Friday, March 20, 2015

74A post Marathi :-अभंग १ ला काये करूनि करी धंदा । चित्त गोविंदा तुझे पायी 
अभंग २ रा :-एक धरिला चित्तीं । आम्ही रखुमाईचा पती 
 Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.in
 Contact mail address is rgphadke@gmail.com


अभंग १ ला :-
काये करूनि करी धंदा । चित्त गोविंदा तुझे पायी ॥ १ ॥
ऐसा संकल्पाचे संधी । माझे बुद्धी धीर द्यावा ॥ २ ॥
कुटुंबाचा तुम्हा भार । मज व्यवहार निमित्त ॥ ३ ॥
तुका म्हणे करिता काम । हृदयी नाम धरीन मीं ॥ ४ ॥

अभंग २ रा :-
एक धरिला चित्तीं । आम्ही रखुमाईचा पती ॥ १॥
तेणें झाले अवघें काम । निवारला भवश्रम ॥ २ ॥
परद्रव्य परनारी । झाली विषाचिया परी ॥ ३ ॥
तुका म्हणें फार । नाही लागत व्यवहार ॥ ४ ॥

अभंगच्या अर्थासाठी असलेली पार्श्वभूमी :-

ह्या आधिच्या post मधे तुकाराम महाराजांनी स्वत: सतत भगवंताचे अनुसंधान कसे ठेवले होते तो अभंग आपण पाहिला. ह्या दोने अभंगात तोच विषय पुढे नेलेला आहे.

ह्यातला पहिला अभंग भगवंताला संपूर्ण शरणागत भक्ताचे वर्णन करणारा
तर
दुसरा त्यामुळे घडलेले परिणाम सांगणारा असे आहेत.

नामस्मरण करणारी भक्ती पुढे पुढे सख्यभक्तीमधे रूपांतरित होते.हे पण ह्या अभंगामुळे स्पष्ट होते.
ज्याचा सखा प्रत्यक्ष भगवंतच आहे त्याला ह्या संसारात काय मिळवायचे राहिले? उत्तर हेच की कांही नाही. त्याला भगवंताचे सख्य मिळाले की सर्व कांही मिळते.
महाभारतात अर्जूनाला , गोपींना, उद्धवाला हे भाग्य लाभले होते. मीराबाईंचे उदाहरण पण आहे.
भगवंताने गीतेच्या विश्वरूप दर्शन अध्यायाच्या शेवटी शरणागत भक्ताचे ह्या लोकात कसे वर्तन असते ते खालील श्लोकामधे साघितले आहे.
मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्त: सङ्गवर्जित:
निर्वैर: सर्वभूतेषू य: स मामेति पाण्डव ॥ ११-५५॥

जो पुरुष सर्व कर्मे माझी म्हणजे परमेश्वराची होत ह्या बुद्धीने कर्म करतो,मत्परायन होऊन राहतो, माझी भक्ति करतो, आसक्तीरहित असतो व कोणत्याच भूताचे ठायी वैर करीत नाही; तो मलाच येऊन मिळतो.

ह्या अभंगांचा अर्थ पाहिला की हेच समोर येते की तुकाराम महाराजांनी वरील प्रमाणे जगामधे कसे जगायचे ते सोप्या शब्दांद्वारे आपल्याला सांगितले आहे.


अभंगाचा शब्दार्थ :-
अभंग १ ला :- मी माझ्या शरीराने जगातले सर्व व्यवहार करेन. ( पण) माझे चित्त हे गोविंदा तुझ्या पायाशी ठेवेन.असा हा संकल्प केला आहे ह्या संकल्पासाठी मला दोन्ही पातळिंवर ( शाररिक व मानसिक ) एकाच वेळी रहायचे आहे. ते करता येणे मला कठीण वाटते व तूच बुद्धी दे. असा व्यवहार करणे हे फक्त एक निमित्त आहे.
तुका म्हणतो की ( मी तुझ्या चरणी सर्व अर्पण केले आहे म्हणून माझ्या कुटुंबाचा भार ( योगक्षेम चालवणे) तुझ्यावरच आहे. मी काम करताना तुझे नाम अंत:करणात धरूनच सर्व कामे करेन.

अभंग २ रा:-
मी रखुमाईचा पती ( विठ्ठल ) ह्याचाच ध्यास मनामधे धरलेला आहे.त्यामुळे माझे सर्व काम झाले व ह्या भवसागरांत जगताना जे श्रम होतात त्यांचे निवारण झाले. माझ्यासाठी परद्रव्य व परनारी दोन्ही विषासमान आहेत. तुका म्हणतो की असे वागायला व्यवहार आडवा येत नाही.

अभंगाच्या अर्थाचे स्पष्टीकरण :-

पहिल्याच ओळित हे स्पष्ट होते की आपण आपले सर्व व्यवहार सोडायचे नाही आहेत , पण त्यां मागची आपली मानसिकता बदलायची आहे.

जोवर आपण म्हणतो की मी करणारा आहे , मी हे केले ते, करीन तेंव्हा आपण सर्व कर्तृत्व कळत व नकळत स्वत:कडे घेत असतो. शिवाय मी जे करतो आहे त्याचा परिणाम अस-असा व्हावा ही अपेक्षा पण आपल्या मनामधे असते.जर मनाप्रमाणे झाले तर सुख होते व मनाविरुद्ध झाले तर दु:ख होते. अर्थातच केलेल्या कर्माची फळे आपल्यालाच भोगावी लागतात.

ह्याशिवाय जर केलेल्या कर्माचे फळ ह्या जन्मामधे भोघणे झाले नाही तर ते भोगण्यासाठी पुन: जन्म घ्यावा लागतोच.
ह्यावरचा उपाय म्हणजे भगवंतालाच शरण जाणे व त्याच्याकडे प्रार्थना करणे जी सर्व कांही तुझ्यामनाप्राणे माझ्याकडून करवून घ्यावे. असा जो वागेल त्याला भगवंत धीर देतो. फार काय स्वत: दिलेल्या वचनाप्रमाणे ( भगवद्‍गीतेत हे वचन आहे)भगवंत स्वत: अशा भक्ताचा योगक्षेम चालवतो.
शरणगेल्यावरती जर आपण भगवंतालाच स्मरून आपली कामे केली तरच असे घडते हे तुकाराम महाराज समजून आहेत व म्हणूनच अभंगाच्या शेवटि ते म्हणताहेत की भगवंताचे स्मरणकरूनच ते सर्व व्यवहार करतील.

पुढचा अभंग वरील प्रमाणे भगवंताचे स्मरण कर्त सर्व कार्ये केल्याने काय परिणाम्क झाले ते सांगतान पुढच्या अभंगात महाराज म्हणतातहेत की त्यांना आता पांदुरंगाह्चाच ध्यास लागला आहे. त्यामुळे त्यांची वर्तणुक वागणे सर्वकांही पहिल्या अभंगात लिहिल्याप्रमाणे होते आहे.

सर्वकर्ता सर्वभोक्ता पांडुरंगच झालेला अहे त्यामुळे मनात होणारी सुखदु:खांची आंदोलने अर्थात हवेनकोपणाने होणारी सुखाची वा दु:खाची जाणिव आता होत नाही आहे. मनास शांती मिळाली आहे मन निवले आहे

अभंगातल्या पुढच्या चरणांमधे परद्रव्य व परनारी हे शब्द तुकाराम महाराजांनी वापरले आहेत. त्यांचा अर्थ प्रथम लक्षाण्त घेणे आवश्यक आहे.

परद्रव्य ह्या शब्दाचा अर्थ पैशाची वासना व परनारी म्हणजे मनाकडे येणारे जे पांच प्रकारचे विषय ( )सौंदर्य डोळ्याचा विषय, )जीभेचा विषय चव, )त्वचेचा स्पर्श, )नाकाचा विषय सुवास ,) कानांचा विषय गोड आवाजात होणारे स्संभाषण, गाणे )त्यांचाकडे पाहण्याची द्रूष्टी असा घेणे योग्य ठरते. सर्वसाधारणत: पैसा असला की माणूस व्यसनांकडे म्हणजे विषयोपभोगांच्या आधीन होण्याचि शक्यता जास्त वाढते.

तुकाराम महाराज अभंगाम्धे पुढे असे म्हणताहेत की (भगवताचा ध्यास लागल्यामुळे सर्वत्र तोच आहे हे कळले आहे व म्हणुनच ) आता मनाला परद्रव्य व परनारी हे सर्व विषासमान म्हणजेच आपला घात करणारे आहेत असे वाटायला लागले आहे. अर्थात त्यांची आसक्ती आता उरलेली नाही.

हे परिणाम वर्णनकरून झाल्यावर महाराज शेवटी स्वत:चा अनुभव हाच सांगताहेत की "असे वागायला जगातला व्यवहार आड येत नाही" अर्थात भगवद्‍भक्तीच्या आड व्यवहार येत नाही.

अभंगाची शिकवण : 
संत जो कांही उपदेश करतात तो प्रथम स्वत: अनुभव घेऊन मग नंतरच करतात. महाराजांचा अभंग तर हे स्पष्टच करतो की त्यांनी ह्या अभंगामधे जे सांगितले आहे त्याप्रमाने त्यांचा स्वत:चाही अनुभव आहे. स्वत:चे अनुभवाचे बोल सांगून महाराजांनी आपल्यावर उपकारच केले आहेत.
ह्या उपकाराचे उतराई होण्यासाठी आपण त्यांच्या उपदेशाप्रंमाणे वागून भग्वंताची भेट होण्यास म्हणजेच मोक्षाचे अधिकारी व्हावे हीच येथे शिकवण आहे.
***************************************




0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home