Friday, September 18, 2015

77th MarathI  post on सावध राहाण्यावर
 Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com


स्मरणाचे वेळें ।व्हावें सावधान कळें।| 1 || पडिलो विषयांचे ओढी । कोणी न दिसेसे काढी ॥ 2
भांडवल माझें । वेच झालेंभूमी ओझे || 3 || तुका म्हणें कळें। तू चि धावे ऐसें कळें ॥4

शब्दार्थ :-

भगवंताचे स्मरण करताना माझी वृत्ती सावध ठेवावी हे मला कळत नाही. ॥ १॥
मी विषयांच्या तावडित सापडलेलो आहे, व मला यातून कोणी सोडवेल असे वाटत नाही ॥ २॥
माझे जे भांडवल होते ते सर्व खर्च झाले आहे आणी ह्या देहाचे भूमीला ओझें झाले आहे ॥ ३॥
तुका म्हणतो की हे देवा आता तूंच धावून यावे असे मला वाटते ॥ ४॥
अभंगाचा अर्थ समजण्यासाठी लागणारी माहिती :-

ह्या अभंगामधे तुकाराम महाराजांनी देवाच्या भेटीची आस लागलेल्या मुमुक्षू भक्ताच्या मनस्थितीचेच जणू वर्णन केलेले आहे. अशा भक्ताला हे कळलेले आसते की भगवंताच्या भेटी साठीच आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे व त्यासाठी प्रयत्न पण त्याने सुरु केलेले असतात. परंतू जरी मुमुक्षत्वाचा मनमधे उदय झालेला असला तरी ती अगदी सुरवातीची अवस्था म्हणजे जवळजवळ बद्धावस्थाच असते. त्यामुळे मनात असूनही मन बाह्य भोगांकडे व विषयांकडे धावत असते. आपले प्रयत्न अपुरे पडत आहे हे कळत असते . थोडक्यात कळते पण वळत नसते. अशावेळी भक्ताला आपल्याला परमार्थसाधना जमत नाही याची खंत वाटत असते.
आपण सर्वचजण साधारणत: सध्या मनाच्या ह्या अशा स्थितीत आहोत म्हणुनच आपल्यासाठी हा अभंग महत्वाचा आहे.
अभंगाच्या अर्थाचे स्पष्टीकरण :-
अभंगाच्या पहिल्याच चरणामधे तुकाराम महाराजांनी "सावधान व्हावे "असे शब्द लिहिले आहेत. सावधान व्हायचे ते भगवंताच्या भेटीच्या प्रयत्नांमधे यश मिळावे म्हणून. पण आपण असे खरेच सावधान आहोत कां ? हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:स विचारायला हवा .असो. ”


अर्थात जर आपल्याला आपल्या बेसावध असण्याचे मूळ कारण कोणते आहे हे कळले तर मग योग्य तो उपाय करणे शक्य आहे.
तुकाराम महाराजांच्या खालील अभंगात आपल्याला महाराजांनी हे मूळ कारण सांगितले आहे.

पडिली हें रूढी जगा परिचार । चालविती वेव्हार सत्य म्हणुनि ॥ १॥
मरणाची कां रे नाही आठवण । संचिताचें धन लाभ ठेवा ॥ २॥
देहाचें भय तें काळांचे भातुकें । ग्रासुनी तें एकें ठेविलेसें ॥ ३ ॥
तुका म्हणें कांही उघडां रें डोळें । जागोनिं अंधळे होऊं नका ॥ ४ ॥

ह्या अभंगात " मृत्यू आपल्यावर केंव्हाही झडप घालेल ( नरजन्माची अमोल संधी व्यर्थ जाईल) ह्या सत्याचा विसर पडणें " हेच मूळ कारण सांगितले आहे.
हे जगतच व ह्यातील पदार्थ विषय तसेच त्यांच्या भोगाने मिळणारा आनंद हेच खरे आहेत असे समजून जवळजवळ सर्वच लोक जगाच्या व्यवहारात गुंतून राहतात. स्वत:वर मृत्यूची झडप कधीही पडू शकते हे विसरूनच सर्व व्यवहार करत असतात. अभंगात तुकाराम महाराज ह्या कटू सत्याची आपल्याला आठवण करून विचारताहेत की हे कसे विसरलात? तुम्ही जे सत्कर्म केले त्यामुळे ह्या जन्मात तुम्हाला सुखे मिळाली. पण हा ठेवा संपल्यावर मग परत जन्म घ्यावा लागेल. पुन: दु:खे भोगावी लागतील. क्षणोक्षणी देह मृत्यूकडे धावतो आहे. आता तरी डोळे उघडा. कळत असूनही आंधळे होऊ नका.

हाच मुद्दा समर्थ रामदासस्वामी खालील ओव्यांमधे सांगतातहेत.
संसार म्हणजे सवेचि स्वार । नाही मरणास उधार। मापी लागले शरीर । घडिने घडी ॥
सरता संचिताचे शेष । नाही क्षणाचा अवकाश । भरता न भरता निमेष । जाणे लागे ॥
देह परमार्थी लावले। तरीच याचें सार्थक जाले।नाही तरी तें वेर्थची गेले।नाना आघाते म्रूत्यपंथे ॥

म्हणुन आपण आपला प्रत्येक क्षण भगवंताच्या प्राप्ती करता खर्च करतो आहोत ह्या बाबत सावधानता ठेवली पाहिजे. नामस्मरणद्वारे भगवंताची आठवण सतत ठेवता येते.
तसेच जर शरीराला रोगांनी ग्रासले तर आपले सर्व लक्ष शरीराकडेच राहते व भगवंताचा मग विसर पडतो. म्हणून शरीराला तंदुरुस्त ठेवण्याविषय़ी पण आपण सतत सावध रहायला पाहिजे.
त्यासाठी योग्यते व्यायाम, जीभेवर ताबा हा हवाच.

शेवटचा मुद्दा :- आपल्या शरीर व मनाला जर एखादी सवय लावायची असली तर ती गोष्ट वारंवार करावी लागते. म्हणून स्वत:ला सतत सावधान रहण्याची सवय लावून घ्यावी लागेल.


अभंगाच्या चरण २ मधे महाराज म्हणतात की आढळते हेच की फक्त विषयभोगांकरताच सर्वसाधारणत: लोक सावध असतात. तसेच सावध करायला दुसरे कोणीही मदत करत नाही.

अभंगाच्या तिसîrÉÉ चरणामधे तुकाराम महाराज स्वत:ला अशा लोकांसारखे कल्पून म्हणताहेत की असे वागून मी माझे सर्व भांडवल ( येथे भांडवल म्हणजे देह, मन व विचार करणारी बुद्धी व वेळ ) आता खर्च झाले आहे व आता मी भूमीला भारभूत झालो आहे.थोडक्यांत म्हणजे सर्वनाश झाला आहे.एक भगवंतच तो आपल्याला सध्याच्या वर्णन केलेल्या स्थितीतून बाहेर काढू शकतो हे समजल्यामुळे , अभंगाच्या शेवटच्या चरणामधे महाराज भगवंतालाच हांक मारताहेत. ह्यालाच शरणागत भाव म्हणता येईल.
असा ह्या अभंगाचा अर्थ मला समजला आहे व तोच येथे लिहिला आहे.

अभंगाची शिकवण :-

ज्याला भगवद्‍भेटीची तळमळ लागली असेल त्याने आपला प्रत्येक क्षणी वर लिहिल्याप्रमाणे सतत सावध राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा व्यक्तीला समर्थ "सदेव " म्हणतात. समर्थांची एक ओवी येथे आठवली ती लिहित आहे.
ऐक सदेवपणाचे लक्षण । रिकामा जाऊ नेदी एक क्षण । प्रपंच वेवसायाचे ज्ञान। बरें पाहें॥.

सदेवपणाचे लक्षण हेच की सदेव व्य्क्ती स्वत:चा एकही क्षण वाया न घालविता प्रपंच व परमार्थ दोन्ही नीटपणे करते. असे ही ओवी सांगते.
असे सदेव होण्याच आपण प्रयत्न आपण करायला हवा हेच महत्वाचे.

















0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home