Thursday, October 4, 2012


     Abhanga 10 सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती ।date 4th Oct 2012 : Tukarama's Parabhakti.( Supreme Devotion)

Readers may give their comments in the field provided in the blog or send email on address :- rphadke45@yahoo.co.in. or  rgphadke@gmail.com

इंग्रजी स्पष्टीकरणानंतर मराठी स्पष्टीकरण  आहे.

सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरीया ॥ १ ॥
गोड तुझे रूप गोड तुझे नाम । देई मज प्रेम सर्व काळ ॥ २ ॥
विठोबा माउलिये हाचि वर देई । संचरोनि राही हृदयामाजी ॥ ३ ।
तुका म्हणे कांही न मागो आणीक । तुझे पायी सुख सर्व आहे ॥ ४ ॥

Verbatim meaning :

O' Lord of RakhumayI ( Mother Rukmini) ; let my eyes always aspire to see only you ( Your Form) and you alone || 1 ||.
Your appearance ( the form I see) is sweet to my mind and also your name is sweet. Always bless me with (Give me) intense affection , love for you . || 2 ||.
O my mother Vithoba bless me with only a boon that you will always be occupying my heart. || 3 ||
Tuka says that I do not want to ask for anything from you since all Joy is present at your holy feet. || 4 ||

Background Information :

In this abhanga Sant Tukarama has addressed his beloved deity Lord Panduranga by another name Viththala .He is asking a boon from the lord.

Sant Tukarama's devotion (भक्ति) is very intense . It is called (परा-भक्ति).
The philosophy of Bhakti accepts God as Personal and with Form ( सगुण रुप भगवंत).
Bhakti ( भक्ति) Intense love or attachment to God transcends all other kinds of love. On attaining the liberation it takes the form of supreme devotion. (परा भक्ति) . Such a disciple (भक्त) is very rare to find.

The devotees of God are categorized in three categories.
There are three levels of devotees as per Srimad Bhagavadgeetaa ( श्रीमद्‌ भगवद्‌गीता)
    1) Artharthi( अर्थार्थी) : Seeking worldly gains and favours. They are called as Sakama Bhaktas (सकाम भक्त) i.e. Those who expect some thing from the God.( Name , fame, freedom from troubles , wealth and so on.
    2) Jignaasu (जिज्ञासू) : Seeking the truth( an inquirer of Truth). They are still seeking the God.
    3) Jnani (ज्ञानी) : The enlightened ones  Their attitude varies. Some love Him as a Friend (सखा) like Arjuna, some love Him like parents (वात्सल्य भाव) like Yashodaa , some love Him like a lover ( मधुर भाव) like Sant Meerabai., some love Him like a Lord and treat themselves as the servants of Lord. ( दास्य भाव) like Ramadasaa, Purandara dasa.
    Tukarama maharaj is loving the Lord like a child loves His mother. He wants this bhava ( attitude)  for his bhakti  (devotion).
    All such devotees are Nischkaama Bhaktas(निष्कामभक्त) i.e. those who love the Lord unconditionally. They do not ask or expect anything for their worship or devotion.
      For most of us the beginning are ArthaarthI ( अर्थार्थी) . We start worship of God since we want something from Him and believe that He will give us what we want. In our Pujas we always do the sankalpam( संकल्पम्‌) for our family etc.Everybody wants that he and his family should live comfortably, good wife or Husband, Disease free living, enough wealth ( The definition of enough varies from person to person,) long life, educated children ,and so on . The list will be unending!

The Pujas, Prayers , Homas etc all these activities are done by Sakama Bhaktas. These all are done for the fulfillment of some desires.

We should remember here that it is the desires that cause us to suffer from grief  and pains. Unfulfilled desires are the cause of next birth . i.e.cause for  getting entangled in the cycle of birth-death-berth …

Only the true devotion without any desires is thus desirable.

Meaning of the Abhanga:

San Tukarama is  praying to Lord Panduranga   that he should be blessed with such unconditional devotion in this abhanga.

In the first lines he aspires that he will continuously remember the Lord  Paqnduranga ( His name and form). From the language used it is clear that he has already experienced the intense love and pleasure in seeing his Lord . He also says that the name of the Lord to is very sweet to him.

Sir Gondwalekar  Maharaja ( A seer from  Maharashtra ) says in his sayings that one has to add the flavour of Love to the Nama then only it becomes sweet .

Tukarama Maharaj has such feeling of love towards Lord Panduranga and his Nama( name). That is why he says in this abhanga that the appearance as well as name of his Lord Panduranga are sweet. He does not want anything else from his Lord. 

This abhanga shows what should be the attitude of a real devotee of God. 

Let us try to cultivate such an attitude. Then liberation will not be a matter of future.

ह्या पुढे अभंगाचे मराठीत स्पष्टीकरण दिलेले आहे.

   Abhanga 10 date 4th Oct 2012 : Tukarama's Parabhakti.( Supreme Devotion)

Readers may give their comments in the field provided in the blog or send email on address :-rphadke45@yahoo.co.in. or  rgphadke@gmail.com


सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरीया ॥ १ ॥
गोड तुझे रूप गोड तुझे नाम । देई मज प्रेम सर्व काळ ॥ २ ॥
विठोबा माउलिये हाचि वर देई । संचरोनि राही हृदयामाजी ॥ ३ ।
तुका म्हणे कांही न मागो आणीक । तुझे पायी सुख सर्व आहे ॥ ४ ॥

शब्दश: अर्थ (शब्दार्थ ):

हे रखुमाईच्या पती पांडुरंगा माझ्या डोळ्यांनी मी तुझेच रूप पाहॊ ॥ १॥
तुझे रूप व नांव दोन्हीही गोड वाटतात. माझ्यावर तुझी कृपा तुझे प्रेम सतत राहॊ ॥ २॥
हे माझे विठुमाई मला हाच वर दे की तूं माझ्या हृदयामधे नेहमी राहशील ॥ ३॥
तुका म्हणतो की मला आणखी कांहिही नको आहे कारण तुझ्या चरणांपाशीच सर्वे सुखे आहेत। ४॥

अभंगामागची भूमिका कोणती त्याचे माहीती :
ह्या अभंगामधे तुकाराम महाराज त्यंच्या आवडत्या दैवताशी विठ्ठ्ला बरोबर बोलत आहेत व प्रार्थना करीत आहेत की मी जे वर मागणार आहे ते विठोबा माऊलीने द्यावे.

संत तुकाराम महाराजांची भक्त म्हणून जी स्थिति आहे ती अत्यंत तीव्र कोटीची आहे. अशा भक्तीला " परा भक्ती " असे नांव आहे. भक्ति करतांना आपण भगवंतास सगुण रूपा मधे पाहतो. भक्ती ह मनाचा भाव आहे व ह्याभावात भक्ताला भगवंताविषयी पराकोटीचे प्रेम वाटते, इतर कोठल्याही ऐहिक वस्तु आवडत नाहीत. ह्यामुळे ईश्वर भेट होते. असे भक्त पहायला मिळणे अत्यंत दुर्लभ योग असतो.

भगवदभक्तांचे तीन प्रकार आहेत. श्रीमद्‌भगवद्‌गीतेमधे ह्या तीन प्रकारच्या भक्तांचे वर्णन येते.
असे म्हणता येईल की भक्तीच्या ह्या निरनिराळ्या पातळ्या आहेत.
    ) अर्थार्थी भक्त: असे भक्त ऐहीक सुखे व ऐहीक जगामधे भोगावी लागणारी दु:खे यांच्या पासून मुक्त व्हावे , जगामधे आपले नांव व्हावे, प्रसिद्धि मिळावी , भरपूर पैसा संपत्ती मिळावी म्हणून भगवंताची भक्ती करतात. अश्या भक्तीला " सकाम भक्ती " म्हणतात.
    ) जिज्ञासू भक्त: ह्यांना सत्य काय आहे हे जाणून घ्यायचे असते. म्हणून ते भगवंताची भक्ती करतात.
    ) ज्ञानी भक्त : ह्या भक्तांना भगवंत आकळलेला असतो. तरीही ते भगवंताची द्वैतामधे
    द्वैतमय दॄश्य जगात राहत असल्यामुळे भगवंताची भक्ति करतात. असे भक्त आपण कॊणीएक भावामधे भगवंताशी नाते जोडून असलेले पाहतो. जसा अर्जुनाचा सख्यभाव होता, यशोदमातेचा वात्सल्याचा भाव होता, मीराबाईंचा मधुर भाव होता. कांही भक्त भगवताचे सेवक दास ह्या भावांत होते. जसे पुरंदरदास, रामदास स्वामी इत्यादी
    तुकाराम म्हाराजांचा भाव लहान बाळासारखा आहे. ते आपल्या विठ्ठलाला आई ह्या भावांत पहात असत. अभंगामधे ते भगवंताला "विठोबा माऊली "म्हणत आहेत.

ह्या सर्व़च भक्तांची भगवंतावर निश्च्काम भति होती. भगवंताकडून कसलिही अपेक्षा न असणारी अशी ही भक्तिची सर्वोच्च पायरी आहे.
आपण सर्वच जण खरतर अर्थार्थी भक्त आहोत. आपल्याला देवाची भक्ती ह्यासाठी करण्याची बुद्धी झाली आहे कारण आपल्याला त्याच्याकडून कांहीतरी हवे आहे व तो ते देईल असा थोडसा विश्वास वाटतो आहे. कोणतीही पूजा जरताना तर आपण संकल्पच करतो व नंतरच पूजा करतो. पूजेचा संकल्प पण हाच असतो की भगवंताने सर्वांना क्षेम, स्थैर्य , आयुष्य , आरोग्य , संपत्ती इत्यादी सर्व द्यावे. इतरहि मागण्या म्हणजे चांगली पत्नि किंव पती, चांगली मुले , यादी न संपणारी होईल!
साधारणत: पूजा,यज्ञ, होम वगैरे करणारी मंडळी सकाम भक्तच करतात. प्रत्येकाची कांहितरी ईच्छा असते ती पूर्ण व्हावी म्हणून हे सर्व सकाम भक्त करतात.


येथे हे लक्षांत घेणे आवश्यक आहे की अपूर्ण राहिलेल्या ईच्छा, वासना यांच्या पूर्ती साठीच
जीवाला अनेक जन्म घ्यावे लागतात. ह्यामुळे वासना पूर्ती होते पण दुख:ही भोगावे लागणे चालू राहते. जन्म-मृत्युचक्रांत अडकण्याचे हे कारण आहे .
फक्त खरी निष्काम भक्तीच ह्या कारणास्तव घडायला हवी.

अभंगाचा अर्थ :
संत तुकाराम महाराज ह्या अभंगात पांडुरंगा कडे ही प्रार्थना करीत आहेत की त्याने अशी निष्काम भक्ती करण्याची बुद्धी द्यावी.

अभंगाच्या पहिल्याचरणांत ते मागतात की त्यांना पांडुरंगाच्या सुंदर रूपाचा व गोड नांवाच कधीही विसर होऊ नये. अभंगाची भाषाच तुकाराम महाराजांची परा भक्तीची स्थिती स्पष्ट करते.

श्री. गोंदवलेकर महाराज ( महाराष्टांतले एक अलिकडचे संत ) म्हणतात जेंव्हा भगवंताबद्दल असीम प्रेम वाटू लागते तेंव्हा त्याचे नाम गॊड होते.
अभग लिहितांन त्यांना असा अनुभव प्रत्यक्ष येतो आहे हे पण स्पष्टच आहे. त्या शिवाय पांडुरंगाच्या मूर्तीचे खरे सौंदर्य व नामाची खरी गोडी चाखणेच शक्य नाही. त्याना भगवंताकडून फक्त प्रेम हवे आहे बाकी कांहीही नको आहे.

अभंगाची शिकवण :
हा अभंग हेच दर्शवितो की आपली देवावरची भक्ति कशी असावी.
अशी भक्ती घडावी म्हणुन आपण भगवंताची प्रार्थना करूया कारण मग मोक्षाची वेळ दुर असणार नाही.



1 Comments:

At October 23, 2012 at 11:12 PM , Blogger Unknown said...

Dear Ravi,
I liked your explanation of this week's Abhaband. Well done.
Keep it up.
Raja

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home