७६वे postरात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग
Blog address : http//tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com
//tukaramasteachings.blogsopt.com
Blog address : http//tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com
//tukaramasteachings.blogsopt.com
अभंग
:-
रात्री
दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग
। अंतर्बाह्य जग आणि मन ॥१ ॥
जीवाही
अगोज पडती अघात । येऊनिया
नित्य नित्य वारू ॥ २ ॥
तुका
म्हणे तझ्या नामाचिये बळें
। अवघियांचे काळें केलें तोंड
॥ ३ ॥
आम्हाला
रात्रंदिवस मन व बाह्य परिस्थितीशी
युद्ध करण्याची वेळ प्रसंग
आहे.॥
१॥ जिवावर अकस्मात आघात होत
असतात व त्यांचे सतत निवारण
करावे लागते.॥
२ ॥
तुका
म्हणतो की ह्या सर्वांचे तोंड
मी हे देवा,
तुझ्या
नामाच्या साह्याने केले
आहे.॥३॥
अर्थस्पष्टीकरणासाठी
घेतलेला नामदेवमहाराजांचा
अभंग .
अमृताहुनी
गोड नाम तुझे देवा । मन माझे
केशवा कां बा न घे ॥ १ ॥
सांग
पंढरीराया काय करू यांसी ।कां
रूप ध्यानासि न ये तुझे ॥ २॥
कीर्तनीं
बैसतां निद्रे नागविले । मन
माझे गुंतले विषयसुखा ॥ ३ ॥
हरीदास
गर्जती हरीनामा्च्या कीर्ती
। नये माझा चित्ती नाम म्हणें
॥४।\
अभंगाच्या
मागची पार्श्वभूमिका :-
जेंव्हा
एखाद्या माणसाला संतांचा
उपदेश "आपल्या
नरजन्माचे सार्थक भगवद्भक्ती
करून मोक्षप्राप्ती घेण्यात
आहे"
हे
मनापासून पटते तेंव्हा तो
मनापासून ह्या धेयाच्यासाठी
प्रयत्न करू लागतो.
हे
प्रयत्न म्हणजे
१)
नवविधाभक्तीपैकी
एखाद्या भक्तीद्वारे भगवंताची
आराधना करणे
२)
उपनिषदांनी
सांगितलेल्या ज्ञानमार्गाने
स्वत:च्या
मूळ स्वरूपाचे करून घेणे
अशा
स्वरूपाचे असतात.
परंतू
त्यापूर्वी एवढी वर्षे मनाला
लागलेल्या सवयी एकदम सुटत
नाहीत.
त्यामुळे
अशा भक्ताचा स्वत:शीच
संघर्ष सुरु होतो.
अशा
स्थितीमधून तुकाराम महाराज
पण गेले होते.
महाराजांनी
ह्या संघर्षात कसा विजय मिळवला
व विठ्ठलाला
आपलेसे
केले अर्थात जीवनसार्थक करून
घेतले ते सांगणारा हा अभंग
आहे.
अर्थातच
येथेपण आपल्याला मार्गदर्श्नच
मिळते हे स्पष्टच आहे.
ह्या
संघर्षाचे स्वरूप फार सोप्या
व सुंदर रित्या नामदेव महाराजांचा
एक प्रसिद्ध अभंग सांगतो
म्हणुन तो अभंग घेऊनच तुकाराम
महाराजांच्या अभंगाचा अर्थ
स्पष्ट होतो.
हाच
प्रयत्न येथे केलेला आहे.
अभंगाच्या
अर्थाचे स्पष्टीकरण :-
असे
हे प्रयत्न सुरू केले की आपल्या
साधनेमधे अनेक विघ्ने येतात
असा अनेकांना अनुभव येतो.
सर्व
विघ्नांच्या बद्दल कांही
लिहिणे अशक्यच आहे.
ह्यातल्या
कांहींकडे प्रथम नामदेवमहाराजांच्या
अभंगाप्रमाणे पाहणे सोपे
होते.
१)
आपण
रोज एका ठराविक वेळि ध्यान
करायचे ठरवतो.
पण
झोपेमुळे हे करणे जमतच नाही.
फार
काय ध्यानाला बसलो तरी मांडि
घातल्यावर पाय मांड्या दुखू
लागतात.
मग
ध्यान बाजूला राहते.
कधी
नको त्या आठवणी येतात व मन
प्रक्षौभित होते व ध्यान
बाजुलाच पडते.
२)
आपणस
जी कांही पद्धत ठरवलेली असते
उदाहरणार्थ एखादा श्री
साईबाबांची वा श्री गजानन
महाराजांच्या पोथीतला एखाद
अध्याय वाचण्याचे ठरवेल.
दुसरा
कोणी रोज ३-४
माळांचा संकल्प करेल.
ह्या
ठरवलेल्या संकल्पात कोणि
आजारी पडल्यामुळे,
कधी
घरी अचानक पाअहुणे आल्याने
, ईत्यादी
कारणामुळे ठरविलेले करू शकत
नाही.
३)
जप
किंवा ठरवलेले साधन करण्याच्या
ऐवजी एखादा सिनेमा पहाण्याची
ईच्छा होते व मग सर्व नंतर करू
असे आपण ठरवतो.
पण
ती नंतरची वेळ दरवेळी पुढे
ढकलली जाते.
आळस
झोप ही म्हणुनच परमार्थातलॆ
मोठे अढथळे समजले जातात.
आजकाल
कीर्तन नसते पण नामदेव
महाराजांच्या काळि कीर्तन
रोज सायंकाळि असे व लोक त्यासाठी
देवळामधे जात.
तेथेही
झोपणारे तेंव्हाही होते.
बरेच
वेळा सेमिनारमधे पेपर प्रेझेंटेशन
होताना लोक झोपतात हे आजही
दिसते.
४)
निवृत्तीनंतर
अनेकांना आपले पेंन्शन वा
संचित ठेवीवरचे व्याज पुरेल
की नाही ही काळजी करतात व जरी
सुस्थितीत रहाण्याची सोय
असली तरी परमार्थाकडे दुर्लक्ष
होते.
५)
ह्या
प्रकारचे अनेक विचार मनामधे
येतात ,
आपण
त्यांच्यावर कांही कार्य
करतो
आपल्या
पंचेंद्रियाना अनेक गोष्टींची
कांहिना कांहि कारणाने आठवण
होते व आपण मग त्यामागे लागतो.
उदाहरणार्थ
जुनी गानी ऐकाविशि वाटतात.
कधी
खाण्याची ई च्छा होते.
ईत्यादि.
ह्या
सर्वांना विषयसुख असे नामदेव
महाराजांनी म्हटले आहे.
ह्याप्रमाणे
विषयसुखाच्या मागे लागले की
परमार्थसाधन अर्थातच मागे
पडते हे कळत असते पण वळत नसते.
.ही
लढाई आपल्या स्वत:च्या
भगवंताकडे नेलेल्या वृत्ती
व मनाला येणारे हे विषयांचे
आकर्षण ह्यामधे सतत चालु असते.
आपल्याला
त्यांवर तोडगा काढावाच लागतो.
पण
ह्या धावपळीत परमार्थ साधन
अगदी सोपे देवाचे नांमस्मरण
करणे सुद्धा जमत नाही,
असे
नामदेवमहाराज त्यांच्या
अभंगात म्हणतात.
ह्यालाच
तुकाराम महाराजांनी सतत
युद्धाचा प्रसंगाला सामोरे
जाणे म्हटले आहे.
येथे
कोणी हा प्रश्न उपस्थित करेल
की मग आपल्या कर्तव्याला
तिलांजली द्यायची कां?
हा
तर पळपुटेपणाच होईल.
हे
म्हणणे अगदी बरोबरच आहे असे
म्हणावे तर मग परमार्थ साधन
सोडणेच य़ॊग्य म्हणता येईल.
ह्या
मुद्द्यावर असे म्हणतायेते
की तुकाराम महाराजांनी ह्यासाठी
नामाच्या साह्याने ह्या
सर्वावर विजय मिळवला हे सांगितले
आहे.
आपण
ही तोच उपाय करावा हेच महाराजांनी
सुचविलेले आहे.
म्हणुनच
पुनरावृत्तीचा दोष असूनही
हे नामस्मरण कसे करायचे तो
भाग लिहित आहे.
(ज्यांना
विस्ताराने पहायचे असेल
त्यांनी श्री.समर्थ
रामदास स्वामींच्या दासबोधातील
"नामस्मरणभक्तीचा
समास पहावा.
आणखी
माहितीसाठी श्री.
कामत
यांचे "नामस्मरणाचे
महत्व "
प्रकाशक
केश्अव भिकाजी ढवळे हे पुस्तक
(
रु.५०/-)
जरूर
वाचावे.)
१)
सततपणे
( जेंव्हा
वेळ मोकळा असेल तेंव्हा)
श्रीराम
, ॐ
नम:शिवाय
ईत्यादी आवडीच्या नामाचे
स्मरण करावे.
२)
"आहे
तितुके देवाचे"
हे
समजून घ्यावे.
जर
एखाद्या व्यवहारमधे कांही
नुकसान झाले,
तर
ह्या विचाराने आपला उद्वेग
नष्ट होऊ शकतो.
३)
जे
कांही आपल्या आयुष्यात घडते
ते देवाने आपल्या भल्यासाठीच
केले आहे ह्यावर श्रद्धा
विश्वास ठेवावा व शांत रहावे.कोणी
वाईट वागले ,
दुष्टपणे
व्यवहार केला ;
तर
ह्या विचाराने आपला उद्वेग
नष्ट होऊ शकतो.
४)
आपला
मी पणा टाकावा व त्यासाठी
भगवंतच कर्ता करविता आहे हे
स्वत:ला
नेहमी सांगत रहावे.
ह्यामुळे
आपल्याला वाटणारा वृथा अहंकार
कमी होतो.
५)
रोजच
आपला दिवस आपण कसा घालविला
ह्याचा न चुकता आढावा घ्यावा.
ह्या
आढाव्यामधे भगवंताची आठवण
किती वेळा राहिली नाही हे पण
पहावे.
व
मग पुढच्या दिवशी अशी चूक
करणार नाही ह्याबद्दल स्वत:लाच
सांगून पुढच्यावेळी तसे
वागण्याचा प्रयत्न करायचा.
६)
मुख्य
म्हणजे ह्या शिवाय भगवंतास
मनापासून शरण जावे.
त्याची
प्रार्थना करावी की मला योग्य
ती बुद्धी दे .
ज्यांनी
आपल्याला दुखावले त्यांना
पण क्षमा करावी,चांगली
बुद्धी दे"
अशी
पण प्रार्थना असावी.
समर्थांचे
रघूनायका मागणे हेची आता "
ह्या
नावाचे करूणाष्टक "ही
एक अत्यंत प्रभावी प्रार्थना
आहे.
स्तोत्रे
आहेत.
अभंगाची
शिकवण :-
तुकाराम
महाराज म्हणतात त्याप्रमाणे
नामाची कांस धरल्यास आपल्याला
अभंगात उल्लेखिलेली
लढाई नक्कीच जिंकता येईल.
सर्वच
संतांनी नामस्मरण ,
भगवंताचे
भजन कीर्तन करावे हाच सोपा
उपाय सांगितला आहे.तसेच
उपनिषदांनी सांगितलेला पण
जेंव्हा आपण असे स्मरण करण्यासाठी
सुरुवात करतो.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home