Added 30th post केला मातीचा पशुपती ।on 4th April 13.for Abhanga a week
blogaddress :http:// tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com
blogaddress :http:// tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com
Abhanga 30th post : Date 4th April
2013.
केला मातीचा
पशुपती । परि मातीसी काय महती
।शिवपूजा शिवासी पावे । माती
मातीमाजी जाये ॥ १॥
तैसे पूजिती
आम्हां संत। पूजा घेतो भगवंत।
आम्ही किंकर संतांचे दास।
संत पदवी नको आम्हास ॥२॥
केला पाषाणाचा
विष्णू। परी पाषाण नव्हे।
विष्णू विष्णूपूजा विष्णूसि
अर्पे।पाषाण राहे पाषाण रूपे
॥ ३॥
केलीं कांशाची
जगदंबा । परि कांसे नव्हे अंबा
। पूजा अंबेची अंबेला घेणे ।
कांसें राहे कांसेपणॆं ॥ ४॥
ब्रह्मानंद
पूर्णामाजी। तुका म्हणे केली
कांजी । ज्याची पूजा तणेंचि
घेणें। आम्हा पाषाणरूप राहणें
॥ ५॥
Verbatim Meaning :-
When a shivalinga made of clay is worshiped ; The
worship reaches Shiva only and the Shivalinga remains as the clay
only. Clay has no value.|| 1||
Similarly we are worshiped by Saints. But the worship is
received by God only. We are servants of the saints. We do not have
desire to be called as saint. || 2 ||
When Vishnu made of stone is worshiped ; The worship
reaches Vishnu only and the Image of Vishnu remains as the stone
only. Stone has no value.|| 3||
When Devi 's Image made of Brass is worshiped ;
The worship reaches Devi only and the Image remains as the Brass
only. Brass has no value.|| 4||
The real God is full of Bliss. His presence is like the
taste in a rice soup. He whom we worship receives the worship. We
people remain mortals only || 5 ||
Background Information required to understand the
meaning behind the abhanga:-
We have seen in earlier Abhangas that this Universe is
the wonderful creation of God. There is a very ancient sukta (
verse ) available where seer has given thought for understanding the
creation . This verse is known as “ Nasadiya Sukta” . In this
the Seer says the at the beginning there was nothing existent;
neither good or Bad. ( Duality) .What existed was the unique
Parabrahma .( Who is the real God and who is worshiped by the
Mankind.
Our scriptures-have taken this thought to a simpler
level for our understanding. They proclaim that the whole Universe
got created because the God thought to multiply Himself. He created
the material for this purpose and then after creating the Universe
he created the Man and other entities by putting His own part in the
bodies of various entities.
For this purpose the example is given that of a spider
who create his own net from the material from itself.
This all means only one thing that the God is existing
everywhere in the Universe. He of'cource is not visible to our
senses. However He is the basis of all the universe is very clear.
The meaning of the abhanga is clear on the above
said basis, and is written in the further lines.
Meaning of the Abhanga:-
Sant Tukaram Maharaj
is bringing this clarity in the Abhanga .He uses the above said
scientific explanation given by our scriptures to explain the
worshiper , as how to perform the worship. What should be borne in
the back of mind when performing the worship of God.
It is very very difficult to imagine the God without
form and shape for many of us. Therefore we need some Image or
symbol to worship Him.
The same thought is
given in the 12th
Chapter of Sri. Bhagavadgeeta as reproduced below.
क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम्।
अव्यक्ता हि गतिर्दु:खं
देहमद्भिरवप्यते ॥
|| Chapter 12th Verse 5th ||
We find that various materials such as Stones, Metals
eg. Brass, etc are used to create the different types of the Images
of God . Even the clay is also a popular materiel used especially
to make Images of Lord. Ganesha .Sometimes Shivalinga made of Clay
is also used for the worship.
In the present Abhanga
Tukarama Mahaaraj mas mentioned the Shivalinga made of clay,
Image of Lord Vishnu made of Stones, Image of Goddess Devi of Brass
.In order to specifically bring out that the Real God does not have
material form ; he has given the example of Soup made from Rice
powder, salty and Water. This kind of Soup is used generally for
the recovering patients. It is also used as a part of daily food
in some parts of India. This soup is supposed to give strength .
Obviously the elements in the soup are not visible. But these are
present in each and every drop of the Soup.
Similarly the GOD is everywhere. He is the base behind
His various Images. All the worship offered to the Image of God ;
ultimately reaches Him only.
The Materiel is never permanent in nature. One day or
the other it is going to disintegrate only. But the GOD is not so.
He remains even if everything is destroyed. That is why Maharaj says
in the Abhanga that clay, Stone or Metal have their own place and
The God has His own existence.
Many a times we worship the Saints, We call them Avatar.
Even the Avatar’s bodies are Mortal Only the GOD in their form is
immortal.
Tukarama Maharaj is
bringing this point to our notice through this Abhanga..He is aware
that He is liberated one and that is why in this Abhanga second
stanza he says that do not worship us ; .worship the God almighty .
However the main teaching of the Abhanga is as given
below.
Teaching of the Abhanga :-
When ever we do worship of God through any form such
as Imago the Lord, or Shivalinga etc, or any other method such as
Namasmarana ; we should remember that the images is not the God
himself. He is the basis of the Image and our worship is reaching
Him through the medium of the Image.
When there is a layer of Dust on the Mirror,then we can
not see our own image in such a mirror clearly. Similarly when our
mind is impure, there is not light of Lord in it.Worship of God 's
Image even purifies the mind. Then there is no dalay for the God to
reflect in such a pure mind.
अभंग ३० वा :-
मराठी भाग
आता दिलेला आहे.
केला
मातीचा पशुपती। परि मातीसी
काय महती ।शिवपूजा शिवासी
पावे । माती मातीमाजी जाये॥
१॥
तैसे पूजिती
आम्हां संत। पूजा घेतो भगवंत।
आम्ही किंकर संतांचे दास।
संत पदवी नको आम्हास ॥२॥
केला पाषाणाचा
विष्णू। परी पाषाण नव्हे।
विष्णू विष्णूपूजा विष्णूसि
अर्पे।पाषाण राहे पाषाण रूपे
॥ ३॥
केलीं कांशाची
जगदंबा । परि कांसे नव्हे अंबा
। पूजा अंबेची अंबेला घेणे ।
कांसें राहे कांसेपणॆं ॥ ४॥
ब्रह्मानंद
पूर्णामाजी। तुका म्हणे केली
कांजी । ज्याची पूजा तणेंचि
घेणें। आम्हा पाषाणरूप राहणें
॥ ५॥
अभंगाचा शब्दार्थ
:-
मातीचे
शिवलिंगकरून त्याची पूजा
जेंव्हा करतात तेंव्हा पुजा
शिवाला पावते व माती मातीच
रहाते. ॥१
॥
तसेच
आमची पूजा संत करतात ती भगवंतालाच
पोचते. आम्ही
खरेंतर संतांचे दास आहोत
आम्हाला संत
पदवी
मुळिच नको आहे ॥ २॥
दगडाची
विष्णुमुर्ती केली तरी विष्णू
म्हणजे दगड नव्हे.
दगडाच्या
विष्णूमूर्तीचि केलेली पूजा
विष्णुलाच
पोहोचते.
दगड हा दगडच
राहतो. ॥
३॥
कांश्याची जगदंबेची
मुर्ती केली व तिची पूज केलि
तरि पूजा अंबेलाच पोहोचते.
कासे कांसेच
रहाते.॥
४॥
आनंदमय
परब्र्ह्म सर्वत्र पूर्ण
भरलेले आहे. तुका
म्हणतो की जशी कांजीमधे चव
असते तशी. ज्याची
पूजा
त्यालाच
पावते व आम्ही जे पाषाणरूप(जड)
आहोत ते आम्ही
(जडच)
पाषाणच राहतो.॥
५ ॥
अभंगाच अर्थ
समजण्यासाठी लागणारी माहिती
, अभंगामगची
भूमिका;-
आधीच्या अनेक
अभंगात आपण पाहिलेच आहे की
भगवंतानेच हे संपूर्ण विश्व
निर्माण केले आहे.
.
ह्याबद्दल
आपल्याकडे एक अत्यंत प्राचीन
सूक्त आहे. त्याचे
नांव नासदीय सूक्त.
त्याच्या
कर्त्याने सृष्टी कशी व
केंव्हा निर्माण झाली ह्यावर
आत्यंत खोलवर विचार केला आहे.
सुक्तकार
म्हणतो की सृष्टी निर्माण
होण्यापूर्वी
कांहीच नव्हते.
सत् नव्हते
व असत् पण नव्हते.
होते ते फक्त
निर्गूण निर्विकार परब्रह्म.
आपली शास्त्रे
पण हाच धागा पुढे नेतात व अद्वैत
मताप्रमाणे ह्या अद्वितीय
एकट्या परब्र्हमास स्फुरण
झाले
तोच आदिसंकल्प "
एको॓हं बहुस्याम".
मग ईश्वरच
सृष्टीनिर्मिती साठी लागणारी
सामग्री झाला व त्याने
स्वत:निर्मित
पंचभूतांचे सामान घेऊन सृष्टी
निर्माण केली .
त्यातल्या
प्राण्यांच्या शरीरांमधे
स्वत:चाच
अंश घातला व अशापद्धतीने जड
( अचेतन
) व
चल (चेतन)
सृष्टी निर्माण
केली.
ह्या साठी
कोळ्याच्या जाळ्याचा दृष्टांत
देतात. जसा
कोळी स्वत:च
स्वत:पासून
निर्माण केलेल्या तंतूंचे
जाळे
विणतो तसेच परमेश्वराने
आपल्यापासूनच हें विश्व
निर्माण केले. तोच
या जगाचे मूलद्रव्य व तोच
कर्ताही
आहे. अर्थात
संपूर्णजग परमेशवरानेच
व्यापलेले आहे. तोच
सर्व जगाचे अधिष्टान आहे.
ह्या भूमिकेवर
आता आपल्याला अभंगाचा अर्थ
पाहता येतो.
अभंगाचे अर्थ
स्पष्टीकरण :-
वर पाहिल्याप्रमाणे
भगवंत हेच सर्व जगाचे अधिष्टान
आहे हे स्पष्ट झाले की आपल्याला
तुकाराम महाराज
आपण करतो त्या सगूणपूजे मागचे
शास्त्रीय कारण म्हणजेच रहस्यच
ह्या अभंगाद्वारे सांगताहेत
हे
स्पष्ट होते.
आपल्या जड
इंद्रियांना परमेश्वर हा
अगोचरच आहे. म्हणून
त्याची उपासना करणे सर्वसामन्यांना
कठीणच
होते. म्हणुन
साकार, सगूण
परमेश्वराची आराधना करणेच
योग्य ठरते. हाच
विचार श्रीमद भगवदगीतेमधे
१२व्या अध्यायांत भगवंतांनी
सांगितला आहे. भगवंत
म्हणतात की
क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम्।
अव्यक्ता हि गतिर्दु:खं
देहमद्भिरवप्यते ॥ अ १२-श्लो
५वा॥
भगवंताच्या अनेक
वस्तूच्या मूर्ती आपल्याकडे
आढळतात. पाषाण,
रत्ने,
पितळ,
कांसे,
स्फटिक ह्याच्या
मूर्ती आप्णांकडे
सर्वसाधारणत: पूजेमधे
असतात हे पाहतोच.
या शिवाय गणेश
पूजा मातीच्या गणेश मूर्तीची
पण
करतो. कधीकधी
मातीचे शिवलिंग पण पूजेस
घेतात.
तुकाराम महाराजांनी
अभंगामधे मातीचे शिवलिंग,
कांशाची देवीची
प्रतिमा, पाषाणाची
विष्णूमूर्ती ह्याची उदाहरणे
दिली आहेत. ह्याशिवाय
त्यांनी कांजीचे पण उदाहरण
दिले आहे. कांजी
म्हणजे तांदुळांच्या पिठाचे
पेय. चवीसाठी
त्यांत थोडेसे मीठ घालतात.
आपल्याकडे
आजारी माणसाल लवकर ताकद यावी
म्हणून
पण कांजी वापरतात.
अर्थात कांजीमधे
ताकद वाढवणारे कांहीतरी
अव्यक्त तत्व असते.
ते कोठे आहे
हे पाहता येणार नाही.
तसेच परब्र्ह्म
परमेश्वर हा आहेच.
तो सर्वत्र
आहेच पण आपल्याला अनुभव आलेला
नाही. देवतांमधेही
तोच आहे.
व म्हणुनच
कोणत्याही मूर्तीची पुजा जरी
केली तरी शेवटी ती त्यालाच
पोहोचते. हे
महाराज ह्या अभंगाच्या
द्वारे सांगताहेत.
अर्थांत जे जे
सगूण साकार आहे ते कधीनाकधी
नष्टच होते. पण
त्यामागचे तत्व म्हणजेच भगवंत
हा शाश्वतच
आहे हे समजावे म्हणुन महाराज
म्हणतात की " माती
मातीच राहते, कांसे
कासेच राह्ते व पाशाण
पाशणच राहतो. “ आपण
जीवन्मुक्त आहोत हे तुकाराम
महाराज स्वत: जाणताहेत
व म्हणुनच अभंगाच्या
दुसîrÉÉ
चरणांत
महाराजांनी भगवंताला भजा
आम्हाला नको असे म्हटले आहे.
असो.
पण अभंगाची
शिकवण खालील प्रमाणे आहे.
अभंगाची शिकवण:-
सगूण भगवंताच्या
मूर्तीची पुजा करणेच आपल्यासारख्या
सर्वसाधारण माणसांना योग्य
आहे. कारण
प्रत्येक
मूर्ती मागे भगवंताचेच अधिष्टान
आहे. हे
लक्षांत घेऊनच प्रेमाने
भगवंताची पूजा करावी.
जेंव्हा आरसा
मलीन असतो तेंव्हा त्यांत
प्रतिबिंब स्पष्ट दिसत नाही.
पण तोच आरसा
स्वच्छ केला की मग प्रतिबिंब
स्पष्ट दिसते. तसेच
प्रेमभावनेने भगवंताच्या
अधिष्ठानाची जाणीव ठेवूनच
पुजा चित्त शुद्ध करते.
मग तेथे भगवंताचे
प्रगट होण्यास वेळ लागत नाही.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home