Saturday, August 31, 2013

44th Post onमाझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव। for Abhanga a week of Sant Tukarama.
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com Contact mail address is rgphadke@gmail.com 
For the  Marathi Readers the explanation of the meaning is given after the English version given here ie at the end of English version.

English Version:-


माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव। आपणचि देव होय गुरू ॥ १॥
पडिये देहभाव पुरवी वासना । अंतीं तें आपणापाशीं न्यावें ॥ २॥
मागे पुढें उभा राहे सांभाळित । आलिया आघात निवरावे ॥ ३॥
योगक्षेम त्याचें जाणे जडभारी । वाट दावी करी धरूनियां ॥ ४॥
तुका म्हणे नाही विश्वासस ज्या मनीं । पाहावें पुराणी विचारूनी ॥ ५॥

Verbatim Meaning :-
How to describe my Vithoba's lover for me? He Himself has become my guide-teacher|| 2||
He fulfills my all desires in order to (ultimately ) take me to Him || 2||
He stands in front or behind , and protects, takes care of me|| 3||
He takes care of my needs and shows me the right path || 4||
Tuka says that if you don’t believe in my this statement, read the Puranas for the evidence|| 5||

Background Information for the understanding this Abhanga:-

There is a famous statement inSri,.Bhagavadgeeta
अनन्याश्चिंतयंतो मां ये जना: पर्युपासते । तेषांनित्याभि युक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌ ॥
Here the Lord says that He takes care of the needs of those of His disciples who have totally surrendered to Him. And consider He is their whole and sole everything. Lord also l9oves such a disciple and takes care of disciple's earthly needs .
Tukaram Maharaj is such a disciple of the Lord. He is describing the experience of himself in this abhanga .


In the first stanza of the abhanga , Tukaram Maharaj is saying that he can not describe how much his Lord loves him. In order to explain the point tukaram maharaj says that because of intense love for me, the Lord Himself has become my spiritual Guide and teacher. .
The importance of Spiritual Guide and Teacher is well known .Any person who is desirous of liberation has to have such a Spiritual Teacher. SwamiSamartha Ramadasa also says that even one has done various disciplines followed various methods to attain the Liberation, one can never attain same without getting the blessings of a real Spiritual teacher; since only he removes even a small trace of “Ahankara ie.the feeling of I ”. And without the complete removal ;it is impossible to get Liberation.

If we take an example of the saint Namadev Maharaj , this point gets confirmation. Saint Namdev could talk with his beloved Panduranga. God would eat the offering of food from Sant Namadev. However he had to surrender to the spiritual Teacher Sant Visoba Khecharji to get the real knowledge and Liberation..

This kind of teacher just by touch, etc can give his disciple the coveted fruit of Liberation and true knowledge. On attaining such knowledge one is ever immersed in pure Bliss.This is called “ Shaktipata” in the spiritual language.

Tukaram Maharaj in the very first stanza says that he was blessed by Lord Himself. Lord Himself became his spiritual teacher and guide.

Balance part of the Abhanga describes how the Lord has been taking care of his beloved disciple Saint Tukarama ; in his own words.
Tukaram Maharaj says that the Lord fulfills all his ( Tukarama Maharaja's) desires so as to ensure that at the time, of Death there will be no desire left. ( We have already seen that the main cause of Birth is unfullfilled desires.) One who has no desires left at the time of Death and remembers the God , is naturally Liberated..

In the next three stanzas Tukaram Maharaj describes his own experiences by saying that his Lord takes cars of his all needs, protects him in the calamities, and always guides him. One who has totally surrendered to the Lord will get this kind of experience.
Thus this part is the one ,which can believed since it has been told by the Sait Tuukarama himself (a Liberated person.)

However Tukaram Maharaj knows that there are some persons who will have doubts.
For convincing such persons Tukaram Maharaj further says that if you do not believe in this ; then refer to various Puranas in which there are enough evidences recorded to confirm this statement.

Teachings of the Abghanga:-

The abhanga tells us that we should do all the efforts for getting the true knowledge ( Who am I ?) . All these efforts will lead to get us a true spiritual guide teacher. Until then if our inner voice tells us to follow any specific path; then that path should be followed. As Saibaba says the Belief and Readiness to wait will give us the desired results.

Marathi Version :-
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव। आपणचि देव होय गुरू ॥ १॥
पडिये देहभाव पुरवी वासना । अंतीं तें आपणापाशीं न्यावें ॥ २॥
मागे पुढें उभा राहे सांभाळित । आलिया आघात निवरावे ॥ ३॥
योगक्षेम त्याचें जाणे जडभारी । वाट दावी करी धरूनियां ॥ ४॥
तुका म्हणे नाही विश्वासस ज्या मनीं । पाहावें पुराणी विचारूनी ॥ ५॥

अभंगामागची भूमिका :-
श्रीमद्‍ भगवद्‍गीतेमधे खालील प्रसिद्ध श्लोक आपल्याला माहीत आहे.
अनन्याश्चिंतयंतो मां ये जना: पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌ ॥

ह्या श्लोकामधे भगवंतांनी हेच सांगितले आहे की त्यांना शरणाग अनन्य भक्तांचा योगक्षेम तेच पाहातात कारण अशा भक्ताला फक्त भगवंताशिवाय दिसरे कांही दिसत नाही, दुसरेकांहीच सुचत नाही. म्हणून अशा भक्ताच योगक्षेम भगवंत स्वत:च भक्तावरच्या अतीव प्रेमामुळे चालवतो.
तुकाराम महाराज असेच पांडुरंगाचे भक्त आहेत. ह्या अभंगामधे त्यांनी स्वता:चाच अनुभव वर्णन केलेला आहे.
अभंगाचे अर्थस्पष्टीकरण :-
तुकाराम महाराज पहिल्याच चरणामधे म्हणतात की माझा विठोबा माझ्यावर किती प्रेम करतो हे सांगताच येणार नाही. मी सदगुरू शोधीत होतो तर स्वत:च माझा सदगुरू झाला.

अध्यात्मामधे सदगुरुंचे महत्व अनन्यसाधारण आहे. समर्थ रामदास स्वामी पण म्हणतात
न जाणतां कोटीवरी । साधने केली परोपरीं । तरी मोक्षासी अधिकारी । होणार नाही ॥
असो जयासि मोक्ष व्हावा । तेणें सदगुरू करावा । सदगुरुविण मोक्ष पावावा। हे कल्पांती न घडें ॥

म्हणजेच कितीही प्रयत्न केले, कितीही साधना जसे उपासतापास, व्रते, तीर्थयात्रा, पूजा इत्यादी केली तरी ब्रह्मज्ञान होत नाही. खरे ज्ञान व्हावे ह्यासाठी सदगुरू भेटणे अत्यंत आवश्यकच असते.

संत नामदेव महाराजांचे चरीत्र पाहिले की हा भाग कळतो. नामदेव विठोबाशी बोलायचे. देव त्यांच्या हातचे जेवण जेवायचा पण शेवटी नामदेवांनासुद्धा विसोबाखेचरांकडे ब्रह्मज्ञानासाठी जावे लागले.

सद‍गुरु शक्तिपात करून आपल्या शिष्याला ब्रह्मज्ञान करून देतात. असे ज्ञान झाले की भक्त व भगवंताचचे ऐक्य होते. जन्ममृत्यूचक्र संपते. शाश्वत आनंद व समाधान मिळते. ह्यालाच सायोज्यमुक्ति म्हणतात.
तुकाराम महाराजांच्यासाठी " त्यांच्यावरील प्रेमामुळे स्वत: भगवंतच त्यांचे सदगुरू झाले थेत व म्हणून ते जीवन्मुक्त झाले" हे येथे महाराज सांगताहेत.
पुढच्या सर्व चरणामधे महाराज भगवंत त्याचा योगक्षेम कसा चालवतो आहे ते वर्णन करताहेत.
महाराज म्हणतात की माझ्या सर्व ईच्छा भगवंत ह्यासाठी पुरवतो. की माझी कोणतीही वासना मृत्यूसमयी शिल्लक राहू नये. (वासनाक्षय झाल्याने परत जन्म नाही हा पण अध्यात्मातला एक मुख्य सिद्धांत आहे.)
महाराज पुढे हे पण म्हणतात की भगवंत त्यांना सांभाळतो, त्यांच्यावर येणारी संकटे दूर करतो व एवढेच नाही तर योग्य मार्ग दर्शन पण करतो आहे.

प्रभूशरणागत प्रत्येकालाच असा अनुभव येत असतो. हा भाग विश्वासाचा आहे. महाराज म्हणतात की लोकहो तुमचा विश्वास बसत नसेल तर पुराणांतली उदाहरणे पाहा. म्हणजे मी सांगतो त्यावर तुमचा विश्वास बसेल.

अभंगाची शिकवण :-
ह्या अभंगातून हेच स्पष्ट होते की खरे ज्ञान होण्यासाठी ( मी कोण आहे ? ) आपण आपले सर्व प्रयत्न निष्ठापूर्वक केले पाहिजेत. योग्य वेळी सदगुरुंची भेट होईलच. तो पर्यंत साईबाबा सांगतात त्याप्रमाणे श्रद्धा व सबूरीने प्रयत्न करत रहायचे..







0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home