Monday, April 21, 2014

मराठी 61B post अभंग :- चाले हे शरीर कोणाचिया सत्ते
Dt 20th April 14.
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.in
Contact mail address is rgphadke@gmail.comrgphadke@gmail.com

चाले हे शरीर कोणाचिया सत्ते । कोण बोलविता हरिविण ॥ १॥
देखवी ऐकवी एक नारायण । तयाचे भजन चुको नयें ॥ २॥
मानसाची देव चालवी अहंता । मीचि येक कर्ता म्हणूनिया ॥ ३॥
वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठे ॥ ४॥
तुका म्हणे विठो भरला सबाह्य । उणें काय आहे चराचरीं ॥ ५॥

अभंगाचा अर्थ समजण्यासाठी लागणारी माहिती :-

सर्वप्रथम येथे हे सांगावेसे वाटते की ह्या अभंगामधे जो विषय आहे तोच हजारो वर्षांपूर्वी केनोपनिषदामधे
ऋषींनी चर्चिलेला आहे. ह्यावरून हेच आपण खात्रीपूर्वक म्हणू शकतो की तुकाराम महाराज सुद्धा असेच एक अर्वाचीन ऋषीच आहेत. त्यांच्या एका अभंगामधे त्यांनी हे स्पष्टपणे सांगितले पण आहे असो.

ह्या आधिच्या कांही अभंगामधे अध्यात्मशास्त्रामधला एक महत्वाचा मुद्दा येऊन गेला अहे. हा मुद्दा म्हणजे आपण आपल्या विचारांवर ताबा ठेवणे आवश्यक आहे. आपले सर्व विचार मनामधे येतात ते आपल्या अहंभावामुळेच येतात. आपल्यातला अहंभाव अथवा "मीपणा" आपल्याकडून अनेक कार्ये करवून घेतो. शिवाय आपल्याला अशी पण जाणीव देतो की आपल्यामुळेच सर्व कार्ये घडत असतात. तसेच आपण केलेल्या कर्माचे फळ आपल्याला मिळावे म्हणूनच आपण बहुधा सर्व कर्मे करत असतो. थोडक्यांत म्हणायचे झाले तर प्रत्येक केलेल्या कर्माचे कर्तॄत्व व तसेच भोक्तृत्व ह्या "मीपणा"च्या जानीवेमुळेच आपण स्वत:कडे घेतो.

मनाप्रमाणे फळ आले तर आपण म्हणतो "मी केले" “माझ्यामुळे सर्व कार्य नीट पार पडले "” मी केले नसते तर हे काम झाले नसते. पण जेंव्हा फळ मनाप्रमाणे मिळत नाही तेंव्हामात्र आपण देवाने फळ दिले नाही म्हणुन भगवंताला दोषदेंयासमा गेपुडःए पहात नाही. असो.

प्रत्येक केलेल्या कर्माचे कर्तॄत्व व तसेच भोक्तृत्व आपण स्वत:कडे घेतो व ह्यामुळेच जी फळे कर्मकेल्यानंतर त्ताबडतोब मिळत नाहीत ती भोगण्यासाठी पुन:पुन: जन्म पण जीवाला घ्यावे लागतात. जन्म हेच दु:खाचे मूळ आहे हे समर्थ रामदासांनी अनेक वेळा दासबोधामधे स्पष्ट केले आहे. तुकाराम महाराजांनी पण अनेक अभंगामधे हेच सांगितले आहे.
तुकाराम महाराज तसेच सर्व संतांनी म्हणूनच हे सांगितले आहे की जोपर्यंत हा "मीपणा" जागा आहे तोपर्यंत मुक्ती कधीच मिळणार नाही.
ह्या महितीवरून अभंगाचा भावार्थ लिहिण्य़ाचा प्रयत्न मी येथे केलेला आहे.

अभंगाचा भावार्थ :-

अभंगाच्या पहिल्या दोन चरणांमधे तुकाराम महाराजांनी एक प्रश्न विचारलेला आहे. महाराज म्हणतात की कोणामुळे आपले हे शरीराचे सर्व व्यवहार नीट सुरळीतरीत्या चालले आहेत? कोणाच्या कृपेमुळे आपल्याला सॄष्टीचे ज्ञान ( पाहणे) होते? आपल्याला बोलविणारा कोण आहे? ह्याव रापण विचार करावा हीच महार्जांची येथे अपेक्षा आहे. प्रश्नाचे उत्तर अर्थात आपल्याला माहीत आहे ते म्हणजे "आपल्यातला अंतरात्माच ह्या ऐकणे , बोलणे पाहणे थोडक्यांत म्हणजे पंचेंद्रियांद्वारे सॄष्टीचे ज्ञान घेण्याच्या क्रियांचे मूल आहे.”

केनोपनिषदामधे विचारलेला प्रश्न खालीलप्रमाणे आहे.
" केनेषितां वाचमिमां वदन्ति, चक्षु:श्रोत्रं क देवौ उनक्ति ?”
गोळाबेरीज अर्थ :- कोणामुळे माणूस बोलतो? कोणामुळे दोळ्यांना पाहण्याची शक्ती येते? कोणामुळे कानांना ऐकण्याची शक्ती येते? ह्य कोण?

तुकाराम महाराजांनी अभंगातच उत्तर दिले आहे . ह्या सर्व शक्ती (capabilities) देणारा एकुलता एक म्हणजेच एकमेव नारायण हाच आहे. ( महाराजांनी त्यालाच विठ्ठल, देव भगवंत ईत्यादी नावांनी पण संबोधिले आहे )

अभंगाच्या ३ îrÉÉ चरणामधे महाराजांनी हे पण स्पष्ट केले आहे की नारायणच प्रत्येकाच्या मी द्वारे सर्व कांही करवून घेत असतो. पण त्याच्याच मायेच्याप्रभावामुळे मणसाला वाटते की तोच कर्ता , भोक्ता आहे.
टीप:_ Blog वरच्या " मनाचे कार्य " ह्या भागामधे हे सर्व कसे होते ते लिहिलेचा आहे म्हणुन येथे पुनरावृत्ती केलेली नाही.

ह्यासर्व विवेचनावरून हे तर नक्की स्पष्ट होतेच की "मी कर्ता / भोक्ता " अशी विचारसरणिच अयोग्य आहे. हा मुद्दाच स्पष्ट करण्यासाठी तुकाराम महाराज चौथ्या चरणामधे म्हणतात की " साधे वृक्षाचे पान सुद्धा भगवंताच्या ईच्छेविना हालत नाही.; मग ( विचार करा की ) तुमच्यामधील " मी पणास कोठे थारा आहे.” अर्थातच ह्या "मीपणाला अहंभावाला " कधीच कर्ता वा भोक्ता म्हणता येते नाही . तेंव्हा मी पणा सोडावा.”

अभंगाच्या १ल्या चरणात म्हनूनच महाराजांनी सांगितले की तुमचा अंतरात्म्याच्या ईछ्छेनुसारच तुम्हाला ऐकणे, बोलणे ईत्यादी क्षमता मिळाली आहे. तोच भगवंत सर्वव्यापी आहे. जसा तो तुमच्या अंतरी आहे तसाच तो सर्व विश्वामधेपण आहे. तो नाही अशी कोणतीही जागाच अस्तित्वात नाही.

भगवंताचे कर्तृत्व असे सांगून मग महाराजांनी आपल्याला पुढीलप्रमाणे उपदेश केला आहे. हा उपदेश अभंगाच्या " तयाचे भजन चुको नयें" ह्या चरणामधे आहे.

समर्थ रामदासस्वामींनी दासबोधामधे "आत्मनिवेदन भक्ती म्हणजे काय ह्यावर अनेक ठिकाणी लिहिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात ते भगवंताचे भजन करणे म्हणजेच " आत्मनिवेदन भक्ती होय.

अभंगाची शिकवण:-
शिकवण हीच आहे की १) भगवंत सर्वांभूती आहे हे समजूनच सृष्टीतील सर्वांशी व्यवहार आदराने करावे.
) भगवंत "चल व अचल " दोन्ही मधे आहे. म्हणून अचल पदार्थाचा सुद्ध आदर करावा. ह्यामधे आपल्या भोवतीचे सर्व पर्यावरन पण येते.
) जे जे घडते त्याचा कर्त भोक्ता भगवंतच आहे हे लक्षांत ठेवावे म्हणजे मी पणाला जागाच रहात नाही.


थोडक्यांत म्हणजे भगवंताचे स्मरण सदा सर्वदा असावे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home