Monday, July 29, 2013

Added 43rd  post on उठा सकळ जन उठले नारायण for Abhanga a week of Sant Tukarama.
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com

 To Marathi Readers the explanation of the meaning is given after the English version given here ie at the end of English version.



उठा सकळ जन उठले नारायण । आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥ १॥
करा जयजयकार वाद्यांचा गजर । मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥ २ ॥
जोडोनिया कर मुख पहा सादर । पायांवरि शिर ठेवूनिया ॥ ३॥
तुका म्हणे काय पढियेतें मागा । आपुलालें सांगा दु:ख सकळ ॥ ४॥

Verbatim Meaning:-

Narayana is awakened now, O'Man wake up now. All the seers are happy to see their Lord Narayana || 1||
Praise the Lord using all the instruments like Mrudunga, Veena etc || 2||
Greet Him with folded hands and respectfully put your head at His holy feet || 3||
Tuka says that you may tell all your problems to Him and ask Him to bless you with desirable boon ( what ever you want) || 4||

Meaning of the Abhanga:-

If we see the verbatim meaning it appears very simple. However there is also a hidden deeper meaning. Let us try to find that meaning now.
In the first stanza itself, Tukarama Maharaj says that Lord is awakened now.
In Fact Lord is always awake only . The aspects of Sleeping are present only when we are in dual state ; where we treat the Lord as a separate entity . Out of shear love for the Lord; the disciple thinks that like him the Lord also needs sleep. Worship of Lord is possible only in the state where Lord is separate from the Disciple. That is why there are various pujas such as singing of devotional Songs to wake up the Lord . Evening Puja before He sleeps. Etc.

However the Disciple is really awakened only when the thought sinks in his mind that he has wasted his time and now he has to do something so as to attain liberation and unity with the supreme Lord. After knowing the supremacy of the lord the disciple starts to praise Him. In our country ( India) this is done by singing various devotional songs using various instruments like Drum etc.

It is obvious that those who have experienced the presence of the Lord ( by following one of the various paths) just like we experience the presence of the Sun; see the lord in His Image in the temple and feel very happy to see Him. This is in nutshell the meaning of the first two stanzas of the abhanga

In fact the Lord is present everywhere. He is the Atman in our heart( body)However since we are in the dual state , we do not experience His presence in our Heart. Until then it is better to treat Him separate from us and do His worship. All the saints therefore preach the worship of Lord and ask us to totally surrender to Him. Though He is not seen at least we can imagine His presence in His Image or Symbol. This is quite easy.

In the 3rd and 4th stanza s, Tukaram maharaj is advising us to see the Face of the Lord and surrender to Him .This is done generally by putting one's Head at the Holy feet of the Lord. Tukaram Maharaja further says that now you can ask Him to give you whatever you want.

When we surrender to some one , then it is customary to put the Head at the feet . By this we indicate that for us the Lord is everything. He is all knowledgeable and thus He know what is good for us and what is not suitable for us. He will guaranteedly protects us if we surrender to Him totally. This aspect is very important in the act of Worship..

This is the reason, why Tukaram Maharaj is saying the we should see the beloved Lord's face and pray to Him by closing both the Hands and surrender to Him by putting our Head at His holy feet.
Further in the same stanza we are also told to ask whatever we desire.

However What one should ask depends upon one's mentality.
Samartha Ramadas says in the below-given Verse whose meaning is as given below.

One who begs the wish-fulfilling cow for buttermilk, one who spends time in wasteful discussions instead of practicing the teachings of the Teacher( Teachings about the Lord and method for attaining liberation) , One who treats the wish-fulfilling stone as apiece of Marble, He will be always suffering and suffering only

One whose mind is inclined to Materialistic pleasures , and wastes this Human life ; behaves like the person described in the above verse of Samartha Ramadasa.
Lord is always ready to give us whatever we want, but what to ask is to be decided with proper thinking only. It is best to ask for Liberation and love for Him.

Tukarama Maharaj has written another Abhanga with it's first stanza “O' consort of Rakhumai ( Panduranga ) let my eyes only see your Image.” He prays  the lord to give him, only the Love for the lord .. We will see this abhanga sometimes later.

Also there is a very famous prayer written by Samartha Ramadasa.
Every stanza of this prayer ends with  “ O' Lord Sri Rama thisa is the only demand I am asking. ” .
There are 8 such stanzas in this prayer. This is one of the best examples of '” What is to be asked to the Lord “ Anyway.

Teaching of the Abhanga:-

This abhanga teaches us to Surrender totally to the lord , and thus be sure that The Lord will  give us what is suitable for us; and be happy with whatever He gives us. This abhanga is very important from the above described aspects.

Further below  is the Marathi version of the same Abhanga:-

उठा सकळ जन उठले नारायण । आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥ १॥
करा जयजयकार वाद्यांचा गजर । मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥ २ ॥
जोडोनिया कर मुख पहा सादर । पायांवरि शिर ठेवूनिया ॥ ३॥
तुका म्हणे काय पढियेतें मागा । आपुलालें सांगा दु:ख सकळ ॥ ४॥
अभंगाचा शब्दार्थ :-
नारायण उठले आहेत आता जागे व्हा . (नारायणाचे दर्शन झाल्याने ) तिन्ही लोकांमधील मुनिजनांना आनंद झाला आहे. ॥ १॥
भगवंताचा जयजयकार करा व मृदुंग , वीणा , टाळ इत्यादि वाद्यांचा गजर करा .॥ २॥
भगवंताचे श्रीमुख दोन्ही हातांनी नमस्कार करून आदराने पाहा. त्याच्या पायी डोके ठेवा ॥ ३॥
तुका म्हणतो की तुम्हाला जे दु:ख होते आहे ते त्याला सांगा व काय हवे ते त्याच्याकडे मागा। ४॥

अभंगाचे अर्थस्पष्टीकरण :-

तसे वरवर पाहिले तर अभंगाचा अर्थ अगदी सोपा वाटतो व आहे पण .
अभंगाच्या पहिल्याच चरणामधे महाराज म्हणतात की भगवंत आत जागा झाला आहे. तेंव्हा आता तुम्ही झोपू नका . त्याचे दर्शन झाल्याने सर्व मुनिजन आनंदित झाले आहेत.

खरतर भगवंत झोपला होता कां ? मुळीच नाही पण भक्ताला त्याच्यावरच्या प्रेमामुळे वाटते की त्याला पण आपल्यासारखीच झोपेची गरज असणार व तो पण रात्री झोपतो. ह्याविचारामुळेच आपल्याकडे सकाळी कांकड आरति, तसेच रात्री शेजारती म्हणतात.
ज्यावेळेला माणसाला कळते की आतापर्यंत त्याने सर्व वेळ काळ उगाचच ऐहिका वस्तूंच्या मागे धावण्यात व्यर्थ घालविला आहे ती वेळ म्हणजे खरी जागे झाल्याची वेळ आहे. ह्यावेळिच भगवंताचे दर्शन व्हावे ही ईच्छा मनामधे जागॄत होऊन माणूस भगवंताची भक्ती करू लागतो.
मग त्याला देवाच्या नावाने जयजयकार करावासा वाटतो. त्यचे भजन टाळ मृदंग इत्यादी वाद्ये वाजवून करावेसे वाटते.
जे असे आधीच जागे झाले आहेत व ज्यांनी नवविधाभक्ति, योग किंवा कोणत्याही मार्गाने जाऊन भगवंताची भेट घेतली आहे असे संतजन म्हणुनच नेहमी भगवंताच्या दर्शनाची अनुभूति घेत आनंदामधे मग्न असतात.
ह्याच स्थितीचे वर्णन अभंगाच्या पहिल्या व दुसर्या चरणामधे महाराजानी केलेले आहे.
अभंगाच्या ३ व ४ चरणामधे तुकाराम महाराज म्हणतात की भगवंताचे दर्शन घ्या , त्याच्या पायांवर डोके ठेवा व असे शरण जाऊन जे काय मागायचे ते मागा.

खरे तर भगवंत सर्वत्रच आहे.म्हणजेच आपल्या हृदयांतील अंतरात्मा पण तोच आहे. मायेच्या
अंमलाखाली आपण असल्याने आपल्याला ह्याचा अनुभव नाही. म्हणुनच अनुभव येईपर्यंत
द्वैतामधे राहूनच भगवंताची भक्ती करावी त्याला अनन्य शरण जावेहाच सर्व संतांचा उपदेश
आहे. असो. तसेच भगवंत हा सगूण आहे तसाच निर्गूण अव्यक्त पण आहे. सर्वसामन्यांसाठी
सगूण रूपी भगवंताचे भजन करणेच सोपे व योग्य असते.

आपण आपले डोके ज्याच्या पायांशी आपण ठेवतो त्याला आपण पूर्ण शरण गेलेलो असतो.
असे शरण जाणे ह्यामधे "आपले सर्वस्व तोच आहे, त्याला सर्व कांही ठाऊक आहे ,आपल्यासाठी
योग्य काय व अयोग्य काय आहे ते त्याला माहीत आहे व म्हणुनच तो आपले सर्व संकटांमधून रक्षण करेलच " ही खात्रीची भावना असणे महत्वाचे असते.

म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात की अशा तुमच्या प्रिय भगवंताच्य़ा मुर्तीचे दर्शन घ्या. त्याच्या पायांशी डोके ठेवून त्याला शरण जा. दोन्ही हात जोडून त्याला प्रणाम नमस्कार करा तुकाराम महाराज पुढे हे पण म्हणताहेत की त्याच्याकडे जे काय मागायचे ते मागा.
भगवंताकडे काय मागावे ? ह्या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकासाठी वेगवेगळे आहे.

समर्थांचा एक श्लोक येथे प्रस्तुत करता केला आहे.

घरी कामधेनू पुढे ताक मागे । हरीबोध सांडूनी वेवाद मागें।
करीं सार चिंतामणी काच खंडे। तया मागतां देत आहे उदंडे ॥

ज्याचे मन ऐहिकाकडे गुंतले आहे तो ऐहिक सुखाचीच मागणी करेल. तसे करणे म्हणजे
चिंतामणी कडे काचेचे तुकडे मागण्यासारखे असते किंवा कामधेनूकडे ताकाची मागणी
करण्यासारखे हे आहे..


भगवंत द्यायला तयारच असतो पण काय मागावे हे म्हणुनच विवेकाने ठरविणे उत्तम .
मागायचे तर सर्व दु:खांपासून नेहमी करता मुक्ती कां न मागावी ?
तुकाराम महाराजांचाच एक प्रसिद्ध अभंग आहे. त्याचा पहिला चरण " सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया " असा आहे.". ह्या अभंगात त्यांनी भगवंताकडे फक्त त्याची भक्ती घडावी एवढेच मागितले आहे. पुढे कधीतरी तो अभंग आपण पाहूच.
समर्थ रामदासांचे " रघूनायका मागणे हेची आता " हा शेवटचा चरण असलेले करूणाष्टक
म्हणजे आपण काय मागावे ह्याचे उत्तम उदाहरण आहे. असो.

अभंगाची शिकवण :- वर लिहिल्या प्रमाणे भाव ठेवून भगवंतास शरण जा. स्वत:ची सर्व
दु;खे त्याला सांगा व जे काय हवे ते मागा . तुम्ही खरेच जर असे संपूर्ण शरगागत
भावाने देवा कडे जाल तर तो तुमच्या सर्व ईच्छा पूर्ण करेल हे हा अभंग सांगतो. .
आपल्याला अशी जणू ग्वाहीच येथे मिळते आहे. व ह्या दॄष्टीने हा एक महत्वाचा अभंग
आपण येथे पाहिला आहे.


Wednesday, July 17, 2013

 suppliment to 42nd  post on 16/07/2013x for Abhanga a week of Sant Tukarama.

Date 16th July 2013.

Dear Reader , following are the comments from Sri M. Jayaram on the 42nd Abhanga. These comments will be very useful for the further understanding of Tukarama Maharaja's teachings. That is the reason I am publishing these as a new Post.

There is a famous statement about the spiritual knowledge about the Parabrahman. I am not remembering it exactly but the sum anmd substance is as given here. “ One who says that he has understood , has not understood, The one who says otherwise gets the experience and understanding”.

. On abhang 42 Mr. Jayaram comments as given below.:-

1. Parabrahman cannot be described by logic. The moment you define anything by logic, it's no longer infinite . The dream state analogy can only explain that that a world which is so alive and real disappears when you wake up just as a lamp dispels the darkness of light.
My view is : It is rightly said here that Parabrahman can not be described by logic. I have only tried to explain the All Pervading aspect in my post. .

2. It is more a comparison of deep-sleep state where our mind, senses and body are at sleep and the "good" feeling that  follows the sleep when you awake tell you something was present when all these were asleep.

3. As regards pain and suffering, most of eastern philosophy starts with this question — the western philosophy is more obsessed with who created the world. It is this question which reflects the basic tenet of dharma and karma and the purushaarthas as integral to life. 

4)as i see it, God lies within you — integral like advaita or qualified or distinct as in other philosophies and as soon as one realises this fact, he is out of the chakra of rebirth. The oneness of the soul(or whatever you want to name it) to the universal soul is the answer. The explanations given by you reduce GOD to a distinct being-more powerful,infinite and whatever.Any such explanation leads to a simple question-who created GOD ?
5. Bhakthimargaa is one of the easiest way to realise this oneness and that's where Tukaram is superb — simple language, simple synonyms and universal appeal




.

Monday, July 15, 2013

Added 42nd post on अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव  for Abhanga a week of Sant Tukarama.
 Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com
 To Marathi Readers the explanation of the meaning is given after the English version given here ie at the end of English version.


42nd Abhanga for week ending on 14th July 2013

अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव । प्रतिमा तो देव कैसा आहे ॥ १॥
नाही भाव तया सांगावे तें किती । आपुल्याला मती पाषांडिया ॥ २॥
जया भावे संत बोलिले वचन । नाही अनुभव शाब्दिकांसी ॥ ३॥
तुका म्हणें संती भाव केला बळी । नकळता खळी दूषिला देव ॥ ४ ॥


Background behind this Abhanga:-

In this Abhanga, Saint Tukaram maharaj is telling us the principle of Advaita Vedanta that all this world is parvede3d by the Parabrahman . Maharaj is telling this because of his own experience. This is the subject of this Abhanga.
Meaning of the Abhanga :- In the beginning of the abhanga, Tukaram Maharaj has made a statement that this Brahman is all pervading. There is no single space in this universe which He( Parabrahman ) has not occupied. Let us understand what is the meaning of this statement and then proceed.
.
In our scriptures there is a lot of discussion on this issue. In Bhagavat Purana there is a story of Bhakta Prahlada to bring out this point . Prahlada's father HiranyakashyapU asks him “ Where is your God?”. To this Prahlada replies that my God is pervading everything and thus is present everywhere. When Prahlada gave this answer , the Lord ( Who destroys all the demonic forces .and was waiting to kill Hiranyakashyapu who was also a demon) inspired Hiranyakashyapu to ask next question “ Is He present in this pillar? “ Prahlada replied “Yes” Afterwords the Lord appeared as NruSimha ( Half man and half Lion)and killed Hiranyakashyapu.
This universe is created from that Unknown Power whom we call Parabrahman or Bhagavanta He only is the True God and is not knowable through our five senses or intellect.

However by Logic also one can conclude that He is all parvading.as given below.

For Example :- consider our daily experience of Dreaming. In our dream ,we create our own universe. This contains all the live or non living things.moving things,such as we ourselves, our fri8ends, and other people, Buildings, etc. All these things , in fact every atom of this universe in the dream is we ourselves. None of these things is different from us. That means , we pervade everything in our dreamworld.
Similarly this Universe is a dream of the supreme Lord. Thus everything in this is pervaded by Him

Late Jagadishchandra Basu, has demonstrated this point to Sri. Paramahansa Yogananda through some instrument invented by him. SwamY Yogananada has described this incident in his famous book by name “ Autobiography of a Yogi”.

Therefore we can say that just because we don’t experience the all pervading Quality of Parabrahman; does not mean that all the seers are making a false statement. In fact when we worship the God in various forms such as Shiva, Ganesha etc ; we are actually worshiping the Brahmana only.
There is a famous Sanskrit Verse .
आकाशात्‌ पतितं तोयं यथा गच्छति सागरम्‌ । सर्व देव नमस्कारान केशवं प्रति गच्छति ।"
All the water falling from the sky ultimately reaches the ocean . Similarly all the worships reach Keshava ( Brahman).
All the seers and saints have preached this point in different words. The y have actually experienced this and we have not. That is the difference between them and us..
Vedanta also states that when someone experiences the God , he merges with Him. Then there is no duality between the God and His disciple. Such persons effort-fully come to the dual state so as to explain their experiences to the other people. Duality has Birth-death. And non-duality with God has no such state of existance. In order to inspire people like us , the seers write their experiences. This Abhanga is one such statement of experience in a verse form..

However there are such persons who are blessed with very high intellect, but use this gift to put all their efforts to prove that there is no such power like God. They feel that this is the best way to fame.
They put forward questions such as If there is God then why has created so much pain and misery in
this world. Why He can not prevent the calamities like Tsunami, Too much rain etc.? Why people who do not follow ethical way of living are seen to be prosperous and those who are God fearing are seen suffering ? And so on. They use these arguments to prove that there is no God Almighty.
It does not achieve anything else.
Tukarama Maharaj has termed such people as heretics in the 2nd stanza. He further says in the 3rd stanza that this preaching is not meant for thoes such heretic persons..
If we pay a little attention to the incidents happening around us, or give thought about the visible Universe , we can easily come to the conclusion the “GOD IS THERE He alone is all know-er . He is all pervading . He is our creator and there our Father, Mother everything.”.If one has this attitude in his mind , then definitely one day he will develop love for God and have the experience of unity with God .

However such love does not develop all of a sudden. It develops due to association with God thought. Also one has to be pure in Heart. This purity is achieved by doing all austerities ( by Body, by mind , by speech ). Thinking about what is Transient in nature of thing and then leaving all the attachment with these transient things is required to be done . These methods purify the mind and then the God manifests in such a pure mind.. The disciple and God are then united and thus one is able to free himself from all the sufferings and attain Liberation..

In the last stanza of the Abhanga Tukaram Maharaja is advocating the same point and here he says that “All the seers and saints are advocating the above described approach . He further says in the last stanza that we should follow this and do not blame God for your sufferings..

Teachings of this Abhanga:-

As Tukaram Maharaj tells us, we should examine our feelings and attitude towards GOD . If we believe that He is there then very good, let us follow the approch . Even if there is no such feeling still it is better to try the approch, and then decide our opinions. This appears to be the teaching of this abhanga.


42nd Abhanga for week ending on 14th July 2013

अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव । प्रतिमा तो देव कैसा आहे ॥ १॥
नाही भाव तया सांगावे तें किती । आपुल्याला मती पाषांडिया ॥ २॥
जया भावे संत बोलिले वचन । नाही अनुभव शाब्दिकांसी ॥ ३॥
तुका म्हणें संती भाव केला बळी । नकळता खळी दूषिला देव ॥ ४ ॥

अभंगामागची भूमिका :-
ह्या अभंगामधे तुकाराम महाराजांनी अद्वैत वेदांताचे मुख्य सांगणे जे आहे तेच खरे आहे हेच ठासून स्वानुभवाने सांगितले आहे. हाच अभंगाचा मुख्य विषय आहे.

अभंगाचे अर्थस्पष्टीकरण :-

महाराज प्रथम हे स्पष्ट करताहेत की ब्रह्म सर्वव्यापी आहे. शास्त्रांमधे हया विचारावर बराच उहापोह केलेला आहे. जसे भागवतामधे भक्त प्रह्लादाला हिरण्यकश्यपू विचारतो की तुझा देव कोठे आहे?. प्रह्लाद काय उतार देतो ह्याचीच भगवंत वाट पहात होते. पण प्रहलादाने उत्तर दिले की तो सर्वव्यापी आहे. त्यामुळे कोठे प्रगट व्हायचे हा प्रश्न भगवंतापुढे उभा राहिला. शेवटी हिरण्यकश्यपूलाच प्रेरणा दिली व मग त्याने विचारले की तुझा देव ह्या खांबांत आहे कां? प्रहलादाने होय असे उत्तर दिले. ह्यानंतर भगवंताने नृसिंहरूपाने खांबातून प्रगट होऊन हिरण्यकश्यपूचा वध केला.
सृष्टीची उत्पत्ती ज्या एकमेवाद्वितीय देवापासून झाली तोच खरादेव म्हणजे परब्रह्म अथवा ब्रह्म म्हणजे भगवंत हा होय.
तोच सर्वव्यापी आहे हे तर्काने समजू शकते.
उदाहरणार्थ आपल्या प्रत्येकाच्या स्वप्नामधील सर्व सृष्टीचे निर्माते आपण स्वत:च असतो. त्यातली माणसे, प्राणी , रस्ते, इमारती गाड्या घोडे सर्व कांही आपणच स्वत:मधून निर्माण करतो. स्वप्नामधली प्रत्येक अणुरेणू आपल्यामधूनच तयार होते. म्हणजेच सर्व कांही आपणच तेथे असतो.
असेच भगवंताचे स्वप्न म्हणजे ही सर्व सृष्टी आहे. म्हणून सर्वकांही तोच म्हणजे ब्रह्म आहे ; अर्थात सर्व सृष्टी ब्रह्मरूपच आहे हे तर्काने सिद्ध होते. सर जगदीश चंद्र बोस ह्यांनी हेच एका यंत्राद्वारे दाखवले असे परमहंस योगनंदांच्या " Autobiography of a Yogi” ह्या पुस्तकांत नॊंद आहे. असो.
पण आपल्याला असा अनुभव नाही व संतांचा असा प्रत्यक्ष अनुभव असतो. ते ब्रह्मरूपच असतात.

आपल्याला तो अनुभव नाही म्हणून संतांचे बोलणे ,” ब्रह्म सर्वव्यापी आहे" हे म्हणणे खोटे आहे असे नव्हे. आपण ह्याच निर्गूण निराकाराची उपासना प्रतिमा करुन करत असतो. ब्रह्म हेच आपल्या पूज्य प्रतिमेमागचे अधिष्ठान आहे. तुकाराम महाराज व ईतर सर्व संतांचा हाच अनुभव आहे.

आकाशात्‌ पतितं तोयं यथा गच्छति सागरम्‌ । सर्व देव नमस्कारान केशवं प्रति गच्छति ।"

वरचा संस्कृत श्लोक हेच सांगतो की जसे आकाशातून पडलेले सर्व पाणी शेवटी सागरालाच जाऊन मिळते तसेच कोणत्याही देवतेला केलेली पूजा शेवटी भगवंतालाच पोहोचते.

ह्या भगवंताचा प्रत्यक्ष अनुभव जेंव्हा एखाद्याला होतो तेंव्हा तो ब्रह्मरूपच होतो. पण संतांनी बल:पूर्वक द्वैतामधे येऊन आपल्यावर उपकारच केले आहेत. अनुभवाचा भाग हा द्वैतातला आहे. आपल्याला जर असा अनुभव आला की " मी तोच आहे " “अहं ब्रह्मास्मि " तर त्याक्षणी आपण नेहमीकरता जन्म-मृत्यु चक्रामधून मुक्त होऊ. ह्या सायुज्यमुक्तीसाठीच परमार्थसाधना ,भक्ती प्रत्येकाने करावी
असे अनुभव शब्दबद्ध करण्यामागे संतांची हीच कळकळ आहे. हा अभंग बहुतेक ह्याच करणामुळे तुकाराम महाराजांनी सांगितला आहे.

बरेच जणांना भगवंताने अत्यंत तलख बुद्धी दिलेली असते. पण अनंत जन्मांची पुण्याई नसल्याने अशी मंडळी देवच नाही हे सिद्ध करण्यातच धन्यता मानणारी असतात.
देव आहे तर मग त्याने एवढी दु:खे कां निर्माण केली ? तो निरनिरालळ्या आपत्ती जसे त्सुनामी, अतीवृष्टी, अशी संकटे कां आणतॊ? वाईट वर्तन करणारी माणसे संपत्तीवान दिसतात तर सात्वीक बुद्धीच्या माणसांना मत्र जगण्यासाथी खूप मेहनत करावी लागते म्हणजे भगवंत अन्यायच करीत नाही कां? ईत्यादी प्रश्न उपस्थित करून देव नाहीच असे ही मंडळी म्हणतात व सामन्यांचा बुद्धीभेद करतात. तुकाराम महाराज अशा लोकांना पाषांडी म्हणजेच पाखंडी असे अभंगाच्या दुसîrÉÉ चरणांत म्हणतात.

अगदी थोडा विचार केला तरी भगवंताचे कर्तृत्व ध्यानात येते. पण जर एखाद्याने झोपेचे सोंग घेतले असेल त्रर त्याला जागे कसे करायचे? अशा भावहीन लोकांना कांहीही उपदेश करणे व्यर्थच असते. हेच अभंगाच्या दुसîrÉÉ चरणात सांगितले आहे. तिसîrÉÉ चरणामधे लगेच तुकाराम महाराज म्हणतात की संतांचा उपदेश अशा पाखंडी लोकांसाठी नाही . हा उपदेश ज्यांची देवाबद्दल "तो आहेच" अशी भावना आहे त्यांच्यासाठीच आहे.

ह्या पद्धतीने आपल्याला हेच स्पष्ट होते की जर भगवंताबद्दल " तो आहेच , तोच योग्य अयोग्य वगैरे सगळे कांही जाणणारा आहे, तो सर्वत्र सर्वव्यापी आहे व माझी आई, वडील सखा आहे" अशी भावना असेल तर भगवंताची व आपली नक्कीच भेट होईल.

असा भाव कांही एकदम मनामधे प्रगट होत नाही. त्यासाठी कायिक, वाचिक व मानसिक तप करून मनाला शुद्ध करावे लागते.सतत सारासार विचार करून असाराची ( नाशवंताची ) आसक्ती नष्ट व्हावी लागते. शुद्ध मनाच्या आरशामधेच प्रेमामुळे भगवंत प्रगट होतो. मग अशा भक्ताला तत्क्षणीच ब्रह्मरूपता येते.
सर्व संतांनी असेच वर्तन ठेवले . तुम्हीही करा व उगाच भगवंताला जगामधल्या व तुमच्या आयुष्यातल्या दु:खासाठी दोष देऊ नका ; असे अभंगाच शेवटचा चरण आपल्याला सांगतो.


अभंगाची शिकवण :- महाराज सांगतात त्याप्रमाणे आपण भगवंताबद्दल भाव आहे कां ? हे पाहावे व असा भाव नसला तरीही संतांच्या सांगण्याप्रमाने वागून मग काय ते ठरवावे. तसेच जर आपला भाव भगवंताबद्दल " तो आहेच " असा असेल तर उत्तमच. दोन्ही ठिकाणी भगवंताची उपासना करून मुक्तिसाधण्याचे प्रयत्नांना लागावे हीच शिकवण हा अभंग देतो आहे.