18 th abhanga आंता उघडी डोळें ।
blog
address :http://
tukaramasteachings.blogsopt.com
Contact
e-mail address is rgphadke@gmail.com
Please
Note that For Marathi Readers the details have been also given after" the
Teaching
and meaning of the Abhanga “ i.e. at the end of English version.
आंता उघडी डोळें
। जरी अद्यापी न कळे। तरी
मातेचिया खोळे । दगड आला पोटासी
॥ १ ॥
मनुष्य्देह ऐसा
निध । साधील तें साधे सिद्ध
। करूनि प्रबोध । संत पार उतरले
॥ २ ॥
नाव चंद्रभागे
तिरीं । उभी पुंडलिकाचे द्वारीं
। कट धरुनीयं करीं। उभाउभीं
पालवी ॥ ३॥
तुका म्हणे
फुकासाठीं । पायिं घातलिया
मिठी । होतो उठौठी \
लवकरीच उतार
॥ ४ ॥
Transliterated Version :
Attaa ughaDI DoLe
| jarI adyaapI na kaLe | tarI maatechiyaa khoLe | DagaD aalaa poTaasI
||1 ||
manushya deha
aisaa nidha | saadhIla te saadhe siddha | karUnI prabodha | saNta
paara utarale || 2 ||
naava chandrabhaage
tIrI | ubhI punDalikaache dwaarI | kaTadharoniyaa karI |
ubhaubhi paalavI ||
3 ||
tukaa mhaNe
phukaasaaThi | paayi ghataliyaa mithi | hoto uThauthI | lavakaricha
utara || 4 ||
Verbatim
translation :
O'man open your
eyes now atleast. If you still do not understand this \ then you have
taken birth as a stone || 1||
This body of man is
itself an unmatching wealth| for those who use it to attain
liberation| saints have achieved this by proper thinking. ||2 ||
The boat is at the
banks of river Chandrabhaga | Lord is waiting with his hand on his
waist at his doorsteps|| 3 ||
Tuaka says the if
we hold the holy feet of the Lord, the journy of life leads to
liberation || 4||
Background
Information :
For
whom the Abhanga is addressed?:
When
one faces or sees some problems or situations in the life, for
example the death of some near or dear one, then one starts
thinking about the life and it's purpose. Generally at such moments
one realizes that only the death is certain , and then one at least
temporarily thinks that there must be some way to avoid all this
sadness which continuously envelopes our life.
At
this stage one feels that spirituality will give us the peace of
mind. Everyone wants this peace of mind .
However
this state of mind mostly is short-lived , ie. is active for a few
days only. After some time again the man becomes busy with worldly
affairs and forgets the state in which he was for a short time. If
the state is short lived then it is called स्मशान
वैराग्य (
dispassion that envelopes the mind at the cremetorium ) One gets
back to the state of Bounded one (बद्ध)
Also
due to facing problems in life ( त्रिविध
ताप) some
persons start looking for the ways to become free of the troubles
for ever ( for liberation). They turn to the spirituality which
leads to the path of liberation This state of mind is called
मुमुक्षत्व)
.Even though one has attained this state of मुमुक्षत्व
, ie one has
turned to spirituality, one does not remain in this state fully
because one has to look after ones family, carrier etc. Most of the
time of such population is spent in earning money ( which is thought
to provide support to survive in the old age and for enjoyments,
besides the need for looking after the family and body pleasures.)
Sant
Tukarama says that all such persons are actually sleeping since they
are not aware of the ultimate goal of getting the birth as a Human
being.
Sant
Tukarama has addressed the abhanga for all those who are living as
described above.
Teaching and the Meaning
of the Abhanga :
Tukaram
Maharajs says that it is not very late. At least open your eyes and
mind now and start your journey on the path of liberation If you
are still not ready to do this then you have unnecessarily given
pains and troubles to your mother who carried you in the womb and
beared all the troubles of childbirth. Therefore you are not better
that a stone.
This
Human birth is very rare opportunity that you have got.Do not waste
this opportunity.
To understand how rare is this opportunity of Human birth can be
easily understood if we consider following facts.
As
per the science and aslo Shastras, there are 8400000 species on this
earth. In each type has innumerable populations. Human being is the
only one who can think and take actions to understand the God
concept. All other species follow the life cycle of Birth,
sustainace and reproduction to sustain the speci.
Even
in the Human population a very very small percentage will have access
to the knowledge and get opportunity to think about questions such
as Who is the God, What is my relation with Him, Who am I actually,
Can I become immortal and be free from the viscious cycle of
birth-death -birth? Really it is true that Human birth is a very
rare opportunity.
Tukarama maharaj further says
that some have understood this abovesaid fact and have achieved the
liberation. For this they have followed the path of knowledge. You
can also do this .
How
to do this is clarified in the next stanza where the example of
Bhakta Pundilaka is mentioned.
Pundalika
followed the path of Bhakti.
He
did this by doing all he could do for his old parents. For him his
parents were the real God .He saw God in the form of his parents and
did his worship and sadhana. Lord Panduranga was so much pleased
that He came to see Pundilika and then waited on a brick since
Pundilaka was busy attending his parents need. Such is the love God
has for his disciples.
All our saints have given
this assurance that if the Disciple(भक्त)
loves the God as much as he loves his own life-energy( प्राण
) , then
God also loves him with equal intensity.
In Bhagawatam it is said that
in SatyYuga by following the practice (path) of Meditation, in the
Dwapara yuga the path of performing षोडशोपचार
पूजा)
worship with 16 modes of service , in the Tretayuga the path
of performing various Yagnas homams leads to liberation. But in
this Kaliyuga just the Worship with love ( Bhaktimarga) is
sufficient to gain the liberation. We have already seen that
(नामस्मरण
भक्ति )
Remembering the Name of Lord all the time while doing all the
actions is prescribed since it supposed to be most easy to perform
Thus
in the last stanza Tukarama maharaj says that go and hold the holy
feet of the Lord meaning that remember Him always . Then Like a
ship which takes one to
the
shores , this method will take you across this world and to
liberation .
अभंगाचा
भावार्थ :
भावार्थ
समजण्यासाठी लागणारी माहिती
:
हा
अभंग कोणाला उद्देशून म्हटला
आहे?
जर
आपण आपल्या आयुष्याकडे पाहिले
तर असे आढ्ळते की आपल्या
जीवनामधे अशा अनेक
घटना , प्रसंग
येतात ( उदा.
जवळच्याव्यक्तिचा
मृत्यु ) ज्यांमुळे
आपण आपल्या जीवनाच
विचार करु लागतो.
आपला जन्म
कशासाठी झाला ह्यावर विचार
करू लागतो. मग
खरेतर
लक्षांत येते की मृत्यू हा
अटळच आहे व त्यापासून सुटका
होईल कां असे पण मनांत
विचार येतात हे विचार थोडवेळ
तरी मनांत राहतातच.
अध्यात्म
ह्यावर उपाय सांगते असे
पण मनास पटते.
मन:शांती
प्रत्येकालाच हवी असते.
परंतू
हि मनाची अवस्था फारवेळ टिकत
नाही.
कांही
दिवसांनंतर लोक परत आपापल्या
नित्य
व्यवहारंमधे पुन्हा गुंतुन
जातात.
कारण
आलेले वैराग्य क्षणैकच असते.
अशा
वैराग्याला
स्मशानवैराग्य असे म्हणतात.
आपण
पुन्हा बद्ध स्थितिमधे येतो.
कधिकधी
मात्र त्रिविधतापाच्या
अनुभवामुळे माणसे ह्यातुन
सुटका होण्याचा कांही मार्ग
आहे कां
ते शोधू लागतात व अध्यात्माकडे
वळतात.
मनाच्या
ह्या स्थितिला मुमुक्षत्व
येणे म्हणतात.
जरी
अंगी मुमुक्षत्व आले तरि ते
पुरेसे नसते.ह्य्यचे
कारण म्हणजे आपल्या पाठिमागे
अनेक उपाधी असतात.
संसार
असतो.
संसार
चलवण्यासाठी पैसे मिळवणे भाग
असते,
निरनिराळे
उपभोग घ्यायचे असतात,
घर
नीट चालवायचे असते.म्हातारपणाची
सोय
करायची असते.ईत्यादि
अनेक उपाधि असतात.
पैसा
पुरेसा असेल
तर
हे सर्व करणे शक्य होईलसे वाटत
असते.
.
संत
तुकाराम महाराज म्हणतात की
अशी माणसे खरेतर झोपलेलीच
असतात कारण त्यांना
मनुष्यजन्माच्या मुख्य
ध्येयाची जाणीवच नसते.
हा
अभंग महाराजांनी अशा मंडळींसाठीच
सांगितला आहे.
अभंगाचा
भावार्थ :
महारज
म्हणतातहेत की बाबारे फार
उशीर झालेला नाही.
निदान आतातरी
डोळे उघड व
मोक्षाच्या साठी
योग्य मार्गावर वाटचाल करायला
सुरवात कर. जर
तू हे करायला तयार नसशील
तर तू व्यर्थच तुझ्या आईला (
जिने तुझा
जन्म नीट व्हावा म्हणून अनेक
यातना व
त्रास सोसले ) जन्म
देण्यासठी त्रास दिलास.
तुला दगडाचीच
उपमा देणे योग्य होईल.हा
नरजन्म
मिळणॆ ही अत्यंत दुर्मीळ संधी
तुला मिळालेली आहे ती व्यर्थ
घालवू नकोस.
खालिल
मुद्द्यावर विचार केला तर ही
संधी दुर्मीळ कशी ते समजते.
सध्याच्या
विज्ञानाप्रमाने व आपल्या
शास्त्रांप्रमाणे जीवांच्या
८४ लक्ष योनि आहेत.
फक्त
माणूसच
बुद्धी असल्यामुळे मी कोण?,
कोठून
आलो?
माझे
खरे स्वरूप काय ?
देव
म्हणजे कोण?
त्याचा
व माझा सम्बंध काय?
जन्म-मृत्यु
चक्रामधून माझी सुटका होऊ
शकते कां?
कशी?
अश्या
प्रश्नांवर विचर करू शकतो.
जगामधे
असलेल्या अनंत लोकंपैकी फरच
थोदे जण
हा विचार करतात .बाकिचे
आहार,
निद्रा,
मैथुन
हेच जीवन जगणे समजतात.
म्हणुनच
महाराज
म्हणतात की हि नरजन्माची संधी
दुर्मीळ आहे.
तुकाराम
महाराज पुढे म्हणतात की कांही
जणांना हे समजले व त्यांनी
मोक्षप्राप्ती करून घेतली.
तुम्हीपण
त्यांच्याप्रमाने भक्ती
/ज्ञान
अशा मार्गावरुन जाऊन मोक्षप्राप्ती
करून घेऊ
शकता.
आता
हे कसे करायचे तेच महाराज भक्त
पुंडलिकाचे उदाहरण देऊन स्पष्ट
करीत आहेत.
भक्त
पुंडलिक हे त्यांच्या आई-वडिलांनाच
भगवंत मानून त्यांची सेवा
करीत होते. टिच
त्यांची
साधना होती. ह्या
भक्तिमुळे पांडुरंग त्यांना
भेटायला आले. तेंव्हा
पुंडलिकाने पुढे ठेवलेल्या
विटेवरच पांडुरंग तिष्ठत उभे
राहिले. भगवंत
आपल्या भक्तांवर असे प्रेम
करतो.
सर्वच
संतांनी ही ग्वाही दिलेली
आहे की भगवंत आपल्या भक्तांवर
नि:सीम
प्रेम करतो.
. भक्ताचेही
भगवंतावर असेच प्रेम असते.
दासबोधामधे
समर्थ रामदास म्हणतात
की " देव
म्हणिजे आपुला प्राण । प्राणासी
न करावे निर्वाण । परम प्रितीचे
लक्षण
। तें हें ऐसें॥ ऐसें परम सख्य
धरितां\ ।
देवास लागे भक्ताची चिंता।
भगवतामधे
असे म्हटले आहे की सत्ययुगांत
ध्यानाने ,
द्वापारयुगांत
षोडशोपचार पूजेने ,
त्रेतायुगांत
होम व यज्ञ केल्याने मुक्ती
मिळते. पण
ह्या कलीयुगात प्रेमने केलेली
भक्तीच
मुक्ती मिळण्यास पुरेशी
आहे.
मागे
पाहिल्याप्रमाने नामस्मरण
भक्ती ही नेहमी कामें करतांना
सुद्धा करता येते.
असो.
भक्ताचेही
भगवंतावर असेच प्रेम असायला
हवे हा मुख्य मुद्दा येथे
आहे.
म्हणुनच
अभंगाच्या शेवटच्या चरणांमधे
तुकाराम महाराज म्हणतात की
उठा व त्या
पांडुरंगाच्या
चरणांना घट्ट मिठी मारा .
म्हणजेच
त्याला क्षणभरही विसरू नका
( नामस्मरण सतत करा )
. असे
केले तर तुम्ही हा भवसागर सहज
पार करून जाल.
2 Comments:
Superb ! Samarth Ramdas has said that people those who are "karante " are bad than stones !
येथें श्रोते मानितील सीण| आम्हांस केलें पाषाण |
तरी पाषाणाचें लक्षण| सावध ऐका ||८||
वांकुडा तिकडा फोडिला| पाषाण घडून नीट केला |
दुसरे वेळेसी पाहिला| तरी तो तैसाचि असे ||९||
टांकीनें खपली फोडिली| ते मागुती नाहीं जडली |
मनुष्याची कुबुद्धि झाडिली| तरी ते पुन्हा लागे ||१०||
सांगतां अवगुण गेला| पुन्हा मागुतां जडला |
याकरणें माहांभला| पाषाणगोटा ||११||
ज्याचा अवगुण झडेना| तो पाषाणाहून उणा |
पाषाण आगळा जाणा| कोटिगुणें ||१२||
कोटिगुणें कैसा पाषाण| त्याचेंहि ऐका लक्षण |
श्रोतीं करावें श्रवण| सावध होऊनी ||१३||
माणीक मोतीं प्रवाळ| पाचि वैडुर्य वज्रनीळ |
गोमेदमणी परिस केवळ| पाषाण बोलिजे ||१४||
दगड आला पोटासी
Samarth Ramdas has said that such people are worst than Stone !
If Stone is shaped properly , it will stay like that but people leave their bad part, which comes back again & again to them !
अर्थांतर पाहिल्यावीण| उगेंचि करी जो श्रवण |
तो श्रोता नव्हे पाषण| मनुष्यवेषें ||७||
येथें श्रोते मानितील सीण| आम्हांस केलें पाषाण |
तरी पाषाणाचें लक्षण| सावध ऐका ||८||
वांकुडा तिकडा फोडिला| पाषाण घडून नीट केला |
दुसरे वेळेसी पाहिला| तरी तो तैसाचि असे ||९||
टांकीनें खपली फोडिली| ते मागुती नाहीं जडली |
मनुष्याची कुबुद्धि झाडिली| तरी ते पुन्हा लागे ||१०||
सांगतां अवगुण गेला| पुन्हा मागुतां जडला |
याकरणें माहांभला| पाषाणगोटा ||११||
Dashak 8 Samas 6
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home