Monday, July 29, 2013

Added 43rd  post on उठा सकळ जन उठले नारायण for Abhanga a week of Sant Tukarama.
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com

 To Marathi Readers the explanation of the meaning is given after the English version given here ie at the end of English version.



उठा सकळ जन उठले नारायण । आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥ १॥
करा जयजयकार वाद्यांचा गजर । मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥ २ ॥
जोडोनिया कर मुख पहा सादर । पायांवरि शिर ठेवूनिया ॥ ३॥
तुका म्हणे काय पढियेतें मागा । आपुलालें सांगा दु:ख सकळ ॥ ४॥

Verbatim Meaning:-

Narayana is awakened now, O'Man wake up now. All the seers are happy to see their Lord Narayana || 1||
Praise the Lord using all the instruments like Mrudunga, Veena etc || 2||
Greet Him with folded hands and respectfully put your head at His holy feet || 3||
Tuka says that you may tell all your problems to Him and ask Him to bless you with desirable boon ( what ever you want) || 4||

Meaning of the Abhanga:-

If we see the verbatim meaning it appears very simple. However there is also a hidden deeper meaning. Let us try to find that meaning now.
In the first stanza itself, Tukarama Maharaj says that Lord is awakened now.
In Fact Lord is always awake only . The aspects of Sleeping are present only when we are in dual state ; where we treat the Lord as a separate entity . Out of shear love for the Lord; the disciple thinks that like him the Lord also needs sleep. Worship of Lord is possible only in the state where Lord is separate from the Disciple. That is why there are various pujas such as singing of devotional Songs to wake up the Lord . Evening Puja before He sleeps. Etc.

However the Disciple is really awakened only when the thought sinks in his mind that he has wasted his time and now he has to do something so as to attain liberation and unity with the supreme Lord. After knowing the supremacy of the lord the disciple starts to praise Him. In our country ( India) this is done by singing various devotional songs using various instruments like Drum etc.

It is obvious that those who have experienced the presence of the Lord ( by following one of the various paths) just like we experience the presence of the Sun; see the lord in His Image in the temple and feel very happy to see Him. This is in nutshell the meaning of the first two stanzas of the abhanga

In fact the Lord is present everywhere. He is the Atman in our heart( body)However since we are in the dual state , we do not experience His presence in our Heart. Until then it is better to treat Him separate from us and do His worship. All the saints therefore preach the worship of Lord and ask us to totally surrender to Him. Though He is not seen at least we can imagine His presence in His Image or Symbol. This is quite easy.

In the 3rd and 4th stanza s, Tukaram maharaj is advising us to see the Face of the Lord and surrender to Him .This is done generally by putting one's Head at the Holy feet of the Lord. Tukaram Maharaja further says that now you can ask Him to give you whatever you want.

When we surrender to some one , then it is customary to put the Head at the feet . By this we indicate that for us the Lord is everything. He is all knowledgeable and thus He know what is good for us and what is not suitable for us. He will guaranteedly protects us if we surrender to Him totally. This aspect is very important in the act of Worship..

This is the reason, why Tukaram Maharaj is saying the we should see the beloved Lord's face and pray to Him by closing both the Hands and surrender to Him by putting our Head at His holy feet.
Further in the same stanza we are also told to ask whatever we desire.

However What one should ask depends upon one's mentality.
Samartha Ramadas says in the below-given Verse whose meaning is as given below.

One who begs the wish-fulfilling cow for buttermilk, one who spends time in wasteful discussions instead of practicing the teachings of the Teacher( Teachings about the Lord and method for attaining liberation) , One who treats the wish-fulfilling stone as apiece of Marble, He will be always suffering and suffering only

One whose mind is inclined to Materialistic pleasures , and wastes this Human life ; behaves like the person described in the above verse of Samartha Ramadasa.
Lord is always ready to give us whatever we want, but what to ask is to be decided with proper thinking only. It is best to ask for Liberation and love for Him.

Tukarama Maharaj has written another Abhanga with it's first stanza “O' consort of Rakhumai ( Panduranga ) let my eyes only see your Image.” He prays  the lord to give him, only the Love for the lord .. We will see this abhanga sometimes later.

Also there is a very famous prayer written by Samartha Ramadasa.
Every stanza of this prayer ends with  “ O' Lord Sri Rama thisa is the only demand I am asking. ” .
There are 8 such stanzas in this prayer. This is one of the best examples of '” What is to be asked to the Lord “ Anyway.

Teaching of the Abhanga:-

This abhanga teaches us to Surrender totally to the lord , and thus be sure that The Lord will  give us what is suitable for us; and be happy with whatever He gives us. This abhanga is very important from the above described aspects.

Further below  is the Marathi version of the same Abhanga:-

उठा सकळ जन उठले नारायण । आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥ १॥
करा जयजयकार वाद्यांचा गजर । मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥ २ ॥
जोडोनिया कर मुख पहा सादर । पायांवरि शिर ठेवूनिया ॥ ३॥
तुका म्हणे काय पढियेतें मागा । आपुलालें सांगा दु:ख सकळ ॥ ४॥
अभंगाचा शब्दार्थ :-
नारायण उठले आहेत आता जागे व्हा . (नारायणाचे दर्शन झाल्याने ) तिन्ही लोकांमधील मुनिजनांना आनंद झाला आहे. ॥ १॥
भगवंताचा जयजयकार करा व मृदुंग , वीणा , टाळ इत्यादि वाद्यांचा गजर करा .॥ २॥
भगवंताचे श्रीमुख दोन्ही हातांनी नमस्कार करून आदराने पाहा. त्याच्या पायी डोके ठेवा ॥ ३॥
तुका म्हणतो की तुम्हाला जे दु:ख होते आहे ते त्याला सांगा व काय हवे ते त्याच्याकडे मागा। ४॥

अभंगाचे अर्थस्पष्टीकरण :-

तसे वरवर पाहिले तर अभंगाचा अर्थ अगदी सोपा वाटतो व आहे पण .
अभंगाच्या पहिल्याच चरणामधे महाराज म्हणतात की भगवंत आत जागा झाला आहे. तेंव्हा आता तुम्ही झोपू नका . त्याचे दर्शन झाल्याने सर्व मुनिजन आनंदित झाले आहेत.

खरतर भगवंत झोपला होता कां ? मुळीच नाही पण भक्ताला त्याच्यावरच्या प्रेमामुळे वाटते की त्याला पण आपल्यासारखीच झोपेची गरज असणार व तो पण रात्री झोपतो. ह्याविचारामुळेच आपल्याकडे सकाळी कांकड आरति, तसेच रात्री शेजारती म्हणतात.
ज्यावेळेला माणसाला कळते की आतापर्यंत त्याने सर्व वेळ काळ उगाचच ऐहिका वस्तूंच्या मागे धावण्यात व्यर्थ घालविला आहे ती वेळ म्हणजे खरी जागे झाल्याची वेळ आहे. ह्यावेळिच भगवंताचे दर्शन व्हावे ही ईच्छा मनामधे जागॄत होऊन माणूस भगवंताची भक्ती करू लागतो.
मग त्याला देवाच्या नावाने जयजयकार करावासा वाटतो. त्यचे भजन टाळ मृदंग इत्यादी वाद्ये वाजवून करावेसे वाटते.
जे असे आधीच जागे झाले आहेत व ज्यांनी नवविधाभक्ति, योग किंवा कोणत्याही मार्गाने जाऊन भगवंताची भेट घेतली आहे असे संतजन म्हणुनच नेहमी भगवंताच्या दर्शनाची अनुभूति घेत आनंदामधे मग्न असतात.
ह्याच स्थितीचे वर्णन अभंगाच्या पहिल्या व दुसर्या चरणामधे महाराजानी केलेले आहे.
अभंगाच्या ३ व ४ चरणामधे तुकाराम महाराज म्हणतात की भगवंताचे दर्शन घ्या , त्याच्या पायांवर डोके ठेवा व असे शरण जाऊन जे काय मागायचे ते मागा.

खरे तर भगवंत सर्वत्रच आहे.म्हणजेच आपल्या हृदयांतील अंतरात्मा पण तोच आहे. मायेच्या
अंमलाखाली आपण असल्याने आपल्याला ह्याचा अनुभव नाही. म्हणुनच अनुभव येईपर्यंत
द्वैतामधे राहूनच भगवंताची भक्ती करावी त्याला अनन्य शरण जावेहाच सर्व संतांचा उपदेश
आहे. असो. तसेच भगवंत हा सगूण आहे तसाच निर्गूण अव्यक्त पण आहे. सर्वसामन्यांसाठी
सगूण रूपी भगवंताचे भजन करणेच सोपे व योग्य असते.

आपण आपले डोके ज्याच्या पायांशी आपण ठेवतो त्याला आपण पूर्ण शरण गेलेलो असतो.
असे शरण जाणे ह्यामधे "आपले सर्वस्व तोच आहे, त्याला सर्व कांही ठाऊक आहे ,आपल्यासाठी
योग्य काय व अयोग्य काय आहे ते त्याला माहीत आहे व म्हणुनच तो आपले सर्व संकटांमधून रक्षण करेलच " ही खात्रीची भावना असणे महत्वाचे असते.

म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात की अशा तुमच्या प्रिय भगवंताच्य़ा मुर्तीचे दर्शन घ्या. त्याच्या पायांशी डोके ठेवून त्याला शरण जा. दोन्ही हात जोडून त्याला प्रणाम नमस्कार करा तुकाराम महाराज पुढे हे पण म्हणताहेत की त्याच्याकडे जे काय मागायचे ते मागा.
भगवंताकडे काय मागावे ? ह्या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकासाठी वेगवेगळे आहे.

समर्थांचा एक श्लोक येथे प्रस्तुत करता केला आहे.

घरी कामधेनू पुढे ताक मागे । हरीबोध सांडूनी वेवाद मागें।
करीं सार चिंतामणी काच खंडे। तया मागतां देत आहे उदंडे ॥

ज्याचे मन ऐहिकाकडे गुंतले आहे तो ऐहिक सुखाचीच मागणी करेल. तसे करणे म्हणजे
चिंतामणी कडे काचेचे तुकडे मागण्यासारखे असते किंवा कामधेनूकडे ताकाची मागणी
करण्यासारखे हे आहे..


भगवंत द्यायला तयारच असतो पण काय मागावे हे म्हणुनच विवेकाने ठरविणे उत्तम .
मागायचे तर सर्व दु:खांपासून नेहमी करता मुक्ती कां न मागावी ?
तुकाराम महाराजांचाच एक प्रसिद्ध अभंग आहे. त्याचा पहिला चरण " सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया " असा आहे.". ह्या अभंगात त्यांनी भगवंताकडे फक्त त्याची भक्ती घडावी एवढेच मागितले आहे. पुढे कधीतरी तो अभंग आपण पाहूच.
समर्थ रामदासांचे " रघूनायका मागणे हेची आता " हा शेवटचा चरण असलेले करूणाष्टक
म्हणजे आपण काय मागावे ह्याचे उत्तम उदाहरण आहे. असो.

अभंगाची शिकवण :- वर लिहिल्या प्रमाणे भाव ठेवून भगवंतास शरण जा. स्वत:ची सर्व
दु;खे त्याला सांगा व जे काय हवे ते मागा . तुम्ही खरेच जर असे संपूर्ण शरगागत
भावाने देवा कडे जाल तर तो तुमच्या सर्व ईच्छा पूर्ण करेल हे हा अभंग सांगतो. .
आपल्याला अशी जणू ग्वाहीच येथे मिळते आहे. व ह्या दॄष्टीने हा एक महत्वाचा अभंग
आपण येथे पाहिला आहे.


0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home