Friday, January 10, 2014

Added 52nd postहोउं नको कांही मना या आधीन for Abhanga a week of Sant Tukarama.

 Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com
For Marathi Readers the explanation of the meaning is given after the English version given here ie at the end of English version.

Note:- I am planning to share my understanding of the working of our mind with a view that this will help us to control it. I also have planned to share some tips which I received from some learned friends.
For this reason ; the next post will not be a abhanga.

2014 Abhanga post 52nd

होउं नको कांही मना या आधीन । नाईकें वचन याचेंकांही ॥ १॥
हटियाची गोष्टी मोडून काढावी । सोई ही धरावी विठोबाची ॥ २॥
आपुले आधीन करूनियां ठेवा । नाहीं तरी जीवा घातक हें॥ ३॥
तुका म्हणें झाले जे मना आधीन । तयांसी बंधन यम करी ॥ ४॥

Verbatim Meaning:-

Do not become enslaved of your mind. Do not listen to anything it says || 1||
One should break away from the habit ( of thinking that all the pleasure comes from the external objects) and should attach  himself to Vithobaa|| 2||
Keep your mind under your control otherwise it will be causing you serious damage || 4 ||
Tuka says that those who do not control their mind are imprisoned by the lord of Death Yama|| 4 ||

Background Information for the understanding the meaning:

It has been our experience that we get any pleasure or pain for a short time only. 
However there is one more result of satisfying our desire, which is unknown to us.
This is nothing but the remembrance of the experience in our mind. In Spirituality this is called as the seed. It is this seed i.e. remembrance of the event that ultimately binds the soul to the cycle of Birth and Death.

For example the experience of pleasure forms the seed of desire for enjoyment. The experience of pain forms the desire not to experience the same again. Sometimes a desire is generated to take revenge  and this desires takes the form of seed. All such seeds are stored in our Chitta. This is called “ Sanchita “.

All this happens because our mind is not under our own control.

NOTE :- Here I have tried to be as brief as possible for the aspects of control of mind ( which is itself a vast subject) . Therefore next post is planned to be about the functioning of our mind and deriving some practical hints for it's control.

One of the most important doctrine in spirituality states that “Desires are the basic cause of our imprisoned and entangled permanently to the cycle of Birth-Death. The main purpose of getting the Human body is to attain Unity with God and desires prevent us from achieving the same.
This Abhanga  is addressing the issue of control of the mind.

Meaning of the Abhanga:-

In the very first stanza it is advised that one should not be enslaved by the mind.

Mind has many attributes .One of which is the ability to remember and recollect.
Generally we experience some pleasure because of association with some sense objects.
For example when an Alphonso Mango is tasted for the first time; the taste, pleasure experienced because of eating the Mango and it's bright reddish Yellow colour are all imprinted on our memory circuit. This is called “Seed of Desire”

Sometimes later in the life this seed will fructify because of  some trigger such as a picture, Advertisement in the paper, arrival of the summer season etc. Then the desire to eat Alphonso Mango will again arise in the mind.
However it is possible that in the mean while, the person in whose mind this desire has awakened is declared Diabetic and thus eating the Mango in such health condition will only cause sufferings ultimately.

The concerned person may not even eat the Mango but the Desire will still remain unsatisfied.
Our mind keeps on getting many such desires continuously. Some of the strong categories of these desires are “ Desire for Sex enjoyment”, Desire for taking Revenge” Desire for Name and Fame etc. Unsatisfied desires ultimately take the form of Seeds and when one dies the soul takes these seeds of desires with him and finds a new body to satisfy the unsatisfied desires.Thus a new body form comes to life.

This is the reason Tukaram Maharaj is asking us not to become enslaved to the mind.in the very first stanza. He advises us not to listen to the demands of our mind which are are going to bind us.

How to break this habit of Mind is the natural question that will arise. The answer is given in the next stanza. Tukaram maharaj says that Replace the desire by purposeful efforts with some other desire which is not going to cause binding. 
The intense desire to unite with the God is this kind of desire. Though He is not visible to us, it is clear that He is everywhere. He is our true Mother. Thus just remembering Him is sufficient. This can be done by remembering Him as VithThala, Krishna , Rama , Ishwara or by any other name. This is called Namasmaran Bhakti. ( Worship by Reciting the Holy name of the Lord)

In the third stanza of the Abhanga ; Tukaram Maharaj is once again advising the same above described point by saying that develop this as a habit by intense efforts. Otherwise you will be doing damage to yourself and will entangle yourself in the cycle of Death-Birth.

In the last stanza Tukaram Maharaj is concluding that those who have not conquered  the desires are going to suffer at the hands of the Lord of Death. His name is Yama. Indirectly it is told to us not to get in this kind of situation.

Teachings of the Abhanga:

Though the desires can not be totally nullified , at least one can replace them with the right kind
 ( the desire to be united with the Lord) and tread the path of Liberation.





2014 Abhanga post 52nd
होउं नको कांही मना या आधीन । नाईकें वचन याचेंकांही ॥ १॥
हटियाची गोष्टी मोडून काढावी । सोई ही धरावी विठोबाची ॥ २॥
आपुले आधीन करूनियां ठेवा । नाहीं तरी जीवा घातक हें॥ ३॥
तुका म्हणें झाले जे मना आधीन । तयांसी बंधन यम करी ॥ ४॥

अभंगामागची भूमिका :-
आपला नेहमीचाच अनुभव हाच आहे की आपल्याला सुख किंवा दुख: कांही वेळापर्यंतच भोगावे लागतात. सुखभोगाने आनंद तर दुख:भोगाने दुख: अनुभवास येते. ह्याशिवाय आणखी एक परिणाम आपल्या न कळत होतो तो म्हणजे ह्या भोगांची आठवण आपल्या चित्तामधे बीजरुपाने साठविली जाते. ही आठवण जेंव्हा पुन: उफाळून वर येते तेंव्हा आपल्याला तोच भोग परत घ्यावासा वाटतो. ह्यालाच वासना जागृत होणे पण म्हणतात.
उदाहरणार्थ जर आनंदाचा भोग घेतला गेला तर त्याचे बीज तोच आनंद परत मिळावा ह्या रूपाच्या विचाराने पुढे कधीतरी प्रगट होते. दुख:भोगाचे बीज कधी सूड व प्रतिशोधाचे रुप घेते तर कधी असा भोग पुन: नकॊ असे रूप घेते. ह्या बीजकोशाचेच एक नांव संचित असे आहे.
अशी वासनेची बीजेच आपल्याला पुन:पुन: जन्म घ्यायला लावतात.

हे सर्व घडते ते आपला मनावर ताबा नसल्यामुळे घडते . आपण मन सांगते तसे वागतो.
      हा अभंग ह्या संदर्भातलाच आहे .
टीप :- हा अभंग मनावर ताबा ठेवायला सांगतो. ह्यासाठी मनाचे कार्य कसे चालते हे समजणे आवश्यक आहे. पण हा विषय वेगळा व बराच मोठा आहे. पुढचे Post मी अंत:करण पंचकाचेकार्य ह्यावरच लिहिणार आहे. तसेच मनावर ताबा ( आपले ध्येय भगवद्‌भेटिचे आहे) करण्यास काय करता येते त्याबद्दल पण जे समजले ते लिहिणार आहे. येथे मुख्य तत्वाचे च फक्त वर्णन केले आहे.

अभंगाचे अर्थस्पष्टीकरण:- :-

अभंगाच्या पहील्याच चरणामधे असे सांगितले आहे की आपण मनाचे गुलाम होऊ नये.

मनाच्या अनेक गुणांपैकी आठवण राहणे हा मनाच एक महत्वाचा गुण आहे. आपल्या पाच इंद्रियांच्यापैकी कोणत्यातरी इंद्रियाने आनंद वा दुखांची आपल्याला आठवण राहते. आपले सर्व जीवनच आठवणिवर चालत असते. जन्म झाल्याबरोबर ही आठवण राहण्याची क्रिया सुरू होते.
साधे उदाहरण पाहूया. समजा एखाद्याने आंबा कधीही पाहिला नव्हता. तो त्याने पाहिला व चाखला. असे केल्याबरोबर त्याच्या आठवणीच्या कोशामधे आंबा पिवळा असतोव त्याची चव मधूर असते ह्या अनुभवाचीच आठवण तयार होते. खाताना झालेला आनंद तात्पुरताच पण आठवण मात्र नेहमीकरता चितामधे उरते.ह्यालाच वासनाबीज असेही म्हणतात.

नंतर उन्हाळा आला व नुसती आंब्याचे चित्र असलेली जाहिरात पाहिली, तर पुन: आंबा खाण्याची वासना वर ऊफाळून येते. अर्थात आठवण हीच मनामधे वासनाबीज रुपे मनामधे राहिलेली असते म्हणूनच असे घडते.

पण जर मधल्या काळामधे अशा माणसाला मधुमेह झाल्याचे निदान झाले असेल तर अशी वासनापूर्ती त्याने केल्यास ते आनंदाऐवजी दुखा:चे कारण होते. अशा माणसाने निग्रहपूर्व आंबा खाल्ला नाही तरी वासनेचे बीज मनामधे उरलेलेच असते. अशी बीजेच पुनर्जन्माचे कारण बनतात पुढच्या जन्मामधे नवी बीजे तयार होतात.
ह्या बीजांचे वर्गीकरण करायचे झाले तर लोकेषणा, दारेषणा( पुत्रेषणा) , वित्तेषणा , सूडाची ईच्छा इत्यादी करता येते. कोणतीही ईषणा ( वासना ) जर अपूर्ण असेल तर ती पुढच्या जन्माला कारणीभूत होते, हे आपण वर पाहिलेच आहे.

ह्या सर्व वासना , ईच्छा सतत मनामधे येत राहतात म्हणूनच तुकाराम महाराज पहील्याच चरणात सांगताहेत की वासनांचे गुलाम होऊ नका. ह्यासाठीच मनाचे ऐकू नका असे ते म्हणतात.

अध्यात्मातला एक सिद्धांत हाच आहे की वासनापूर्ती न झाल्यामुळेच प्राण्याला पुन:पुन: जन्म मृत्यूचक्रामधे अडकावे लागते. माणसाच्या जन्माचे मुख्य उद्देश्य भगवंताची प्राप्ती हेच आहे व वासनापूर्तीमागे लागल्यामुळे ते दूरच राहते. भगवंताचे दर्शन/प्राप्ति झाली की मगच जन्ममृत्यूचक्रामधून जीवाची कायमची सुटका होते.

तुकाराम महाराजांचा आजचा अभंग मनावर ताबा कसा मिळवावा हेच सांगतो.

येथे प्रश्न असा येतो की हे कसे साधायचे.? ह्याच प्रश्नाचे उत्तर पुढच्याच चरणात येते.
उत्तर हेच आहे की चांगल्या वासनेने अशुभ वासनेला बाजूला करा. ह्यासाठीच प्रयत्नाचे महत्व आहे. चांगल्या वासना म्हणजे ज्यांच्यामुळे पुढचा जन्म घ्यायची पाळी येणार नाही त्या वासना.

भगवंता विषई प्रेमभावना असल्याने त्याचीच भेट व्हावी ही सर्वांत शुभ वासना होय. भगवंत आपल्याला दिसत नाही पण तो आहेच हे सत्य आहे. तोच खरेतर आपली आई आहे व त्याला आपल्या मनातले सर्व कांही कळत असते. म्हणून आपण जर त्याचे स्मरण कोणतेही नांव घेऊन उदा. विठ्ठल विठ्ठल किंवा श्रीराम जयराम जयजय राम , ॐ नम:शिवाय इत्यादिपैकी कोणत्याही नामाने करू शकतो. हे स्मरण हट्टाने जबरदस्त प्रयत्न करून करावे असे पण महाराज सांगतात.

अभंगाच्या पुढच्या चरणामधे ( ३ रा) महाराज परत असे सांगतात की असे प्रयत्न जर तुम्ही केले नाही तर परत जन्म-मृत्यू चक्रामधे अडकावे लागेल. थोडक्यात म्हणजे असे स्मरण न करण्याने तुमचीच हानी होणार आहे.

अभंगाच्या शेवटच्या चरणामधे ( ४ था) महाराज हाच मुद्दा वेगळ्या पद्धतीने पुन: सांगताहेत. महाराज म्हणतात की जर तुम्ही अशा वागणुकीने मनावर ताबा ठेवला नाही तर मग यमदेवता मृत्युदेवता तुम्हाला पुन: ह्या शरीररूपी तुरुंगात टाकेल . तेंव्हा सावध व्हावे.

अभंगाची शिकवण :

जरी आपल्या वासना समूळ नष्ट करता येत नाहीत तरी पण आपण कमीतकमी हा प्रयत्न करू शकतो की आपल्या वासना शुभ असाव्या. कारण शुभ वासनाच आपल्याला जन्ममृत्युचक्रामधून शेवटी सोडवितात.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home