Added 58B मुखें बोले ब्रह्मज्ञान to Abhanga a week of Sant Tukarama.
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.in
Contact mail address is rgphadke@gmail.com
मुखें बोले ब्रह्मज्ञान । मनीं धन आणि मान ॥ १ ॥
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.in
Contact mail address is rgphadke@gmail.com
मुखें बोले ब्रह्मज्ञान । मनीं धन आणि मान ॥ १ ॥
ऐशियाची करिंतां सेवा
। काय सुख होये जीवा ॥
पोटासाठी संत । झाले
कलींत बहुत ॥ ३ ॥
विरळा ऐसा कोणी । तुका
त्यासि लोटांगणी ॥ ४॥
अभंगाचा अर्थ :-
ह्या अभंगामधे तुकाराम
महाराजांनी दांभिक गुरु कसे
असतात ते सांगितले आहे व
आपल्याला गुरुंची निवड करताना
काळजी घ्यावी हेच सुचविले
आहे.
पहिल्याच ओळींत महाराज
म्हणताहेत की ब्रह्मज्ञानाच्या
गप्प करणारी अनेक मंडळी आपल्याला
आढळतात. अशा लोकांची
स्थिती म्हणजे " लोकांसांगे
ब्रह्मज्ञान व आपण कोरडा पाषाण
" अशीच असते.
अशी दांभिक माणसे
पैसा, संपत्ती व
कीर्ती मिळावी म्हणून हा
खटाटॊप करत असतात. सध्याच्या
कलीयुगामधे असे बरेच लोक झाले
आहेत.
असल्या दांभिक गुरुकडुन
तुम्हाला कांहीही मिळत नाही
हे लक्षांत घ्यावे.
अभंगाच्या शेवटी
महाराज म्हणतात की जर असा खरा
ब्रह्मज्ञानी कॊणी असेल तर
महारज त्याच्या पायी लोटांगण
घालतील.
अभंगाची शिकवण :-
तुकाराम महाराजांच्या
कालांत जसे दांभिक लोक होते
तसेच आजच्या काळांतही आहेत.
परिस्थिति कांही फार
वेगळी नाही.
आपला गुरु निवडताना
तो खरेच ब्रह्मज्ञानी आहे की
नाही याची खात्री करून घ्यावी
व नंतरच अशा सद्गुरुंना शरण
जावे असा गुरू ओळखणे पण कठीणच
असते..
ब्रह्मज्ञानी संताचे
वाङ्मय म्हणजेच संतांचे रूप
होय. असे वांङ्मय
वाचणे, मनन करून
त्या मधील उपदेशाचाचा खरा
गूढार्थ उकलून काढणे व त्या
उपदेशाप्रमाणे आचरण ठेवणे
हे करणे मात्र आपल्याला सोपे
व साधण्यासारखे आहे. असे
आचरण होऊ लागले की योग्य वेळी
सद्गुरूची भेट सहजपणे घडते.
“ एका योग्याची आत्मकथा
( Autobiography of a Yogi) ह्या
स्वामी परमहंस योगानंद ह्यांच्या
पुस्तकामधे अशा प्रसंगाचे
वर्णन आहे.”
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home