Saturday, January 18, 2014

Added 53rd post Working of mind to Abhanga a week of Sant Tukarama.

 Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com

Contact mail address is rgphadke@gmail.com

For Marathi Readers the explanation of the meaning is given after the English version given here ie at the end of English version.
The Working of our mind is planned to be given in three parts.
(Post 1 )Part 1 :- Basic Theory given by Scriptures.
(Post 2) Part 2 : - Basic Theory given by our Scriptures.
(Post 3) Part 3 :-  Practicle Actions to be taken in our day today life.

WORKING OF THE MIND :- THE PROCESS ( Part 1)


Definition of Mind :- Mind is defined as the pure Inspiration that appears in our mind. In short ; mind is the pure feeling of awareness “ I am “ which arises in the heart as soon as an entity takes birth.
The mind has capacity for cognition, will and doubts .

If we try to find the location of our mind then it is not possible to exactly locate it since it is in fact an non-manifested one. However as per the working the mind has five defined functions which are interrelated with each other. We may call these as five different aspects of the mind.

These are 1) Inspiration 2)Chitta 3) Mind 4) Intellect 5) Feeling of Self .
These five function act rather in serial order and with a definite time lag between each.
The working of mind starts with Inspiration .

The working of each of these is described further below. Once we understand the Working process then it is possible to think of the methods for control of our mind. I would like to recall here the previous post no 52 of Abhanga in which Sant. Tukaarama has asked us to control our mind. This whole exercise is only to achieve the control.

As per the Scriptures we have five Sheaths ( bodies) inside this Gross Visible body. These are addressed as PanchakoSas.( 1) The outer Shell is our visible body gross level named Annamaya kosha.2) next is invisible Pranamaya kosha.3) Manomaya kosha 4) Vijnyaanamaya kosha 5) Anandmaya kosha.

    1) Functional aspects of Inspiration :- The inspiration occurs in our mind without any specific cause or trigger. This is the Quality we possess because we are not different from the universal Consciousness to whom there are many names such as “ Parabrahman, Parameshvar, Bhagavant , God Almighty etc.
From the beginning of the mankind many are pondering over the reason or cause for the creation of the Universe. Until now nobody has been able to bring out the definite cause for this event of creation of the universe. Best answer given is “ Because of the will of God. He was alone and felt that He should not remain alone. This is called as “ The first Inspiration” ( Adisankalpa) it is represented by the sound and Symbol “OUM” .
We get the inspiration because of some external triggers too. This is as per the game plan of our “ Prarabdha” or “Fate” which is nothing but the store house of the memories from our past as well as present birth. It is the Fate which causes us to act impulsively causing the manifestation of further actions and events . These then result in Pleasure or Sufferings depending on the nature of the action.
This information is important to understand how to control our mind and hence is passingly mentioned here. We will see the details later.

    1. Functional aspects of Chitta :- As mentioned above our Chitta is the storehouse of or memories. These are also called “ Sanskaras or Impressions “.
      We can imagine our Chjittra like a lake in which waves / turbulence are appearing from time to time ; because of some Inspiration.
      Shri.Bhagavadgeeta classifies these in three categories. 1) Tamasik 2) Rajasik 3) Satvik.
      We can further classify our Thoughts ( Thought is the manifestation of the Inspiration is verbal word form we we understand better.) The desires are another name for these thoughts.
      Some broad categories are 1) Desire for Enjoyment of Sex 2) Desire for Name and Fame 3) Desire for accumulation of Wealth 4) Desire for taking Revenge. 5) Feeling of Depression 6) Feeling of Pleasure 7) Love 8) Hatred 9) Anger 10) Jealousy etc.
      It is to be noted here that mere appearance of a thought is not much troublesome . It is the action done on the thought which is damaging. In our next post we will examine functional aspects of our Manas ( mind) , Intellect and Action ultimately taken by the “Self =I “.

I request my esteemed readers to kindly share with me their views or suggestions so that next post can be made more comprehensive.
अंत:करण पंचकाची कार्यपद्धती ( भाग १ ला)

) अंत:करणाची व्याख्या :-
Post 1 :भाग १ ला शास्त्रांनी सांगितलेला सिद्धांत 
Post 2 : भाग २ रा  शास्त्रांनी सांगितलेला सिद्धांत 
Post 3 : व्य्वहारामधे कसे वागता येईल तो भाग.
अंत:करण ( Mind) म्हणजे काय हे सांगणारी ओवी दासबोधामधे खालील प्रमाणे आहे. ह्या ओवीत अंत:करणाची व्याख्या येते.
निर्विकल्प जें स्फुरण । उगेच असतां अंत:करण। तें जाणावे अंत:कर्ण।जाणती कळा ॥ १७--४॥
आपल्यामधील जाणिवेचे अत्यंत शुद्ध रूप म्हणजे अंत:करण (Mind) होय.

अंत:करण कोठे असते असे पहायचे झाले तर त्याचे स्थान सूक्ष्म देहामधे असते असे आपली शास्त्रे सांगतात.

) अंत:करणाचे कार्य पांच प्रकाराने होत असते.
हे पांच प्रकार म्हणजे १) अंत:करण( स्फुरणाचे स्थान) ) मन ३) बुद्धी ३) चित्त ५) अहंकार..
ह्या प्रत्येक प्रकाराची एक विशिष्ठ कार्य करण्याची पद्धत आहे. जर वरवर पाहिले तर सर्व एकाच वेळी कार्यरत आहेत असे वाटते. पण सुक्ष्म द्रूष्टीने विचार केला तर असे आढळते की
) प्रथम स्फुरण होते.
) नंतर चित्त कार्यरत होते.
) ह्या नंतर मनाचे काय करवे करूनने ह्या संभ्रमात पडते.
) नंतर बुद्धी निर्णय देण्याचे काम करते.
) सर्वात शेवटी अहंकार काम करायला लागतो व कार्य घडते.

आता पुढे अंत:करणपंचकाचे कार्य विस्तॄतरुपाने पुढे घेतले आहे. ते समजले की मगच आपल्याला मनावर ताबा कसा मिळवता येईल त्याचे स्पष्टिकरण होईल. अंत:करण पंचाकाचे कार्य लिहिण्य़ाचा हा उपद्व्याप त्यासाठीच करत आहे. असो.
येथे मला मागच्या ५२व्या अभंगाची वाचकांना आठवण करून द्यावी असे वाटते आहे. त्या अभंगामधे तुकाराम महाराजांनी मनावर ताबा ठेवा असा उपदेश सर्वप्रथम केला आहे. As per the

आपल्या शास्त्रांमधे पंचकोशांचे वर्णन आहे .हे सर्व कोष आपल्याच शरीरामधे आहेत. ) बाह्य दिसतो तो अन्नमय कोष म्हण्जे आपले स्थूल शरीर होय. ) त्यानंतर येतो तो प्राणमय कोष ३) तिसरा मनोमय कोष जेथे आपले अंत:करण असते. ) चौथा ज्ञानमय कोष व ५) आनंदमय कोष.

) अंत:करणात झालेले स्फुरंणाचे कार्य :-.
कोणताही विचार मनामधे येतो तेंव्हा असे दिसते की सर्वप्रथम आपल्याला कांहितरी स्फुरण होते व नंतर ह्या स्फुरणामुळे पुढचे सर्व कार्य होते.

हे स्फुरण कां होते असे जर कोणी विचारले तर उत्तर हेच आहे की आपण परमात्म्याचेच अंश आहोत व स्फुरण होणे ही परमात्म्याचीच करणी आहे. परमात्म्याला आपल्या दृश्य सृष्टीमधला नियम की " कांही व्हायचे असेल तर त्याच्यामागे कांहितरी कारण असते " लागू होत नाही.

आपली सॄष्टी कां निर्माण झाली ? हा प्रश्न पूर्वीपासून अनेकांना पडत आहे व ह्याचे उत्तर आपल्या संतांनी ( जे ब्रह्मज्ञानी होते ) हेच दिले आहे की त्याला ( भगवंताला लीला करण्याची ईच्छा झाली की मी एकटा आहे व अनेक व्हावे " ऎकॊहं बहुस्याम्‌ " म्हणुन सृष्टीनिर्मिती झाली . ह्यालाच आदीसंकल्प म्हणतात. ) आपण त्याचेच अंश आहोत. म्हणून आपल्याला पण असेच स्फुरण होते.
ह्या मूल देवालाच आपण भगवंत, परमेश्वर, परब्रह्म ह्या नावांनी ओळखतो. आपण ॐ ह्या रूपाने त्याला सगुणामधे पहात असतो.

समर्थांच्या खालील ओवीमधे स्फुरंण कोठे होते ते सांगितले आहे.
"नाभिस्थानीं परा वाचा । तोचि ठाव अंत:करणाचा ।" ॥ १७--३ ॥

आपली वाणी चार प्रकारची आहे. परा, पश्य़ंती मध्यमा व वैखरी. बाह्य सृष्टीशी होणारे आपले व्यवहार आपल्याला बोलता येते म्हणूनच साधारणत: घडतात. बोलण्याआधीपण सर्वप्रथम होते ते स्फुरण.

स्फुरंणाला शब्द नसतात. आपण त्याला trigger म्हणु शकतो. ज्या क्षणी जीव जन्माला येतो त्या क्षणी त्याला स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव होते. मी आहे हे जीवावस्थेमधील पहिले स्फुरण म्हणता येते. येथे फक्त असणेपणाची जाणीव आहे म्हणुन स्फुरण हे कोणतेही विकार नसलेले, कल्पनारहित असते. पण ह्या स्फुरणामुळेच पुढच्या सर्व क्रिया घडतात.
स्फुरणाचे आणखी एक महत्वाचे रूप आहे. हे रूप आपल्या जीवनात अनेक घटना घडवते.
जसे सहज कांहीतरी स्फुरण होते तसेच ईश्वरी योजनेनुसार प्रारब्धानुसार पण कांहीतरी स्फुरण आपल्याला होते .
प्रारब्ध म्हणजे बीजावस्थेमधे असणारी आपल्या पूर्वकर्माची फळे असे म्हणता येते. ही बीजे केंव्हा फळरूप घेणार आहेत त्याची आपल्याला अंशमात्र कल्पना नसते. पण एवढे मात्र नक्कीच म्हणता येते की योग्यवेळ आली की ही बीजे फळरूप होण्याची वेळ आल्याबरोबर आपल्याला कांही तरी करावेसे वाटते व तसे केल्यानंतर बीजाचे फळामधे रुपांतर होते.

आपण दृश्य सृष्टीमधे वावरत आहोत. दृश्यातील कोणत्याही पदार्थाचे गुणधर्म पंचेद्रियांद्वारे आपण ओळखतो. ( रूप, स्पर्श, गंध, रस, शब्द) एका ईंद्रियाला एकाचेच ज्ञान करून देण्याची क्षमता आहे. जसे त्वचेला गॊड,कडू कळत नाही. नाकाला मऊ/कठीण कळत नाही. पण प्रत्येक ईंद्रियाला ह्यामधील अनेक छटांचे ज्ञान सहजपणे होत असते. उदाहरणार्थ रंगाचेच असंख्य प्रकार आहेत. चवीचे पण असंख प्रकार आहेत. तसेच सुगंधाचे.... .

)चित्ताचे कार्य :-
स्फुरणामुळे आपल्या चित्तामधे तरंग (Trigger ) उठतात व त्यानंतरच पुढचे कार्य होते.
एक नेहमीच्या अनुभवातले उदाहरण हा भाग स्पष्ट करते.
समजा आपण रोज १२.३०ला जेवण रोज जेवायचे ठरवले. असे ठरवल्यावर आपल्या चित्तामधे ह्याची नोंद आठवणरूपे होते. ह्या नोंदीलाच ’संस्कार" असे नांव आहे. ह्या जन्मामधीलच नव्हे तर पूर्वीच्या सर्व जन्मांचे सर्व संस्कार आपल्या चित्तामधेच साठवलेले असतात.
चिताला जर आपण एखाद्या सरोवराची उपमा दिली तर सरोवरातील निरनिराळे भोवरे, लाटा , तरंग ह्यांनाच आपण वॄत्ती असे म्हणतो. वॄत्तींचे अनेक प्रकार आहेत. त्यातले महत्वाचे म्हणजे १) आकर्षणात्मक वृत्ती
) क्रोध, द्वेष , मत्सर ह्या प्रकारच्या वृत्ती ३) अभिमानाच्या वॄत्ती ४) प्रेममय व्रूत्ती ५) दु:खदायक वृत्ती ६) धैर्यवृत्ती ईत्यादी असंख्य " संस्कार" वृत्ती आपल्या चित्तामधे साठवलेल्या असतात.
श्रीभगवद्‌गीतेमधे ह्यांचे वर्गीकरण १) तामसिक २) राजसिक ३) सात्विक वॄत्ती असे केले आहे.

आपण ह्या वृत्तींचे वर्गीकरण करू शकतो व ह्यामुळेच आपल्याला कोणत्याही वृत्तीकडे साक्षीभावाने पाहून विवेकाने वागता येऊ शकते. कांही वॄत्ती बंधनात ( जन्म-मृत्यूचक्रामधे अडकवतात तर कांही आपल्याला भगवंताकडे नेतात.

ह्याच्या पुढचा भाग पुढच्या post मधे लिहित आहे कारण चितामधे येणारे निरनिराले विचार व त्यांच परींणाम हा भाग बरच मोठ होत आहे.


वाचकांनी ह्या पोस्त बद्दल आपले विचार जरूर कळवावे हीच येथे विनंती आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home