Thursday, August 23, 2012



4th Abhanga No : 4ढेकणाचे संगें हिरा जो भंगला ।  Date of Posting 23 rd Aug 2012.

ढेकणाचे संगें हिरा जो भंगला । कुसंगे वाढला साधू जैसा ॥ १ ॥
ओढाळाच्या संगे सात्विक नासती । क्षण एक नाडली समागमे \\ २ ॥
डांकाचे संगती सोने हीन झाले । मोल ते तुटले लक्ष कोटी ॥ ३ ॥
विषानें पक्वान्नें गोड कडू झाली । कुसंगाने केली तैसी परी ॥ ४ ॥
भावे तुका हा सत्संग हा बरा । कुसंग हा फेरा चौर्यांशीचा ॥ ५ ॥

Transliterated text for the above abhanga.
dhekaNaache saNge hiraa jo bhangalaa | kusaNge vaadhalaa saadhU jaisaa || 1 ||
odhaaLaachyaa saNge saatvika naasatI | kshana eka naaDaLI samaagame || 2 ||
DaaNkaache saNgatI sone Hina jhaale | mola te tuTale lakSha koTI || 3 ||
viShaane paquaanne goDa kaDU jhaalI | kusaNgaane kelI taisI parI || 4 ||
bhaave tukaa haa satsaNga haa baraa | kusaNga haa pheraa chouryaashIchaa || 5 ||

Background Information required to understand the meaning:
In our day to day life as well as in Spirituality it is very important to have clean mind.
If the mind is clean and quite ; then only one can achieve the desired results since one is able to think properly and clearly.
What we call alertness will always help. Alertness ( सावधानता ) while doing any task helps us . However one is alert only when one plans the work properly. Monitor various actions is also a shade of Alertness.

This Abhanga is about the effects of Company / association ( संग ) that we choose; in our life, It mainly is alerting us about the company we choose.
Here the company ( संग) means not only the Physical Company / or association with various persons around us (Family, Friends, Colleagues and others ) , संग also is the company of various thoughts.
Once Gautama Buddha was going with a disciple somewhere. They had to cross a stream during their travel. Near the stream was one beautiful maiden. She was afraid to cross the stream since the water was quite deep at the crossing. Buddha offered her help by suggesting that she can sit on his shoulder and she agreed. They crossed the stream.and the lady thanked Budhdha.
On their way the disciple asked Budhdha how he could do such act . Budhdha replied that the moment they crossed the stream he had already forgotten the maid. But then he asked to his disciple as why he was still thinking of the Lady. The disciple was still in the company of the ladyin his mind.

Our memory is the root cause of appearance of various thoughts in our mind. The thoughts only decide our various actions .That is the (संग) of which we must be aware of. Good thoughts is a good company. But any other type of thoughts may drive us to do some actions which later on we regret.

Meaning of the Abhangaa :

In order to make us understand the importance of a Right Company or Association ;

Sant Tularam is giving many simple example in our day to day life.

1) If the Diamond ( Hardest Substance known ) comes in contact with the blood of  Bedbug, then it breaks.
     2) A Sage falls from his respectful position , if he chooses to have the company of bad persons.or desires.
    A famous example is that of Sage Vishvamithra( विश्वामित्र ऋषी) the seer ( द्रष्टा).of Gayathri Mantra (गायत्री मंत्र) . He could not control himself when Menaka the celestial Maiden ( अप्सरा) came to disturb him from His tapasyaa.(तपस्या)
    3) Gold never gets rusted. But when it is mixed with lower grade substances ( metals like Copper, Silver, etc) it looses this property.
    Naturally it's value falls.
    4) A good cow , when it succumbs to the habit of going to same place for food , it no more remains a good cow.

    5) Sweet and apetising food turns to Killer food ( Poison ) when it is mixed with poison
In our day to day life we have many such examples which clearly bring out the importance of having/ choosing a good and proper company ( संग)
.
In our times Sage Ramakrishna Paramhansa is famous. One day he visited some merchant. Then He felt like taking ( stealing ) the Silverware after eating the offered food. He realized that the same merchant used to follow unfair means for gathering wealth.This incident is described in his biography.

When Sandalwood powder when kept with our cloths , the cloths catch the wonderful smell of Sandalwood.

Tukaram maharaj in the last line of Abhanga stresses the point that with good association / company (सत्संग) one can avoid the problem of transmigration ( Getting entangled in the cycle of Birth-death-birth …. ) .




What is this good association ( सत्संग) ?

One meaning of the Satsang is : To be in the good company of Knowledgeable persons in the field of interest. This is the best.

Another meaning is as follows.
However it is not possible to get such company always. One can however Read the Books , or Hear Discourses ( श्रवण), think , dig (understand ) the deeper meaning of what we have read ( मनन) and put into action what is learnt.

Yet another meaning is : To do Namasmarana ( नामस्मरण ) . On the grosser level the भगवदनाम always keeps the mind in the company of the Deity whose nama (नाम) one is reciting. We already have seen the importance of Practice in our earlier Abhanga.With practice one can do one's all the actions along with the (नाम). .

All our saints and the liberated souls , Upanishadas also tell us to see the God (भगवंत) in the beings around us. But one has to trade this path with caution. We will see what Tukaram Maharaj says about this aspect in the Abhangas to follow.
 
            ह्यापुढे अभंगाचे मराठीत स्पष्टीकरण देलेले आहे.

           .Abhanga No : 4 Date of Posting 23 rd Aug 2012.

ढेकणाचे संगें हिरा जो भंगला । कुसंगे वाढला साधू जैसा ॥ १ ॥
ओढाळाच्या संगे सात्विक नासती । क्षण एक नाडली समागमे \\ २ ॥
डांकाचे संगती सोने हीन झाले । मोल ते तुटले लक्ष कोटी ॥ ३ ॥
विषानें पक्वान्नें गोड कडू झाली । कुसंगाने केली तैसी परी ॥ ४ ॥
तुका हा सत्संग हा बरा । कुसंग हा फेरा चौर्यांशीचा ॥ ५ ॥

अभंगाचा शब्दार्थ :


हिरा हा अत्यंत कठीण पदार्थ आहे पण जर त्याला ढेकणच्या रक्ताचा स्पर्श झाला तर मात्र तो फुटति.. तसेच जर साधूला कुसंगती लागली तर तो परमार्थमार्गावरून घसरतो.
बैलाच्या मागे लागल्याने सात्विक गाय नासते तिला ओढाळ म्हणतात.. शुद्ध सोन्यचे मोल किंमत खूप असते पण तेच सोने त्यामधे हलक्या दर्जाचे धातू मिसळले की त्याची किंमत खूप कमी होते. उत्तमोत्तम पक्वान्नामधे विष मिसळले की ते कॊणीही खाऊ शकत नाही जणु ते कडू होते.हा सगळा वाईट संगतीचा परीणाम होय.
म्हणुन तुकाराम महार्राज म्हणतात की चौऱ्याएंशी लक्ष योनिंमधे जन्म मरणाचा फ़ेरा चुकवायचा असेल तर सत्संग धरावा

अभंगाच अर्थ समजण्यासाठी आवश्यक माहीती :
आपल्या व्यवहारीक तसेच पार्मार्थीक जीवनामधे मनाची शुद्धता फार महत्वाची असते. जर मन शुद्ध व शांत असेल तर आपण हाती घेतलेले कार्य नीट पणे पुर्ण होते कारण आपण योग्य रीत्या विचार करुन ते कार्य करतो.
कोठेही कोणचेही कार्य करतांना सावधानता राखणे आपल्याला मदतच करते. सतर्क माणुसच नीट योजना आखू शकतो. याशिवाय अखंड चाळणा म्हणजे काम योग्य दिशेने होते आहे की नाही हे वेळोवेळि तपासणे हा सुद्धा सावधानतेचाच एक भाग आहे.

ह्या अभंगामधे आपण आपल्या आयुष्यात निवडलेल्या संगतीचे परीणाम वर्णन करून आपल्याला परमार्थामधे कशी संगत धरावी ह्या मुद्द्यावर तुकाराम महाराजांच उपदेश आहे.

संग म्हण्जे आपले नातेवाईक व आजूबाजूची मंडळींचा सहवास एव्ढाच अर्थ घ्यायचा नाही. आपले निरनिराळे विचार हे सुद्धा आपल्या संगाचाच अविभाज्य भाग आह्वे हे पण लक्षांत घ्यायचे आहे.

एकदा गौतम बुद्ध त्यांच्या एका शिष्याबरोबर प्रवास करत होते. रस्त्यात एक नदी पार करून पुढे जायचे होते. दोघे तेथे आले तेंव्हा तेथे एक सुंदर तरुणी काठावर उभी होती. तिलापण नदीच्या पलीकडच्या काठवरच जायचे होते पण पाण्यामधे प्रवेश करण्यास ती घाबरत होती.पाणीपण तसे खोलच होते. बुद्धांनी तिला विचारले की ते तिला (जर ती त्यांच्या खांद्यावर बसयला तयार असेल तर ) पलीकडे नेऊ शकतील. तरुणी तयार झाली व बुद्धांनी तिला नदीपलीकडे नेले. त्यांना धन्यवाद देऊन तरुणी निघून गेली.
रस्त्यामधे पुढे जाताना शिष्याने विचारले की तुम्ही संन्यासी असूनही त्या स्त्रीला असे कसे नेले? संन्याश्याला स्त्रीस्पर्श वर्ज्य असतो. बुद्ध म्हणाले की संन्यास्याने स्त्रीबद्द्ल मनामधे विचार करणे पण वर्ज्य आहे. ती तरूणी नदिपलिकडे उतरल्यावर मी तिला विसरलो पण तू अजूनही तिचाच विचार करतो आहेस. तू अजूनही तिच्याच संगतीत आहेस. सोड ही संगत.

संगत ही अशी वैचारिक पण असू शकते नव्हे असते. कारण आपली स्मरणशक्ती. आपल्या अनेक कार्यांचे मूळ कारण हे मन आहे व त्यामधील स्मरण. मनामधे विचार आल्यानंतरच आपण कोणतेही काम करतो. चांगले विचार असतील तर उत्तमच पण बरेच असे विचार असतात ज्यांमुळे आपण नको ते करून बसतो व नंतर पश्चातापाची वेळ येते.
आपल्या विचारांच्या संगाबद्दल; आपण सावध असायला हवे.

अभंगाच भावार्थ :

संगतीचे महत्व पटावे म्हणून तुकाराम महाराजांनी अनेक (रोजच्या जीवनामधले) दृष्टांत दिले आहेत.

) ढेकणाच्या रक्ताच्या संगामुळे अत्यंत कठीण हि सुद्धा फुटतो.
) कुसंगामुळे सात्विक साधू रसातळाला जातो.
विश्वामित्र ऋषींचे उदाहरण प्रसिद्धच आहे. गायत्री मंत्राचा हा द्रष्टा ऋषी मेनका ह्या
अप्सरेच्या प्रेमामधे पडला व त्यांची तपस्या भंग झाली.
) शुद्ध सोन्यामधे हिणकस धातू मिसळले की त्याची किंमत कंमी होते.
) एखादी चांगली गाय बैल व चारा यांच्या ओढीमुळे बिघडते.
) पक्वांनांमधे विष मिसळले की ते खाण्यालायक रहात नाही.

ही व अशी अनेक उदाहरणे हेच स्पष्ट करतात की चांगली संगत असणे नेहमीच महत्वाचे आहे.

आपल्या काळतलेव उदाहरण श्री. रामकृ्ष्ण परमहंसांच्या चरित्रात वाचायला मिळते.
एकदा ते एका व्यापारी ग्रूहस्थाकडे गेले होते. तेथे जेवण झाल्यानंतर त्यांना तेथील चांदीची भांडी बरोबर न्यावी ही ईच्छा झाली. त्याक्षणी त्यांना कळले की तो व्यापारी गैरमार्गाने संपत्ती मिळवत होता म्हणून असे विचार मना मधे आले आहेत,.

चंदनाची पावडर असलेली थैली जर आपण आपल्या वस्त्रांत ठेवली तर वस्त्रांना चंदनाचा सुगंध लागतो .

असे संगतीचे महत्व आहे. असो.

सत्संग म्हणजे काय ?

एक अर्थ हा आहे की : चांगल्या शिकलेल्या सुसंस्कृत माणसांच्या साधूंच्या
सहवासात राहणे ही सर्वोत्तम संगत होय.

दुसरा अर्थ असा आहे की : आपल्याला नेहमीच वर म्हटल्याप्रमाणे संगतीचा लाभ होणे तसे कठीणच असते. पण आपण चांगली पुस्तके , सद्‌ग्रंथांचे वाचन करणे, प्रवचने , कीर्तने ऐकणे, जे ऐकले त्यावर विचार मनन करणे व आचरणामधे आणणे ही पणउत्तम संगत होय.

आणखी एक अर्थ हा आहे की : नामस्मरण करणे . भगवंताचे कोणतेही नांम स्मरण केले की मनामधे त्या त्या देवतेची प्रतिमा तयार होते. ह्यामुळे आपण भगवंताच्या संगतीत राहतो. आपण आधीच्या अभंगामधे पाहिलेच आहे की मनामधे स्मरण करत आपण व्यवहारामधे राहू शकतो व्यवहारातली कामे करू शकतो.

अभंगाची शिकवण :
असे हे सत्संगतीचे महत्व आहे व ज्याला मोक्ष हवा आहे त्याने वेळ न घालविता सत्संगत धरावी हेच येथे सांगितले आहे.


1 Comments:

At August 27, 2012 at 8:02 AM , Blogger Unknown said...

Tukaram maharaj gives a clear cut warning that if you want to have Mukti from Aagam-Nigam chakra the satsanga is the only way.

Madhav Bhat.

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home