Added 39th post on अवघाचि आकार ग्रासियेला काळें for Abhanga a week of Sant Tukarama.\
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com
To Marathi Readers the explanation of the meaning is given after the English version given here ie at the end of English version.
अवघाचि आकार ग्रासियेला काळें। एकचि निराळें हरीचे नाम ॥ १॥
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com
To Marathi Readers the explanation of the meaning is given after the English version given here ie at the end of English version.
अवघाचि
आकार ग्रासियेला काळें। एकचि
निराळें हरीचे नाम ॥ १॥
धरूनि
राहिलो अविनाश कंठी । जीवन
हे पोटीं सांठविले ॥ २॥
शरीर
संपत्ती मृगजळासमान । जाईल
नासोन खरे नोहें ॥ ३॥
तुका
म्हणे आतां उपाधीच्या नांवें।
आणियेला देवें वीट मज ॥ ४॥
Verbatim
Translation :-
All this world
is destroyed by the Time . Only the Name of God is indestructible ||
1||
I am holding
this Name in my speech. It is like Nectar which I have stored in my
stomach|| 2||
This body and
material wealth are like mirage. They are are not true in nature||
3||
Tuka says that
now he has developed utter dislike for these limiting adjuncts. I
developed this dislike because of (blessing )of my God ||
Background
for understanding this Abhanga:-
There
are many paths which one can follow in order to achieve the coveted
goal of Liberation . The path of Knowledge (ज्ञानमार्ग
) is one of these
paths. In this path one make various queries such as : Who am I?
What is my relationship with this world? Who is the true God? What
is true knowledge? Why I have taken birth ? How this whole universe
has been formed ? Etc.
When one gets
the true knowledge ; then all these questions are answered
automatically. Such a person is the true Seer or Saint. Some saints
go to live alone in the forest , away from the crowd. While some
live in the Crowd in order to help and enable the others to be free
from the shackles of birth and Death cycle. They share their
experiences by writing the same. Thus these works guide us.
The present
Abhanga is one such work.
It shows us the
real nature of the world around us and thus enable us to be clear as
how much one should get attached to it. It enables one to develop
detachment to the worldly things so that the destruction, loss of
the same will not cause mental pain and agony to us.
Meaning of
the Abhanga:-
In the very
first verse Tukaram Maharaj has said that this whole world is always
getting destroyed as the time advances. We see this everyday . It is
the doctrine of the Vedanta that whatever is experienced is going to
get destroyed one day or the other. Only the true God who is the
creator of this universe is above time. We can not see him but we
can call him by any of His thousands of the Names. Thus the Name of
God is not destroyed by the by time.
In the third
stanza Maharaj further says that this Body and all the material
wealth are also like mirage in a desert. We think that they belong
to us but a deeper thinking will reveal that this is not true.
Nobody can drink the water seen in the mirage . When the time of
death arrives , one just leaves everything. Alexander 's life story
describes this kind of event. These are our day to day experiences.
We can not hold any of our wealth or even our own body thus these
are also a part of mirage or illusion. However we get attached to
these all because of the association of our body with these things
since many births.
In Vedanta
language these attachments are called " Limiting adjuncts"
उपाधीs .For example a red
flower placed near a colorless crustal will make the crystal to
appear as red. The whole body-mind complex is an UpadhI for the
immortal; Atman( Individual soul) and the whole world is the UpadhI
of the Parabrahman ( the true God, the Absolute).
In the last
stanza of the Abhanga Tukarama Maharaj says that he has developed
utter dislike for this Upadhi.
In the second
Stanza Maharaj has described the reason for developing such utter
dislike. He says that he has taken firm hold of the Name of God . It
is this Nectar because of wish he has attained the Liberation and
that is the reason for developing the Utter dislike for the World
and the enjoyments from the worldly things.
Teachings of this Abhanga :-
We have already
read in the earlier Abhangas that when there no desire the there is
no birth necessary. Tukarama Maharaj has liking only for the Name of
God. This is the clue for progressing on the path for attaining
Liberation.
अवघाचि आकार ग्रासियेला काळें। एकचि निराळें हरीचे नाम ॥ १॥
धरूनि
राहिलो अविनाश कंठी । जीवन
हे पोटीं सांठविले ॥ २॥
शरीर
संपत्ती मृगजळासमान । जाईल
नासोन खरे नोहें ॥ ३॥
तुका
म्हणे आतां उपाधीच्या नांवें।
आणियेला देवें वीट मज ॥ ४॥
अभंगामागची
भूमिका :-
मोक्षप्राप्तीसाठी
अनेक मार्ग आहेत .
त्यातलाच
ज्ञान मार्ग पण एक आहे.
ह्यामधे
आपण अनेक प्रश्नांची
उत्तरे शोधत असतो.
जसे
मी कोण आहे?
माझे
व ह्या सॄष्टीचे नाते काय आहे?
खरा
देव कोणता?
खरे
ज्ञान कोणते?
मला
जन्म कां मिळाला आहे ?
ही
विराट सृष्टी कशी निर्माण
झाली?
ईत्यादी.
जेंव्हा
एखाद्याला खरे ज्ञान (
आत्मज्ञान
) प्राप्त
होते तेंव्हा सर्वच प्रश्नांची
उत्तरे मिळतात.
आशा
व्यक्तीला
आपण संत पुरुष म्हणतो.
कांही
आत्मज्ञानी पुरुष जनसंपर्कापासून
दुर जातात तर कांही
जनांमधेच
राहून आपले अनुभव शब्दांकीत
करतात.
ह्या
वाङमयामुळे इतरांना पण
जन्ममृत्यूच्या चक्रामधून
सुटण्यासाठी मार्गदर्शन
होते.
प्रस्तुत
अभंग असेच मार्गदर्शन करणारा
आहे. येथेव
आपल्याला ह्या सृष्टीच्या
नाशवंत रूपाची जाणीव
होते व अशी जाणीव झाली कि आपल्या
वस्तू ,
जिवलगांचा
वियोग झाल्यामुळे जे दु:ख
होते
त्याची धार बोथट होते.
अभंगाच्या
अर्थाचे स्पष्टीकरण:-
पहिल्याच
ओळिमधे तुकाराम महाराज म्हणतात
की सर्व सृष्टी ही कालाचे
खाद्य आहे.
कधीनाकधी
नष्ट होणारी आहे.आपण
हे नेहमीच अनुभवत असतो.
हाच
वेदांतातल एक मुख्य सिद्धांत
आहे
की जे जे आपल्याला अनुभवास
येते ते ते सर्व नष्ट होणारे
म्हणजेच नाशवंत आहे.फक्त
भगवंत
हाच शाश्वत आहे.
कारण
तोच सर्व विश्वाचा तोच काळाचा
निर्माता आहे.
त्याला
आपण पाहू शकत
नाही पण त्याच्या नामाद्वारे
आपण त्याच्याकडे पोचू शकतो.
त्याचे
नामपण कालातीत आहे.
अभंगाच्या
३ îrÉÉ
चरणामधे
तुकाराम महाराज म्हणतात की
आपले शरीर व संपत्ती सर्वच
एखाद्या
मृगजळा प्रमाणे आहेत.
आपल्याला
वाटत असते की ही आपली आहेत पण
थोडा खोल विचार
केला तर हे म्हणणे पटू शकते.
जेंव्हा
माणूस मृत्यु पावतो तेंव्हा
तो बरोबर ह्यातले कांहीएक
घेऊन जाऊ शकत नाही.
जगज्जेता
अलेक्झांडरची कहाणी अनेकांना
माहीत असेल.
तो
मृत्यूसमयी
बरोबर कांही नेता येत नाही
म्हणून रडला.
असो.
म्हणुनच
ह्याला मृगजळाची उपमा दिली
आहे.
मृगजळाच्या
पाण्याने तहान भागत नसते.
पण
अनेक जन्मांच्या सवय़िमुळे
आपल्याला
ह्या सर्वाची आसक्ती वाटत
असते.
वेदांताच्या
भाषेत ह्यालाच उपाधी म्हणतात.
उपाधी
म्हणजे जे नाही ते जोडले जाणे.
जर
एखादे लाल फूल एखाद्या नितळ
काचेजवळ ठेवले तर काच लाल
दिसते.
तद्वतच
आत्म्याने स्वत:ला
ही शरीर व मनाची उपाधी मागे
लावून घेतली आहे.
सर्व
विश्व हे परब्रह्मास बळजबरीने
लावलेली उपाधी आहे असे वेदांत
सांगतो.
शेवटच्या
ओळींमधे तुकाराम महाराज
म्हणतात की त्यांना ह्या
उपाधीची नावड वीट आला आहे.
तसेच
अभंगाच्या २ îrÉÉ
चरणामधे
त्यांनी हा वीट येण्याचे कारण
पण सांगितले आहे.
ते
म्हणतात की मी देवाचे नांम
धरून ठेवले आहे.
हे
अमृत मिळाल्यामुळे आता त्यांना
बाकी सर्वाचा
वीट आला आहे.
अर्थात
हे उघडच आहे की ते जन्म मृत्यू
पलिकडे पोहोचले आहेत.
जीवन्मुक्त
झाले आह्वेत.
ह्यामुळेच
जगातले सर्वकांही त्यांना
नकोसे झाले आहे.
अभंगाची
शिकवण:-
मागे
पाहिल्याप्रमाणे जेंव्हा
कोणाला कांही ईच्छाच उरलेली
नसेल तर मग त्याला त्या ईच्छेची
पूर्ती
करून घेण्यासाठी जन्माची
आवश्यकताच राहाणार नाही.
ज्याला
मोक्षाची वाटचाल करायची
आहे त्याच्यासाठी अभंगाद्वारे
तुकाराम महाराजांनी साधनेमधे
उन्नती करून घेण्यासाठी
आवश्यक किल्लीच ह्या अभंगाद्वारे
प्रगट केली आहे.
ह्या
अभंगाची हीच शिकवण आहे.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home