Sunday, April 21, 2013

Added 33rd Abhangaशरण शरण जी हनुमंता on 21st April 2013.
blogaddress :http:// tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com


In this week we celebrated “ RamanavamI “ the day when the Divine assumed the form of Lord SriRama. ( Birthday of Lord SriRama)”. For this reason I have selected two Abhnagas on SriRama and Sri Hanumana together.
ह्याच आठवड्यामधे दि. १९ एप्रील रोजी रामनवमी उत्सव साजरा झाला. त्यानिमित्त ह्यावेळी तुकाराम महाराजांचे राम व हनुमान यांच्या वरचे दोनच अभंग एकत्र घेतले आहेत.
Explanation in Marathi is given after the English version.

) हनुमानाची स्तुतीपर अभंग :-
शरण शरण जी हनुमंता । तुज आलो रामदूता ॥ १॥
काय भक्ताच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ॥ २॥
शूर आणि धीर । स्वामिकाजीं तू सादर ॥ ३॥
तुका म्हणें रुद्रा । अंजनीचिया कुमारा ॥ ४॥

रामनामावर असलेला अभंग :-
राम म्हणें वाट चालीं। यज्ञ पाऊली पाऊली ॥ १॥
धन्य धन्य तेंशरीर । तिर्थव्रतांचे माहेर ॥ २॥
राम म्हणे करिता धंदा । सुखसमाधी त्या सदा ॥ ३॥
राम म्हणें ग्रासोग्रासी । तोचि जेविला उपवासी ॥ ४॥
राम म्हणें भोगीं त्यागीं । कर्म न लिंपे त्या अंगी ॥ ५॥
ऐसा राम जपे नित्य । तुका म्हणें तोचि जीवन्मुक्त ॥ ६ ॥

Verbatim Meaning:

Of 1st Abhanga on Hanumana:-
O'Hanumantaa I surrender myself to you. || 1||
Please show me ( explain me) the path( method) of performing the worship|| 2||
You are Brave and have great patience. You are always ready to do every work for your
Master|| 3||
Tuka says this to You O'Rudra and the son of Anjani || 4||

Of 2nd abhanga on Srirama
One who recites the Ramanama, is performing the sacrifice at every step|| 1||
The body of such a person is just like Holy places of Pilgrimage|| 2||
One who does all his duties remembering Rama, is always doing Meditation|| 3||
One who remembers Rama for every portion he eats, is always in the company of God.|| 4||
One who says Ramanama , is not bind-ed by the fruits of his actions, at the same time enjoys
the fruits|| 5
Tuka says that the one who always recites the Name of Lord Rama , attains the liberation in
this body form itself|| 6||

Back ground Information for Understanding the Abhanga:-

Saint Tukaram Maharaj has written a few abhangas in praise of Lord SriRama and Hanumana. The present ones are from this set. The specialty of these is “ These Abhangas throw light on the methodology to be followed for performing the worship with the attitude that the Lord is our Supreme Master.
Similar is the opinion of another Saint Samartha Ramadasa. In his book Dasabodha there is one full chapter titled “NamasmarNa Bhakti Nirupan “ addressing the same aspects ie. the methodology to be followed for performing the worship with the attitude that the Lord is our Supreme Master.
The Mother ( from Sri. Aurobindo Ashram “ ) says “ The quite mind gets through meditation is indeed of short duration, for ( because) as soon as you come out from meditation you come out at the same time from the quietness of mind. The true lasting quietness in the vital and the physical as well as in the mind comes from complete consecration to the Divine; for when you can no more call anything, not even yourself,yours, when everything, including your body, sensations, feelings and thoughts, belong to the Divine. The Divine takes the entire responsibility of all and you have nothing more to worry about.”

In short all the Saints have told the same points, regarding the method of worship of God.:( Reference:-:- Sayings of Mother page 27)

Meaning of the Abhanga:
The first Abhanga if for Lord Hanumana . Those who have read Ramayana know that Hanumana was very powerful, very brave and also very knowledgeable. However Hanumana took pride to address himself as a Humble Servant of Lord SriRama. How to do worship assuming ourselves as the humble Servant of the Lord can be learn t by understanding the life and character of Lord Hanumana. Using his intellect and strength he found where Mother Sita was located. Besides this he brought-back both SriRama and LakShmana from Patala ( Residence of the Demons) where they were taken by the Demons using deceitful methods.( During the war between Ravana and Lord SriRama). The episode of Burning of Lanka , the capitol of the Demon Ravana is well known. After the war , during Coronation ceremony Hanumana showed the crowd that his Lord resided in his heart. For this purpose he tear-opened his own chest.
Hanumana is an Avatar of 11th Rudra. He is also known as “ Anjanisuta ie. The son of Anjani”.

Hanuman always stands with his head bowed and his both hands closed in the Salute position in front of his Master Lord Srirama.
In the first Abhnaga, Tukaram Maharaj is praying to Lord Hanumanta for blessing him with same attitude of servant of God so that he can worship his beloved Panduranga in the same fashion.
How to perform Namasmaran ( Methodology for remembering the God) is explained in the second abhanga, as follows.
The 1st Stanza:- Tukarama Maharaja says that We should chant the name of God while doing our daily life operations . Doing this is as if we are performing a (यज्ञ )sacrifice.
During the ritual of Sacrifice the doer puts various things in the sacrificial fire and says that he is consecrating the same to the deity of the sacrifice and also the doer says “ This does not belong to me, I am consecrating it to you.” In short the first stanza tells us to do every action as a sacrifice for the God.
The 3rdt stanza :- Here Maharaj says that “All of us have to work in order to support ourselves and look after our family . If we remember the God while doing this work, then it is nothing but meditations.”meaning that we should have an attitude “every work is a worship of God.”

The 4th Stanza:- Here we are advised to remember the name of Lord (ie. remember the Lord because of whom we are able to enjoy every meal” and treat the Meal as His Prasadam..Universally applied this is applicable to all the inputs we receive through our five sense organs. That can also be called as a meal for our body.
The 5th Stanza:- Here Tukaram Maharaj clearly says that those who live as described above , who consecrate everything to Lord, will not get bonded by the results of the actions done. In short the fruits of the actions do not bind such a person.

Thus the Abhanga reveals the real way to live life. It can be easily seen that there is no difference in Karmayoga and Living the life doing Namasmarana or Atmnivedan Bhakti.

The 2nd and 6th Stanzas : these clearly say that whosoever lives life like this definitely attains the Liberation during the lifetime itself. He can be therefore addressed as the Jeevanmukta.

Teachings of these Abhangas:-
The teaching are are very clear. Do not waste the opportunity of getting the birth as a human. Live the life as described in these Abhangas is the teaching of these abhangas.

Hereonwards the meaning is explained in Marathi language
.
) हनुमानाची स्तुतीपर अभंग :-
शरण शरण जी हनुमंता । तुज आलो रामदूता ॥ १॥
काय भक्ताच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ॥ २॥
शूर आणि धीर । स्वामिकाजीं तू सादर ॥ ३॥
तुका म्हणें रुद्रा । अंजनीचिया कुमारा ॥ ४॥

रामनामावर असलेला अभंग :-
राम म्हणें वाट चालीं। यज्ञ पाऊली पाऊली ॥ १॥
धन्य धन्य तेंशरीर । तिर्थव्रतांचे माहेर ॥ २॥
राम म्हणे करिता धंदा । सुखसमाधी त्या सदा ॥ ३॥
राम म्हणें ग्रासोग्रासी । तोचि जेविला उपवासी ॥ ४॥
राम म्हणें भोगीं त्यागीं । कर्म न लिंपे त्या अंगी ॥ ५॥
ऐसा राम जपे नित्य । तुका म्हणें तोचि जीवन्मुक्त ॥ ६ ॥

अभंगाच्या मागची भूमिका :-
तुकाराम महाराजांचे कांही अभंग श्रीराम व हनुमानाचे स्तुतीपर आहेत त्यातलेच हे दोन अभंग रामनवमी निमित्त येथे घेतले आहेत ह्या अभंगांचे वैशिष्ठ्य हेच आहे की येथे नामस्मरण कसे करावे ते तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. तसेच दास्यभक्ती कशी करावी ह्यावर पण प्रकाश देणारे आहेत.
अगदी असेच सांगणे समर्थांचे पण आहे. समर्थ रामदास स्वामींच्या नामस्मरण निरुपण समासामधे अगदी हीच पद्धत नामस्मरणासाठी सांगितलेली आढळते.
श्री अरोबिंदो आश्रमाच्या माताजी सांगतात " जेंव्हा आपण ध्यान करतो तेंव्हा मनाला शांतीचा अनुभव मिळतो. पण ध्यान संपले की मन परत पूर्वीच्या अस्वथ अवस्थेत येते. असे अनेक साधकांच्या बाबतीत घडते. मन व शरीराला पूर्ण शांतीचा सतत अनुभव तेंव्हाच येतो जेंव्हा तुमचे सर्वकांही भगवंतास अर्पण होते. अर्थात जेंव्हा तुम्ही स्वत:चे असे कांहिहि आहे असे म्हणू शकत नाही ( ह्यात सर्व भौतिक संपत्ती तर येतेच शिवाय अगदी तुमचे शरीरसुद्धा, तसेच तुमचे विचार, भावना, ईत्यादी सर्व कांही ), तेंव्हा सर्व योगक्षेमाची जबाबदारी भगवंत स्वत:वर घेतो. मग तुम्ही काळजी करावी असे कांही रहातच नाही.( संदर्भ :- Sayings of Mother page 27)
सर्व संत एकच उपदेश करतात तो कसा हे पण येथे स्पष्ट होते.

अभंगाच्या अर्थाचे स्पष्टीकरण :-
सर्वप्रथम हनुमानाचा अभंग ह्यासाठी घेतला आहे की अत्यंत शक्तिमान , शूर व ज्ञानी असूनही हनुमंत स्वता:ला श्रीरामरायांचे सेवक दास म्हणवून घेण्यातच धन्यता मानतात. दास्यभक्ती कशी करावी हे आपल्याला हनुमंताच्या चरित्रावरून कळते. हनुमानाने बुद्धी व चातुर्याने सीतेला शोधले.
रामरावण युद्धामधे राक्षसांनी राम-ल्क्ष्मणांना मायेने पाताळंत नेले होते तेथून सोडवीन आणले. लंकादहनाच केले. भर दरबारांत स्वत:ची छाती फाडून तेथे रामच असल्याचे सर्वांना श्रीरामरायांच्या पट्टाभिषेकाच्या प्रसंगी दाखवून दिले. हनुमान म्हणजे रुद्राचाच एक अवतार होय. त्यांचेच आणखी एक नांव म्हणजे " अंजनीसुत" अर्थात अंजनीचा मुलगा हे आहे.
असे हे हनुमान श्रीरामरायांचे पुढे नेहमी आदराने हात जोडुन उभे असतात.
अभंगामधे अश्या हनुमंताच्या कडे तुकाराम महाराज हेच मागणें मागताताहे की " हे हनुमंता मी तुला शरण आलो आहे. कृपया मला देवाची भक्ती कशी करावी हे समजाऊन सांगा "
नामस्मरण कसे करावे हे पुढचा अभंग सांगतो.
अभंगाच्या १ ल्या चरणाचा अर्थ :-
व्यवहारामधे जातायेता नाम जपावे असे पहिल्याच ओळित सांगून महाराज हे पण म्हणतात की असे करणे म्हणजे पाऊलोपावली यज्ञ करण्यासारखे आहे. यज्ञामधे आपण आहुती देतो व म्हणतो की "अमुक देवताय स्वाहा इदं न मम " म्हणजेच ही आहुती अमुक देवतेला समर्पित असो. ज्याची आहुती दिलेली आहे ती माझी नाही " थोडक्यांत आपले प्रत्येक कर्म हे देवास केलेला यज्ञ समजून करा असेच ह्या पहिल्या ओळीत सांगितले आहे.

अभंगाच्या 3चरणाचा अर्थ :- आपल्याला रोजीरोटीसाठी कांहितरी कामधंदा करणे आवश्यकच आहे. हे करतांना रामाचे स्मरण ठेवले तर ती सुखाची समाधीच होय असे अभंगाचा तिसरा चरण सांगतो. अर्थात प्रत्येक कार्य भगवंताचे आहे असे समजून करावे हाच ह्याचा अर्थ घेता येईल.

अभंगाच्या ४थ्या चरणाचा अर्थ :- जर जेवतांना प्रत्येक घास घेताना मी जे जेवतो आहे ते भगवंताला अर्पण करून मग त्याचा प्रसाद आहे हे समजून घ्यावे असे महाराज अभंगाच्या ४थ्या चरणामधे सांगत आहेत. खरेतर आपल्या पाचही इंद्रियांकडून जे देहाला मिळते ते सर्व आपले भोजनच असते. जे जे मिळते तो देवाच प्रसादच आहे हे समजून घ्यावे असेच येथे सांगितले आहे.

अभंगाच्या ५व्या चरणाचा अर्थ:- अशापद्धतीने जो सर्व भोग भोगतांना रामाचे स्मरण करतो , सर्व कर्मे रामार्पण बुद्धिने जो करतो; त्याला त्याकेलेल्या कर्मांचे फळ बाधक होत नाही असे येथे सांगितले आहे.
एकूणच कर्मयोग जगण्याचे रहस्यच ह्या अभंगात जणू तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. तसेच कर्मयोग व नामस्मरण भक्तिची सांगड ( संबंध) पण येथे स्पष्ट झाला आहे.

अभंगाचे २,व ६वे चरण हेच स्पष्ट करतात की जो असे जीवन जगतो त्याचे मानवी शरीरात जन्म घेण्याचे सार्थक होते व तो जीवन्मुक्तच होतो.

अभंगाची शिकवण :- येथे शिकवण स्पष्टच आहे की अभंगाप्रमाणे वर्तन ठेवा व आपल्या नरजन्माचे सार्थक करून घ्या.

1 Comments:

At April 22, 2013 at 9:10 PM , Blogger Yogesh Kulkarni said...

दोन्ही अभंगांच्या सुंदर विवेचानाबद्दल धन्यवाद!!

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home