Tuesday, August 27, 2019

new Marathi post on 27/08/2109
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com
For English Readers a separate post has been added.



दि. २७//२०१९
स्वर्गातून पाठविलेला अभंग ३ रा :-

उद्धरिले कूळ आपण तरला । तोचि एक झाला त्रैलोक्यात ॥ १ ॥
त्रैलोक्यात झाले द्वैतची निमाले । ऐसें साधियेले साधन बरवे ॥२ ॥
बरवे साधन सुखशांती मना । क्रोध नाहीं जाणा तिळभरी ॥ ३॥
तीळभरी नाही चित्तासी तो मळ । तुका म्हणें जळ गंगे चे तें॥ ४ ॥

अभंगाचा शब्दार्थ :-

ज्याला भगवंताचा साक्षात्कार झालेला आहे अशा पुरूषाचे हे वर्णन हा भंग तर करतोच ; त्याशिवाय त्याचे वागणे कसे असते? ते वर्णन हा अभंग सांगतो.
महाराज म्हणतात :-
ज्याची भगवंताची भेट झालेली असते त्याचा स्वत:चा उद्धार तर होतोच ; शिवाय त्याच्या कुळाचा उद्धार पण होतो. ॥ १ ॥ भगवदभेटीमुळे त्याचे सर्व त्रैलिक्याशी ऐक्य घडते व अर्थातच द्वैताचा संपूर्णपणे निरास होतो. त्यासाठी त्याने असा उद्धार होईल अशीसे साधना केलेली असते.॥२॥ ह्या केलेल्या साधनेमुळे त्याच्या मनाला शाश्वत सुख व शांतीचा अनुभव येतो.( द्वैतभाव नसल्यामुळे ) त्याल कोणावरच क्रोध येत नाही ॥३॥ त्याच्या मनास कोणत्याही मळाचा स्पर्श होत नाही . त्याचे मन गंगेच्या पाण्यासारखे शुद्ध असते.॥ ४ ॥

अभंगाचा अर्थ समजण्यासाठी लागणारी माहिती :-
स्वर्गातून पाठविलेल्या अभंगांमधील हा ३ रा अभंग आहे.

) महाराजांनी आपल्याला पहिल्या अभंगात जन्माची कारणे तसेच दु:ख भोगावे कां लागते हे सांगून ह्यातून सुटके साठी परमार्थ साधन करावे हे सांगितले आहे.

) त्यानंतर चित्तशुद्धीचे महत्व सांगणारा अभग दुसरा आपण पाहिलाच आहे. त्यामधे ब्रह्मज्ञानी सदगुरुंना शरण जावे हा उपदेश महाराजांनी केला आहे.

आता ह्या तिसऱ्या अभगामधे; तुकाराम महाराज आपल्याला तीन मुद्दे सांगताहेत ) ज्याची भगवंताशी भेट अर्थात आत्मज्ञान मिळाले आहे त्याला काय मिळाले.
) त्याच्या कुळाला काय लाभ होतो.
) अशा पुरूषाची मनस्थिती / अंतरंग कसे असते .
अध्यात्म शास्त्रांमधी अद्वैत वेदांता अत्यंत मुक्ती / मोक्ष ही कल्पना प्रथम स्पष्ट केली आहे.. त्यासाठी माणसाचा जन्म जीवाला मिळालेला आहे. जीव व शीव वस्तुत: एकच आहेत पण जीवाच्या मनावर असलेल्या मायेच्या आवरणामुळे तो स्वत:ला भगवंतापासून वेगळा समजतो. ह्या मायेच्याकरामतीमुळे त्याला अनेक जन्म घेऊन सतत सुख / दु:खे सोसावे लागतात. सुख तिळाएवढे भोगावे लागतात.”’ सुख पाहता जवा एवढे व दु: पर्वताएवढे " ह्याचरणांचा तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे.

मोक्षप्राप्ती म्हणजेच हा द्वैतभाव संपूर्णपणे नष्ट होणे होय. ही मनाची स्थिती तेंव्हाच येते जेंव्हा साधकाला मी व भगवंत वेगळे नाही हा अनुभव येतो त्यालाच भगवंताची भेट होणे म्हणत्तात. येथे भक्त व भगवंत यांचे ऐक्य झालेले असते. श्री. रामकृष्ण परमहंस दृश्टांत सांगताना म्हणतात की मिठाची बाहुली समुद्राची खोली मोजायला गेली व समुद्राशीच एकरूपता पावली. पूर्वी वेगळि होती, समुद्रभेटीनंतर समुद्ररूप झाली. असा ब्रह्मसाक्षात्कारी पुरूष असतो.


अभंगाच्या अर्थाचे स्पष्टीकरण :-

अभंगाच्य़ा पहिल्याच चरणात तुकाराम महाराज म्हणतात की " उद्धरिले कूळ आपण तरला । तोचि एक झाला त्रैलोक्यात ॥१॥.अर्थात ज्याने अशी भगवंताची भॆट घेतली आहे ,अर्थात जो मुक्त झाला आहे त्याचा स्वत:चा उ्द्धार तर झालेलाच असतो, शिवाय त्याने ज्या कुळात जन्म घेतला आहे अशा त्याच्या कुळाचा पण उद्धार होतो.

उद्धार होणे म्हणजेच मोक्ष मिळणे. हे आपण जाणतोच. पण आपण जाणतो ते पुस्तकी ज्ञान होय. मोक्षप्राप्ती ही नरदेहातच मिळते. वेदांतात ॐकारातून सृष्टी निर्माण झाली हा एक सिद्ढांत आहे. त्यानुसार निराकार परब्रह्मामधे " एकोऽहं बहुस्याम " मी एकटा आहे व अनेक होईन " असा आदिसंकल्प निर्माण झाला. त्यालाच मूळमाया , भगवंत ही नांवे आहेत. त्यानंतर भगवंताने पंचभूते निर्माण केली. प्रत्येक शरीर हे पंचभूतांचेच बनलेले असे. नंतर भगवंताने स्वत:चाच अंश अनेक शरीरांमधे घालून ८४ लक्ष योनींचे प्राणीमात्र निर्माण केले. ह्याप्रमाणे प्रगट सृष्टि तयार झाली. ह्यातल्या फक्त मनुष्यप्राण्यालाच भगवंताची भॆट घेता येते . त्यासाठी काय प्रयत्न करावे हे समजते. हे प्रयत्न करणे म्हणजेच साधना करणे होय.
साधनेचे तीन मार्ग प्रसिद्ध आहेत. ) भक्तीमार्ग २) ज्ञान मार्ग ३) योग मार्ग. माणसाला आपण कोणता मार्ग निवडावा ह्याचे स्वातंत्र्य आहे.

मोक्षप्राप्त झालेल्या पुरूषाकडून अशी साधना घडलेली असते. त्याच्या कुळात असणाऱ्या व्यक्तींना ह्या साधनेचा सत्संगतीचा आपोआपच लाभ होतो. त्यांना पण आपण अशी साधना करून मोक्षप्राप्ती करून घेण्याची इच्छा होते. एका दिव्याने दुसरा लावतात तसेच कांहीसे हे होत असते. असा अर्थ घॆणे येथे स्पष्ट झाले. भगवंत सर्वव्यापी, जन्ममृत्यातीत आहे व भगवंताशी ऐक्य पावलेला पुरूष पण असाच सर्वव्यापी म्हणजेच " त्रैलोक्याशी एक होणे" होय.

अभंगाचा पुढचा चरण म्हणतो :- त्रैलोक्यात झाले द्वैतची निमाले । ऐसें साधियेले साधन बरवे.अशी साधना करणे हेच सर्वोत्तम होय. ही साधनाच भगवंताची भेट घडविते म्हणुन " साधन बरवे " हे शब्द महाराजांनी योजले आहेत. अर्थात साधना करावी हेच आपल्याला ते एकप्रकारे सांगत आहे.
साधनेचा परिपाक म्हणजे मोक्षप्राप्ती. सर्व त्रैलोक्य व्यापलेल्या भगवंताशी ऐक्य अनुभवणे म्हणजेच आपण व ह्या सृष्टीतले सर्वकांही एकच आहोत ही जाणिव सतत जागृत असणे होय. ह्या जाणिवेमुळे सर्वच आपलीच आहेत हा सर्वसमभाव मनामधे सातत्याने असतो. ह्यालाच द्वैताचे निमणे अर्थात निरसन होणे म्हणतात. किंवा अद्वैत साधणे पण म्हणतात.
अशी व्यक्ती ह्या अद्वैतानुभवानंतर कशी जीवन जगत असते. ह्या प्रश्नाचे उत्तर हेच आहे की अशी व्यक्ती पुढचे सर्व जीवन लोकोद्धारासाठीच जगते. तेच वर्णण पुढचे चरण करतात.

अभंगाचे पुढचे चरण आहेत :- बरवे साधन सुखशांती मना । क्रोध नाहीं जाणा तिळभरी ॥ ३॥तीळभरी नाही चित्तासी तो मळ ।
त्यामुळे अशा संतव्यक्तीच्या मनामधे काम, क्रोध ईत्यादी षडरिपूंना स्थानच नसते. आपलाच म्हटले की प्रेमभाव हा आलाच. ह्या प्रेमभावामुळेच सर्व संतांनी उपदेशपर वाङ्मयनिर्मिती केलेली आहे. तसेच श्रीमद्‌ भगवदगीता मधे पण ह्याच कारणाने अर्जुनाचे निमित्त करून सर्व जगाला उपदेश केला आहे. गीता ही साक्षात भगवंताची वाणी आहे. सर्व संत गीतेचा संदर्भ म्हणुनच देतात. संतवाङयातील उपदेशाचा उद्देश एकच की मानवजातीने असे ऐक्य साधावे व जन्माचे सार्थक करून घ्यावे.

कारण जेंव्हा हे ऐक्य साधते तेंव्हाच मनाला एक शाश्वत अशी सुख व शांती मिळते. जीवाच्या मनामधे काम उतपन्न होतो. अभिलाषा निर्माण होतात. व कोणतीही अभिलाषा, जर पूर्ण झाली नाही की मनाची हॊणारी क्षुब्धता म्हणजे क्रोध ह्यामुळेच मन खरेतर अशांत होत असते. मुख्यत: अभिलाषा तीन प्रकारच्या असतात. त्यांनाच ईषणा असे पण म्हणतात. लोकेषणा, दारेषणा, वित्तेषणा.ह्या अभिलषाच मनाची शांती बिघडवतात. ह्यांचे असणे म्हणजे देहबुद्धी असणे होय. ज्याच्या मनामधे अशा अभिलाषांना स्थानच उरलेले नाही त्याला शाश्वत शांतीचाच येत असतो. ह्या अभिलाषा सर्व प्रथम चित्तमधे उत्पन्न होत असतात. म्हणून त्यांना तुकाराम महाराजांनी चित्ताचा मळ म्हटले आहे.

शेवटी महाराज म्हणताहेत की " तुका म्हणें जळ गंगे चे तें" अर्थात असे ज्याचे मन असते ते गंगेच्या निर्मळ जलाप्रमाणेच असते.
येथे हा अभंग पूर्ण झाला आहे.

अभंगाचे तात्पर्य :- आपले मन असे संपूर्णपणे निर्मळ जेंव्हा होईल तेंव्हाच भगवंताची भेट होईल . त्या साठीच आपले मन निर्मळ करण्यासाठीच आपण प्रयत्न म्हणजे साधना करायची असते हेच आपल्याला ह्या अभंगामुळे स्पष्ट झाले.




0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home