26th postआवासाचिये आशा गळ गिळी मासा । for Abhanga a week of Sant Tukarama.
blogaddress :http:// tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com
26th Abhanga : posting Date 13th Feb 2013.
मराठीत अभंगाचा
अर्थस्पष्टीकरण इंग्रजी
स्पष्टीकरणानंतर दिलेले
आहे.
आवासाचिये आशा गळ गिळी
मासा । फुटोनिया घसा मरण पावें
॥ १ ॥
मरणाचे वेळी करी तळमळ
। आठवी कृपाळ तये वेळी ॥ २॥
अंतकाळीं ज्याच्या
नाम आलें मुखां । तुका म्हणें
सुखा पार नाही ॥ ३॥
Verbatim Meaning :-
The fish gets attracted to the object attached to the string, and
calls his own death. || 1||
At the time of death , it remembers the God ( but it is of no use) to
help it || 2||
tukaa says that for the one who is remembers the God at the time of
Death, there is no limit to his happiness || 3||
Background Information to understand the meaning of the abhanga:-
We have seen that everybody puts his efforts to satisfy his various
desires. However after satisfying one desire , another desire takes
birth and this continues endlessly. At the time of death, the Soul
collects all the seeds of these unfulfilled desires and then leaves
the body. Subsequently another body form is selected by the departed
Soul and then new birth takes place. The cycle continues for ever.
The result is sufferings in every birth .
This Abhanga suggests the solution for getting out of this vicious
cycle and make one free forever.( Liberation )
Meaning of the Abhanga:-
Tukarama Maharaj is giving the example of the fish which eats the
food attached to the hook and dies. There are many species . All
these live life to satisfy the basic animal needs of Food, Sex and
Sleep.
Only Man has the capability to think . By the faculty of Reason , Man
is able to think about the creator .Hence one feels that only our
creator ( GOD) can free us from all the sufferings .
In actual life Man tries to satisfy the demands of the five senses
, but demands are endless. That is what binds the one to the cycle of
birth-death-birth.
However (from the background information it is clear )it is
possible to escape the Death for ever only when one does not have any
desires left in his mind at the time of death. This is not so easy as
it sounds.
Our mind has one good attribute which is as described below.
Our mind gets attached to the things it likes very much. Then it
constantly recollects that thing only. It becomes ones habit.
Therefore if we develop the habit of remembering the God., then we
will remember Him at death bed. Then since there is no other desire
there is no further birth.
Teaching of the Abhanga: The abhanga teaches us to put our
efforts to develop the habit of Remembering the God.
अभंगाचे मराठीत स्पष्टीकरण ह्या पुढे दिलेले आहे.
आवासाचिये आशा गळ गिळी
मासा । फुटोनिया घसा मरण पावें
॥ १ ॥
मरणाचे वेळी करी तळमळ
। आठवी कृपाळ तये वेळी ॥ २॥
अंतकाळीं ज्याच्या
नाम आलें मुखां । तुका म्हणें
सुखा पार नाही ॥ ३॥
अभंगाचा शब्दार्थ
:-
गळाला लावलेले आमिष
मासा पहातो व ते खाण्याच्या
आशेने त्याचा गळा त्या गळाला
अडकतो . गळा फाटून
असा मासा मरतो. ॥
१॥
मरणाची वेळी त्याला
यातनांमुळे भगवंताची आठवण
होते ॥ २॥
तुका म्हणतो की ज्याच्या
मुखी अंतकाळी नाम येते त्याच्या
सुखाला मर्यादाच नाही॥ ३॥
अभंगामागची भूमिका
:-
आपण आतापर्यंत पाहिलेच
आहे की जो पर्यंत माणसाला कसली
तरी भोगेच्छा असते तोपर्यंत
माणुस त्या ईच्छेच्या पूर्ती
साठी प्रयत्न करत राहतो.
या शिवाय दरवेळी
नव्यानव्या वासना तयारच होत
राहतात. ह्या वासना
पुर्ण झाल्या नाहीत तरमग जीव
पुन: पुन: नवी
शरीरे धारण करत राहतो. एकूण
जन्मम्रूत्युच्या चक्रामधे
अडकून सतत सुख दु:खे
भोगणे हे वासनांच्या मुळे
घडते.
ह्या दुष्ट चक्रामधून
कॊणाची सुटका होते ते हा अभंग
सांगतो . अर्थात
आपण मग काय करायला हवे ते
आपसूकच समोर येते.
अभंगाचे अर्थस्पष्टीकरण
:-
गळाला लावलेल्या
आमिषाची आशा धरल्याने मासा
स्वत:चे मरण
बोलवून घेतो असा दृष्टांत
प्रथमच तुकाराम महाराज देत
आहेत..
अनेक प्राण्यांच्या
जाती आहेत. त्यांपैकी
मासा येतो. प्रत्येक
प्राण्याला स्वत:चा
जीव अत्यंत आवडता असतो.
त्यासाठी अन्न हे
हवेच. पण माणसा
शिवाय बाकीचे सर्वच प्राणी
आहार, निद्रा व मैथुन
ह्या मागेच जीवन घालवतात.
ह्या पलिकडे आपल्याला
कांही मिळवायला पाहीजे याची
त्यांना जाणीवच नसते. म्हणुनच
आपन पहातो की मासा अन्नाचे
आमिष पाहून फसतो. उंदिर
पिंजर्यात अडकतो तेही अशाच
आशेमुळे.
तुकाराम महाराज म्हणतात
की प्रत्येक जीवाला मरणाचे
वेळी देव आठवतो. इतरवेळी
नाही.
पण माणसाला सदसद्
विवेक बुद्धीची देणगी देवाने
दिलेली आहे. त्या
बुद्धीमुळेच देव ही एक अशी
शक्ती आहे की जी आपल्याला
संकटांतून किंवा दु:खांतून
सोडवू शकते असा त्याला विश्वास
पण वाटतो.
तरीही
माणूस पांच इंद्रीयांद्वारे
मिळणारे जे जे मिळते ते ग्रहण
करतो .
त्यामधे
त्याला आनंद मिळतो पण तो थोडावेळ
पुरणारा.
हा
आनंद परत परत मिळावा म्हणुन
माणुस प्रयत्न करत राह्तो.
ह्यालाच
कर्म करणे असे अध्यात्मात
म्हटले आहे.
कर्मफलाचे दोन भाग
असतात. एकामुळे फळ
मिळते. दुसरा भाग
वासनांच्या रूपाने चित्तामधे
जातो. ह्या वासनाच
पुढे परत कांही कारणाने अंकुरित
होतात. जर झाल्यानाहीत
तर जीवात्मा शरीर त्यागचे
वेळी ह्यावासना बरोबर घेऊन
जातो. नंतर त्यापृण
व्हाव्या म्हणून परत जन्म
घेतो.
ह्या चक्रामधून सुटका
व्हावी असेपण कांही जणांना
वाटते. अशांच्या
साठी अभंगात महाराज म्हणतात
की भगवंताचे नांव जर मुखांत
मृत्युचावेळी आले तर तो अत्यंत
सुखी होतो.
अभंगाची शिकवण:-
पण जर अशी भगवंताची
आठवण यायला हवी तर त्याची पण
सवय असायला हवी.
आपल्या मनाचे एक
वैशिष्ठ्य हे आहे की ज्याची
त्याला आवड लागते तीच गोष्ट
ते आपणहून करत राहते. .
म्हणुन भगवंताचे नाव
आठवण्य़ाची सवय लागायला हवी
जर भगवंताच्या भेटिचीच
वासना मनामधे असेल तर मग इतर
कसलीही वासना उरतच नाही .
त्यामुळे माणसाला
मुक्ती मोक्ष मिळतो. मोक्षाचे
सुख हे सर्वसुखापेक्षा उत्तम
आहे हे आपल्याला माहीतच आहे.
म्हणुनच नामस्मरण
आता[ पासूनच
करा असे महाराज आपल्याला
ह्या अभंगाद्वारे सांगत
आहेत.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home