Sunday, February 3, 2013

Added 25th  post सरते माझं तुझें।for Abhanga a week of Sant Tukarama.
blogaddress :http:// tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address for sending suggestions/ comments  is rgphadke@gmail.com
            The Marathi version is given at the end of this English version.
                     .
सरते माझं तुझें। तरि हें उतरते ओझें ॥ १॥
नलगे सांडावे मांडावे । आहे शुद्धचि स्वभावें॥२॥
घातला तो आशा। मोहोजाळें गळां फांसा ॥ ३॥
सुखाचा तो मान । दुखाचा तो शीण ॥ ४ ॥
करितां नारायण । एवढें वेचितां वचन ॥ ५ ॥
तैसा मान अपमान । लाभा हानि हे समान ॥ ६॥
तुका म्हणें याचे नांव सोवळें साचें ॥ ७ ॥

Verbatim Meaning:-
The burden of the shoulders of the Soul will be lightened ,if and when the duality ( yours and mine) is ended. || 1||
The real Nature of the SELF is PURE only . To realize HIM ,one need not renounce anything in this world|| 2||
The desires have put a noose around the neck of the soul and pull Him down|| 3||
In the real Nature of the SELF , there is no Praise-Insult, desirability of Happiness and undesirability of Unhappiness || 4||
One should say that the real doer is “ Narayana only” || 5||
In his mind he sees Profit-Loss, Insult-Praise with equanimity || 6||
Tuka says that this is called real”PURITY” || 6||

The Basis and the background information needed to understand the meaning:

It is important to know the definition of a Sadhaka .: The Sadhaka is the one who has no doubts about the importance of the knowledge of the Atman and therefore tries everything possible to acquire it). The efforts put-up by the Sadhaka are called Sadhana.

This abhanga describes the efforts the Sadhaka has to put and the secret of the Sadhana.
There are four point addressed in the abhanga. These are
    1) The secret of the Sadhana .
    2) Description of the Real SELF (being)
    3) Description of the condition of mind of a liberated soul.
    4) The direction of efforts one has to do in summary form.
The main purpose of performing the Sadhanaa ( putting all the efforts ) is as given below.
For a Sadhaka who wants to follow the path of Knowledge; “ finding answers to the questions such as Who am I? What is my true nature.” is the main purpose.
For the Sadhaka who wants to follow the path of Devotion ; meeting God is the purpose .

In both the cases ( as we have seen in the first post) the real GOD is the same .
Both types of Sadhakas are putting efforts to realize the same GOD principle.
The meaning of the Abhanga can be understood under the above described basis only.


MEANING OF THE abhanga
The explanation of the four points clarifies the meaning of this abhanga. These four points are therefore written further here.

1) How is the Nature of the Being( SELF) is described in the last and second stanza of the abhanga as follows.

The parabrahman is the God or Real SELF. Tukarama Maharaj uses the word “ PURE” to describe the same.
PURE means where there is no stain of any kind. , where there is no distortion . The shastras use fourteen names to describe the PURE SELF such as OUM kar brahman, Brahman like the SPACE etc. After all all these are some words and naturally the words are incapable of describing the True Nature of the SELF. That is why the Vedas say “not this-Not this”and stop.
In our daily life we can not describe the sweetness of Sugar in words. One has to eat it end understand the meaning.
Similarly “ The real description is inability to describe HIM “ is the only description.
This is the reason why, Tukaram Maharaj has used the word “ PURE(सोवळे) in the abhanga.


2)When one is liberated, then what is the condition of the mind of such personality ; is described in the 4th, 6th and 7tha stanzas of the Abhanga.
The details are given further below in our explanation of the meaning of the abhanga.

We live in the world of duality where we and the God are separate. The moment one experiences the Real SELF ,this duality is ended . After this stage the devotee and the God are one and the same.
The person who is liberated experiences this state. For him the experience “ All the world and Myself are one only” becomes the reality. He lives in this world only in such state of mind .
Once the duality is ended, then who will Insult whom? Who will get benefited from a transaction and who will be facing loss? Who will be happy and who will be unhappy one. There is no separation ( duality) and therefore all these are meaningless for a liberated soul. Naturally this state is reached in this very birth -time and hence there is no more need to take further births. .

    3) What is the Secret of doing Sadhu? 4) What is the direction of efforts to live this secret?
In the first stanza of the stanza, Tukarama Maharaja is saying that the moment on overcomes the thinking of “ yours and Mine” ; all the burden on the shoulders of the Soul is removed. The burden mean the feelings of Happiness -Unhappiness, regrets etc that we carry in our mind resulting continuous sufferings. Maharaj further says that the Real Nature of the SELF is PURITY. In order to manifest this this real Nature of the SELF in one's life ; one need not leave anything.

In the path of Knowledge the mental attitude that “ I am the Brahman “ must continuously , all the time ,; be present in the mind of the Sadhakaa. Once this attitude is developed then one can do his routine activities and duties in the world, or one may renounce the world and do meditation on this aspect in a Jungle. It does not matter where one is living. The ability to remain constantly in the state of thinking that “ I am the brahman” is the secret of Sadhana in the path of knowledge.

In the path of Devotion ( worship) the God and the devotee are two different entities. Unless this condition exist, one can not formulate any relationship with the God ; be it Mother -child, Master-servant, lover -loved one etc. The specific relationship gets established as per the attitude of the devotee. However in every such relationship, one thread of Unconditional Surrender is the common thread.
Ability to achieve this state of Unconditional Surrender to God is the secret of the Sadhana in the path of Devotion.

In both the paths one is required to leave the attachment to all the worldly objects ( Physical or Mental in their nature) . In the abhanga , Tukarama Maharaj is using the example of the Noose around one's neck. The noose is our set of different desires . The desires ultimately makes us Bounded Ones (बद्ध पुरुष)

( The Sadhak is the one who has no doubts about the importance of the knowledge of the Atman and therefore tries everything possible to acquire it)

For the Sadhaka who is following the path of knowledge( ज्ञानमार्ग) always weighs what is permanent in Nature and what is not; and tries to become unattached to the non-permanent aspects in this world.
The Sadhaka , who follows the path of Worship, always lives with the conviction that “ God is the doer and not the Sadhakaa himself.
The 5th stanza describes these aspects only, in the Abhanga.. .


Note : In this Abhanga we get the direction for the efforts to be made/put. The details are described in various Abhangas of Sant Tukarama mahaaraja . We will be reading those in future.



अभंगाचा मराठी अर्थस्पष्टीकरण : खालील प्रमाणे दिले आहे.
Date 3rd Jan 2013 . marathi version.
सरते माझं तुझें। तरि हें उतरते ओझें ॥ १॥
नलगे सांडावे मांडावे । आहे शुद्धचि स्वभावें॥२॥
घातला तो आशा। मोहोजाळें गळां फांसा ॥ ३॥
सुखाचा तो मान । दु:खाचा तो शीण ॥ ४ ॥
करितां नारायण । एवढें वेचितां वचन ॥ ५ ॥
तैसा मान अपमान । लाभा हानि हे समान ॥ ६॥
तुका म्हणें याचे नांव सोवळें साचें ॥ ७ ॥

अभंगाचा शब्दार्थ :-
जर तुझे माझे हा द्वैतभाव नाहिसा झाला असता तर जीवात्म्यावरचे सर्व ओझे उतरले असते ॥ १ ॥ यावाचून कोणतीही गोष्ट करायला किंवा सोडावयाला नको . स्वस्वरूप स्वभावत: शुद्धच आहे ॥ २ ॥ प्रपंचाच्या मोहामुळे सर्व जीवांच्या गळ्यात आशेने एक पाश घातला आहे ॥ ३ ॥ स्वरूपामधे सुखाचा मान आहे व दु:खाचे श्रम नाहीत ॥ ४ ॥
सर्व कांही नारायणच आहे ,एवढे शब्द बोलावेत. ॥ ५ ॥
लाभ व हानी , मान व अपमान हे तो समान लेखतो ॥ ६ ॥ तुका म्हणतो की ह्यालाच खरे सोवळे म्हणतात ॥ ७ ॥

अभंगाचा अर्थ समजण्यासाठी मागची भूमिका :
हा अभंग साधकाने जी साधना करायची असते त्या साधनेची मर्म सांगणारा आहे .
अभंगामधे चार मुद्दे येतात.
) साधनेचे मर्म २ ) आत्मस्वरूप कसे आहे त्याचे वर्णन ३) आत्मस्वरूपाचे ज्ञान म्हणजे आत्म ज्ञान झाल्यावर मनाची काय स्थिती होते त्याचे वर्णन ४) ह्या साठी कोणते प्रयत्न करायला लागतात त्यांची दिशा सारांश रुपे काय आहे ? .

साधना करण्याचे मुख्य उद्देश्य कोणते? हे पाहायचे झाले तर खालील प्रमाणे म्हणता येते.
जो ज्ञानमार्गी साधक आहे त्याच्यासाठी आत्मज्ञान अर्थांत माझे खरे स्वरूप काय आहे? मी कोण? हे जाणणे होय. तसेच जो भक्तीमार्गी साधक आहे त्याच्यासाठी भगवंताची भेट होणे ही साधनेचे उद्देश्य आहे.
दोन्ही ठिकाणी ( पहिल्या अभंगात पाहिले होते त्याप्रमाणे ) खरा देव म्हणजे परब्रह्म. हेच आहे दोन्ही मार्गांमधे त्याला आपलेसे करून घेण्यासाठी प्रयत्न करायचे असतात.
ह्या भूमिकेच्या पायावरच ह्या अभंगाचा अर्थ खालील प्रमाणे लागतो.

अभंगाचा अर्थ :
वर लिहिलेल्या चार मुद्द्यांसाठी स्पष्टीकरण म्हणजेच  अभंगाचा अर्थ आहे व  तोच ह्यापुढच्या विवरणांत लिहिला आहे.
) आत्मस्वरूप कसे आहे ? ह्याचे वर्णन अभंगाच्या शेवटच्या व दुसîrÉÉ चरणांमधे येते.
परब्रह्म म्हणजेच भगवंताचे स्वरूप किंवा आत्मस्वरूप . हे कसे आहे ते महाराजांनी सांगण्यासाठी अभंगाच्या शेवटचा पदामधे ( तुकाराम महाराज) "सोवळे" हा शब्द वापरला आहे
सोवळे म्हणजे शुद्ध. ज्याला कसलाही डाग , विकार नाही असे. अर्थात हा शब्द परब्रह्मालाच उद्देशून आहे हे स्पष्टच आहे. आत्मस्वरूप हे शुद्ध आहे. त्याच्याठिकाणी कसलाही विकार नाही असा ह्याचा अर्थ घ्यायचा आहे.
शास्त्रांमधे परब्रह्माची १४ नांवे आहेत. जसे ॐ इत्याक्षर ब्रह्म , खंब्रह्म इत्यादि. पण शेवटी शब्द हे जडांतले. त्यांना मर्यादा आहेत. ब्रह्माला नाहीत. वेदांनी नेति-नेति म्हणजे कळत नाही असे म्हणले आहे. साखरेची गोडी जशी शब्दांनी वर्णन करून सांगता येत नाही तसेच. " परब्रह्माचे वर्णन करता येत नाही हेच त्याचे खरे वर्णन आहे.”   म्हणूनच तुकाराम महाराजांनी "सोवळे = शुद्ध" हा शब्द अभंगात म्हटलेला आहे.

)ह्या आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले की अशा व्यक्तीच्या मनाची काय स्थिती असते? तिचे वर्णन अभंगाच्या ४ , ६ व ७ ह्या चरणांमधे येते.
ह्या परब्रह्माशी एकरूपता झाली की द्वैत संपते. द्वैत म्हणजे आपण व भगवंत ( परब्रह्म) यांच्या मधे वेगळेपण.
जो ब्रह्मानुभव घेतो तो नेहमीकरता द्वैत भावातून सुटतो. सर्व विश्वच मग त्याला आपणच आहोत हे स्पष्टपणे सतत जाणवत राह्ते.
असे झाले की कोणी कोणाचा मान ठेवायचा ? ज्याचा मान ठेवायचा व ज्याचा अपमान होतो ते दोन्ही एकच . तसेच कॊणी कोणाकडून काय घ्यायचे? ज्याचा फायदा होतो तो व ज्याचे नुकसान होते तो दोघेही एकच ज्याला सुख होते तो व ज्याला दु:ख होते तो तेही वेगळे नाहीत. म्हणुनच आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले की ह्या सर्वांना अर्थच उरत नाही. म्हणूनच आत्मज्ञान झाले की जन्माचे साफल्य झाले असे म्हणतात जन्म-म्रूत्यु चक्रांतून सुटका होणे हे आत्मज्ञान झाल्यानेच घडते. हाच शरीरांत चैतन्य असतानाच म्हणजे ह्याच जन्मामधे मिळालेला मोक्ष होय.

) साधनेचे मर्म कोणते काय आहे ? ) ह्या साठी काय प्रयत्नांची काय दिशा आहे?
अभंगाच्या पहिल्याच चरंणांमधे महाराज म्हणाताहेत की जर तुझे माझे पण संपले तर जीवाच्यावरचे सर्व ओझे उतरले असे म्हणता येते. हे ओझे कोणते पहायचे झाले तर जन्म-मृत्युच्या चक्रामधे अडकल्याने जी सुखे व दु:खे भोगावी लागतात ती सर्व म्हणजेच हे ओझे आहे. महाराज पुढे म्हणतात की आत्मस्वरूप शुद्धच आहे. ते प्रगट व्हायला कांहीही व्यवहार सोडावे लागत नाही.
हा ज्ञानमार्गातला भाग आहे. ह्या मार्गामधे " अहं ब्रह्मास्मि " म्हणजे मीच ब्रह्मस्वरूप आहे ही धारणा सतत जागृत रहायाला हवी. मग तुम्ही संसारतली कामे करून जीवन व्यतीत करा किंवा संन्यास घेऊन वनांमधे जाऊन ध्यान करा . कांही फरक पडत नाही. सतत ही जाणीव मात्र जागी हवी की मी ब्रह्मस्वरूपच आहे.
अशी जाणीव सतत जागी असणे हे; व ही मनाची स्थिती साधता येणे हे ज्ञानमार्गाच्या साधनेचे मर्म आहे.

भक्ती मार्गामधे सुरवातीला भगवंत व भक्त हे वेगवेगळे असतात. . म्हणूनच भक्त भगवंताशी कांही नाते जोडू शकतो. सखा, प्रियकर, , स्वामी , आई , बंधू असे कोणतेही हे नाते आपापल्या वृत्तीनुसार हे नाते तयार होते. ह्या नात्यामधे भगवंतच आपला सर्व कांही आहे व दुसरा कोणीही नाही हा अनन्य भाव पण असावा लागतो. . असा भाव साधणे , अशी मनाची स्थिती होणे हे भक्तिमार्गातल्या साधनेचे मर्म आहे.

दोन्ही मार्गामधे दृश्याचे प्रेम आसक्ती सुटायला हवी . हेच अभंगाच्या
" आशेने गळ्यांत मोहाचा फासा घातला " असे तिसîrÉÉ चरणांत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे.

ज्ञानमार्गी साधक ह्या साठी " सार-असार " “ शाश्वत – अशाश्वत " हा विचार करुन आसक्ती सोडण्याच प्रयत्न करत असतो.
जो भक्तिमार्गी असतो तो " सर्व करणारा नारायण " हे समजून जगामधे वावरत असतो
अभंगाचा ५वा चरण हेच सांगतो आहे.

ह्या स्पष्टीकरणामधे अभंगाचा अर्थ पुढे आलेला आहे असे मला वाटते.

टीप : आत्मज्ञान व्हावे यासाठी प्रयत्न काय करायचे ह्याची फक्त दिशा येथे आढळते. महाराजांच्या इतर अभंगात विस्ताराने ह्या प्रयत्नांचे वर्णन करणारे अभंग आहेत. आपण ते नंतर पाहणारच आहोत.

माझ्या मते ह्या अभंगाचा अर्थ असा असावा.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home