Wednesday, November 28, 2012

     
         Added 17th Abhanga ऐसा हा लौकिक कदा रखावेना । for Abhanga a week of Sant Tukarama.
         blog address :http:// tukaramasteachings.blogsopt.com
       Contact e-mail address is rgphadke@gmail.com
इंग्रजी अर्थस्पष्टीकरणानंतर पुढे मराठी स्पष्टीकरण दिलेले आहे.
        Abhanga 17 Date 29th Nov 2012

ऐसा हा लौकिक कदा रखावेना । पतितपावना देवराया ॥ १ ॥
संसार करितां म्हणती हा दोषी । टाकितं आळसी पोटपोसा ॥ २॥
आचार करितां म्हणती हा पसारा । न करितांनरा निंदिताती ॥ ३॥
संतसंग करितां म्हणती हा उपदेशी । येरा अभाग्यासी ज्ञान नाहिं ॥ ४ ॥
धन नाही त्यासी ठायींचा करंटा । समर्थासी ताठा करिताती ॥ ५ ॥
बहु बोलोंजाता म्हणती वाचाळ । न बोलतां सकळ म्हणती गर्वीं ॥ ६ ॥
भेटिसि न जातां म्हणती हा निष्ठूर । येता जातां घर बुडविलें ॥ ७ ॥
लग्न करूं जातां म्हणती हा मातला । न करितां जाला नपुंसक ॥ ८ ॥
निपुत्रिका म्हणति पहा हो चांडाळ । पातकाचे मूळ पोरवडा ॥ ९ ॥
लोक जैसा ओक धरिता धरवेनां । अभक्ता जिरे ना संतसंग ॥ १० ॥
तुका म्हणे आतां आइका हे वचन । त्यजुनियां जन भक्ति करा ॥ ११ ॥

Verbatim Translation :

O' all purifying Lord, it is very difficult to follow the ways of this world and the society || 1||

If One pays attention to his worldly duties, people blame him and if one does not do so then they call such a person as lazy and self centered || 2 ||

If one works hard and earns wealth then people say that he has unnecessarily increased his liabilities., and if this is not done then also they condemn him.|| 3 ||

If one follows the teachings of the Sages then people say that he preaches, and if one does not do this then they say that he is unfortunate not to have knowledge|| 4||
If one does not have wealth then he is called unfortunate , and for a wealthy person they say that He is proud of his wealth and is showing it off.|| 5 ||

If one mingles with the people he is called as talkative, if one does not mingle then the society says that he is arrogant || 6 ||

If a person does not meet the visitors he is termed as Heartless, but if he welcomes everyone then he is said to be one who is wasting his wealth and bring poverty to the household || 7 ||

         If a person shows interest to get married then he is not appreciated , if he does not marry then he is called impotent || 8 ||

        If a person is childless he is condemned, if he has many children then this is treated as the main reason for committing all wrongdoings || 9 ||
     
        No body can not hold the vomited food in hands, similarly the people who do not believe in God and worship can not tolerate the company of good persons || 10 ||
  
         Tuka says that listen to what I say. Forget all what the society approves of or disapproves, and worship the God. || 11 ||

         Background information :

It is very clear that we have to live in the society. Each society has it norms for living. The nature of the Human beings is the same whether they are Indians, Westerners or from any other region on the earth.

         Most of the societies have certain norms for a person living in the society.
         However some individuals differ in their opinion. 
         They are more inclined  towards spirituality.
The Vedic Dharma insists that one should follow the fourfold path in   individuals viz.
       One should first do his duties (धर्म), earn money in rightful ways( अर्थ )for    looking after one's family, Live the normal life of a householder ( marry to continue the race ) and do the duties of a householder ( काम) and also strive for the ultimate goal of Liberation.(मोक्ष).
    
       This Abhanga is applicable for those who want to start the efforts for   attaining the goal of Liberation ( मोक्ष)

       Teachings of this Abhanga :

       It is generally seen that many a times some persons in the the society or   family are not happy when an individual starts his efforts in the direction of spirituality.
      The reasons may vary. Some family members may be feeling fear that the individual will not pay enough attention for the welfare of the family. There may be many reasons.

      The meaning of the first 8 stanzas is very clear and straightforward.
and therefore is not discussed here.

         What Tukarama Maharaj says in the last two stanzas is very  important.

           He says that do not pay attention to what all others say as far as you want to start efforts for attaining your goal of liberation. (This is because it is only the change of attitude of an individual that matters most).

          As long as you have love for the God in your mind, and as long as you are not going to abandon your duties , do your worship of God. Do not worry of what the society says or thinks about your worshiping the God.



अभंगाचा अर्थ समजण्यासाठीची माहीती :

आपण प्रत्येकजणाला सभोवतालच्या समाजातच रहायचे आहे. कोठेही गेलो तरी हेच आढळते की सर्व माणसांचा स्वभाव कांही बाबतीत सारखाच असतो, मग तो भारतीय असो वा पाश्चिमात्य असो किंवा पृथ्वीवर च्या कोठल्याही पर्देशांतला असो.

ह्या सर्व समाजांच्या जीवन जगण्याबाबत कांही विशिष्ठ पद्धती असतात. पण कांही जणांना अध्यात्माबद्दल आपुलकी असते.

वैदिक धर्मा मधे माणसाने चार आश्रमांप्रमाणे जीवन जगावे असे अपेक्षित आहे. पहिले म्हणजे त्याने आपली कर्तव्ये सर्वप्रथम योग्य रीत्या करावी., आपल्या कुटुंबाला जगण्या करता लागणारा पैसा अडका नीती न्याय्य मार्गाने मिळवावा , गृहथाने वंशवृध्दीसाठी कामाला पण जीवनांत योग्य स्थान द्यावे व शिवाय मोक्षप्राप्तीसाठी सुद्धा जरूर यत्नशील असावे.

हा अभंग अशा प्रत्येकासाठी आहे ज्याला मोक्षाची कामना आहे.

अभंगाची शिकवण :

बरेच वेळा असे दिसते की जर एखाद्याने परमार्थसाधना सुरु केली तर समाजाला वा त्याच्या कुटुंबातल्या माणसांना ते आवडत नाही.

ह्याचे कारण म्हणजे त्यांना वाटते की हा आता आपल्या कर्तव्याला विसरेल व घरातल्या मंडळींचे हाल होतील. अनेक कारणे असू शकतात.

ह्या संदर्भानुसार अभंगाच्या सुरवातिच्या चरणांचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. सोपा आहे म्हणून येथे त्या भागाचे स्पष्टीकरण दिलेले नाही.फक्त तो भाग सध्याच्या मराठीमधे लिहिला आहे.

ऐसा हा लौकिक कदा रखावेना । पतितपावना देवराया ॥ १ ॥
हे देवा मला तुझी भक्ति करायची आहे व त्यामुळे लौकीक पध्दतीने मला जगता येत नाहि आहे. मला माहीत आहे की तूच माझ्यासारख्या पतिताला पावन करणारा आहेस.

संसार करितां म्हणती हा दोषी । टाकितं आळसी पोटपोसा ॥ २॥
जर मी स्वत:ची कर्तव्ये केली नाहीत व तुझे भजन करत राहिलो तर लोक मला आळशी फुकटखाऊ म्हणतील.

आचार करितां म्हणती हा पसारा । न करितांनरा निंदिताती ॥ ३॥
जर संसाराकडेच लक्ष दिले तर निंदा करून म्हणतील की हा स्वार्थी आहे व स्वत:च्या भल्या साठी ह्याने हा सर्व पसारा व्याप वाढविलेला आहे.

संतसंग करितां म्हणती हा उपदेशी । येरा अभाग्यासी ज्ञान नाहिं ॥ ४ ॥
जर संतसंग धरला तर ंहणतील की हा लोकांना उपदेश करतो जणू कांही बाकिच्यांना कळतच नाही असे ह्याला वाटते.

धन नाही त्यासी ठायींचा करंटा । समर्थासी ताठा करिताती ॥ ५ ॥
जर जवळ धन संपत्ती नसेल तर मग करंटा म्हणतील व असेल तर म्हणतील
की ह्याला पैशाचा मद चढलेला आहे.

बहु बोलोंजाता म्हणती वाचाळ । न बोलतां सकळ म्हणती गर्वीं ॥ ६ ॥
जर लोकांमधे बोलत सएल तर म्हणतील की हा वाचाळ आहे, व न बोलल्यास गर्विष्ठ म्हणतील.

भेटिसि न जातां म्हणती हा निष्ठूर । येता जातां घर बुडविलें ॥ ७ ॥
जर कोणाशी फार जवळीक ठेवली नाही तर म्हणतील की हा निष्ठूर काळजाचा आहे व जनसंपर्क वाढवला तर म्हणतील की लोकांचे करून ह्याने घर बुडविले.

लग्न करूं जातां म्हणती हा मातला । न करितां जाला नपुंसक ॥ ८ ॥
लग्न करु म्हटले तर म्हणतात की हा मातला आहे व गुढ्घ्याला बाशिंग लावून बसला आहे. व न केले तर म्हणतात की हा नपुंसक आहे.

निपुत्रिका म्हणति पहा हो चांडाळ । पातकाचे मूळ पोरवडा ॥ ९ ॥
ज्याला मुलेबाळे नाहीत त्याला चांडाळ म्हणतात व ज्याला आहेत त्याला म्हणतात की ह्याने पोरवडा वाढवला कारण अनेक मुले असल्यानेच माणूस पातकी होतो.( त्यांचे पालन पोषण करण्याकरीता पातके करतो)

लोक जैसा ओक धरिता धरवेनां । अभक्ता जिरे ना संतसंग ॥ १० ॥
ज्याप्रमाणे ओकारी हातांमधे धरता येत नाही त्याच प्रमाणे ज्याला संतसंग हवा असतो त्याला संसारांत मग्न झालेल्याची संगत धरवत नाही.

फक्त शेवटच्या दोन चरणांमधे तुकाराम महाराजांनी महत्वाचे जे कांही सांगितले आहे तेवढा भागच येते स्पष्टीकरणासाठी घेतलेला आहे.

महाराज म्हणतात जर तुम्हाला मोक्षाची वाटचाल करायची ईच्छा झाली
असेल तर मग ईतर मंडळी काय म्हणतील त्या कडे लक्ष देऊ नका.
प्रयत्न सुरू करा. ( कारण येथे व्यक्तिगत भाव व साधानाच महत्वाची आहे. )

जोवर तुमच्या माअमधे भगवंताविषयी प्रेम व श्रद्धा आहे, जोवर तुम्ही स्वत:ची
कर्तव्ये न विसरता बिनचुकपणे करता ( त्यांच्या कडे दुर्लक्ष करत नाहॊ आहात;
तर मग भगवंताची मनापासून भक्ती करा. कोण काय म्हणतो ह्याकडे दुर्लक्ष
करा )

हीच शिकवण ह्या अभंगामधे दिलेली आहे.



Thursday, November 22, 2012

    16th Abhanga Added post  बळें बाह्यात्कारें संपादिलें सोंग। for Abhanga a week of Sant Tukarama.
     Date 23 rd Nov 2012.
    blogaddress :http:// tukaramasteachings.blogsopt.com
    Contact mail address is rgphadke@gmail.com
अभंगाचे मराठी स्पष्टीकरण इंग्रजी स्पष्टीकरणानंतर दिलेले आहे.

           बळें बाह्यात्कारें संपादिलें सोंग। नाहीं जाला त्याग अंतरींचा॥ १ ॥
ऐसें येतें नित्य माझ्या अनुभवा । मनासी हा ठावा समाचार ॥ २ ॥
जागृतीचा नाहीं अनुभव स्वप्नीं । जातो विसरूनि सकळही ॥ ३॥
प्रपंचाबाहेरी नाहीं आलें चित्त । केले करी नित्य वेवसाव ॥ ४ ॥
तुका म्हणे मज बहुरुप्याचि परी । जालें सोंग वरी आंत तैसें ॥ ५ ||

Verbatim Translation :

Many a persons forcefully assume ( show to the world) the appearance of a person who has no desires | Actually their mind has not given up the desires || 1 ||
I am experiencing this continuously | My mind is fully aware of this state of mine || 2 ||
When I sleep and go to dream-sleep state then I forget the experience of the world in the waking state (I do not have awareness of the waking state)|| 3 ||
The mind has not come out of the illusion of visual world | It keeps on doing it's work ( of doing some resolve and then doubting it ) || 4 ||
Tuka says that my present state is like that of an actor. | Whatever is seen outside ; same is the condition inside || 5 ||

Meaning of the Abhanga :

In this Abhanga Sant Tukaram Maharaj is describing the condition of the fraudster sages ( those who deceive the world by external show for their own benefits).
And he has also described his own state of mind in the second and the last stanza of the abhanga.

In the first stanza : He says that there are some kind of persons who just show that they have no desires. However they have not ( in their heart ) abandoned any of the desires.

In the second Stanza He says that I am continuously aware of this state of mind .
There are three major types of desires a man has .1) The desire for Name and fame लोकेषणा, 2) Desire for wealth वित्तेषणा ३) Desire for wife, children sex.दारेषणा) . Tukarama maharaj here is indirectly telling us to keep away from such fraudsters.

Indirectly he is also telling us to abandon the desires. How to abandon the desires is a big question . Partial answer for this question is in the third stanza.

In the next line itself i.e. is in the third stanza he says that he is fully aware of his own state of mind meaning that our mind knows where we are .

Thus a person who is desirous of God Vision should examine whether his mind still has the desires for worldly things. If it is so then the mind still needs purification.

The third stanza directly touches the thoughts described in detail in the Vedanta ( especially in the Maandukya Upanishad ) . Contemplation on this thought enables one to develop asceticism ( वैराग्य ) i.e. indifference to the worldly desires .

Tukarama Maharaj here says that one forgets the experience of the visual world (experienced when one is awake); when one goes to dream state of sleep. I am describing this thought briefly here.

We know that in the dream state we ourselves create the whole world . In this world we have people , various things such a houses, trees etc. everything that we experience in the waking state. We may get a lottery and will feel very happy too in the dream.
However when we come back to the waking state i.e, when we are awake then we realize that it was just a dream. Therefore then we do not cry over the loss of lottery money . Why? Because it was just a dream.
The Vedanta says that the waking state is also a dream only. This is the dream of the Parasmeshwara. Thus we are not different from Him. And Thus realized; we really should not get attached to the world and cry for loss of any worldly thing be it wealth, or our near and dear ones and even our own body.
Also it means that everything is done by Him as per His plan ; using our body as His instrument. ( He is the doer not me.)

In both the states the experiencer is the same. He is the Atman. He does not die . That is our true nature.

As stated in the fourth stanza , however most of us forget the above described basic fact. And because of this we always think that this world is true, our body is true. Thus we run behind the bodily pleasure and totally forget that the death can strike us any time.But if we look about every incident or happening in our life it enables us to develop  detachment and reduce the grief we may feel because of any loss.


The last stanza again describes what is the state of mind of Sant Tukarama. Himself. He confirms here that he is same both outside and inside. That is the true sign of a saint


अभंगाचे मराठी स्पष्टीकरण :-

बळें बाह्यात्कारें संपादिलें सोंग। नाहीं जाला त्याग अंतरींचा॥ १ ॥
ऐसें येतें नित्य माझ्या अनुभवा । मनासी हा ठावा समाचार ॥ २ ॥
जागृतीचा नाहीं अनुभव स्वप्नीं । जातो विसरूनि सकळही ॥ ३॥
प्रपंचाबाहेरी नाहीं आलें चित्त । केले करी नित्य वेवसाव ॥ ४ ॥
तुका म्हणे मज बहुरुप्याचि परी । जालें सोंग वरी आंत तैसे ॥ ५ ॥

अभंगाचा शब्दार्थ :-
मला हा रोजच अनुभव येतो आहे की अनेक जण बाह्यत: वैराग्याचा आव बळजबरीने आणतात. पण खरेतर त्यांनी मनाने कसलाच त्याग केलेला नसतो. ॥ १॥
हा अनुभव येत आहे हे मला सतत जाणवत असते . मला माझे मन कसे आहे तेही ठाऊक आहे ॥ २॥
जेंव्हा मी झोपी जातो व स्वप्नावस्थेत जातो तेंव्हा जागृत अवस्थेमधे जाणवलेल्या सृष्टीचा मागमूसही उरत नाही. सर्व कांही विसरले जाते. ॥ ३॥
माझे चित्त अजूनही प्रपंचामधून निवृत्त होत नाही आहे व मी त्यामुळे नित्य व्यवहार करतोआहे ॥ ४॥
तुका म्हणतो की माझे वागणे बहुरुप्याप्रमाणे आहे. जसा मी दिसतो तसाच अंतर्यामी पण आहे ॥ ५॥

अभंगाच्या अर्थाचे स्पष्टीकरण :
ह्या अभंगामधे तुकाराम महाराजांनी ढोंगी साधूचे वर्णन केलेले आहे.( असे लोक स्वत:च्या फायद्याकरीता बाह्यत: आपण मोठे निर्लोभी असल्याचे दाखवतात व त्यामुळे लोकांची फसगत होते.)
अभंगाच्या दुसîrÉÉ व शेवटच्या चरणांमधे महाराजांनी स्वता:ची खरी स्थिती काय आहे तेही
निर्भीडपणे माडले आहे.
अभंगाच्या पहिल्याच कडव्यामधे महाराज म्हणतात की कांही लोक असे असतात जे जगाला आपण अगदी नि:स्प्रूह, निर्लोभी असल्याचे सोग करतात. पण प्रत्यक्षांत त्यांच्या मनामधील वासना, ईच्छा मुळीच कंमी झालेल्या नसतात.

अभंगाच्या दुसîrÉÉ कडव्यांत महाराज म्हणतात माझे मात्र असे नाही. माझ्या चितामधे काय चालले आहे ते मी जाणुन आहे.
माणसांमधे तीन प्रकारच्या वासना ( ईषणा) साधारणत: असतात. ) उदो उदो व्हावा, नांव व्हावे , कीर्ती मिळावी अशी ईषणा . हिलाच लोकेषणा म्हणतात. ) वित्तेषणा म्हणजे भरपूर पैसा, संपत्ती मिळावी ही ईषणा ३) दारेषणा म्हणजे स्त्रीबद्दल आसक्ती.
महाराज आपल्याला ह्या तीन ईषणां असणाîrÉÉ ढोंगी साधूंपासून दुरच रहा हेच ह्या अभंगामधे सुचवीत आहेत.
तसेच तुम्ही पण ह्या ईषणांपासून दूर रहा हे पण सांगत आहेत.
पण प्रश्न असा पडतो की हे कसे करायचे ? अभंगाच्या तिसîrÉÉ कडव्यांत ह्याव थॊडासा उलगडा केलेला आहे.
तिसîrÉÉ कडव्यांत ते म्हणताहेत की त्यांना स्वत:च्या मन:स्थितीची पूर्ण कल्पना आहे. म्हणजेच आपल्या मनाला आपण कोठे आहोत ते कळते.
म्हणून ज्याला भगवंताचा साक्षात्कार हवा असेल त्याने प्रथम स्वत:च्या मनाची पूर्ण तपासणी करावी व पहावे की आपल्याला अजूनही बाह्य सृष्टीतल्या नाशवंत वस्तूंबद्दल आसक्ती, प्रेम आहे कां ? जर उत्तर हो असे असेल तर आपल्याला स्वता:चे मन शुद्ध करून घेणे जरूरीचे आहे.

अभंगच्या ह्या भागांत वेदांताचा ह्या दृश्याबद्दलचा (मांडुक्य उपनिषदातला) विचार प्रगट होतो.
ह्या विचारावर मनन केले तर माणसाच्या मनांमधे वैराग्य उत्पन्न होऊ शकते. वैराग्यचा अर्थ हाच की दृश्यांतल्या सर्वच वस्तुमात्रांचे नाशवंतच खरे आहे हे लक्षांत आल्याने त्याची आसक्ती सुटणे हा घेता येतो. वैराग्यामुळे वासना क्षीण होतात.

तुकाराम महाराज म्हणतात की आपण झोपी गेलो की जागृत अवस्थेमधे अनुभवास येते त्या सर्वाचाच पूर्ण विसर पडतो. शरीर स्वप्नावस्थेत गेलेले असते त्यामुळे हे घडते. ह्या विचाराचे थोडक्यांत विवरण पुढे केलेले आहे.

आपल्या स्वप्नावस्थेत आपणच स्वत:ची एक वेगळी सृष्टी निर्माण करतो. ह्या स्वप्नातल्या जगामधे माणसे असतात, पशू, पक्षी, घरे , ईमारती , झाडे वगैरे सर्व कांही असते व आपल्याला ते त्या वेळी खरे आहे असेच वाटत असते. जागृतावस्थेव मधे जे जे व्यवहार आपंण करतो तेच ह्या स्वप्नामधेपण घडतात. ह्या शिवाय आपल्या जागृतीत मनामधे आलेल्या कांही ईच्छा सुद्धा पूर्ण होतात. उदाहरणार्थ आपल्य़ाल लोटरी लागून पैसे पण मिळतात व आपण खूप आनंदी होतो.
पण नंतर आपण जागे होतो. आपल्याला कळते की अरे हे तर एक स्वप्न होते. पण म्हणून आपण कांही पैसे गेले ह्याचे दु:ख करत बसत नाही. स्वप्नामधले पैसे गेल्याचा आपण शोक करत नाही.
कारण काय तर ते फक्त एक स्वप्नच होते म्हणून. !

वेदांत म्हणतो की ह्या स्वप्नाप्रमाणेच हे जागृतीत अनुभवास येते ते सर्व जग पण स्वप्नच आहे. जशी आपण स्वप्नामधे सृष्टी निर्माण केली तशीच परमेश्वरानॆ आपण आहोत ती सृष्टी निर्माण केली. म्हणजे आपण सर्वजण परमेश्वराच्य़ा स्वप्नामधे वावरत आहोत. वस्तुत: आपण व परमेश्वर एकच आहोत. म्हणुन ह्या स्वप्नामधील सर्वकांही नाशवंतच आहे. अर्थात म्हणूनच ह्या स्वप्नामधल्या वस्तूंची आसक्ती धरून राहाण्यात कांहीही अर्थ नाही. पैसा, अडका हा सुद्धा त्यातच येतो. पैशाचीच नव्हे तर स्वत:च्या देहाची सुद्धा आसक्ती ठेवणे अयोग्यच आहे. आसक्ती ठेवली की जन्ममृत्युचे बंधन आलेच .
हे विश्व स्वप्नवत आहे ह्याचा अर्थ हा पण आहे की येथील सर्व कांही होते ते परमेश्वराच्या मनाप्रमाणे होते. आपला देह , पैसा हे त्याचे कार्य करण्यासाठीच आपल्याला मिळालेला आहे. ( भगवंत कर्ता -मी नाही !.मी त्याच्या इच्छेप्रमाणे चालणारे एक यंत्र आहे)

जागृत व स्वप्नावस्थमधे जे अनुभवले जाते ते अनुभवणारा मात्र एकच आहे . तो म्हणजे आपल्यातील अंतरात्मा . तेच आपले खरे स्वरूप आहे.

अभंगाच्या ४ थ्या चरणांत म्हटल्याप्रमाणे , वर लिहिलेल्या मुख्य तत्वास आपण नजरेआड करत असतो. ह्याचा परिणाम म्हणजे आपले शरीर व जगच खरे आणी शाश्वत आहे असा आपला समज होतो. मग आपण पंचेंद्रियांच्या द्वारे मिळणाîrÉÉ तात्पुरत्या भोगानंदामागे धावत राहातो. मृत्युचे विस्मरण होते .
परंतु जर आपण वर वेदांतात जे दिले आहे ते सांगणे समजून घेतले व स्वत:च्या जीवनातल्या घटनांकडे पाहीले तर आपल्या अंगी वैराग्य सहजपणे बाणू शकेल. मग कोणत्याही घटन्र बद्दल सुख दु:ख फारसे होणार नाही. मन उद्विग्न हॊणार नाही.

अभंगाचा शेवटचा चरण तुकाराम महाराजांची स्थिति कशी ते सांगतो. त्यांची ही स्थिति अंतर्बाह्य एकसारखीच आहे. ( वैराग्याची स्थिती) . हीच खरा संत ओळखण्याची खूण आहे.
अभंगाची शिकवण : विचार करून अशाश्वतची आसक्ती सोडावी, हीच शिकवण येथे आहे.








Thursday, November 15, 2012

          Added 15th Abhanga करावी तें पूजा मनेचि उत्तम ।for Abhanga a week of Sant Tukarama.
          blogaddress :http:// tukaramasteachings.blogsopt.com
         Contact e-mail address is rgphadke@gmail.com

अभंगाचे मराठी स्पष्टीकरण इंग्रजी नंतर दिलेले आहे.
         Abhanga 15 Date 15th Nov 2012

करावी तें पूजा मनेचि उत्तम । लौकिकाचे काम काय असें ॥ १ ॥
कळावें तयासी कळे अंतरिचे । कारण ते साचे साच अंगीं ॥ २॥
अतिशयाअंतीं लाभ किंवा घात । फळ देते चित्त बीजाऐसे ॥ ३ ॥
तुका म्हणे जेणे राहे समाधान । ऐंसे ते भजन पार पावी ॥ ४ ॥


Verbatim Meaning :

One should rather perform worship in mind. (मानसपूजा) Then there is no need for the ritualistic worship . || 1||

Such a worship , done with full concentration of mind is the true worship | When one worships God like this then He knows this ( because He can understand the thoughts in the mind.)|| 2 ||

Any activity when done intensely ; results (gives) either some benefits or some Losses., it all depends upon what the intention is there in the mind || 3||

Tuka says that one should do the worship which give satisfaction to the mind . Such worship results in Liberation|| 4 ||

Back ground Information:

Generally when a person understands meaning of some major attributes of God such as (Omniscient, Omnipresent, Omnipotent सर्वज्ञ ,सर्वव्यापी, सर्वशक्तिमान, ), then one looks upon the God as His Father, or Mother or Friend, or Child, or Lover as per the likes of the individual. The relationship thus develops between the devotee and the God. It is not possible to imagine the God without form( निर्गूण ) and therefore it is one does the worship of the Form of God he/She most likes. ( Such Srirama, Srikrishna, Goddess Lakshmi , Swastika, , etc ) Sri.Ramakrishna Paramhansa says that Body and Shadow both are the same.

We have seen earlier that there are Nine ways one can worship the God ( नवविधाभक्ति).
One of these is Archanbhakti ( अर्चनभक्ती) in which the devotee worships the God in some form .Here the devotee offers to his God all that generally is offered to a VIP( Very Important Person) when such a VIP visits the house.

This is a popular form of Image worship .( मूर्तीपूजा) , sometimes the images are replaced with symbolic objects such as , shaligramaa, shivalingaa etc. In our country many families have the practice of performing the worship daily . One major advantage is that , we at least remember Him during this worship.

To perform the worship our Shastras have prescribed some specific method namely Worship with 16 steps,( षोडशोपचार पूजा ) The . There is a shorter version in which five steps are followed..(पंचोपचार पूजा) .However we need many material objects such as flowers, Lamp, Incense Sticks, Betel leaf and nut, cloths, etc. and of cource the food articles. This type of worship is External and is said to be necessary since it leads to concentration. When the concentration becomes deep then external rituals drop off themselves .

Internal worship is called ( मानसपुजा)manasapuja. It is actually meditation which may be a simple process of contemplation on the God with form.

Sant Tukarama is praising this form of worship in this abhanga.

Meaning of the Abhanga:

In the beginning itself Tukarama Maharaj is saying that Manasapuja is better . It does not require any external objects. All one has to do is contemplate on God.

He further says that God knows what is there in your mind. He will give you whatever you want . ( However , we must remember here that there is a need of complete surrender to Him. Then only it becomes clear and accepted by our mind that all that happens is for our welfare only.)

The third stanza of this abhanga is very important. Here Tukarama maharaja says that when one prays to the God with intense desires , it may result in getting some benefits, or it may result in some losses. However both are of temporary nature. It is far superior worship where one is not asking anything from our God except love for Him and for all that he has created. Gita calls it ( निष्काम भाव) . It leads to pure satisfaction for the devotee. The devotee then accepts whatever happens around him without getting disturbed. His love for God does not diminish due to problems he faces.

In Srimad Bhagavad gita the Lord has assured that He takes care of such a devotee.

That is why in the last stanza Sant Tukaram maharaj is advocating that this kind of Meditation ( internal worship ) is the best and one should follow it.



MarathI version of the Abhanga 15 Date 15th Nov 2012
करावी तें पूजा मनेचि उत्तम । लौकिकाचे काम काय असें ॥ १ ॥
कळावें तयासी कळे अंतरिचे । कारण ते साचे साच अंगीं ॥ २॥
अतिशयाअंतीं लाभ किंवा घात । फळ देते चित्त बीजाऐसे ॥ ३ ॥
तुका म्हणे जेणे राहे समाधान । ऐंसे ते भजन पार पावी ॥ ४ ॥


अभंगाचा शब्दार्थ :
माणसाने उत्तम पद्धतीने मानसपूजा करावी. त्या साठी कसलीही सामग्री वगैरे लागत नाही ॥ १॥
भगवंताला तुमच्या मनात काय आहे ते सर्व कळते. तो अंतर्यामी आहे. तुम्ही पुजा कां करताआहत त्याचे खरे कार्णपण तो जाणतो. ॥ २॥
जसे चितामधे असेल त्या बिजरूपाप्रमाणे कर्माचे फळ मिळते. अतिशय लोभाचा अंत शेवटी घातच करतो॥ ३॥
तुका म्हणतो की असे भजन करा की जेणेकरून तुमच्या मनामधे समाधान राहील. असे भजन्च तुम्हाला भवसागराम्तून पार नेईल. ॥ ४ ॥

अभंगामागची भूमिका व अर्थ स्पष्टीकरणासाठी लागणारी माहिती :

जेंव्हा माणसाला भगवंताच्या कांही मुख्य गुणांचा म्हणजे सर्वज्ञ, सर्वशक्तीमान, व सर्वव्यापी ह्या गुणांचा अर्थ कळतो तेंव्हाच त्याला हे पटते की भगवंताच्या बरोबर आपण कांही नाते जोडून त्याची भक्ती करावी. मग माणूस त्याच्या स्वभावानुसार भगवंताशी व्डील, आई, सखा, प्रियकर असे कोणतेतरी नाते ठरवतो व भगवंताला त्याभावाने पाहातो व हळूहळू हे नाते दृढ होत जाते. भगवंत हा खरेतर निर्गूणच आहे. पण तो सगूणही आहे. सगून रुपाशीच आपण प्रथम नाते जोडू शकतो.( ष्रीराम, श्रीकृष्ण, लक्ष्मीदेवी,
स्वस्तिकचिन्ह, ॐकार ईत्यादी सर्व भगवंताची सगूण रुपे आहेत.) श्री. रामकृष्ण परमहंस म्हणतात की जसे शरीर व सावली ही एकाचीच रूपे आहेत तसेच.

आपण हेहीपाहिले आहे की सगूणाची भक्ति करण्याचे नऊ प्रकारा आहेत. त्यांनाच नवविधा भक्ति म्हणतात.
ह्या नवविधाभक्तिंपैकी एकीचे नांव आहे अर्चनभक्ती. ह्या प्रकारामधे भक्त देवाची पूजा करतो. पूजेमधे देवाला ते ते सर्वकांही अर्पण केले जाते जे आपल्याकडे एखादी अत्यंत महत्वाची व्यक्ति पाहूणा म्हणून येते तेंव्हा अशा पाहूण्याला अर्पण केले जाते. येथे आपण भगवंताला त्याच्या मूर्तीमधे पाहतो.
अर्चनभक्ती हा मूर्तीपूजेचा सर्वांत लोकमान्य व सर्वांना आवडणारा असा प्रकार आहे.
कांही ठिकाणी भगवंताच्या मूर्ती ऐवजी ॐकाराचे चित्र, शालिग्राम, शिवाची शाळुंका शिवलिंग, अशी चिन्हरूपेपण देव म्हणुन पूजेला घेतात.
आपल्या देशांत बरच जण रोजच देवपूजा करतात. पूजा केलीजाते तेंव्हा कमीतकमी त्यावेळेपुरते काम होईना भगवंताची आठवण , स्मरण घडते.

आपल्या शास्त्रांनी पुझेच दोन प्रकार पद्धती सांगितल्या अहेत. ) षोडशोपचार पूजा . ह्या पुजेमधे भगवंताला १६ उपचारानी (आवाहन आसन, आचमन , स्नान, अभिषेक धूप, दीप नैवैद्य, विडा देणे इत्यादि ) पूजिले जाते. ) पंचोपचार पूजा. ह्या पुजेच्या दुसîrÉÉ पद्धतीत फक्त ५ उपचार केले जातात.

पण दोनही पुजा करायच्या तर निरनिराली साधन सामग्री जसे गंध, फुले, दीप, उदबत्ती, विड्याचे पान व सुपारी, कपडे, इत्यादी व शिवाय नैवेद्यासाठई फळे, व भोजनसामग्री हे सर्व लागते. अर्थात पैसा पण खर्च करावा हा लागतो.
ह्या बाह्य उपचारांच्या पुजेच मुख्य फायदा हा आहे की मन भगवंताकडे एकाग्र होते. म्हणूनच जेंव्हा मनाची एकाग्रता ह्या सर्व बाह्य उपचारांविना होऊ लागते तेंव्हा साहजिकच बाह्य उपचारांनी पूजा करणे बंद होते.
ह्या नंतर आपण मनानेच सर्व उपचार करून पूजा करू शकतो. अशा अंतर्यामी केलेल्या पूजेला " मानसपूजा " असे नांव आहे. ध्यान करणे ही पण एक वेगळ्या पद्धतीची मानसपूजाच असते असे म्हणता येईल.

अभंगामधे संत तुकाराम महाराज ह्या मानसपूजेचेच कौतुक करीत आहेत.

अभंगाचा स्पष्टिकरण करुन अर्थ :
अभंगाच्या सुरवातीलाच तुकाराम महाराज म्हणतात की मानसपूजा करणेच खरतर उत्तम पूजा करणॆ होय. ह्या पूजेसाठी कांहिही बाह्य सामग्री लागत नाही .लागते ते भगवंताचे ध्यान .

पुढे महाराज म्हणतात की भगवंतास तुमच्या मनामधे काय विचार चालले आहेत ते कळते. तुम्हाला काय पाहिजे आहे ते पण कळते. तो नक्कीच तुम्हाला जे काय आवश्यक असेल ते ते सर्व देईलच ह्याची खात्री बाळगावी. ( पण हे ही लक्षांत घेणे आवश्यक आहे की त्याला अनन्यभावे शरण जायला हवे. अशी शरणागती पत्करली असेल तरच तुम्हाला हे पण पटेल की तो जे जे कांही करतो ते तुमच्या भल्यासाठीच करत आहे.) ह्या शिवाय अशी पूजा तुम्हाला मोक्षा कडे पण नेते हा मोठा फायदा आहेच.

अभंगाचा तिसरा व चौथा चरण दोन्ही अत्यंत मह्त्वाचे आहेत. येथे तुकाराम महाराज म्हणतात की जेंव्हा कोणी भगवंताची अत्यंत तीव्रभावाने प्रार्थना करत्तो , तेंव्हा त्याला कांहितरी फायदा हा नक्कीच अनुभवास येतो पन कधीकधी कांहीच फायदा न होता उलट नुकसान झाल्यासारखे भासते.फायदा काय वा नुकसान काय दोनही अशाश्वतच, फार काळ न टिकणारे असतात.
त्यापेक्षा वरच्या दर्जाची पूजा म्हणजे भगवंतास कांहीच न मागंणे , त्याच्याकडून कसलीच अपेक्षा न धरता करणे व फक्त त्याच्यावरील प्रेमामुळे, त्याच्या सर्व निर्मितीचे कौतुक म्हणून करणे ही होय. भघवद्‌गीतेमधे ह्यालाच निष्काम भाव म्हटलेले आहे.
जर पूजा कांही फळाशा धरून केली तर त्या लोभाचे फळ हे मिळेलच पण हा फलाशेचा भावच आपल्याला जन्म-मृत्युच्या फेîrÉÉ मधे अडकवतो व जन्मोजन्मी दु:खे भोगायला लावतो हे विसरू नये हे अभंगाच तिसरा चरन सांगतो.
असा भाव भक्ताला शाशवत समाधानचा अनुभव देतो. असा भक्त त्याच्यावरआलेल्या कोणत्याही संकटांमुळे, विचलीत होत नाही. ट्याचे भगवंतावरचे प्रेम सर्व स्थितींमधे कायमच राहते, कमी होते नाही.
श्रीमद्‍भगवद्‍गीते मधे भगवंतांनी ही खात्री दिली आहे की भगवंत अशा भक्ताचा योगक्षेम स्वत: चालवतात. ह्या कारणास्तव तुकाराम माहाराज अभंगाच्या शेवटच्या कडव्यांमधे अशा आंतरिक मानसपूजेचाच सर्वोत्तम पूजा म्हणुन स्विकार करताहेत.

अशी मानसपूजा आपल्या सर्वांकडून घडॊ हीच भगवंतास प्रार्थना करूया..