Added 37th postशुकसनकादिकीं उभारिला बाहो .for Abhanga a week of Sant Tukarama.
blogaddress :http:// tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com
blogaddress :http:// tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com
शुकसनकादिकीं उभारिला
बाहो । परिक्षिती लाहो दिसां
सातां॥ १॥
उठाउठी करी स्मरणाचा
धांवा । धरवत देवा नाहीं धीर
॥ २ ॥
त्वराजाली गरुडा
टाकियलें मागें । द्रौपदीच्या
लागें नारायणा ॥ ३॥
तुका म्हणें करी बहुत
तांतडी ।प्रेमाची आवडी लोभा
पूर ॥ ४॥
Verbatim Meaning:-
The sages Shuka and Sanakaa told Bhagavata story and Listening to
that Parikshit got liberation in seven days|| 1||
When any one remembers and calls the Lord, He can not wait for even a
second || 2||
When Draupadi called Him, He ran so fast that Garudaa was left far
behind|| 3||
Tuka says that call the God with urgency, then because of this flood
of love He comes immediately|| 4||
Background information to understand the meaning of Abhanga:
This abhanga describes when a person will be liberated. Here the time
aspect has not been addressed . In fact the time for liberation
depends on the the Attitude of the Mind of the disciple. The Abhanga
is describing to us what this attitude should be.
Most of us would like to have liberation but we are in no hurry. We
are busy with the works and plays of this world and then if there is
time left then the thought of Liberation comes to the mind.
Intense desire for Liberation is called ( तीव्र
मुमुक्षत्व).If anyone has such Intense
Desire, then all his attention will be naturally concentrated to
achive this desired goal.
Tukarama Maharaj has given us the examples from Bhagavatam to
explain this point.
Meaning of the Abhanga:-
King Parikshita had only seven days time left to li8ve in this world.
He was very much worried . But luckily Shuka charya, with other
Sages arrived there. Shukacharya told the Bhagavat Katha (
BhagawatPuran भागवत पुराण)
for one week to King Parikhsita . He know that he didn’t have any
more time and used the available time to remember Lord Krishna and
did nothing else. Because of his Intense desire for Getting
liberation he remembered the Lord Krishna and since there were no
other desires he was liberated.
When a disciple calls the Lord with love and intense desire to meet
Him,or with the intense hope that only He can save such a disciple;
The God can not wait at all; even for a second. He runs to for His
disciple. It is a well known fact that when Droupadi called Him like
this , He cam immediately and saved her in the court of Duryodhana .
Tukarama Maharaj says that if you call the Lord with such Intense
love and desire, He will come for you also.
Teaching of the Abhanga:- The Abhanga enables us to examine
our own attitude and take necessary corrective action in case we are
desirous for Liberation.
Further below the meaning of the Abhanga is given in Marathi
Language.
शुकसनकादिकीं उभारिला
बाहो । परिक्षिती लाहो दिसां
सातां॥ १॥
उठाउठी करी स्मरणाचा
धांवा । धरवत देवा नाहीं धीर
॥ २ ॥
त्वराजाली गरुडा
टाकियलें मागें । द्रौपदीच्या
लागें नारायणा ॥ ३॥
तुका म्हणें करी बहुत
तांतडी ।प्रेमाची आवडी लोभा
पूर ॥ ४॥
अभंगाच शब्दार्थ :-
परिक्षिताने सात
दिवसांत जेंव्हा शुकसनकादिकांनी
सांगितलेले भागवत पुराण ऐकले
तेंव्हा त्याला सातव्या दिवशीच
मोक्षलाभ झाला ॥ १॥
जेंव्हा भक्ताकडुन
सतत भगवंताला आळविले जाते
तेंव्हा त्याला (अशा
भक्तावर कृपाकरण्यासाठी)
धीर धरवत नाही ॥ २॥
घाई झाल्याने तो
गरुडालाही मागे सोडुन अशा
भक्ताकडे धावत येतो, तो
द्रौपदीच्या रक्षणासाठी असाच
धावला होता ॥ ३॥
तुका म्हणतो की भगवंत
नेहमीच तांतडिने भक्तावरच्या
प्रेमापोटी धावून येतो ॥ ४॥
अभंगामागची भूमिका
:-
मोक्ष केंव्हा मिळतो
हे ह्या अभंगात स्पष्ट केले
आहे. येथे वेळ
ह्या दॄष्टिने वेळेचा अर्थ
घ्यायचा नाही तर मनामधे काय
भाव असावा लागतो ते येथे
महत्वाचे आहे. हा
भाव कसा असावा ते ह्या अभंगावरून
समजते.
आपण सर्वांनाच मोक्षाचि
आंस आहे. पण त्यासाठी
आपल्याला घाई झालेली नाही.
आपले सर्व व्यवहार
झाल्यानंतर कधीतरी आपल्याला
वाटते की आता मोक्षासाठी
कांहितरी करावे. थोडक्यांत
म्हणजे आपल्यामधे मुमुक्षत्व
आहे पण ते तीव्र नाही.
पण जर मुमुक्षत्व
तीव्र स्वरूपाचे असेल तर अशा
माणसाला दुसरे कांहीही सुचत
नाही. त्याचे सर्व
प्रयत्न फक्त व फक्त मोक्षासाठीच
असतात. ह्या अभंगामधे
तुकाराम महाराजंनी भागवतामधील
उदाहरणे देऊन हा मुद्दा स्पष्ट
केला आहे..
अभंगाच्या अर्थाचे
स्पष्टीकरण :-
.
राजा परीक्षीताजवळ
फक्त सात दिवसांचे आयुष्य
शिल्लक आहे हे कळल्यामुळे
;आता मला मोक्ष कसा
मिळेल ह्याचीच काळजी वाटत
होती. सुदैवाने
शुकाचार्य तेथे ईतर मुनिजनांसह
आले. त्यांनी सात
दिवसांत परिक्षिताला भागवत
पुराण ऐकवले. तीव्र
मुमुक्षत्वाचा उदय झाल्यामुळे
राजाच्या मनामधे फक्त भगवंताचेच
स्मरण राहिले व ईतर कोणत्याही
वासना मनामधे राहिल्या नाहीत.
ह्यामुळे तो मुक्त
झाला.
.
जेंव्हा एखादा भक्त
अत्यंत तळमळीने भगवंताला
स्मरतो , तेंव्हा
भगवंताला अश्या भक्ताची काळजी
लागते. मग तो क्षणाचाही
विलंब न लावता अशा भक्तासाठी
धाव घेतो. द्रौपदीने
असाच धावा वस्त्रहरणाच्यावेळी
केला तेंव्हा तो असाच तिला
सोडविण्यासाठी धावून गेला
होता.
अभंगात तुकाराम महाराज
हेच सांगताहेत की जर तुम्ही
अशा प्रेमाने व अनन्यभावाने
भगवंताचा धावा कराल तर तो
तुमच्यासाठीपण असाच धावून
येईल.
अभंगाची शिकवण :-
ह्या अभंगामुळे आपल्या
आपली स्वत:ची खरी
काय मनस्थिती आहे , आपल्याला
खरेच कां मोक्ष ह्याच जन्मी
हवा आहे कां? हे
तपासता येते. ही
तपासणी केली की काय करायचे
तेही आपण ठरवू शकतो. हीच
ह्या अभंगाची शिकवण आहे.
.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home