Wednesday, April 30, 2014

मराठी 62B post अभंग :- अवघ्या वाटा जाल्या क्षीण । कळीं न घडे साधन 
Dt 30th  April 14.
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.in
Contact mail address is rgphadke@gmail.comrgphadke@gmail.com


अवघ्या वाटा जाल्या क्षीण । कळीं न घडे साधन ॥ १ ॥
उचित विधिविधान । न कळें न घडे सर्वथा ॥ २ ॥
भक्तिपंथ बहु सोपा । पुण्य नागवे वा पापा ॥ ३॥
येणें जाणें खेपा । येणेंचि खंडती ॥ ४॥
उभारोनि बाहे । विठो पालवित आहे ॥ ५॥
दांसा मीच साहे । मुखे बोले आपुल्या ॥ ६॥
भाविक विस्वासी । पार उतरिलें त्यासीं ॥ ७॥
तुका म्हणें नासी । कुतर्क्याचें कपाळीं ॥ ८ ॥


अभंगामागची भूमिका :-

अध्यात्म शास्त्रामधे ईश्वर प्राप्तीसाठी अनेक मार्ग सांगितले आहेत. त्यातले मुख म्हणजे योगमार्ग, ज्ञान मार्ग, व भक्ती मार्ग हे होत. जर ह्या मार्गांची माहिती आपण पाहिली तर असे आढळते की योगमार्गामधे यम, नियम आसन इत्यादि सर्व येतात. हे सर्व माहीत असलेला गुरुपण त्यासाठी लागतो. जर कांही चुका झाल्यातर नुकसानच होते. तसेच ज्ञान मार्गाचे पण आहे. आंगी प्रखर वैराग्य, सर्व आसक्तीचा त्यागघडावा लागतो. मुख्य म्हणजे अहंकाराच समूळ नष्टव्हावा लागतो. प्रपंच करणे कठीण जाते त्याचा त्यागच करावा लागतो.शरीराने नसला तरी मनाने तरी हा त्याग व्हावाच लागतो. ऎकूण योगमार्ग काय वा ज्ञान मार्ग काय दोन्ही चालणे सर्वसामान्य माणसाला कठीणच असते.

ह्याच कारणास्तव सर्व संतांप्रमाणे तुकाराम महाराजांनी पण भक्तीमार्गच चांगला आहे; तोच चोखाळावा असे ह्या अभंगात सांगितले आहे..



अभंगाचा भावार्थ :-

अभंगाच्या १ ल्या व २ îrÉÉ चरणांमधे तुकाराम महाराज म्हणताहेत की सध्याच्या ह्या कलीयुगामधे माणसाला भगवंताची प्राप्ती होण्यासाठी साधा करणे कठीण झाले आहे. त्यामुळे जरी ईतर अनेक मार्ग आहेत तरी त्या मार्गांचे आचरण करण्याची क्षमताच माणसात उरलेली नाही य़ोग्य ते विधिविधान करणे जवळजवळ अशक्यच झाले आहे.

आपल्यापैकी अनेकांचा हा अनुभव आहे की साधी सत्यनारायणाची पूजासुद्धा साग्रसंगीत कशी करायची याचे आपल्याजवळ ज्ञान नाहि. विधीविधानच माहित नसण्याचा ह्यावरून अर्थ काढता येईल. असो.
तरीही निराश होण्याचे कारण नाही.
महाराज ३îrÉÉ व ४ थ्या चरणात हे स्पष्ट करताहेत की भक्तिमार्ग सोपाच आहे.
आपण सर्व हे जाणतोच आहोत की पापामुळे फळे भोगण्यासाठी जन्ममृत्यूचक्रामधे जीव गुंततो व अनेक जन्मासाठी यातना भोगत राहतो. पुण्यजरी केले तरी स्वर्गामधे सुखे भोगण्यासाठी जातो. पुण्यक्षय झाला की पुन: जन्म घेतो व जन्म मृत्यूचक्रामधे अडकतो. दोन्ही हानीकारकच आहेत. पण भक्तीमुळे माणसाचे पाप जसे नष्ट होत तसेच पुण्याचाही क्षय होतो व म्हणुनच माणसाल मोक्ष मिळतो.
अर्थात ४थ्या चरणात म्हटल्याप्रमाणे भक्तिनेच हे साध्य होते.
अभंगाच्या ५ व्या चरणामधे तुकाराम महाराज म्हणताहेत की भगवंता निरनिराळ्या खुणांद्वारे भक्ताने आपल्याकडे लक्ष द्यावे हेच सुचवित असतो. पण आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही.
हा मुद्दा समजण्यासाठी थोदेसे विवरण आवश्यक आहे. ते खाली देत आहे.
आपल्याला ह्या जगामधे अनेक ताप होत असतात. कांही स्वत:च्याच मुळे होतात तर कांही दुसîrÉÉ वस्तू वा जीवांकडून होतात. ह्या सर्वातून भगवंताशिवाय कोणीही सुटका करू शकणार नाही असे जेंव्हा लक्षांत येते तेंव्हाच माणूस ईश्वरभक्ती करू लागतो.

पण शाहाणा विवेकी मात्र एवढे होण्याची वाट पाहात नाही . असो.


अभंगाच्या ५ , ६ व ७ व्या चरणामधे तुकाराम महाराजांनी आपल्याला भगवंताच्या वचनाची आठवण करून दिलेली आहे. हे भगवद्‍गीतेमधील प्रसिद्ध वचन खालील प्रमाणे आहे.
अनन्याश्चिंतयंतो माम्‌ ये जना: पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानाम्‌ योगक्षेमं वहाम्यहम्‌ ।
जो मला अनन्यभावे शरणागत आहे त्याचा योगक्षेम मीच वाहातो . त्याची सर्व काळजी मी घेतो असा ह्या वचनाचा शाब्दिक अर्थ आहे.

येथे भगवंताला संपूर्णपणे शरण जाणे एवढेच अपेक्षित आहे.
अभंगाच्या शेवटच्या चरणामधे महाराजांनी एक सुचना दिलेली आहे. महाराज येथे म्हणतात की ज्यांनी ह्या भगवद्‍वचनावर विश्वास ठेवून आचरण केले आहे तेच भवसागर तरले आहेत. जो कुतर्क करत राहील त्याच्या कपाळीचे दुख:भोग कधीच संपणार नाहीत. अध्यात्मात ह्या श्रद्धेचे फार मोठे महत्व आहे. ज्याची अशी श्रद्धा असते त्यालाच ह्यातुकाराम महाराजांच्या वचनाचा अनुभव येईल.

अभंगाची शिकवण :-

शिकवण हीच आहे की व्यर्थ वेळ न घालवता भगवद्‌भक्तीला लागावे..

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home