Tuesday, October 1, 2013

Added 50 post नाम संकीर्तन साध पै सोपे, for Abhanga a week of Sant Tukarama.
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com

Contact mail address is rgphadke@gmail.com

For  Marathi Readers the explanation of the meaning is given after the English version given here ie at the end of English version.

अभंग ५० वा :-
नाम संकीर्तन साध पै सोपे। जळतिल पापे जन्मांतरिची ॥ १॥
नलगे सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण ॥ २॥
ठायीच बैसोनी करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा॥ ३॥
रामकृष्ण हरी विठ्ठला केशवा। मंत्र हा जपावा सर्व काळ ॥ ४ ॥
याविण आणिक्क नाही पै साधन । वाहतसे आण विठोबाची ॥ ५॥
तुका म्हणे सोपे आहे सर्वाहूनि । शाहाणा तो धणी घेतो येथे ॥ ६॥.

Verbatim Translation :-
Reciting the Holy name of God is the simplest method. Following this method causes the burning of all the sins done in this as well as many previous births|| 1||
To do recitation , one need not go to a forest ( go away from the materialistic world). Narayana ( Lord) comes to the home of such a disciple.|| 2||
All one has to do is to sit at some place steady and call the God with love.|| 3||
Any mantra ( name of God) such as Ramakrishna, Hari, Viththala, Keshava can be selected for recitation and one should recite the Name all the time || 4||
I vouch for these statements remembering my lordViththala ; and also confirm that there is any other simpler method available|| 5||
Tuka says that this method is the simplest of all . Whosoever understands this will get benefited || 6 ||

Background Information for this Abhanga :-

In the earlier Abhangas posted ;“ NamasmaraNa “ ie. “ Recitation of the Holy Name of God “ has been addressed in many places.
This abhanga is generally recited at the end of Haripatha in the Varakari sect.
This abhanga guides one who is desirous of attaining Liberation while fulfilling his worldly duties.

The Meaning of the Abhanga:-

The meaning is clarified by taking each stanza separately as given below.

Stanza 1:-
Reciting the Holy name of God is the simplest method. Following this method causes the burning of all the sins done in this as well as many previous births|| 1||

Recitation of the Holy name of God, describing His various attributes and actions is one of the easiest path one can follow for attaining the Liberation. The Soul gets entangled in the cycle of Birth-Death because of the thinking that “ I am the doer”. When this attitude is existing while doing any work ; then the doer has to experience the results of his action. Some may be good and give happiness but some may lead to very unhappy state. If these results do not manifest in the present birth time then there is a need to take another birth. But one can not escape this as long as “ I am the doer, enjoy-er” attitude remains active. All t6his happens because the doer has forgotten that the God is the real doer. Thus forgetting the God, real doer is the main Sin. .
Therefore this stanza tells us to always remember the God so that the all the sins committed by us in this and earlier births are negated.

Stanza 2 &3 :-
To do recitation , one need not go to a forest ( go away from the materialistic world). Narayana ( Lord) comes to the home of such a disciple.|| 2||
All one has to do is to sit at some place steady and call the God with love.|| 3||

These stanzas describe briefly the method to remember the God.
It is said here that :-
One need not go to a Jungle ie. Renounce the world meaning that one need not put any extraordinary efforts in order to recite the holy name of God. All that one has to do is to recite His name with Love At the start even if there is no love and one recites the name of God, it does not matter. Whether one takes bitter medicine with love or not, the medicine definitely does it's curative action.
Similarly Even if the recitation of God's name ( Remembering Him) is done without love it also helps. For such a disciple too, the God comes to meet him.

Here a question arises in the mind . “When, How and for what time period should one recite the Holy name of God?” This question was answered by Saint ShrI. Samarth Ramadas swami in “ Dasabodha” in the chapter specifically addressed for “ Recitation of Holy name”

He says that the Recitation should be done continuously, when you are enjoying the life or when you are suffering in the life. One should do the recitation while doing any work. Whatever may be the conditions around, one should not leave the recitation even for a short while. In short he says that one should do everything with the remembrance of God.

Just before Saartha Ramadas left for his heavenly abode; he has uttered some Abhangas. In these abhangas; it has been said that one should try top recite the name for 13000000 times . The moment this number is reached the God will be experienced by the reciter.

If we try to say the name throughout the day of say 16 hours( excluding the time when we sleep) ,the above figure can be reached in about 12 years. Such a large number has been told only to ensure that one will not forget the God even for a second in the life.

4th stanza: - This tells us which name is to be recited.
Any mantra ( name of God) such as Ramakrishna, Hari, Viththala, Keshava can be selected for recitation and one should recite the Name all the time || 4||

We know that God has been addressed with innumerable names. In fact every name of God is equally good and powerful. This part of the Abhanga is addressing the same point. Tukaram Maharaj is telling us here to take any name which we are comfortable with and with which we address our God. It rains everywhere and ultimately all the water reach the Sea. Similarly recitation of any name takes the disciple to Him only.

5th Stanza:- I vouch for these statements remembering my lordViththala ; and also confirm that there is any other simpler method available|| 5||

In above stanza Tukaram Maharaj , who himself had attained the Liberation , is assuring us based on his own experience that “ I am vouching by taking my Viththala's name for the above described method. There is no other simple method to attain the coveted goal of Liberation from the cycle of Births-Deaths for you.

Last stanza:-
Tuka says that this method is the simplest of all . Whosoever understands this ;will get benefited || 6 ||

In the last stanza Maharaj concludes that thus “ Recitation of the Holy name of God “ is really a unique method to worship Him. One who is wise enough will understand what I am trying to say and take advantage of this information.

Teachings of this Abhanga:-

In short Tukaram Maharaj is advising us all the we should not doubt his advise and take necessary action to meet the Real goal for human birth that of Liberation.

From here onwards is the meaning of this abhanga explained for Marathi readers.

अभंग ५० वा :-
नाम संकीर्तन साध पै सोपे। जळतिल पापे जन्मांतरिची ॥ १॥
नलगे सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण ॥ २॥
ठायीच बैसोनी करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा॥ ३॥
रामकृष्ण हरी विठ्ठला केशवा। मंत्र हा जपावा सर्व काळ ॥ ४ ॥
याविण आणिक्क नाही पै साधन । वाहतसे आण विठोबाची ॥ ५॥
तुका म्हणे सोपे आहे सर्वाहूनि । शाहाणा तो धणी घेतो येथे ॥ ६॥

अभंगा मागची भूमिका :-
नामस्मराणाबद्दल मागच्या अनेक अभंगांमधे उल्लेख आला होता. ह्या अभंगामधे नामस्मरणाची पद्धत व महत्व स्पष्ट केलेले आहे
हरीपाठाच्या शेवटी हा अभंग म्हणण्याची वारकरी संप्रदायामधे पद्धत आहे.
ज्याला प्रपंचात राहून परमार्थ साधना करायची आहे त्या प्रत्येकासाठी हा अभंग मार्गदर्शक आहे.
अभंगाचे अर्थस्पष्टीकरण :-
ह्या साठी आपल्याला अभंगाच्या प्रत्येक चरणाचा अर्थ पाहाणे आवश्यक आहे. म्हणून चरणा प्रमाणे अर्थाचे स्पष्टीकरण केलेले आहे.
१ ला चरण :-
नाम संकीर्तन साध पै सोपे। जळतिल पापे जन्मांतरिची ॥ १॥
नामस्मरण करणे , भगवंताच्या निरनिराळ्या गुणांचे वर्णन करणे हा भगवद्‌प्राप्तीचा अत्यंत सोपा मार्ग आहे. खरे पापकर्म कोणते तर मी कर्ता असे समजून कार्य करणे हेच होय.. असे झाले की भगवंताचा विसर पडतो. मी पणाने कर्तृत्व स्वत:कडे घेण्यानेच माणसाला केलेल्या कर्मांची बरी वाईट फळे भोगण्याकरिता पुन:पुन: जन्म घ्यायला लागतो. म्हणून भगवंताला विसरणे हेच अत्यंत मोठे पापकर्म होय. आपण गेले अनेक जन्म हेच केले व त्यामुळे अनेक जन्मांमधील पापे भोगण्या साठी पुन:पुन: जन्म घेतले.
पण आता चांगली वेळ आली आहे. भगवंताचे स्मरण ठेवून तोच कर्ता व करविता आहे हे ध्यानांत ठेऊनच सर्व कांही करावे म्हणजे ही जन्मजन्मांतरीचे पापे नष्ट होतील असे हा चरण सांगतो.
ह्या साठी कसे वागायचे तो भाग आता पुढच्या चरणांमधे येतो आहे.
२ रा व ३ रा चरण:-
नलगे सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण ॥ २॥
ठायीच बैसोनी करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा॥ ३॥

नामस्मरण करण्यासाठी कांहीही सायास म्हणजे पराकोटीचे प्रयत्न करावे लागत नाहीत. आपले व्यवहार संसाराची कामे सोडून जंगलामधे संन्यासी होऊन रहावे लागत नाही. एकच गोष्ट करावी लागते ती म्हणजे हरीचे स्मरण अत्यंत प्रेमाने करावे लागते. सुरवतीला जरी हरीनामस्मरण
प्रेमने झाले नाही तरी पण कडू औषधे जरी नावडिने घेतली तरि रोग बरा करतात तसेच होते. पूर्वी केलेली पापे नष्टच होतात व नवी निर्माण होत नाहीत.
येथे कोणी असे विचारेल की नामस्मरण केंव्हा , कसे व किती वेळ करायचे. ह्या प्रश्नाचे उत्तर समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामधे नामस्मरण भक्ती ह्या समासांत दिले आहे. त्याचा सारांश खालील प्रमाणे आहे.
नामस्मरण सर्व काळी करावे म्हणजे सतत करावे. सुखाचे भोग अथवा दु:खाचे ताप सहन करत असतान , कोणतेहॊ काम करताना , नामस्मरण स्मरावे. जीवनामधे कशीही परिस्थिती आली असली तरीही नामस्मरणाची कांस सोडू नय. थोडक्यांत म्हणजे भगवंताला न विसरता सर्व कांही करावे.

नामस्मरण किती करावे ? ह्या प्रश्नाचे उत्तर पण मिळते.ते खालील प्रमाणे आहे.
समर्थांच्या अंत:काळच्या अभंगामधे समर्थांनी १३ कोटी ही संख्या सांगितली आहे. सकाळी जागे झाल्यापासून ते रात्री झोपी जाईपर्यंत जर सतत नामस्मरण जो कोणी करत असेल त्याच्या कडून १३ कोटी संख्येचा जप साधारणत: १२ वर्षांत होतो असे अनुमान आहे. असो. एवढी मोठी संख्या ह्याच साठी सांगितली आहे की क्षणभर सुद्धा भगवंताचा विसर पडायला नको.
४था चरण:-
रामकृष्ण हरी विठ्ठला केशवा। मंत्र हा जपावा सर्व काळ ॥ ४ ॥
स्मरणासाठी भगवंताचे कोणतेही नाम घेता येते. हेच हा अभंगाचा चरण सांगतो. ज्या देवावर भक्ताची श्रद्धा आहे ते नाम घेतले चालते. आकाशातून पडलेले सर्व पाणी जसे शेवटी सागरलाच मिळते तसेच नाम कोणतेही घेतले तरी भगवंतालाच पोहोचते. असा ह्याच अर्थ घेता येतो.

५वा चरण :-
याविण आणिक नाही पै साधन । वाहतसे आण विठोबाची ॥ ५॥
वरच्या चरणामधे तुकाराम महाराज हेच म्हणतात की : मी माझ्या प्रिय विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो की वर सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही परमार्थ साधना केली तर पुरे आहे. दुसरी कोणतीही साधना करावी लागणार नाही " आपण ४९ व्या अभंगात पाहिलेच होते की परमार्थामधे संतवचनांवर विश्वास ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. " येथे तर महाराजांनी आपल्याला ही ग्वाहीच दिलेली आहे की माझ्यावचनांवर विश्वास ठेवा व नामस्मरणाला लागा..

शेवटचा चरण:-
तुका म्हणे सोपे आहे सर्वाहूनि । शाहाणा तो धणी घेतो येथे ॥ ६॥
म्हणुनच शेवटी पुन्हा महाराज म्हणताहेत की असे हे नामस्मरणाचे साध हे सर्वांत सोपे साधन आहे. जो शाहाणा आहे तोच माझे बोल समजून स्वत:चा फायदा करून घेईल.

अभंगाची शिकवण :-
अशा पद्धतीने नामस्मरण करून तुम्हाला मिळालेल्या ह्या अनमोल मनुष्यजन्माचे सार्थक करून घ्यावे हीच ह्या अभंगाची शिकवण आहे.


0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home