Friday, May 9, 2014

मराठी 63B post अभंग :- न ये तुज जरी  मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाहीं देवें  
Dt 08th May 14.
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.in
Contact mail address is rgphadke@gmail.comrgphadke@gmail.com



न ये तुज जरी मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाहीं देवें ॥ १ ॥
नाहिं तयाविण भुकेला विठ्ठल । येईल तैसा बोल रामकृष्ण ॥ २॥
देवापाशी मागे आवडिची भक्ती । विश्वासेंशी प्रीती भावबळें ॥ ३ ॥
तुका म्हणें मना सांगतो विचार । धरावा निर्धार दिसेदिस ॥ ४॥.

अभंगाचा शब्दार्थ :-

जरी तुला देवाने गोडगळा दिलेला नाही तरी तुला जसे जमेल तसे रामकृष्ण म्हणत रहा ,
विठ्ठल हा भावाचा भुकेला आहे.॥ १ + २ ॥
देवाकडे ( त्याला ) जी आवडते ती भक्ति, प्रेम व त्याच्यावर दृढ विश्वास माग. ॥ ३॥
तुका म्हणतो हे मना तुला सांगतो तो विचार ऐक. भक्ती करण्याचाच निर्धार रोज करावा ॥ ४॥

अभंगाचा अर्थ समजण्यासाठीची भूमिका :-

आपले संत, तसेच शास्त्रे सतत हेच सांगतात की माणसाचा जन्मच भगवंताला भेटण्यासाठी म्हणजेच मोक्षपदाची प्राप्ती करून घेण्यासाठी झालेला आहे. ह्या साथीचे प्रयत्न, शोध हा कांहिना कांही कारणांमुळे सुरू होतो. भौतिकाशास्त्रज्ञ हे शोधायचा प्रयत्न करतात की आपल्या ह्या ब्रह्मांडाचा उगम कसा झाला व त्यामधे आपले स्थान कोणते? पण सर्वसामान्य माणसाला कांहीतरी दु:खे भोगावी लागतात व त्यांमधून पूर्णत: सुटण्याचा मार्ग आहे कां ते हवे असते.
एवढे मात्र नक्की खरे की ह्यासर्व ब्रह्मांडाचा कारभार चलवणारी कोणतीतरी शक्ती आहे. तिलाच आपण देव म्हणतो. असा देव आहे हे पटलेले असते व त्याने माझी दु:खे दूर करावी ह्या उद्देशाने माणसे देवाची भक्ती करण्यास प्रवृत्त होतात.
आपल्या संतानी भक्ती कशी करावी ह्या साठी सोप्या भाषेंत मार्गदर्शन केलेले आहे.
येथे एक प्रश्न पडू शकतात की १) भक्ती करायची म्हणजे नक्की काय करायचे? ) हा अभंग कोणासाठी असावा?) भक्ति करण्यास काय पात्रता लागते?
ह्या तीनही प्रश्नांचे उतार हेच आहे की ज्याला स्वत:ची कर्तव्ये करायची आहेत व शिवाय मोक्षाची ईच्छा धरून आहे त्याच्यासाठीच हा अभंग तुकाराम महाराजांनी सांगितला आहे.

तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या दोन चरणांमधे म्हणतात की भगवंताची भक्ति करण्यासाठी लागतो तो मुख्य भाव.
हा भाव प्रेमाचा हवा. येथे रामकृष्ण परमहंसांचे एक वचन आठवते. ते म्हणतात की नवजात बाळावरचे आईचेप्रेम, कृपणाचे पैशाविषयिचे प्रेम व पतिव्रतेचे पतीवरचे प्रेम ह्या सर्वांस एकत्र घेतले तर जी प्रेमभावना असेल तसे देवावर प्रेम असावे. असे प्रेम म्हणजेच देवावरची भक्ती.”

असे प्रेम निर्माण झाले की भक्तला देवाशिवाय दुसरे कांही नकॊ असे वाटते. देवाच्याच ईच्छेनुसार जे घडते त्यांत तो आनंद मानतो. मग तो फक्त भगवंताचेच स्मरण करत असतो.
तुकरम महाराज आपल्याला हेच येथे सांगताहेत की " अशा भक्तिभावाने त्याचे नांव जसे " रामकृष्ण " तुम्ही घ्या , ध्यानात ठेवा, त्यासाठी गोड गळ्याची आवश्यकता नाही. विठ्ठल म्हणजे भगवंत अशाच भावाचा भुकेला आहे.

अभंगाच्या ३ व ४ थ्या चरणांमधे महाराज सांगताहेत की तुमचा मनाला मी एक विचार सांगतो आहे. तो म्हणजे देवाजवळ मागायचे तर अशी भक्ती दे हेच मागावे. मी अशी भक्ती करेन असा रोज दिवसेदिवस निर्धार करा.

ह्याचा अर्थ असा की सुरवातीला अशी भक्ति निर्माण होणे सहज नाही. त्यासाठी निश्चयपूर्वक कांही प्रयत्न पण दिसेदिस म्हणजे रोजच करावे लागतील.

हे प्रयत्न म्हणजे १)मनाने मी त्याचे विस्मरण होऊ देणार नाही असा प्रयत्न कराव लागेल. जर आपण मनाला सतत भगवंताचेच स्मरण करण्याची मनाला सवय लावली तर हे शक्य आहे.2) जे करावे लागेल ती त्याचीच पूजा म्हणुन ते काम नीटपणे करणे ३) तसेच जर होणारी प्रत्येक घटना होण्यामागे त्याचीच प्रेरणा आहे ( ह्यामधे आपण स्वत:जे करतो ते पण आले ) कर्ताकरविता तोच आहे हे स्वत:ला समजावणे पण येते.
विश्वासाने असे प्रयत्न केले तर भगवंत दूर नाही हेच महाराजांनी आपल्याला ह्या अभंगाद्वारे सांगितले आहे.

अभंगाची शिकवण :

निर्धारपूर्वक भगवंताचे स्मरण नित्य व नियमितपणे करावे हीच ह्या अभंगाची शिकवण आहे.









0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home