Wednesday, July 10, 2013

Added 41th  post onआता कांही सोस न करीं आणिक। for Abhanga a week of Sant Tukarama.
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com
 To Marathi Readers the explanation of the meaning is given after the English version given here is at the end of the English version.

आता कांही सोस न करीं आणिक। धरीन तें एक हेंची दृढ ॥ १॥
जेणें भवसिंधु उतरिजे पार । तुटे हा दुश्तर गर्भवास ॥ २ ॥
जोडिन ते आतां देवाचे चरण । अविनाश धन परमार्थ ॥ ३॥
तुका म्हणें बरा जोडला हा देह । मनुष्यपण इहलोकां आले ॥ ४॥

Verbatim Meaning :-

Now I have no other likings ( in my mind) . I will hold the Him only || 1||
So that I will be able to cross this ocean of life and ( also ) avoids The the event of coming to the mother's womb ( to take birth) || 2||
I will hold the holy feet of God and earn the priceless wealth of Spirituality || 3||
Tuka says that luckily I have got this Human birth || 4||

Background Information to understand the meaning:-

Our scriptures have recognized the importance of getting this Human birth form.

Only in this form ;one is able to think about the causes for sufferings and enjoyment.
Also only in this form; one can think about the ways and means of getting the freedom from the endless cycle of Birth-death for a himself/herself.
Samartha Ramadas has said that “ This human birth is like finding a  treasure of jewels. One can  get a number of jewels or a large  fortune in this birth and also  enjoy the same ; in this human birth.

However the best jewelry or fortune is “ the reaching the The realization of God ie. Freedom from getting entangled in the cycle of birth-death ( which make us to suffer the most)( termed as Liberation.) in the spiritual language.”
Only in this Birth alone can one achieve this object of liberation;  by proper thinking and proper living so as to ensure that this unique opportunity of getting birth as a human being is not wasted..

Tukaram Maharaj is telling us in this Abhanga what He is going to do in this Human birth Let us try to get into the details.

Meaning of the Abhanga :

In order to get the full meaning of the Abhanga we will have to start from the last stanza and then go to 1st, 2nd and third ones.
Tukarama Maharaj is Happy that  he is borne as a Human . This is because only in this body we have been blessed with the power of the intellect which can go beyond the routine aspects of Sleep, Sex for continuation of the race, and food. We humans only can do the analysis for sufferings faced in our life and find ways and means to avoid the same. This is the reason of development of Medicine, Electronics , Mechanical Engineering and many more sciences.
Samartha Ramadas also has written a full chapter in the Dasabodha by Name “ Naradeha stavan “ “ In the praise of Human body” . I am quoting only one of the verses here from this chapter. Samartha says that using this Human body many have attained the coveted state of Liberation mainly by using the power of Discrimination; (given by the lord).
Since only in this body can one think of taking the necessary steps and attain the Liberation , it is a very precious gift . One should use this opportunity for Liberation.

In the earlier verses he is sharing with us what he is doing. It is always worth to follow the saints. The steps that were taken by him are explained in the balance verses. Let us see the same.
In the first verse one is Tukarama Maharaj says that he is no more attracted to the material wealth. And that he has decided to hold firmly the holy feet of the Lord.
We have seen earlier that having attachment to material worldly things only leads to sufferings caused due to repeated births and deaths. On the other hand having the desire for God leads to liberation. Same aspect is once again addressed here.

In the second and third verses Tukaram maharaj is saying that he is not going to leave the holy feet of his lord( Panduranga) . To elaborate this he says that by holding the holy;y feet he will avoid the need to take birth again and cross this ocean of life which is otherwise impossible to cross .All the saints have told the same point that without such Intense love for God it is not possible to achieve the coveted goal of liberation.

Indian scriptures call this world as an ocean . One needs to have a ship which will take one to the end of this ocean. This ship is nothing but the Love for God. It is called “ भक्ति" When such love manifests in the heart of a devotee then automatically he gets liberated. Thus this love is most important aspect in the efforts for liberation.

Teachings of this Abhanga:-

The teaching is very simple. It is “ Love the God. Hold Him as your only Savior and live in this world continuously remembering Him. Do not allow a single moment without this activity. “

Now further down is the Marathi Version of the Abhanga for Marathi readers.

आता कांही सोस न करीं आणिक। धरीन तें एक हेंची दृढ ॥ १॥
जेणें भवसिंधु उतरिजे पार । तुटे हा दुश्तर गर्भवास ॥ २ ॥
जोडिन ते आतां देवाचे चरण । अविनाश धन परमार्थ ॥ ३॥
तुका म्हणें बरा जोडला हा देह । मनुष्यपण इहलोकां आले ॥ ४॥
आपली वेद व इतर शास्त्रे , तसेच सर्व संतांनी आपल्याला मिळालेल्या ह्या नरजन्माचे महत्व ऒळखले आहे. फक्त ह्या नरदेहातच आपण जन्मदु:खाच्या कारणांचा शोध घेऊ शकतो व कारणे ओळखून योग्य ती उपाय योजना करून जन्ममॄत्यूच्या चक्रांतून स्वता:स सोडवू शकतो. समर्थ रामदास नरदेहस्तवनाच्या समासामधे म्हणतात की
" देह परमार्थी लाविलें । तरीच ह्याचे सार्थक जाले । नांही तरी व्यर्थची गेले । ना आघातें मृत्यपंथे॥
या नरदेहाचेनीं आधारें। नाना साधनांचेनि द्वारें। मुख्य सारासारविचारें । बहुत सुटले ॥ "
समर्थ रामदासांनी म्हणूनच नरदेहाला रत्नपेटीची उपमा पण दिलेली आहे.
सर्वांत श्रेष्ठ संपत्ती कोणती तर " मोक्ष संपत्ति म्हणजेच जन्म मृत्यू चक्रामधून मुक्ति " हीच आहे. ही संपत्ती मिळविणे फक्त नरदेहातच शक्य आहे. जो शाश्वत काय आहे व अशाश्वत काय आहे हे समजून सर्व अशाश्वत वस्तूंची आसक्ति सोडतो त्यानेच ह्या मनुष्यजन्माच्या संधीच योग्य उपयोग केला असे म्हणता येते.

ह्या अभंगामधे तुकाराम महाराजांनी स्वत:चेच उदाहरण देऊन जन्माचे सार्थक करण्याचा मार्ग दाखविला आहे.
महाराज अभंगाच्या पहिल्याच चरणामधे म्हणतात की मनुष्य जन्म मिळाला ह्याचा त्यांना फार आनंद झाला आहे. कसे ते आता अभंगाच्या १,२ व ३ चरणांचा अर्थ पाहून स्पष्ट होईल.हाच मुद्दा सर्वच संत वेगवेगळ्या शब्दांत मांडतात.

अभंगाचे अर्थस्पष्टीकरण :-
अभंगाचा अर्थ समजण्यासाठी प्रथम ४था, नंतर १, , व ३ असा क्रम घ्यावा लागतो.
तुकाराम महाराज अभंगाच्या ४थ्या चरणामधे म्हणतात की हा नरदेह प्राप्त झाल्याचा त्यांना आनंद वाटतो आहे. ह्याचे कारण स्पष्टच आहे ते हेच की ह्या नरदेहातच माणूस आपली बुद्धी विवेकाने वापरू शकतो. बाकीच्या योनींमधे ( पशू, पक्षी ईत्यादी ) फक्त अन्न, निद्रा, व प्रजोत्पादन एवढेच प्राणी समजू शकतो. म्रूत्यूचे भय मात्र सर्वांनाच असते. फक्त मनुष्यानेच जन्ममॄत्यूच्या, सुख दु:खाच्या कारणांचा शोध घेतलेला दिसतो. अनेक शास्त्रे जसे औषधी वैद्यकीचे शास्त्र, संगणक शास्त्र, विज्ञान , ईलेक्ट्रॉनिक्स वगैरे शास्त्रांची वाढ ह्याच एका कारणा मुळे झालेली आहे .
महाराजांचे समकालीन समर्थ रामदासांनी तर नरदेहस्तवनाचा एक वेगळा समासच लिहिला आहे. समर्थ एका ठिकाणी म्हणतात
या नरदेहाचेनीं आधारें। नाना साधनांचेनि द्वारें। मुख्य सारासारविचारें । बहुत सुटले ॥ " सारासार विचार म्हणजे शाश्वत काय व अशाश्वत काय हे ओळखून शाश्वताची कांस धरणे. शाश्वत फक्त भगवंतच आहे बाकी ( ह्यात आपण स्वत: म्हणजे आपले शरीर, नतेवाईक मित्रमडली, संपत्ती घर दार ईत्यादी सर्व येते) सर्व कधीनाकधी नाश पावणारेच आहे. म्हणुनच हे पण अर्थातच स्पष्ट आहे की फक्त नरजन्मातच आपण मोक्षासाठी योग्य त्या कारवाया करू शकतो. ही नरदेहाची भगवंताने दिलेली भेट वा संधी व्यर्थ घालवणे अगदी चूकच आहे.

ह्यानंतर , २ व ३ चरणामधे महाराजांनी काय सांगितले आहे ते आता पाहूया.
प्रथम महाराज म्हणतात की आता त्यांना कसलीच आवड उरलेली नाही. कसल्याच वस्तूंची आसक्ती राहिलेली नाही. आणि आता फक्त भगवंताचे चरण मात्र ते धरून ठवणार आहेत. आपण मगे पाहिलेच आहे की जर माणसाल कसलीही आसक्ती असेल तर ती ईछ्चा पूर्ण व्हावी म्हणून जन्म घ्यावा लागतो. एकमेव भगवंताची आसच ह्याला अपवाद आहे. महाराजा चे सर्वस्व फक्त भगवंत आहे . हेच आपल्यालापण आचरणामधे आणायचे आहे.

२व ३ चरणांमधे महाराज म्हणतात की ते आता देवाचे चरण घट्ट धरून रहाणार आहेत. जेंव्हा माणूस भगवंतालाच सर्वस्व मानू लागतो तेंव्हाच अशी उत्कट मनस्थिती होते. असे भगवंताचे उत्कट प्रेमच त्याला ह्या भवसागरामधून तरून नेते. नाहीतर हा संसार तरून जाणे दुष्करच आहे असे सर्व संतांनी स्वानुभवावरून स्पष्टच सांगितले आहे.
आपली सर्व शास्त्रे ह्या संसारलाच भव सागर म्हणतात. ह्यातुण पलिकडच्या मोक्षाच्या किनाîrÉÉल नेणारे जहाज म्हणजेच भगवंताबद्दल उत्पन्न झालेली उत्कट भक्ति (प्रेम) . असे प्रेम भक्ताच्या अंत:करणांत निर्माण झाले की मोक्ष सहज होतो. अशी ह्या भक्तीची महती आहे.

अभंगाची शिकवण ;-


शिकवण तशी सोपीच आहे ती हीच आहे की भगवंतच आपला त्राता अहे हे समजून त्याची भक्ती करा. सतत त्याचे स्मरण ठेवावे. अगदी क्षणभरसुद्धा त्यचा विसर पडायला नकॊ . हेच आचरणांत येणे महत्वाचे आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home