69 B th Post in Marathi अज्ञानाची भक्ति इच्छिती संपत्ती । तयाचियें चित्तिं बोध कैचा
Blog address : http: // tukaramasteachings.blogspot.in
Contact mail address is rgphadke@gmail.com
Blog address : http: // tukaramasteachings.blogspot.in
Contact mail address is rgphadke@gmail.com
अज्ञानाची
भक्ति इच्छिती संपत्ती ।
तयाचियें चित्तिं बोध कैचा
॥ १॥
अज्ञानाची
पूजा कामिक भावना । तयाचियें
ध्यानां देव कैंचा ॥ २ ॥
अज्ञानाचें
कर्म फळीं ठेवी ध्यान । निष्काम
साधन तया कैंचें ॥ ३ ॥
अज्ञानाचें
ज्ञान विषयांवरी ठेवी ध्यान
। ब्रह्म सनतन तया कैंचें ॥
४ ॥
तुका म्हणे
जळो ऐशियाचें तोंड । अज्ञानाचें
बंड वाढविती ॥ ५॥
शब्दार्थ
:-
अज्ञानी
माणसांची भक्ती संपत्ती साठी
असते मग त्यांना भगवंत कसा
भेटेल?॥
१॥
अज्ञानी
जनांची पूजा सकाम असते मग
त्यांना देवाचे ध्यान कसे
करता येईल?॥
२॥
अज्ञानी
माणसाने केलेले कर्म फळाची
आशा टेवून केलेले असते,
अशांना नि:ष्काम
साधनाचे महत्व कसे कळेल?॥
३॥
अज्ञानी
जनांचे ज्ञानाची व्याख्या
विषयांचे ज्ञान अशी असते मग
सनातन ब्रह्माचे ज्ञान त्यांना
कसे कळणार?॥
४॥
तुका
म्हणतो की जे लोक अशा विषयांवर
आधारित ज्ञानाचे बंड वाढवतात
, अशांचे
तोंड जळॊ!
॥ ५॥
अभंगाचा
गर्भित अर्थ समजण्यासाठी
लागणारी भूमिका :-
नुकतीच
गणेश चतुर्थी सर्व देशभर साजरी
केली गेली. श्री.गणेशाचे
रूप दोन प्रकारचे आहे. पहिले
खरे अव्यक्त रूप अर्थात
अध्यात्मिक रूप व दुसरे आपल्याला
माहीत असलेले सगूण रूप. आपण
ह्या सगुणाचीच पूजा करत असतो..
पण
खरेतर गणेश म्हणजेच परब्रह्म
.ॐ
कार हे त्याचे प्रतीक आहे.
ॐ चे पाच भाग
आहेत. १)
अ अक्षर जागृत
अवस्था(
शरीराची )
दर्शविते.
२)
उ अक्षर स्वप्नावथा
दर्शविते ३)
म अक्षर सुषुप्तिचे
दर्शक आहे,
४)
अर्धमात्रा
तुर्येचे दर्शक आहे व बिंदू
उन्मनी अवथा दर्शवितो.
गणेश हा ह्या
सर्वापलीकडचा आहे .
तोच सर्व
ब्रह्मांडाचा जनक होय.
म्हणजे तोच
सॄष्टीमधल्या प्रत्येक
प्राणिमात्रांचा ,
आपला खरा आईबाप
दोन्ही आहे.
म्हणून त्याला
"गणनायक"
असे पण संबोधतात.
आपण
म्हणूनच कोठलेही कार्य सुरू
करण्याआधी त्याचे स्मरण करून
कार्यसिद्धीसाठी त्याची
प्रार्थना करतो.
आपण
जे सगूण रुप नेहमी पहातो ;
ते ॐ कारावर
आधरित आहे व त्याचा उगम
गणपतीअथर्वशीर्षा मधे आहे.
ह्या सगूण
रुपाचा अर्थ आपल्याला ज्ञानेश्वरी
मधे तसेच अनंतराम रामदासी
ह्यांच्या दासबोध प्रवेश
ह्या पुस्तकांमधे वाचावयास
मिळतो.
ॐकार सगूण व
अव्यक्ताला जोडणारा तसेच
भगवंताचे नाम पण आपल्याला
अव्यक्ताशी जोडते.
भगवंताचे
अव्यक्त रूप हेच सगुणामगचे
अधिष्ठान आहे हे लक्षांत घेणे
महत्वाचे आहे.
अशा
ह्या भगवंताचे दर्शन घ्यायचे
झाले तर आपल्याला अध्यात्माकडेच
वळावे लागते हे देवदर्शन झाले
की माणसाच्या सर्व दु:खाचे
नेहमीकरता निरसन होते.
.हाच मोक्ष
होय.
कसे ते आता
थोडक्यांत पाहूया.
सर्वसाधारणत:
ईश्वराच्याकडे
माणसे कां वळतात हे जर पहायचे
झाले तर असे आढळते की दु:खनिवृत्ती
हवी म्हणुन ईश्वराची आराधना
केली जाते.
आपल्याला अनेक
प्रकारची दु:खे
,
ताप भोगायला
लागतात.
उदाहरणार्थ
:-
१)
कठीण लवकर बरे
न होणारे आजार .
त्यातून लवकर
बरे व्हावे म्हणुन लोक भक्ति
कडे वळतात.
२)
जेंव्हा एखादी
घटना मनाप्रमाणे होत नाही
तेंव्हा.
३)
जवळची व्यक्ती
मृत्यू पावते तेंव्हा .
४)
कोणी आपला अपमान
केला,
रागावले तर.
५)
ईतरांना होणारा
ताप पाहिल्यावर होणारी चिंता
की आपल्यावर तर अशी वेळ येणार
नाही नां?
६)
जुने गेलेले
चांगले दिवस व त्यावेळच्या
आठवणी आल्या की दु:ख
होते.
जर
यादीच करायचे ठरवले तर ही यादी
कधीही न संपणारी होईल.
ह्यातली
कांही दु:खे
शरीराला व कांही मनास होतात.
मनामुळे
शरीराला होhÉÉîrÉÉ
दुखा:ची
जाणीव होते.
ह्या
व असल्या सर्व दुखा:तून
आपल्यातल्या प्रत्येकाला
मुक्ती म्हणजे निवृत्ती हवी
असते.
कांहीपासून
आपल्याला तात्पुरती दुख:निवृत्ती
मिळते.
उदाहरणार्थ
:-
जर
योग्य औषध घेतले तर आजार बरे
होतात.
पेनकिलर
घेतले तर शरीरास होणारे दुख:
जाणवत
नाही. मूळ
कारण जोपर्यंत नष्ट होत नाही
तोवर ही असली दुख:निवॄत्ती
तात्पुरती असते. पुढे
कधीतरी पुन:
आजार
होतातच.
हा
आपला सर्वांचाच अनुभव आहे.
कारणाचा समूळ नाश करणे
शक्य आहे कां ? ह्या
प्रश्नावरचे उत्तर होय असेच
आहे. ते म्हणजे "
अज्ञानाचा नाश होणे
" हे आहे. जेंव्हा
अज्ञानाचा नाश होतो तेंव्हा
ज्ञानोदय होतो. ह्यालाच
आत्मज्ञान अशी संज्ञा अध्यात्मात
आहे. असे आत्मज्ञान
झाले की उरतो तो फक्त निखळ
आनंद . ह्या स्थितीलाच
मोक्ष हे पण नांव आहे. ह्या
स्थितीपर्यंत जाणे हाच सर्व
अध्यात्माचे ध्येय आहे.
तुकाराम महाराजांच्या
ह्या अभंगामधे आपल्याला
अज्ञानाची म्हणजेच दुख:
होण्याची ची मूळ मुख्य
लक्षणे ( कारणे )
महाराजांनी सांगितली
आहेत. त्यावरून आपण
काय करायचे ते सहजच समजते.
व जो असे समजल्यावर
योग्य ते आचरन करतो त्याचे
मन शुद्ध होते व तो आत्मज्ञानासाठी
पात्र होतो.
येथे हे पण लक्षांत
घ्यायचे आहे की जोपर्यंत
आपल्याला जन्म आहे तोवर दु:ख
हे सोसावे लागणारच. म्हणुन
जन्ममृत्यू चक्रामधून सुटका
होणे महत्वाचे ठरते. जन्म
घ्यावे लागतात ह्यचे कारण
अज्ञान हेच आहे. व
म्हणूनच महाराजांचा हा अभंग
मह्त्वाचे मार्गदर्शन करणारा
आहे.
जन्म
येंण्याचे कारण म्हणजे आपल्या
मनाची बाह्य सृष्टीतल्या
वस्तूंची आसक्ती हेच आहे.
आसक्तीचेच
दुसरे नांव वासना.
वासना
अंत:करणात
बीजरूपाने साठविल्या जातत
व त्यांची पूर्ती व्हावी
म्हणून जीवाला शरीरधारणा
करावी लागते.
अर्थात
जन्म झाल्याक्षणीच आपण
अज्ञानाच्या वेढ्यात अडकतो.
ह्यातून सुटण्याचे
दोन मह्त्वाचे मार्ग आहेत.
१) ज्ञानमार्ग
२) भक्तिमार्ग.
खालील
प्रसिद्ध श्लोकामधे एक महत्वाचा
मुद्द सांगितलेला आहे.
"आकाशात्
पतितं तोयं , यथा
गच्छति सागरं ; सर्वदेव
नमस्कारान् केशवं प्रति
गच्छति ””
श्लोकाच
अर्थ हाच आहे की जसे आकाशातून
पडलेले पाणी शेवटी सागरालाच
जाऊन मिळते तसेच कोणत्याही
देवाला केलेला नमस्कार शेवटी
केशवालाच पोहोचतो.
म्हणजेच
कोणत्याही मार्गाने गेले तरी
शेवटी भगवंताची भेट म्हणजे
आत्मज्ञान होते.
भगवद्गीतेमधे
भगवान श्रीकृष्ण हेच सांगतात
की आत्मज्ञान झाल्याविना
मुक्ती नाही.
श्रिमद्
शंकराचार्य प्रसिद्ध "भजगोविंदम्
स्तोत्राच्या शेवटच्या श्लोकान
म्हणतात
कुरुते
गंगा सागरगमनम् । व्रतपरिपालन
अथवा दानम् ।
ज्ञानविहिनं कर्ममनेन
। मुक्तिर्नभवति जन्म शतेन
॥
अर्थ:-
माणसाने गंगेमधे
स्नान केले ,
किंवा समुद्रस्नान
केले, अथवा
अनेक वेगवेगळी व्रते केली,
दानधर्म केला
तरी जर ज्ञान झाले नाही तर हे
सर्व व्यर्थ आहे.
शंभर किंवा जास्त
जन्मभर जरी हे सर्व केले तरी
आत्मज्ञानविना मुक्ती मिळणार
नाही.
आत्मज्ञान
अर्थात ज्ञान होणे म्हणजे
अज्ञानाचा समूळ नाश हॊणे होय.
म्हणुनच असे
म्हणतात येते की ज्ञानमार्ग
असो वा भक्तीमार्ग ,
मुख्यत:
अज्ञानाचा नाश
होणे महत्वाचे आहे.
अज्ञान
म्हणजे काय ह्या प्रश्नाचे
उत्तर समजणे आवश्यक आहे.
त्यासाठी
अज्ञानाची लक्षणे समजणे हेच
उत्तम.
तसेच अज्ञानचा
उगम कशामधे आहे तेही समजणे
मह्त्वाचे ठरते.
सर्व शास्त्रे,
स्वनुभवी संत,
वेदांत हेच
सांगतो की "
मीपणा ,
अहंकारामधे
अज्ञानाचे मूळ आहे.
मीपण जन्म
होतक्षणीच प्रगट होतो व जीव
स्वत:लाच
कर्ता,
भोक्ता समजू
लागतो.
तसेच त्याला
हे दॄश्य जगत व ह्या जगामधले
सर्वकांही आपल्याला खरे सुख
देणारे आहे असे वाटू लागते व
त्यामुळे दृश्यावर जीवात्मा
आसक्त होतो.
असो.
तुकाराम
महाराजांचा हा अभंग ह्याच
अज्ञानाच्या निरनिराळ्या
रूपांचे
स्पष्टीकरण करणारा आहे.
एकदा
कां आपल्याला हे समजले की मग
पुढची कारवाई करणे सोपे जाते.
ह्या
पार्श्वभूमीवरून आता अभंगाचा
अर्थ काय आहे ते पाहता येते
व तोच भाग पुढे दिलेला आहे.
अभंगाचे
अर्थस्पष्टीकरण :-
अभंगाच्या
पहिल्या पंक्तीमधे महाराज
म्हणतात की
अज्ञानाची
भक्ति इच्छिती संपत्ती ।
तयाचियें चित्तिं बोध कैचा
॥ १॥
अज्ञानी
माणसाला असे वाटते की पैसा,
संपत्ती जवळ
असेल तर सर्व सुखे मिळतील.
परंतू खरेतर
प्रत्येकाचा अनुभव ह्याच्या
उलट असतो.
भरपूर संपत्ति
असल्यास माणूस आळशी होतो.
मग स्वत:ला
जी साधी कामे करता येतात ती
सुद्धा नोकरचाकरांकडून करून
घेतली जातात.
ह्यामुळे
सरतेशेवटी रोगांना आमंत्रण
मिळते ,
दु:खच
पदरात पडते.
तसेच
पैसा वापरून पंचेंद्रीयांच्या
आनंद भोगाकडे प्रवृत्ती
वाढतेव.
पण प्रत्येकाचा
हाच अनुभव आहे की कोणत्याही
बाह्य वस्तूकडून शरीराला
मिळालेले सुख क्षणीकच असते.
असे सुख भोगल्यावर
त्याची आठवण चित्तमधे साठविली
जाते.
नंतर कांही
तरी निमित्तने ती उसळते व तेच
सुख परत परत मिळावे असे वाटते.
पण जसेजसे वय
वाढते तशीतशी शरीराची सुख
भोगण्याची क्षमता कमीच होते.
पण वासना उरतेच
व अशा स्थितीत मृत्यू आला तर
पुन: ती
वासनापूर्ती व्हावी म्हणून
जन्म घ्यावा लागतो.
असे हे चक्र
सतत चालूच रहाते.
म्हणून महाराज
म्हणताहेत की जर असे विचार
असतील त्याला ज्ञान कसे मिळेल
? अर्थातच
मिळणार नाही
एकंदरीत
असे म्हणतायेते की जन्म होंणे
हेच दु:खमय
आहे.
पुन:जन्म
टाळंण्यासाठीच प्रयत्न करायला
हवेत.
अभंगाच्या
दुसîrÉÉ
व
तिसîrÉÉ
पंक्तीमधे
महाराज म्हणतात की
अज्ञानाची
पूजा कामिक भावना । तयाचियें
ध्यानां देव कैंचा ॥ २ ॥
अज्ञानाचें
कर्म फळीं ठेवी ध्यान । निष्काम
साधन तया कैंचें ॥ ३ ॥
येथे
बरेच लोक पूजा पाठ कां करतात
ह्यावर महाराजांची टिप्पणि
आहे.
अनेक
अज्ञानी लोक आपल्याला पूजा
पाठ होम हवन करताना आढळतात.
कशासाठी?
तर मला देवाने
आयुष्य,
आरोग्य,
धनसंपत्ती
ईत्यादी सर्व द्यावे म्हणुन.
पूजेचा संकल्प
हाच असतो.
ह्यालाच कामिक
भावनेने केलेली पूजा म्हटले
आहे. तसेच
अशी अज्ञानी मंडळी जे कांही
कर्म करत असतात ते कर्म पण
केलेल्या कर्माचे मनाप्रमाणे
फळ मिळावे ह्याच उद्देशाने
केले जाते.
जर तसे फळ मिळाले
तर आनंद होतो नाही मिळाले तर
दु:ख
होते.
खरेतर
पूजा ही भगवंतावरील प्रेमाने
व्हायला हवी पण असा भाव असणारा
एकादाच असतो.
सुरवातीला
म्हटल्याप्रमाणे भगवंत सुद्धा
पूजापाठाचे हवे ते फळ देतोच.
पण असे फळ ईच्छिणे
म्हणजे कल्पवृक्षाकडे कवड्या
मागण्यासारखेच आहे.
मग अशा माणसाला
मुक्ती कशी मिळेल !अर्थातच
मिळणार नाही.
पाँडेचरीच्या
माताजींचे एक वचन आहे .
माताजी म्हणतात
की "
प्रत्येक कर्म
हे भगवंताची पूजा करतो आहे
ह्या भावनेने करावे .
मग साधे झाडण्याचे
काम सुद्धा भगवंताची पूजाच
होते व ते कर्म भगवंताजवळच
नेणारे होते.”
हाच मुख्य
मुद्दा वरच्या पंक्तिंमधे
तुकाराम महाराजांनी सांगितला
आहे.
अभंगाच्या
४ थ्या पंक्तींमधे
महाराज म्हणताहेत की
अज्ञानाचें
ज्ञान विषयांवरी ठेवी ध्यान
। ब्रह्म सनतन तया कैंचें ॥
४ ॥
अज्ञानी
जन जगामधे कसे जगतात ते ह्या
पंक्तिंमधे तुकाराम महाराजांनी
सांगितले आहे.
अज्ञानी माणसाचे
मन नेहमीच बाह्य सृष्टिमधून
मिळणाîrÉÉ
( पंचेंद्रियांच्या
विषयांकडून मिळणाîrÉÉ
) सुखाकडे
लागलेले असते.
डोळे
दृष्टिसुख (
सुंदर
दिसणारी वस्तू पाहिली की
मिळणारे)
मागतात,
कान
गॊड गाणी व बोलणे मागतात,
नाकाला
सुगंध हव असतो,
त्वचेला
स्पर्शसुख हवे असते,
रसनेला
चवीचे खाणे पिणे हवे असते.
ह्या
सर्वांपासुन आनंद घेते ते
मन.
मन
हे आपल्या "
मीपणा"
चाच
एक भाग आहे पूर्वी मिळालेल्या
आनंदाची आठवण आपल्या चित्तामधे
असते ती कांही कारणाने उफाळून
वर आली की मनाला तोच आनंद परत
हवासा वाटतो.
सर्व
हवे-नकोपण
मनाचेच असते.
हवीशी घटना
घडली नाही,
हवीशी वस्तू
, भोग
मिळाला नाही,
मनासारखे
झाले नाही की मग दु:ख
होते.
फार काय
जुन्या आठवणिमुळे सुद्धा मन
दु:खी,
क्षुब्ध
होते.
मृत्यूची
भीती,
असाध्य
आजारांची भीती मनामुळेच आपण
जाणतो.
असो.
लिहावे
तेवढे कमीच असेल.
जर आपण
जनावरे कशी जगतात हे पाहिले
तर असे आढळते की त्यांना पण
अन्न,
झोप,
भय व मैथून
हेच व एवढेच समजते.
म्हणुनच
एका सुभाषितकाराने म्हटले
आहे की जर माणुस पण फक्त आहार,
निद्रा,
भय व मैथुन
ह्याच्यासाठीच जगत असेल तर
तो शिंगे नसलेला पशूच होय.
थोडक्यांत
असे म्हणता येईल की अज्ञानी
व पशू यांच्यामधे फारसा फरक
नसतो.
म्हणुनच
तुकाराम महाराज हेच सांगताहेत
की अशारीतीने जगणाîrÉÉ
माणसाला
कधीच मोक्ष मिळणार नाही.
ह्याचाच
अर्थ हा की तो जन्म-मृत्यूच्या
चक्रामधेच भटकत राहील.
अभंगाचा
शेवटचाचरण खालील प्रमाणे
आहे.
तुका
म्हणे जळो ऐशियाचें तोंड ।
अज्ञानाचें बंड वाढविती ॥ ५॥
पण बरीच
मंडळी हे सर्व थोतांड आहे
वगैरे सांगून लोकांचा बुद्धीभेद
करतात.
अशा रीतीनेव
अज्ञानाचे महत्व वाढवणाîrÉÉ
अशा लोकांचे
तोंड जळॊ असे उद्गार अभंगाच्या
शेवटी महाराजांनी काढले आहेत.
ह्याचे
कारन हेच आहे की संतांना असेच
वाटते की प्रत्येकाने आपल्या
नरजन्माचे सार्थक मोक्षासाठी
योग्य ते प्रयत्न करून घ्यावे.
मोक्षानेच
सर्व दु:खातून
सुटका आहे.
अभंगाची
शिकवण:-
आतापर्यंतच्या
विवरनावरून हे स्पष्टच आहे
की बाह्यसॄष्टिमधील कोणतीही
वस्तू आपल्याला न संपणारा
आनंद देऊ शकत नाही.
प्रत्येक वस्तू
नाशवंतच आह म्हणुन अशा वस्तूपासून
मिळनारा आनंद पण क्षणीक म्हणजे
नाशवंतच असतो.
तसेच मनाच्या
हवे-नकोपणा
च्या स्वभावामुळे आपण अज्ञानाच्या
अंमलाखाली येतो व हे अत्यंत
न-कळत
घडत असते.
अर्थात आपण
मनाच्या आधिपत्याखाली असल्याने
हे सर्व घडते.
म्हणून ह्यातून
बाहेर यायचा उपायच करणे आवश्यक
आहे.
सर्व संतांनी
एक उपाय सांगितला आहे तो खालील
प्रमाणे.
उपाय मणजे
भगवंताची भक्ती करणे .
त्यासाठी खाली
लिहिल्याप्रमाणे आचरण ठेवावे
लागेल.
१)
हे समजून घ्यायचे
की फक्त भगवंतच शाश्वत खरा
आहे. बाकी
सर्व( धन,
संपत्ती,
बयको,मुलेबाळे
, मित्र
घरदार ईत्यादी )
अशाश्वत आहे.
म्हणुन ह्या
अशाश्वताची आसक्ती ठेवायची
नाही.
आसक्ती
मधे अपेक्षा असतात.
प्रेमामधे
अपेक्षा नसतात.
म्हणून सर्वांवर
निरपेक्ष प्रेम असावे,
आसक्ती नसावी.
२)
करीत असलेली
प्रत्येक क्रिया ही भगवंताची
पूजा आहे ह्या भावनेने करावी.
३)
नेहमी लक्षांत
ठेवावे की कर्ता व करविता,
तसेच भोक्ता पण
मी नव्हेतर भगवंतच आहे.
हे सर्व एकदम
जमणारे नाही पण प्रयत्न करणे
आपल्याच हाती नक्कीच आहे.
मला वाटते
की हीच ह्या अभंगाची शिकवण
आहे.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home