळतात व आपण खूप आनंदी होतो.
पण नंतर आपण जागे होतो. आपल्याला कळते की अरे हे तर एक स्वप्न होते. पण म्हणून आपण कांही पैसे गेले ह्याचे दु:ख करत बसत नाही. स्वप्नामधले पैसे गेल्याचा आपण शोक करत नाही.
कारण काय तर ते फक्त एक स्वप्नच होते म्हणून. !

वेदांत म्हणतो की ह्या स्वप्नाप्रमाणेच हे जागृतीत अनुभवास येते ते सर्व जग पण स्वप्नच आहे. जशी आपण स्वप्नामधे सृष्टी निर्माण केली तशीच परमेश्वरानॆ आपण आहोत ती सृष्टी निर्माण केली. म्हणजे आपण सर्वजण परमेश्वराच्य़ा स्वप्नामधे वावरत आहोत. वस्तुत: आपण व परमेश्वर एकच आहोत. म्हणुन ह्या स्वप्नामधील सर्वकांही नाशवंतच आहे. अर्थात म्हणूनच ह्या स्वप्नामधल्या वस्तूंची आसक्ती धरून राहाण्यात कांहीही अर्थ नाही. पैसा, अडका हा सुद्धा त्यातच येतो. पैशाचीच नव्हे तर स्वत:च्या देहाची सुद्धा आसक्ती ठेवणे अयोग्यच आहे. आसक्ती ठेवली की जन्ममृत्युचे बंधन आलेच .
हे विश्व स्वप्नवत आहे ह्याचा अर्थ हा पण आहे की येथील सर्व कांही होते ते परमेश्वराच्या मनाप्रमाणे होते. आपला देह , पैसा हे त्याचे कार्य करण्यासाठीच आपल्याला मिळालेला आहे. ( भगवंत कर्ता -मी नाही !.मी त्याच्या इच्छेप्रमाणे चालणारे एक यंत्र आहे)

जागृत व स्वप्नावस्थमधे जे अनुभवले जाते ते अनुभवणारा मात्र एकच आहे . तो म्हणजे आपल्यातील अंतरात्मा . तेच आपले खरे स्वरूप आहे.

अभंगाच्या ४ थ्या चरणांत म्हटल्याप्रमाणे , वर लिहिलेल्या मुख्य तत्वास आपण नजरेआड करत असतो. ह्याचा परिणाम म्हणजे आपले शरीर व जगच खरे आणी शाश्वत आहे असा आपला समज होतो. मग आपण पंचेंद्रियांच्या द्वारे मिळणाîrÉÉ तात्पुरत्या भोगानंदामागे धावत राहातो. मृत्युचे विस्मरण होते .
परंतु जर आपण वर वेदांतात जे दिले आहे ते सांगणे समजून घेतले व स्वत:च्या जीवनातल्या घटनांकडे पाहीले तर आपल्या अंगी वैराग्य सहजपणे बाणू शकेल. मग कोणत्याही घटन्र बद्दल सुख दु:ख फारसे होणार नाही. मन उद्विग्न हॊणार नाही.

अभंगाचा शेवटचा चरण तुकाराम महाराजांची स्थिति कशी ते सांगतो. त्यांची ही स्थिति अंतर्बाह्य एकसारखीच आहे. ( वैराग्याची स्थिती) . हीच खरा संत ओळखण्याची खूण आहे.
अभंगाची शिकवण : विचार करून अशाश्वतची आसक्ती सोडावी, हीच शिकवण येथे आहे.








2 Comments:

At November 22, 2012 at 7:45 PM , Blogger Suhas said...

This is bit tough Abhanga.. !
Very well explained.
Bhavdiya,
Suhas

 
At November 24, 2012 at 9:33 AM , Blogger Unknown said...

Interesting. Thanks for presenting

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home