Sunday, June 5, 2016

82 a POST वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरें। MARATHI
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com


 For ENGLISH  Readers a separate post has been added..


वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरें। पक्षीही सुस्वरें आळविती ॥ १ ॥
येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाहीं गुण दोष अंगा येत ॥ २॥
आकाश मंडप पृथिवी आसन । रमे तेथें मन क्रीडा करू ॥ ३ ॥
कंथाकमंडलॊ देहौउपचारा । जाणवितो वारा अवसरू ॥ ४॥
हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवूं रुची ॥ ५ ॥
तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाचि वाद आपणांसी ॥ ६॥


अभंगाचा शब्दार्थ :-

ह्या वनामधले वृक्षवेली वनचर व सुस्वरामधे गाणारे (भगवंताची स्तुतीच जणू करणारे ) पक्षीच आमचे सोयरे संबंधी आहेत. त्यासुखामुळे आम्हाला हा एकांताचा वास आवडता झाला आहे ; येथे कोणताच गुणदोष आंगी लागत नाही॥ १+२॥
येथे आकाश हाच मंडप आहे व पृथ्वी हेच बसण्याचे साधन पण आहे. शिवाय येथे देहरक्षणासाठी गोधडी, कमंडलू आमच्याजवळ आहे. तसेच वेळ किती झाला हे समजावणारा वारा सुद्धा आहे.म्हणून आमचे मन रमेल तेथे आम्ही क्रीडा करू .॥ ३+४ ॥
तुका म्हणतो की येथे आम्ही हरिकथेच्या जेवणाची रुची निरनिराळ्या प्रकारांनी घेऊ. एकांतात स्वत:च्या मनाशीच संवाद (मनन करून) साधू ॥ ५+ ६ ॥

अभंगाची पार्श्वभूमीका :-
संत तुकाराम महाराज हे एक जीवन्मुक्त पुरुष होते. असा पुरुष दृश्य जगतामधे जरी वावरत असला तरी त्याची ब्रह्मावस्था ढळलेली नसते. पण असे पुरुष प्रयत्नपूर्वक स्वत:ला थोडे खालच्या पातळीवर आणत असतात. हीच तुर्यावस्था होय (शरीराच्या ह्या अवस्थेत दृश्याचे भान जागृत असते तसेच आपणच सर्वत्र आहोत ही ब्रह्मावस्थेची स्थिती पण असते) . उंबरठ्यावर ठेवलेल्या दिव्याचा दृष्टांत ह्या स्थितीचे वर्णन करताना देतात. उंबरठ्यावरच्या दिव्याचा प्रकाश घराच्या आत तसाच बाहेर पण पडलेला असतो. व त्यामुळे घरातील तसेच बाहेरील दृश्य आपण पाहू शकतो.

अशा जीवन्मुक्ताचे बोल म्हणजे परमेश्वरी वाणीच होय. म्हणूनच ह्या अभंगाचे महत्व अनन्यसाधारण आहे. कारण ह्या अभंगामधे आपण जगाकडे कशा दृष्टीने पहावे हे आपल्याला समजते.

श्रीमद्‍ भगवद‌ गीते मधील विश्वरूप दर्शनाचा प्रसंग हेच सांगतो की भगवंत सर्वकांही झालेला आहे. तोच सर्वव्यापी आहे व हाच मुद्दा ह्या अभंगात आलेला आहे.

ह्या पूर्वी पाहिलेल्या तुकाराम महाराजांच्या " जे कां रंजले गांजले " ह्या चरणाने सुरू होणाîrÉÉ अभंगामधे आपल्या आजूबाजूच्या सर्व जनताजनार्द्नामधील माणसांसाठी ; विशेषत: जे परिस्थितीने गांजले आहेत ( दारिद्र्यामुळे हतबल झाले आहेत ) त्यांचे भले करण्यासाठी झटावे हा उपदेश आहे.

प्रस्तूत अभंग आपल्याला फक्त माणसांचाच नव्हे तर संपूर्ण सृष्टीचा पण विचार करावा हे तर
सांगतोच पण त्याबरोबरच एकांतात कां जावे हे पण सांगतो. एकांताचे महत्व जाणणे हे प्रत्येक
साधकालाच नव्हे तर ज्याला ज्याला प्रपंचात यश हवे आहे त्या त्या प्रत्येकासाठी आवश्यकच आहे.
ह्या पार्श्वभूमिकेवरून ह्या अभंगाचा अर्थ पाहणे योग्य ठरते.

अभंगाच्या अर्थाचे स्पष्टीकरण :-
सुरवातीस म्हटल्याप्रमाणे स्वत:च ब्रह्मज्ञानी असल्यामुळे तुकाराम महाराजांना सर्व विश्वाला पांडुरंग व्यापून आहे हा स्वानुभव होता व म्हणुनच सर्व प्राणीमात्रच नव्हे तर ज्यांना त्यांच्याकाली सजीव समजत नसत असे वृक्षवेली ही सुद्धा आपलेच आहेत ही जाणीव होती.

सर जगदीशचंद्र बोस ह्यांनी आता १९ व्या शतकाच्या सुरवातीला विविध उपकरणे वापरून वृक्ष वेली यांना सुद्धा जीव आहे , भावना आहेत हे सिद्ध केले आहे. असो.

म्हणुनच अभंगाच्या पहिल्याच चरणामधे महाराज म्हणताहेत की आजूबाजूचॆ सर्व वृक्षवेली, पशू पक्षी ही आमचेच सगे सोयरे आहेत. पक्षांची किलबील सुद्धा आम्हाला संगीताप्रमाणेच आनंद देते आहे. आपल्या भोवतीच्या पर्यावरणाकडे पाह्ण्याची आपली दृष्टी कशी असावी हेच येथे स्पष्ट केले आहे. असे पर्यावरण नसेल तर काय होते ह्याचा अनुभव पण आता आपल्या जगामधे येतो आहे.

अभंगाचे पुढचा भाग ह्या पार्श्वभूमिकेवर सहज समजण्यासारखा आहे.

सर्वत्र माझेच सहचर आहेत असे एकदा का समजले की मग माणसाला कोठेही आपण एकटे आहोत असे वाटत नाही. मग अर्थातच अशा सहचरांबरोबर राहणे आनंदाचेच होते.
पण जर आजूबाजूची माणसे भिन्न विचारांची असली तर मात्र अशा लोकांचा सहवास नकोसा होतो हा पण आपल्या प्रत्येकाचाच अनुभव आहे. म्हणुनच " समानशीले व्यसनेशु सख्यम्‌ " हि म्हण प्रसिद्ध आहे. तसेच आता हे पण सिद्ध झाले आहे की आपली मन:स्थिती हि आपल्या जवळपास वावरत असणाîrÉÉ माणसांच्या मनस्थितीमुळे बदलू शकते. जर कोणी उद्विग्न दु:खी उदास असेल तर आपण पण त्याच भावनाच्या आहारी ागदी न कळत जातो. सात्विक मनोवृत्तीच्या माणसांच्या बाबतीत हे जास्त प्रकर्षाने होते. वनामधे एकांतात आनंदी वातावरणामधे म्हणूनच मन आनंदी होते.असो.

सांगायचा मुद्दा हाच आहे की ज्याला भगवंताचे स्मरण असते व त्याच्याच भेटिची आस लागली असेल ; त्याला निसर्गाच्या सहवासात असणेच आवडते. कोणतेही निसर्गरम्यस्थान हे नेहमीच ध्यान, तप करण्यास चांगले असते. आपल्याकडे ह्यासाठीच लोक हिमालयात जातात. असा एकांत वास तुकाराम महाराजांना पण आवडतो. तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर तपसाधनेसाठी जात असत . त्यासंदर्भातच अभंगाच्या ३ व ४ चरणात उल्लेख येतो की येथे आकाश हाच मंडप आहे व पृथ्वी हेच बसण्याचे साधन पण आहे. शिवाय येथे देहरक्षणासाठी गोधडी, कमंडलू आमच्याजवळ आहे .तसेच वेळ किती झाला हे समजावणारा वारा सुद्धा आहे.म्हणून आमचे मन रमेल तेथे आम्ही क्रीडा करू . येथे क्रीडा मह्णजे भगवंताच्या भजनाचा आनंद लुटणे असा घेता येईल.

ह्यापुढचे चरण एकांताचे महत्व सांगणारे आहेत.

एकांतात प्रत्येकाने जावे असे श्री.रामकृष्ण परमहंस पण सांगत . समर्थांचे पण हेच म्हणणे आहे.
सर्वसाधारणत: साधू पुरुषाकडे लोक आपल्या भौतिक अडचणी , समस्याच घेऊन जातात. साधू त्यांचे निरसन पण करतात , पण भगवंताच्या भेटिसाठी येणारे लोक फारच थोडे असतात. जगावर प्रेम करणारा पुरुष म्हणुनच एकांतात जाण्यास उत्सुक असतो. तुकाराम महाराजांना असे एकांतात जाणे आवडले आहे व हाच विचार अभंगात आलेला अहे.

एकांतात जाण्याचे व्यावहारिक तसेच पारमार्थिक दोन्हीकडे फायदेच होतात.
एकांतचे प्रापंचिक महत्व व फायदे:-
ज्याला आपले कार्य यशस्वी व्हावे असे वाटत असते त्याला अशा एकांतात नीट पणे योजना आखता येते. योजनेप्रमाणे सर्व कार्य होते आहे की नाही हे पण पाहता येते. कांही गुप्त योजना एकांतातच आखता येतात.
) शिवाजी महाराजांना अफजलखानाच्या भेटीच्या वेळी काय करावॆ हे त्यांनी एकांतातच ठरविले हे प्रसिद्धच आहे.
) वैदिक गणितातातली सूत्रे पण शंकराचार्यांना अशा एकांतातल्या मननामुळेच लक्षांत आली

समर्थांच्या खालील ओवव्यांचे चरण ह्यादृष्टीने येथे पाहता येतात. ओव्यांचा अर्थ सोपा आहे म्हणून लिहिलेला नाही. फक्त ओव्यांचे चरणच लिहिले आहेत.

अखंड एकांत सेवावा। ग्रंथमात्र धांडोळावा।प्रचीत येईल तो घ्यावा। अर्थ मनी ॥
विवेक एकांती करावा। जगदीश धारणेने धरावा।
येकांती विवेक ठांई पडे । येकांती येत्न सापडे। येकांती तर्क वावडे।
येकांती स्मरण करावें।चुकले निधान पडे ठावें।
जयास येकांत साधला । अवघ्या आधी कळे त्याला । त्यावेगळॆ वडिलपणाला । ठावची नाही ॥ .

एकांताचे पारमार्थिक महत्व व फायदे :-
ध्यानाची प्रक्रिया ही नीट व्हावी ह्यासाठी एकांतच लागतो. ह्यावर बरेच लिखाण आपल्याला वाचायला मिळते.
तसेच एकांतात भगवंताची उपासना जप ईत्यादी करणे सोपे होते. एकांतातच कॊ॓हं हाविचार आपण करू शकतो. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी एकांतात जाणे म्हणजे भगवंताचे स्मरणात राहणे असाच अर्थ सांगितलेला आहे . निरनिराळ्या आध्यात्मिक ग्रंथातील सखोल अर्थ एकांतामधे मनन केल्यानंतरच अंत:करणामधे प्रगट होतो व हाच अर्थ तुकाराम महाराजांना अभंगाच्या शेवटचा चरणांमधे अभिप्रेत आहे

अभंगाची शिकवण :-
अभंगाची हीच शिकवण आहे की ज्याला आपली प्रगती करून घ्यायची आहे मग ती प्रपंचातली असो किंवा परमार्थातली असो, त्यानॆ जरूर एकांतासेवन करावे व स्वत:चे ध्येय साध्य करून घ्यावे.












0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home