27th post मन माझे चपळ । न राहे निश्चळ । for Abhanga a week of Sant Tukarama.
blogaddress :http:// tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com
Abhanga post 27th : Date 9th March 2013
अभंगाच्या अर्थाचे
मराठीत स्पष्टीकरण ईंग्रजी
स्पष्टीकरणानंतर दिले आहे
मन माझे
चपळ । न राहे निश्चळ । घडि घडि
पळ पळ स्थिर नाही ॥ १ ॥
आता तू
उदास नव्हे नारायणा । धावे
मज दीना गांजियले ॥ २ ॥
धाव
घाली पुढे इंद्रियांचे ओढी
। केले तडातोडी चित्त माझे ॥
३ ॥
तुका
म्हणे माझा न चले सायास । राहिलो
हे आस धरोनि तुझी ॥ ४ ॥
Verbatim Meaning:-
My mind is mercurial ।
It is not steady
and stable at any moment || 1 ||
Now O'Narayana do not remain
indifferent | Please come to save poor me|| 2||
My sense organs are running
behind the objects they love| Because of this my mind is disturbed
very much || 3 ||
Tuka says that all my efforts
are useless | I am only hoping for the help from you ||4||
Background Information needed
for understanding this abhanga
We have seen in the earlier
abhaNgaas that our mind is always chasing the objects in this
external world through our five sense organs. This process leads to
the generation of various desires. And this has started from the
moment we have taken birth. The mind is thus continuously occupied by
the subject of these five senses during the time we are awake and
also when we sleep. The result is the state of restlessness for the
mind. We also know that the unfulfilled desires are the sole cause
of successive births and deaths. i.e. getting entangled in the cycle
of births and deaths.
This mercurial mind can not be
controlled even by very high level personalities. This is the reason
why our saints have written various Abhangas, poems during their
initial stage of the sadhanaa( साधना)
For example in one such poem
called KaruNaashtakaa( करुणाष्टक)
Samartha Ramadasa says the “ I am, unable to control my mercurial
mid, O god please help me. Without your support I am getting tired of
putting efforts to control my mind”.
The present Abhnga of Sant
Tukaramaa also falls in this category.
One of the main cause of this
state of mind is it's habit of raising doubts for any action to be
taken. This habit has many shades.
For example we see that many
clever students become overconfident about their knowledge and do not
perform well in the examination.
However this habit of raising
Doubts may be useful in our day to day life. Generally before
alloying any work to an unknown person we first have doubts about the
persons capability. Later-on after he /she completes the assigned
work we develop confidence . This process is thus not very bad as far
as day to day life is concerned. A person who doubts will plan the
actions more thoroughly and will succeed in the undertaking.
But in Spirituality , the doubt
is very dangerous and therefore undesirable. In spirituality. Unlike
material world , the results in spiritual path are not tangible. This
causes Doubt abut the efforts one is putting for ones progress.
Because of Doubts many a people give-up their efforts in
spirituality and loose the golden opportunity of getting the Human
birth.
Thus one must have Faith
(श्रद्धा)
first. The efforts put with faith give us the confidence that God is
really present and He is taking care of our every need. This further
strengthen the Faith. Such person very soon reaches the goal of
Liberation.
Sri.Bhagavadgeetaa also tells us
to have faith for this reason.
However whatever efforts one may
put the mind remains mercurial and take us away from our efforts.
This is everybody's experience.
.
What can one do then? Sant
Tukarama gives answer for this question in this abhanga.
Meaning of the Abhanga:-
Tukarama Maharaja addresses his
god saying “O Narayanaa ! I am tired now after putting all my
efforts to control my mind. It is continuously going to all other
objects .( I am, not able to remember you ) But you are all knowing
one. You alone are my savior. Therefore I pray you to help me to come
out of this state of mind. I am hoping only for the help from you”.
Teaching of the Abhanga:-
We also can pray to our God
like Tukarama Maharaja has done here.
There is a difference between
prayer and request. A request may get rejected. But a prayer is never
rejected .Thus the disciple is very sure that God will listen to the
prayer and do the best for the Disciple.
There are such Abhangas of Sant
Tukarama . Also here I remember a very effective prayer written by
Samarth Ramadas with the last line “ O Rama, this is what I would
like to have from you” ( रघुनायका
मागणे हेचि आता).
In our Indian society , it is
standard practice to say a prayer first in the morning. One should
select some suitable prayer and should pray to God , everyday. This
is the teaching of this Abhanga.
Now the same is given in Marathi for marathi Readers.
अभंगाच्या अर्थाचे मराठीत स्पष्टीकरण :
मन माझे
चपळ । न राहे निश्चळ । घडि घडि
पळ पळ स्थिर नाही ॥ १ ॥
आता तू
उदास नव्हे नारायणा । धावे
मज दीना गांजियले ॥ २ ॥
धाव
घाली पुढे इंद्रियांचे ओढी
। केले तडातोडी चित्त माझे ॥
३ ॥
तुका
म्हणे माझा न चले सायास । राहिलो
हे आस धरोनि तुझी ॥ ४ ॥
अभंगाचा
शब्दार्थ:-
माझे
मन अत्यंतचपळ आहे व कोठेही
क्षणभसुद्धा स्थिर रहात नाही.
सारखे
एकडेतिकडे पळत असते ॥ १॥
हे
नारायणा तू माझ्याबाबतीत
उदास होऊ नकोस .
मला
ह्यापरिस्थितीतून वाचवायला
धाव. मी
अगदी दीनवाणा झालो आहे व ह्या
परिस्थितीमुळे गांजून गेलो
आहे ॥ २ ॥
माझे
चित्त इंद्रियांच्या विषयां
मागे धावते व समाधान न मिळाल्यामूळे
जणू चित्तचे तुकडे झाले आहेत.
॥
३॥
तुका
म्हणतो की माझे सर्व प्रयत्न
अपूरे पडत आहेत.
आता
मला कळून चुकले आहे
व म्हणून
मला हीच आशा आहे की (
हे
नारायणा)
तूच
ह्यातून सोडवशील ॥ ४॥
अभंगाचा
अर्थ समजण्यासाटी आवश्यक
माहिती :-
आपण
आधीच्या अनेक अभंगाच्या
विवरणामधे पाहिलेच आहे की
माणसाचे मन हे सतत पंचेंद्रियांच्या
कोठल्यातरी एका विषयांमागे
धावत असते.
त्यामुळेच
मनामधे वासना निर्माण होतात.
ही
क्रिया आपल्या जन्मापासून
जागेपणी तसेच आपण झोपी गेलो
तरी चालूच असते.
ह्यामुळे
मन अस्थिर असते.
असो.
मनाचे
चपळपण हे भल्याभल्यांना आवरता
येत नाही.
अगदी
उच्च कोटिच्या साधकंना सुद्धा
ते आवरणे कठीणच जाते.
आपल्या
संतांच्या साधकावस्थेमधे
म्हणुनच ह्यावर ओव्या व अभंग
आहेत.
उदाहरणार्थ
: एका
करूणाष्टकामधे समर्थ रामदास
स्वामींनी म्हटले आहे की
"चपळपण
मनाचे नावरे नावरीता.
तुजविण
शिण होतो ,
धाव
रे धाव आता.”
संत
तुकारामांचा हा अभंग अशाच
काव्यामधला एक आहे.
मनाची
एक वाईट सवय म्हणजे संशय वाटणे.
ही
सवय साधकालाच नव्हे तर इतरांना
पण व्यवहारामधे सुद्धा साधारणत:
घातक
ठरते. आपण
पहातोच की
अगदी
हुषार मुले मला सर्व येते असे
समजून अभ्यासाकडे दुर्लक्ष
करतात.
हा
सुध्दा संशयाचाच एक प्रकार
आहे.
पण दृश्य
सृष्टीचे व्यवहार करतांना
" प्रथम
संशय घेणे,
त्यानंतर
तर्काने व अनुभवाने संशयाचे
निराकरण होणे ,व
मग विश्वास बसणे हे घडते.
ह्यानंतर
पुढे खात्री झाल्यावर एखाद्या
व्यक्तीला काम देणे "
ह्या
पद्धतीने चालतात/केले
जातात.
अर्थात
व्यवहारामधे हा विवेक विचार
उपयोगी पडतो हे स्पष्टच आहे.
असा
विचार करणारी व्यक्त्ति
व्यवहारात संशयावर मात करून
यशस्वी होते.
पण
परमार्थामधे याच्या उलट जावे
लागते..
प्रथम
श्रद्धा असावी
लागते.
अशी
श्रद्धाच परमार्थामधे यश
देंणारी असते.
बरीच
मंडळी संशयाने आपली साधना
सोडतात व जीवन व्यर्थ घालवतात.
ठाम
श्रद्धा असल्यानंतर माणसाला
योग्य प्रयत्नांमुळे भगवंत
आहेच व तो माझ्या भल्यासाठीच
सर्व कांही करतो आहे हा अनुभव
येतो.
तो
आहेच हि खात्री झाली की आपले
त्याच्याशी नाते जोडले जाते.
मग
आपण जसे एखादे मूल आपल्या
आईकडे आपली त्राती म्हणुन
पाहते व तिच्यावर सारा भार
टाकून निश्चिंत होते तसे आपण
होऊ शकतो.
भगवंत
अशा भक्ताचा नेहमीच कैवारी
असतो.
भगवंताने
तसे गीतेमधे सांगितलेच आहे.
म्हणुन
हे समजून घ्यावे व आपली दृष्टी
परमार्थांत संशयरहित ठेवावी
असे पण म्हणता येते.
असो.
पण
कितीही प्रयत्न केले तरी मन
अस्थिर राहते हाच आपला अनुभव
आहे /असतो.
ह्या
परिस्थितीतूमधून कसे बाहेर
पडायचे ह्याचे मार्गदर्शन
ह्या अभंगात आहे.
अभंगाच्या
अर्थाचे स्पष्टीकरण :-
तुकाराम
महाराज येथे म्हणतात की हे
नारायणा मी सर्व प्रयत्न करून
आता थकलो आहे.
मन
सतत अस्थिरच आहे.
सारखे
तुझा स्मरणापासून दुर जाते
आहे. पण
तूच सर्व जाणतोच.
तूच
माझा त्राता आहेस.
म्हणुन
तुलाच माझी प्रार्थना आहे की
आता मला ह्यास्थितीतून बाहेर
काढ. हीच
आशा लावून मी बसलो आहे.
अभंगाची
शिकवण:-
महाराज
म्हणतात तशीच आपण प्रार्थना
करू शकतो.
प्रार्थना
व विनंती मधे फरक असतो.
ज्याला
विनंती केली आहे तो तिच्याकडे
दुर्लक्ष करू शकतो.
पण
प्रार्थना नक्कीच ऐकली जाईल
अशी खात्री प्रार्थना MüUhÉÉîrÉÉ
भक्ताला
असते.
तुकाराम
महाराजांचे असे अभंग आहेत.
तसेच
समर्थ रामदास्स्वामींचे "
रघूनायका
मागणे हेची आता"
असा
शेवटचा चरण असलेले करूणाष्टक
साधाकांसाठी प्रार्थनेला
घेता येते.
आपल्याकडे
प्रात:स्मरणामधे
प्रार्थना म्हणण्याची पद्धत आहे.
अशी
कोणतीतरी प्रार्थना रोज
म्हणावी हीच ह्या अभंगाची
शिकवण आहे.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home