Sunday, March 24, 2013

 29th post तुज वर्णी ऐसा तुजविण नाही। for Abhanga a week of Sant Tukarama. date 23rs March 13.
  blogaddress :http:// tukaramasteachings.blogsopt.com 
Contact mail address is rgphadke@gmail.com



29th Abhanga( No 338) date 23rd March 2013.
The Marathi Version is given after the English version .

तुज वर्णी ऐसा तुजविण नाही। दुजा कोणी तीही त्रिभुवनिं॥ १॥
सहस्रमुखे शेष सिणला बापुडा । चिरलिया धडा जिव्हा त्याच्या॥ २॥
अव्यक्ता अल्क्षा अपारा आनंदा । निर्गुणा सच्चिदानंदा नारायणा ॥ ३॥
रूप नाम घेसी आपुल्या स्वईच्छा । होसी भाव तैसा त्याकारणें॥४॥
तुका म्हणें जरी दाविसी आपणा। तरीच नारायणा कळॊं येसी ॥ ५ ॥

Verbatim Meaning:-
O' Imperceptible, Invisible, Unlimited in Attributes, Blissful, Continuously existent, conscious and Blissful, and Attribute-less Narayana! Nobody can describe how actually you are. Only you can do that.|| 1 & 3||
The Thousand headed Sheshnaga even can not describe you. His tongues got divided in two when he tried to describe you. But he could not succeed.|| 2||
Whenever you wills , then only you take the form with name and shapes and show the attribute according to the form you assume || 4|
Tukaa says that O'Narayana only when you will, then only your disciple knows you.|| 5||
Background Information to understand the meaning of Abhanga:-
In case a person get the Darshan of God, How will He appear to such a person ? An answer has been provided for this kind of question in this Abhanga. Besides this, Sant Tukaram Maharaj has described a few important Attributes of God in the same abhanga.
He also has told when God will be realized for the Disciple at the end.
Meaning of the Abhanga:-
In the first post of the Abhanga a week , we have seen that the God is described using three words. Omniscient, Omnipresent and Omnipotent. We also have seen the infinite nature of our visual world .The creator of all this; whom we address as God is not visible to our mortal eyes or senses. To experience Him ,one has to have the true knowledge .( Through the eyes of knowledge only) .
Arjuna had such capability and that is why Arjuna had VishvarUpa darshan of the Lord.
For this reason He is addressed as Imperceptible. He cannot be seen by doing meditation and that is why He is called Invisible.
He has transcended all the universe but we can not still know Him . This is the reason He is called Unlimited in Attributes
Further it is impossible to describe the attributes of the God. Therefore he is addressed as “One without any attributes” All the Attributes come under three categories namely Satva, Raja and Tama. Since He is beyond these He is called as One without any attributes.
Our Shastras say that it is impossible to describe the God in words. They describe Him as “Sat-chit-Anandmaya” meaning one who Truly exists, who is universal consciousness and Blissful .
Of course whatever is written here above are nothing but the words. Our Vedas are also full of words. Many poems, essays, etc are all words. We may read all these but still we can not know Him. Tukarama Maharaja has addressed Him by the name :Narayana “ in this abhanga.
In our shastras ( Scriptures) 14 Attribute specific names are described for the God. Sri Samarth Ramadasa has written one separate chapter to explain the meaning of these names and at end has also shown that all these are inadequate to describe the God. Tukaram Maharaj has given the example of the Sheshanaga who is a mythological character with 100 mouths. Lord Vishnu is described to be sleeping on this Divine serpent. Tukarama maharaj says that even the Sheshnaga who is continuously in the company of Lord can not describe Him,.
One more example in our day to day life can be given for the same issue. The sweetness of Sugar can not be described in any words. The sweetness is to be experienced only. Even here the words are inadequate for such a simple item like sugar.

However , when the right time comes ( Our saints say that when the heart is really clean and pure ,when there is extreme desire for his experience ; then only the God is reflected in such pure heart. That is what is called Darshan or experience of f God) Arjuna had such an experience on the battlefield of Kurukshetra; because of extreme love God felt for Arjuna.
This is the point described in the last stanza of the Abhanga. In this stanza Tukarama Mahaaraj says that “O'Narayana you meet your disciples only when this desire arises in your mind”.

Teaching of the Abhanga:-
Here Tukaram Maharaja is preaching us that we should be ready to wait with patience for the experience of God. He know how and when to give us His experience. A time for this definitely come in the life of the disciple. Until then One should not doubt and continue to do his sadhana with the faith.

From Next page the same description is given in Marathi Language.

तुज वर्णी ऐसा तुजविण नाही। दुजा कोणी तीही त्रिभुवनिं॥ १॥
सहस्रमुखे शेष सिणला बापुडा । चिरलिया धडा जिव्हा त्याच्या॥ २॥
अव्यक्ता अल्क्षा अपारा आनंदा । निर्गुणा सच्चिदानंदा नारायणा ॥ ३॥
रूप नाम घेसी आपुल्या स्वईच्छा । होसी भाव तैसा त्याकारणें॥४॥
तुका म्हणें जरी दाविसी आपणा। तरीच नारायणा कळॊं येसी ॥ ५ ॥

अभंगाचा शब्दार्थ:-
हे अव्यक्त, अलक्ष अपार आनंदमय निर्गुण सच्चिदानंदस्वरूप नारायणा, तुझे अचूक वर्णन 
 करणे तुझ्याशिवाय दुसîrÉÉ कोणालाही शक्य नाही .॥ ३ & 1 ||
एवढा हजार मुखे असलेला शेषनाग , तोही तुझे वर्णन करू शकत नाही. त्याने प्रयत्न केला 
तेव्हा त्याच्या सर्व जिव्हा दुभंगल्या ॥ २॥
तूच तुझ्या ईच्छेनुसार रुप व नाम धारण करतोस व त्या प्रमाणे स्वभाव दाखवतोस.॥४॥
तुका म्हणतो की हे नारायण तुझा मनांत असले तरच तू कसा आहेस ते तुझ्या भक्ताला 
कळते ॥ ५॥

अभंगा मागची भूमिका :-
भगवंताचे दर्शन झाले तर तो कसा दिसेल असा जो प्रश्न मनांत येतो त्या प्रश्नाचे उत्तर ह्या 
अभंगात येते व भगवंताचे कांही विषेश गुण आपल्याला त्यासाठि येथील भगवंताच्या 
वर्णनात तुकाराम महाराजांनी लिहिले आहेत.
तसेच तो केंव्हा व कोणाला दर्शन देतो त्यावर पण येथे प्रकाश टाकलेला आहे.
हेच ह्या अभंगाचे वैशिष्ठ्य आहे.

अभंगाचे अर्थ स्पष्टीकरण:-
मागे येऊन गेलेल्या पहिल्याच ( कांरे नाठविसी कृपाळू देवासी...) अभंगात आपण
भगवंताचे वर्णन सर्वव्यापी, सर्वशक्तीमान, सर्वज्ञ ह्या शब्दांद्वारे वाचलेच आहे. सृष्टीचे विराट 
स्वरूप कसे ते पण आपण पाहिले आहे. असा हा भगवंत आपल्याला आहे हे कळते पण तो 
दिसत नाही . त्याला पहायला ज्ञान चक्षुच हवेत. तरचे त्याचे दर्शन होते. ( जसे अर्जुनाला 
झाले तसे). म्हणुन भगवंत हा अव्यक्त म्हटले आहे. ध्यानाने त्याचे दर्शन होत नाही 
म्हणुन अलक्ष्य म्हटले आहे. त्याने सर्व सृष्टी व्यापली आहे. सृष्टीचाच थांग लागत नाही तर 
त्याचा कसा लागणार, म्हणून त्याला अपार हे विशेषण दिले आहे.
अश्या भगवंताचे गुणवर्णन त्याच्या अनंत नामरूपांप्रमाणे आहे म्हणून तो निर्गूण आहे.
किंवा तो त्रिगुणांचा निर्माता म्हणून गूणातीत अर्थात निर्गूण आहे असे म्हणतात.
आपली शास्त्रे भगवंताचे वर्णन करायचे झाल्यास तो सच्चिदानंदस्वरूप आहे असेच
सांगतात.तोच फक्त खरा शाश्वत आहे म्हणून सतम्हणजे आहेच ह्या अर्थाने, चित म्हणजे 
शाश्वत खरे व आनंद हि अवस्था असणारा असा सच्चिदानंद भगवंत.

अर्थात वर जे जे कांही लिहिले ते म्हणज्र शब्द .वेद सुद्धा शब्दमयच आहेत. अनेक शास्त्रे
भजने, स्तोत्रे पण भगवंताचे वर्णन करतात. पण कितीही शब्द योजून लिहिलेले आपण 
वाचले तरी त्याचे खरे स्वरूप कळत नाही. तुकाराम महाराजांनी ह्या भगवंतालाच नारायण 
म्हणून अभंगात संबोधिले आहे.

आपल्या शास्त्रांमधे भगवंताचे म्हणजेच परब्रह्माची १४ नांवे दिलेली आहेत. श्रीमद्‌
दासबोधामधे ह्याबद्दल एक समासच समर्थांनी लिहून हेच सांगितले आहे की ब्रह्माचे वर्णन 
करण्यास शब्द अपुरेच असतात. तुकाराम महाराजांनी १०० फण्यांच्या शेषनागाचे उदाहरण 
दिले आहे. ते म्हणतात की १०० फण्या असलेला शेषनाग जो सतत भगवंताच्या सहवासांत 
असतो , तो सुद्धा भगवंताचे वर्णन करू शकत नाही.

आणखी एक उदाहरण द्यायचे झाले तर साखरेची गोडी कशी हे आपल्याला सांगता येत नाही 
असे देता येते. साखरेची गोडी अनुभवानेच कळते. वर्णनास शब्द येथेही अपुरेच पडतात
असो.

पण हाच नारायण जेंव्हा योग्य वेळ येते तेंव्हा स्वत:हून भक्ताला दर्शन देतो. अर्जूनास 
त्याने कुरुक्षेत्रावर स्वता:चे दर्शन अर्जुनावरच्या प्रेमामुळे दिले. म्हणुन महाराज अभंगाच्या 
शेवटच्या चरणांत म्हणतात की हे नारायणा तुझ्या मनांत असेल तेंव्हाच तू तुझा भक्ताला 
दर्शन देतोस.
अभंगाची शिकवण:-
तुकाराम महाराज हेच येथे सांगत आहेत की सबूरी बाळगा व भगवंताची अनन्यभावे भक्ती 
करा. योग्य वेळी तो तुम्हाला दर्शन देईल अशी खात्री बाळगा 

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home