Friday, May 10, 2013

Added35th & 36th Posts) देव सखा जरी ।   for Abhanga a week of Sant Tukarama.
  blogaddress :http:// tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com


Abhanga ( pair) for 35th and 36 th post.
) देव सखा जरी । जग अवघें कृपा करी ॥ १॥
ऐसा असोनी अनुभव । कासाविस होती जीव ॥ २।\
देवाची जतन । तया बाधूं न शके अग्न ॥ ३॥
तुका म्हणें हरी । प्रल्हादासी यत्न करीं ॥ ४॥

) प्रेम सूत्र दोरी । नेतो तिकडे जातो हरी ॥ १ ॥
मनेंसहित वाचा काया । अवघें दिले पंढरीराया ॥ २॥
सत्ता सकळ तया हातीं । माझी कींव काकुळती ॥ ३॥
तुका म्हणें ठेवी तैसें । आम्ही राहॊं त्याचे ईछ्चें ॥ ४॥

This time we have selected two Abhangas since they help us to understand the meaning of Total Surrendering to God.
संपूर्ण शरणागती म्हणजे काय ते स्पष्ट करणारे २ अभंग मी ह्यावेळी निवडले आहेत.
Verbatim Meaning :-

Abhanga 1:-
If God is your friend, then the whole world gives you everything || 1||
Even though the people have this experience, they still are worried || 2||
When the God is protector , Then even Fire can not cause injuries to such a person || 3||
Tuka says that this fact is evident from the life story of Prahlaadaa || 4||
Abhanga 2)
God (Hari) has tied me with the bond of Love. Because of this, I go wherever He takes me|| 1||
I have surrendered everything, my mind, speech , body to Him ( The lord residing at Pandharpur) || |
He has complete control; over everything and he has Love for me|| 3||
Tuka says that he( Tukarama Maharaja) is living in this world , as per the will and wish of God.|| 4||
Background Information required to understand the Abhanga:-
In our earlier posts , we have gone through the Upadesa ( advise) given by Tukarama and other saints. We also know that in Srimad BhagavadGeeta the Lord has told the way of Karmayoga ( Yoga of Doing Action) and also we saw that Namasmaranaa Bhakti enables us to follow the both paths ( Path of worship as well as the Path of Knowledge) .

One of the basic requirements in the paths is Total surrender to God.
This pair describes a simple method to achieve the Total Surrender To God.

Meaning of both the Abhangas together :-
In the Bhagavata Purana there is a famous story of Prahlada. He was the only son of the Demon King HiranyakashyapU. Hiranyakashyapu had obtained a boon after doing very hard Tapaa that he could not be killed by any human, Demon, Animal or God., that he can not die during Daytime or during Night; that he can not be killed by any weapon, he can be killed inside the house or outside the house. In short this was a boon for immortality. God granted this boon and naturally Hiranyakashyapu became the rular of all the worlds.

He banned the worship of any other deity in his kingdom. Nobody was to take the name of Lord in any form.
But his own son Pralhaada defied his father. He was always worshiping lord VishnU by reciting His name. His father made many attempts to kill him and in one such attempt Prahlada was made to sit in the Fire along with his aunt Holika . Holika had the boon that she will not get burnt in fire.
But the opposite happened. Holika got burnt while Prahlada did not die.
This miracle happened because Prahlada was loved by the Lord( Due to His NamasmaraNa worship)Hiranyakashyapu was finally killed by Go in the form of Halfman-half Lion, in the evening ( the time when there is noday or night) , at the entrance of the House, by using the sharp nails. Prahlada became the next King.
Tukarama Maharaja says that “If theGod is your friend and everything ; then the whole world comes to help you. Also nothing can cause you any harm or grief.”
He further muses and says that people have experienced this truth but still they keep on worrying.
With the above said knowledgedescribed in the First Abhanga; Tukaram Maharaj is advising the readers to do worship by surrendering to the God like Prahlada.

In the next Abhanga he describes His own status of mind as an example which enables us to understand the method for total surrender to God.

He is disciple of Panduranga and loves his God above everything.

Naturally as promised in the verse of BhagavadGeeta( written below) , the Lord also reciprocates this intense love.
अनन्या श्चिंतयंतोमाम्‌ ये जना: पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानाम्‌ योगक्षेममं वहाम्यहम्‌ ॥
Tukarama maharaja further says that his God of Pandhari ( Lord Vishnu in the form of Sri.Panduranga at Pandharpur) is ruling the whole world. Tukarama has surrendered everything ie. His body, his speech, his mind to the Lord. Because of this the Lord has tied a rope of Love around his neck. He happily goes wherever the Lord wills.
In short Tukarama Maharaja says that he is living the life in this world; totally and only as per the will and wish of lord.

Is this possible? Answer is Yes.

Let us consider our lifetime , it may be 70-80or max 100 years or so.
When we were born, what did we bring with ourselves ? Nothing. No external wealth.
When we leave this world what can we take with us ? Nothing.
During the Russian revolution , it is known that many a rich lost everything in just a day. The story of Dr. Zivago ( though a novel) describes the events vividly.
This small contemplation is good enough to show us that “ all really belongs to the Lord ( who created this world and us) only.

Since He has created us , definitely He will take care of our every need. Thus it is very much possible to surrender to God and live the way He desires. All is to be done in our Mind only.
He has given us intelligence . Using that we can put all our efforts but the fruits of efforts in reality come to us only as per His wish.
A child remembers only his mother. Similarly all we have to do is always remember Him, remember that He is the door not us. We are acting as per His will.
It may not be possible to remember this every moment but practice makes man perfect. This is the reason for performing the act of Remembrance of God ( Namasmarana) continuously.

Teaching of the Abhanga :-
Live by surrendering everything to God. Know always that He is the doer and we are the instruments. Remember Him continuously. Take a review every night to check whether we lived the day like this.
Up-till now we may have not lived like this but still it can be started now. It is still not late.
This is in my opinion the teachings of these abhangas.

Further down the explaination of the abhanga is given in MarathI language.
Abhanga ( pair) for 35th and 36 th post.
) देव सखा जरी । जग अवघें कृपा करी ॥ १॥
ऐसा असोनी अनुभव । कासाविस होती जीव ॥ २।\
देवाची जतन । तया बाधूं न शके अग्न ॥ ३॥
तुका म्हणें हरी । प्रल्हादासी यत्न करीं ॥ ४॥

) प्रेम सूत्र दोरी । नेतो तिकडे जातो हरी ॥ १ ॥
मनेंसहित वाचा काया । अवघें दिले पंढरीराया ॥ २॥
सत्ता सकळ तया हातीं । माझी कींव काकुळती ॥ ३॥
तुका म्हणें ठेवी तैसें । आम्ही राहॊं त्याचे ईच्छे ॥ ४॥

संपूर्ण शरणागती म्हणजे काय ते स्पष्ट करणारे २ अभंग मी ह्यावेळी निवडले आहेत.
अभंगाचा शब्दार्थ :-
अभंग १ ला:-
मला हरीने प्रेमसूत्ररूपी दोरीने बांधले आहे व तो जेथे मला ओढतो तेथे मी जातो. ॥ १॥
मी माझे मन, वाचा व सर्व शरीर पंढरीनाथाला (हरीला) अर्पण केले आहे.॥ २॥
त्याच्या हातीच सर्व सत्ता आहे व काकुळतीला आलेल्या माझी त्याला कींव आली आहे. ॥ ३॥
तुका म्हणतो की तो जसे ठेवतो त्याची जशी ईच्छा असेल तसेच जीवन मी जगतो आहे. ॥ ४॥

अभंग २ रा:-
जेंव्हा देवच तुमचा सखा आहे हे जगाला कळते तेंव्हा जग तुमच्यावर कृपा करते ॥१॥
जरी हा अनुभव लोकांना अहे तरीही लोक काळजी करत असतात ॥ २॥
जेंव्हा देवच रक्षण करणारा असतो , तेव्हा अग्नीसुद्धा (अशा भक्ताला) जाळू शकत नाही ॥ ३॥
प्रल्हादाच्या जीवनचरित्रावरून हे स्पष्ट झाले आहे ॥ ४॥

अभंगाचा अर्थ समजण्यासाठी लागणारी भूमिका :-
ह्या आधीच्या अनेक अभंगांमधे तुकाराम महाराजांचा व ईतर संतांचा उपदेश आपण वाचला आहे.
भगवद्‌गीतेमधे श्रीकृष्णांनी सांगितलेला कर्मयोग म्हणजे काय व तसेच नामस्मरण भक्तीमधे आपल्याकडून कर्मयोगाचे व ज्ञानयोगाचे आचरण कसे घडते ते पण आपण पाहिले आहे.

ह्या दोनही ठिकाणी आवश्यक असते ती " संपूर्ण शरणागती ". ह्या दोन अभंगांमधे अशी संपूर्ण शरणागती कशी पत्करायची याचेच मार्गदर्शन आहे.
अभंगाच्या अर्थाचे स्पष्टीकरण :-
ह्या अभंगात भक्त प्रह्लादाचा उल्लेख आहे. ही भागवत पुराणामधली कथा आहे. हिरण्यकश्यपु हा दैत्य राज होता. त्याने कठीण तप करून असा वर मिळवला की त्याला दिवसा, रात्री, घराच्या आंत वा बाहेर, देव, दानव, मानव तसेच कोणत्याही पशु पक्षी यांच्याकडून , कोणत्याही शस्त्राने मृत्यू येणार नाही.
तसे पाहीले तर हे अमरत्त्वाचेच वरदान त्याने मिळवले. मग उन्मत्त झाला व कोणत्याही देवाची अर्थात भगवंताची पूजाच काय पण नांव सुद्धा घेण्याची त्याने बंदी घातली. पण त्याचा पुत्र प्रल्हाद ह्याच्या अगदी विरुद्ध वागत होता. प्रल्हादाला ठार मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. पण प्रल्हाद सतत नामस्मरणातच दंग होता. होलिका ही प्रल्हादाची आत्या. तिला अग्नी जाळू शकणार नाही हा वर मिळाला होता. प्रल्हादाला ठार मारण्यासाठी. होळीमधे प्रल्हाद व होलिका बसवले गेले. पण होलिका जळाली व प्रल्हाद वाचला. शेवटी भगवंताने नृसिंहाचा अवतार घेऊन हिरण्यकश्यपुचा वध केला.
प्रल्हादाची अनन्य भक्ती व त्यामुळे भगवंताची त्याच्यावरची प्रीती ह्यामुळे प्रल्हादाचे कल्याण झाले.
म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात की "जर भगवंत तुमचा मित्र असेल व सर्वस्व असेल तर सर्व जग तुमच्यासाठी झटते. मग तुम्हाला कशापासूनच कसलेच भय उरत नाही.
पुढच्याच चरणांमधे तुकाराम महाराज ( जणू आश्चर्याने) म्हणतात की हे सर्व माहीत असूनही लोक सारखे कसली ना कसली काळजी करत असतात.
ह्या पार्श्वभूमीकेवरुन पुढच्या अभंगात महाराजांनी स्वत:चेच उदाहरण देऊन हे कसे शक्य आहे ते स्पष्ट केले आहे..
महाराज पांडुरंगाचे भक्त आहेत.पांदुरंगावर त्यांचे अनन्य प्रेम व भक्ती आहे. अर्थात पांडुरंग पण त्यांच्यावर प्रेम करतात. भगवदगीतेमधला खालील श्लोक हेच सांगतो.
अनन्या श्चिंतयंतोमाम्‌ ये जना: पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानाम योगक्षेमं वहाम्यहम्‌ ।
अभंगात महाराज पुढे म्हणतात की पांडुरंगाच सर्व विश्वाचा मालक , राजा आहे. तुकाराम महाराजांनी आपले सर्वस्व त्याला अर्पण केले आहे.त्यांचे मन, शरीर, वाचा सर्वकांही पांडुरंगाचे आहे. त्यामुळे पांडुरंगाने त्याना प्रेमरज्जूने बांधले आहे. पांडुरंग नेईल तिकडे ते जातात. तो ठेवेल त्यात ते समाधानाने राहातात.

येथे असा प्रश्न पडतो की असे जगणे शक्य आहे कां? उत्तर अर्थतच "होय"शक्य आहे " हेच आहे.
कसे ते आता पुढे आपण पाहूया.
सर्वप्रथम हे ध्यानात घ्यायला हवे की सर्वांच निर्माता म्हणजे आई बाप तोच आहे. मग आई जशी आपल्या लेकरांची काळजी घेते तसे तो करणार नाही कां? जेंव्हा आपण त्याला अनन्यभावे शरन जातो तेंव्हा तो खरच आपली सर्व काळजी घेत असतो. स्वत:च्या आयुष्यातल्या घटनांकडे पाहिले तर हे सहज लक्षांत येते. असो.
म्हणुन त्याने ठेवले तसे राहाणे, त्यांत समाधान मानणे हे करता येणे नक्कीच शक्य आहे.
आपण प्रयत्न करून मग आपल्या प्रयत्नांचे फळ त्याच्यावर सोडावे एवढेच. हे मनानेच करायचे आहे.
आपण सर्वांचे आयुष्य साधारणत: ७०-८०- जास्तितजास्त १०० वर्षांचे आहे. जेंव्हा आपण जन्माला आलो तेंव्हा हातात कांहिही नव्हते. मृत्युनंतरपण आपण येथील कांहीच बरोबर नेत नसतो. हे जग ज्याने निर्माण केले त्याचीच येथील सर्व संपत्ती , मालमत्ता आहे. हेच ध्यानांत ठेवायचे व ह्या सर्व नश्वराची आसक्ती ठेवायची नाही. रशियन क्रांतीमधे अनेकांची संपत्ति एका दिवसांत हातची गेली. डॉक्टर झिवागो या चित्रपटामधे हे सुंदररीत्या दाखवले आहे. असो. थोडक्यांत म्हणजे जे जे आहे ते त्याचे आहे हे लक्षांत ठेवले की झाले.
ह्यावर थोडेसे मनन केले की आपल्याला तुकाराम महाराज मी देवाशी प्रेमरज्जुने बांधला गेलो आहे व तो नेईल तिकडे जातो असे कां म्हणतात हे समजते.

ह्यात हे स्पष्ट झाले की जसे लहान मूल आपल्या आईलाच फक्त हांक मारते तशीच आपण पण भगवंतमाऊलीला हांक मारायची. सर्व कर्ताकरविता भगवंतच आहे हे सतत ध्यानांत ठेवायचे आहे.त्यासाठी सतत नामस्मरण करणे सोपे आहे हे ओघाओघाने आलेच


अभंगाची शिकवण :-
शिकवण हीच आहे की भगवंताला अनन्य भावे शरण जावे. तोच सर्व कर्ताकरविता आहे हे लक्षांत थेवावे.
जे जे आहे ते त्याचेच आहे म्हणुन समाधानने जीवन नामस्मरण करत जगावे.
आजवर आपाण असे जगत आलेलो नाही पण आतातरी सुरुवात करायला हरकत नाही. मला वाटते की हे अभंग हीच शिकवण देतात..

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home