Added working of mind part2 Marathi Post 57B today the 27th Jan14.
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.in
Contact mail address is rgphadke@gmail.com
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.in
Contact mail address is rgphadke@gmail.com
अंत:करणाची
कार्यपद्धती भाग २ रा :-
( Theory-part 2 )
मागच्या पोस्ट वर
लिहिलेल्या विचारांचा सारांश
:-
आपण पाहिलेच आहे की
अंत:करणाचे कार्य
सर्वप्रथम स्फुरणापासून सुरू
होते. स्फुरणामुळे
चित्तामधे तरंग उठतात. सुखदु:खाच्या
भोगांच्या आपल्या सर्व आठवणी
चितामधे बीजरूपाने साठवलेल्या
असतात. ह्यांनाच
वासनाबीज असेही नांव आहे.
अशासाठीच म्हणतायेते
व खरेच आहे की कोणत्याही
भोगाच्या वासनेचे बीज चितामधे
स्फुरणामुळे अंकुरित होते
तसेच येथे हे पण समजून
घ्यायला हवे की आपल्या
(पंचेंद्रियांद्वारे
आपल्या कडे जे जे येते ते सर्वच
) अन्न म्हणता येते हे अन्न ग्रहण केल्यामुळे
पण नवी नवी वासनाबीजे निर्माण
होत असतात. अर्थातच
ही सर्व बीजे चित्तामधेच
साठवली जातात.
ह्या बाबत पॊँडेचरीच्या
माताजींचे एक वचन आहे. माताजी
सांगतात की आपले सर्व विचार
कांहीएक आकार घेतात व वातावरणामधे
सर्वांचेच बरेवाईट विचार
ह्याप्रमाणे आपल्या अवतीभोवती
असतात. जेंव्हा
आपले मन हे विचार ग्रहण करण्यास
तयार असते ( आपल्या
नकळत हे सर्व घडते ) तेंव्हा
विचारांचा मनामधे प्रवेश
(विचारांचा प्रवेश
अर्थातच चित्तामधेच होतो)
होतो व मग ते प्रगट
होतात व कांहीतरी कार्य आपल्या
हातून होते. .
म्हणुनच पातंजलींचे
योगसुत्र हे सांगते की "
य़ोग: श्चित्त
वृत्ती निरोध:” म्हणजे
चितामधल्या वृत्तिंचा निरोध
करणे म्हणजेच योग होय.
अशा रीतीने आपल्या
चित्तमधे जी आवर्तने ,भोवरे
निर्माण होतात ती सर्व आपल्या
भावनांचे रूप घेऊन मनामधे
प्रगट होतात.
आपल्या
अ) मन
, ब)
बुद्धी
व क)अहंकाराचे
कार्य ह्यापुढे लिहिले आहे.
३) मनाचे
कार्य :-
मन
हे अंत:करणाचाच
भाग आहे.
चित्तमधे
विचार उत्पन्न झाल्यानंतर
त्याल शब्दरूप येते.
नंतर
मनामधे त्याविचाराप्रमाणे
कार्य करावे ,
करू
नये असे संकल्प विकल्पांची
आंदोलने सुरू होतात.
संकल्प
म्हणजे काम नक्की करायचे हे
वाटणे, तर
विकल्प म्हणजे कार्य करूनये
असे वाटणे.
मनामधे
जे प्रेम,
क्रोध,
द्वेष,
संशय
ईत्यादी भाव असतात त्यांपैकी
कोणतातरी भाव ह्यामुळे प्रगट
होण्याची क्रिया सुरू होते
व म्हणुनच काय करावे हे मनाल
कळत नाही.
मग
ह्यासाठी मनाची धाव बुद्धीकडे
निवाडा करण्यासाठी होते.
म्हणुनच
मनाला पाîrÉÉप्रमाणे
चंचल म्हणतात.
असो.
४) बुद्धीचे
कार्य :- अंत:करणाचा
महत्वाचा भाग म्हणजे बुद्धी
होय. बुद्धी
वापरून आपण योग्य अयोग्याचा
निवाडा करत असतो.
श्रीमद् भगवद्गीतेमधे
भगवंताने बुद्धीचे तीन प्रकार
१) तामसिक २) राजसिक
व ३ ) सात्विक बुद्धी
असे वर्णन केलेल आहेत. आपल्या
बुद्धीचे सर्व निर्णय ह्या
तीनांपैकी एकामधे येतात.
आपली बुद्धीच कोणत्याही
विचाराचे मनमधे प्रगटीकरण
झाल्यावर काय करायचे ते ठरवते.
त्यासाठी केलेल्या
कार्याचा परिणाम काय होईल,
तो योग्य की अयोग्य
ह्यावर बुद्धीच निर्णय देते.
लोकमान्य टिळकांनी
बुद्धीला व्यवसायित्मिका
बुद्धी असे नांव तिच्या ह्या
कार्यप्रणाली वरून दिले आहे.
आपल्या
अहंकाराला आपल्या बुद्धिचा
निर्णय कळतो व त्यानंतर पुढची क्रिया म्हणजे जे ठरले ते प्रत्यक्षांत आणणे ही अहंकारामुळे घडते.
५) अहंकार
:- आपल्या
अंत:करणाचा
अहंकार हा एक सर्वात मुख्य
भाग आहे.
आपला
जन्म होताक्षणीच अहंकार म्हणजे
" मी
" व
"माझे
" ही
जाणीव उत्पन्न होते.
ह्या
जाणीवेचेच दुसरे नांव अहंकार
आहे.
प्रत्येव्यक्ती
वा प्राण्याच्या बाबतीत असे
नक्की म्हणतायेते की जागृत
व स्वप्नावस्थेम्धे अहंकार
जागाच असतो.
अहंकारामुळेच
आपल्याला मीकर्ता आहे,
अथवा
मी भोक्ता आहे असे वाटते.
केलेल्यासर्व
कर्माचे फळे सुखाची किंवा
दु:खाची
असतात. हे
सुख दु:ख
आपल्याला अहंकारामुळेच जाणवते.
अहंकार
व मनामुळेच आपल्याला
पंचेंद्रियांच्याद्वारे
निरनिराळ्या विषयांचे ज्ञान
होते..
अहंकारामुळेच आपल्याला
आपण व जगातील ईतर वस्तू /जीव
प्राणी आपल्याहून वेघले आहेत
हे कळते.
आपली
शास्त्रे व संत हेच सांगतात
की आपण व विश्वनिर्माता भगवंत
हे एकच आहोत.
भगवंत
कालातीत आहे.
म्हण्जे
खरेतर आपण सर्वच कालातीत आहोत.
अशी
ही जाणिव आपल्या प्रत्येकामधे
अत्यंत सूक्ष्म रूपाने सतत
जागृत असते .
पण
अज्ञानामुळे आपण आपला देहच
सत्य व कालातीत करण्याचा
प्रयत्न करत असतो.
ह्याप्रयत्नाचेच
दृश्यरूप म्हणजे निरनिराळी
वैद्यकीय तंत्रे व शोध असे
म्हणता येते.
ह्या
सर्वाचे मूळ म्हणजे आपला
अहंकारच आहे हे येथे लक्षांत
घ्यायचे आहे.
श्रीरामकृष्ण परमहंस
म्हणतात " आपण जो वर जिवंत आहोत तोपर्यंत अहंकार
हा राहणारच आहे; मग
त्याला ईश्वराचा चाकर म्हणुन
ठेवणेच सर्वांत उत्तम होय.”
ह्यावरून आणखी एक बाजू
स्पष्ट होते की अहंकार हा आपण
जोवर जिवंत आहोत तोपर्यंत
आपल्याबरोबर असणारच आहे.
तोच आपल्याला
खîrÉÉमित्राप्रमाणे
आपल्या मनावर ताबा करायला
मदत करणारा आहे.
श्रीरामकृष्णांच्या
ह्या उपदेशामधेच आपल्या मनावर
ताबा ठेवायचा म्हणजे काय
करायचे ह्याचे सुत्र आहे.
वरील
व blogवरच्या आधीच्या पोस्ट
च्या आधारे अंत:करणाचे
संपूर्ण कार्य कसे चालते
त्यासाठी एक उदाहरण:
फक्त
येथे घेतले आहे.
सविस्तर
भाग पुढच्या पोस्ट मधे लिहिणार
आहे.
आता एक
उदाहरण घेऊन अंत:करणाचे
कार्य कसे होते ते स्पष्ट
करण्याच्यासाठी येथे घेतो
आहे. आपण
हापूस आंब्याचे उदाहरण येथे
घेतो आहोत.
समजा
की उन्हाळ्याच ऋतू सुरू झाला
आहे.
उन्हाळा
जवळ आला की अनेक जाहिराती येऊ
लागतात.
त्यांमधे
देवगड हापूस आंबे येथे मिळतील
अशी जाहिरात समजा पाहिली.
ह्यानंतर
खालील क्रियांची साखळी तयार
होते.
अ)
ही
जाहिरात डोळ्यांनी पाहिली
गेली.
( बाह्य
जगांतून डोळा ह्या इंद्रियाद्वारे
माहीती आत गेली.)
मागे
एकदा हापूस आंबा खाल्ला होता
व त्याची चव,
रंग,
व नांव यांची
त्याच वेळी चितातमधे नोंद
झालेली होति.
( चित्तमधे
संस्कार झालेला होता)
जाहीरात
पहिल्यामुळे असा
आंबा पुन:
खावा
असे स्फुरंण प्रथम अंत:करणात
निर्माण झाले व चित्तमधे हे
स्फुरण शब्दरूप झाले..
ब)
मग मना
मधे संकल्प निर्माण झाला
की आता आंबे विकत आणावे.
पण मधल्या
काळामधे आपल्याला डॉक्टरानी
तुम्हाला मधुमेह झाला आहे
आता गोड तर खाऊच नका,
आंबे तर
अगदी वर्ज्य आहेत हे निक्षून
सांगितले आहे हे पण मनाला
आठवले व म्हणुन आंबे आणूच नयेत
उगाच मोह नको असे विकल्प पण
आले.
मनाला
काय करावेव हे समजले नाही.व
म्हणून ते बुद्धीकडे धावले.
क)
त्यानंतर
बुद्धिचा निर्णय झाला की
आंबे जरुर विकत घेऊया.
आपण खायचा
नाही पण बाकिच्यांना तर आनंद
घेऊदे!
४)
मग "
मी "
आंबे विकत
घेतले.
अर्थात हे उदाहरण अगदी सोपे आहे पुढच्या पोस्त मधे practical भाग येईल.