Thursday, February 27, 2014

मराठी Post  59Bअभंग :- अणुरेणुया थोकडा। तुका आकाशाएवढा
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.in
Contact mail address is rgphadke@gmail.com

) अणुरेणुया थोकडा । तुका आकाशाएवढा ॥ १ ॥
गिळूनी सांडिलें कळिवर । भवभयाचा आहार ॥ २॥
सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटी ॥ ३॥
तुका म्हणें आता । उरलो उपकारा पुरता ॥ ४ ॥

अभंगाचा शब्दार्थ :-
तुकाराम आता अणू रेणूंपेक्षाही सूक्ष्म व आकाशापेक्षाही विशाल झाला आहे ॥ १॥
आता तुकारामाने भवभयाचाच आहार केला आहे व सर्वकांही गिळून स्थूल शरीर टाकले आहे ॥ २॥
तसेच त्रिपुटीपण ( तुकारामाने) टाकली आहे व ज्ञानदीप ह्या शरीरामधे प्रकाशित झाला आहे. ॥ ३॥
आता हा तुकाराम फक्त उपकारांपुरताच शिल्लक आहे ॥ ४॥
अभंगाच्या मागची भूमिका :-
(स्व. भीमसेन जोशी यांनी हा अभंग गायलेला आहे.)
ह्या अभंगात तुकाराम महाराजांनी स्वत:च्याच ब्रह्मज्ञानावस्थेचे वर्णन केलेले आहे.
ब्रह्मज्ञान होणे हेच माणसाच्या मानव जन्म मिळाल्याचे सार्थक होय असे आपली शास्त्रे (धर्म ,अर्थ, काम व शेवटी मोक्ष हे चार पुरुषार्थ शास्त्रांनी सांगितले आहेत.) तसेच सर्व संत पण हेच सांगतात. ब्रह्मज्ञान, , आत्मज्ञान , मी खरा कोण आहे व माझे खरे स्वरूप काय आहे हे ज्ञान , जन्ममृत्यूचक्रामधून सुटका, ,मोक्ष ही सर्व एकच स्थितीची निरनिराळी नांवे आहेत.
ही स्थिती खरेतर शब्दातीत , वर्णनातीत असते ही अनुभवायची असते.. (जशी साखरेची गोडी शब्दांत सांगता येत नाही तसेच कांहिसे म्हणता येईल )
पण तरीही संत सोप्या शब्दांत ह्या स्थितीचे वर्णन आपल्या सारख्या बद्धांकरिता ह्यासाठी करतात  की आपणपण नरजन्माचे असे सार्थक करून घ्यावे अशी उर्मी यावी व आपण प्रयत्नांना लागावे. हीच संतांची अपेक्षा असते.
ह्या दृष्टीनेच ह्या अभंगाचा अर्थ लावणे योग्य ठरते. व तसा प्रयत्न मी येथे केलेला आहे. वाचकांनी ह्यावर आपली मते , विचार जरूर कळवावेत हीच विनंती येथे आहे. असो.

भावार्थाचे स्पष्टीकरण :-
भगवंत अर्थात परब्रह्म कसा आहे तर तो सुक्ष्माहून सूक्ष्म आहे.तो सर्वव्यापी आहे. त्याची ओळख होणे भेट होणे म्हणजेच ब्रह्मज्ञान होणे; त्याच्याशी एकरूपत्व येणे.
भगवंताचे वर्णन तीन शब्दांत करायचे झाले तर भगवंत सर्वज्ञ , सर्वशक्तीमान व सर्वव्यापी असा आहे असे ते वर्णन होते. हे वर्णन " कारें नाठविसि कृपाळू देवासी " ह्या अभंगाचा अर्थ पाहताना (post no 1) आलेच आहे. तरीही पुनरावृत्ति आवश्यक म्हणून येथे करतो आहे.

जर आपण आपल्या भोवतीचे विश्व रात्री पाहीले तर आकाशामधे अनंत ग्रहतारे दिसतात. सध्या उपलब्ध असलेल्या खगोल शास्त्राची कांस आपण घेतली तर समजते की आपण पाहातो ते ब्रह्मांड अत्यंत विराट आहे. असे म्हणतात की प्रकाशाला ब्रह्मांडाच्या एका टोकापासून दुस़îrÉÉ टोकापर्यंत जायला कोट्यावधी प्रकाश वर्षे ( प्रकाशाची गती १ सेकंदामधे ३३००००Km / १८००००मैल आहे. म्हणजे एका वर्षामधे प्रकाश ३३३०००*६०*६०*२४*३६० km जातो) आहे. ( खरेतर अजूनही ब्रह्मांडाच्य़ा आकाराबद्दल  खगोलतज्ञांचा एक अंदाजच आहे!) पण ह्या साध्यागणिताने ब्रह्मांडाच्या विराटत्वाची कल्पना येऊ शकते. ईश्वराने हे सर्व ब्रह्मांड व्यापले आहे म्हणजे तो त्याहून विराट आहे. हे ब्रह्मांड अवकाशामधे (Space) आहे. अवकाशालाच "तुकाराममहाराजांनी "आकाश " संबोधले आहे.
तसेच जर आपण पदार्थांची मूळ रचना पाहिली तरे असे दिसते की प्रत्येक पदार्थ अणू व रेणूंचा बनला आहे. अणूच्या आंत गेले तर असे आढळते की एका proton भोवती electron फिरत असतात. ब्रह्म हे त्यापेक्षापण सूक्ष्म आहे.
ब्रह्म म्हणजेच भगवंत हे आपण जाणतोच . ब्रह्मज्ञान म्हणजे त्याच्याशी एकरूपता. ही एकरूपता तुकाराम महाराजांनी साधल्यामुळे अभंगाच्या पहिल्याच चरणामधे ते म्हणताहेत की " मी असा आकाशापेक्षाही विराट आहे व अणुरेणूंपेक्षाही सुक्ष्म आहे.

अभंगाच्या २ îrÉÉ चरणामधे महाराज म्हणाताहेत की " मी हा भवभ्रमाचा पसारा गिळून टाकला आहे व ह्याचा अर्थ वरच्या संदर्भात स्पष्टचा आहे. “ तुकाराम महाराज विदेही अवस्थेमधे आहेत. आत त्यांना ह्या मर्त्य शरीराची बंधने उरलेली नाहित. .
आपल्या शास्त्रांप्रमाणे आपण हे जे दॄश्य अनुभवत आहोत ते एक प्रकारचा भ्रम आहे. तुकाराम महाराजाचा व ईतर संतांचापण हाच अनुभव आहे. " यतो दृष्टं ततो नष्टम्‌ " अर्थात जे जे दिसते ते सर्व नाशवंतच असते " हा निसर्गनियम पण आहे. जसा शिंपल्यामधे रुप्याचा भास होतो तसेच आपल्याला हे जग भासते पण अज्ञानामुळे तेच खरे वाटते. पण ब्रह्मज्ञानी पुरुषासाठी हे सर्व भ्रमच असते. मला (तुकाराम महाराजांना) हे कळले आहे हाच " मी भवभ्रम गिळून टाकला आहे "ह्या चरणाचा अर्थ येथे स्पष्ट होतो.

अभंगाच्या तिसîrÉÉ चरणामधे ही ब्रह्मरूपता कशी घडते ते वर्णन आहे. महाराज म्हणतात की "मी त्रिपुटी सांडली कारण माझा मनामधे ज्ञानदीप ( ब्रह्मज्ञान) उजळला आहे. त्रिपुटी म्हणजे परस्पर संबधित अश्या तीनांचा समुदाय. अध्यात्मामधे ज्ञाता-ज्ञान-ज्ञेय (ब्रम्हज्ञान अनुभवणारा- ब्रह्मज्ञान- ब्रह्म) ही त्रिपुटी प्रसिद्ध आहे. ही त्रिपुटी आपले द्वैतामधले कोणतेही ज्ञान होण्याची प्रक्रिया स्पष्ट करण्यासाठीच वापरतात.
येथे ज्ञाता व ज्ञेय वेगळे असतात. पण ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत हे वेगळेपण संपते. ह्यावेळी ज्ञाता-ज्ञेय-ज्ञान सर्व एकच होतात. तुकाराम महाराजांना ब्रह्मज्ञान झाल्यामुळे त्यांच्यापुरती तरी त्रिपुटी संपली आहे व महाराज हेच आपल्याला ह्या अभंगाच्या ३îrÉÉ चरणामधे सांगताहेत.

पण महाराजांचे शरीर हे अनुभवाचे बोल लिहिणारे अजून पंचभूतांमधे विलिन झालेले नाही. ज्ञानानंतर ज्ञानी पुरुषाचे असेच होते. बाकिच्यांना पण असे ज्ञान होऊन त्यांचीपण सर्वदु:खांतून सुटका व्हावी ह्याच कारणाकरिता ज्ञानी जगामधे रहातो. हे ज्ञान कसे मिळेल हेच सांगण्याकरता ज्ञानी पुरुष उरलेले आयुष्य व्यतीत करतो. ह्यालाच उपकार करणे म्हणतात. ह्या उपकारामधे परतफेडिची अपेक्षा नाही. तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या ४थ्या चरणामधे हेच स्पष्ट करत आहेत.

अभंगाची शिकवण :- ह्या अभंगावरून आपल्याला हीच शिकवण मिळते की संतांच्या वचनांवर श्रद्धा व विश्वास ठेवून त्यांनी सांगितलेला मार्ग चोखाळावा व जीवनाचे सार्थक करून घ्यावे.


0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home