Wednesday, May 3, 2017

स्वर्गातून पाठविलेले अभंग : अभंग २ रा अहर्निशी सदा परमार्थ करावा।

स्वर्गातून पाठविलेले अभंग : अभंग २ रा अहर्निशी सदा परमार्थ करावा।
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com

स्वर्गातून पाठविलेले अभंग :- अभंग रा.
विशेष टिप:- स्वर्गातून पाठविलेले अभंग ह्या साखळीतला हा दुसरा अभंग येथे विवरणासाठी घेतला आहे. हे अभंग खरेच कां महाराजांनी स्वर्गारोहणा नंतर पाठवले?  ह्यावर आपण कांहीच ठामपणे म्हणू शकत नाही. कदाचित तुकाराम महाराज सदेह स्वर्गास गेल्यानंतर त्यांच्या एखाद्या भक्ताने त्यांच्या हजारॊ अभंगाचे सारांश म्हणुन हे अभंग एकत्र केलेले असतील. वस्तुस्थिती कांही कां असेना आपल्याला हे १४ अभंग परमार्थ साधनेसाठी नक्कीच उपयोगी आहेत. ह्याच दृश्टीने आपण ह्या अभंगांकडे पहावे हेच उत्तम होईल.
कोणाचा स्वर
अहर्निशी सदा परमार्थ करावा} पाय ठेवावा आडमार्गी १॥
आडमार्गी कोणी जन जे जातील त्यांतून काढील तोचि ज्ञानी २॥
तोचि ज्ञानी खरा दुजीयासी वेळोवेळां त्यासी शरण जावे
आपण तरेल नव्हें ते नवल कुळॆं उद्धरील सर्वांची ती
शरण गेलियानें काय होतें फळ तुका म्हणें कुळ उद्धरिले
अभंगाचा शब्दार्थ :-
माणसाने आडमार्गाला जाता रात्रंदिवस परमार्थ करावा ॥१॥ आडमार्गाला जे लोक जातात त्यांना त्यातून बाहेर काढतो तोच ज्ञानी होय. ॥२॥
असा (ज्ञानी मनुष्य) स्वत:चा उद्धार करून घेतो ह्यात कांहीच  नवल नाही , तो सर्वांची कुळे उद्धारितो ४॥ अशा खऱ्या ज्ञानी माणसाला वेळोवेळी शरण जावे तुका म्हणतो, अशा शरणागतीचे हेच फळ मिळते की सर्व कुळाचा उद्धार होतो .
अभंगाच्या अर्थस्पष्टीकरणासाठी आवश्य असलेली माहिती :--
अभंगांच्या ह्या साखळीतल्या आधीच्या ( १ल्या ) अभंगामधे तुकाराम महाराजांनी हाच उपदेश केला आहे की आपला हा नरजन्म दुर्मीळ आहे. परत मिळेलच ह्याची शाश्वती नाही . म्हणुन परमार्थ साधन करून स्वत:च्या मानव जन्माचे सार्थक करून घ्यावे त्या साठी त्रिगुणातीत व्हावे हे पण सुचविले आहे.
आता ह्या दुसऱ्या अभंगात तुकाराम महाराजांनी आणखी एक सोपा उपाय सांगितलेला आहे.
अभंगाचे अर्थस्पष्टीकरण :-
अभंगाच्या आरंभीच  तुकाराम महाराज सांगत आहेत की परमार्थ करण्यासाठी आडमार्गाला जाऊ नये.
हा आडमार्ग म्हजे काय हा प्रश्न येथे आपल्याला पडतो. आडमार्ग म्हणजे खरा देव कोण ? त्याचा माझा काय संबंध आहे ? माझे भले कशांत आहे ह्याचा विचार करता, पूजापाठ करणे, तीर्थयात्रा , दानधर्म ईत्यादी करणे. निरनिराळे नवस बोलणे देवाकडे अशाश्वताची मागणी करणे. ईत्यादी सर्व क्रिया मणजेच आडमार्गास जाणे म्हणता येते.
साधारणत: ही सर्व कर्मे केल्याने पुण्य मिळेल स्वर्गसुख मिळेल अशी भावना मनात असते. बरेच वेळा अशा लोकांना देवाकडून आपल्या निरनिराळ्या वासना त्याने पूर्ण कराव्या अशी अपेक्षा असते. जर अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर मग हीच मंडळी देवाला नांवे सुद्धा ठेवायला मागेपुढे पहात नाहीत.
बरेच वेळा कांही माणसे जो कोणी चमत्कार दाखवतो अशा माणसाला साधू समजतात त्याच्या सांगण्याप्रमाणे वागतात. पण बहुतेक वेळा आडातच नाही तर पोहोऱ्यात पाणी येत नाही तसे होते जन्म व्यर्थ जातो.
हे असे वर्तन असणे म्हणजेच आडमार्गावर जाणेच होय. श्रीमद.दासबोधामधे समर्थ रामदासांनी ह्यावर बरेच कांही लिहिले आहे. ते मुळातच वाचणे योग्य होईल. तेच येथे फक्त सारांशरुपाने स्पष्ट केले आहे.
आता परमार्थ म्हणजे काय हे पाह्णे योग्य ठरेल परमार्थ महणजे परन अर्थात उत्तम अर्थ म्हणजे फळ. साधारणत: माणसाला आपल्याला खूप संपत्ती मिळाली की सर्व सुखे मिळतील असे वातते त्यासाठीच तो भरपूर प्रयत्न करत असतो. पण ही संपत्ती अशाश्वत असल्यामुळे;  सतत टिकणारे म्हणजेच शाश्वत समाधान कधीच मिळत नाही.
ज्यांना शाश्वत समाधान मिळाले आहे अशी माणसे पण जगामधे आहेत  आढळतात. त्यांना आपण संत सज्जन म्हणतो. त्यांना मिळालेले हे शाश्वत सुख समाधान त्यांना ब्रह्मज्ञान  आत्मज्ञान झालेले असल्याने प्राप्त झालेले असते. संत तुकाराम, ष्री रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद ही अशी आत्मज्ञानी संत मंडळी होती.
असे आत्मज्ञान मिळाल्यावर जीवनातले सर्व दु: नामशेष होते. ह्यासाठी जे प्रयत्न करणे घडते त्यालाच परमार्थ साधन म्हणतात..
अभंगाच्या पहिल्या चरणामधे तुकाराम महाराज हाच उपदेश करताहेत की माणसाने रात्रंदिवस परमार्थसाधन करावे.
अभंगाच्या पुढच्या दुसऱ्या चरणामधे तुकाराम महाराज म्हणताहेत की खरा ज्ञानी आडमार्गाने जाणाऱ्या लोकांना योग्य ते मार्गदर्शन करतो तो उपदेश करून त्यांना योग्य त्या मार्गावर नेतो.
महाराज  पुढच्या तिसऱ्या व पुन्हा एकदा ५व्या चरणात हे पण स्पष्ट करतात की अशा ज्ञानी मानसाने स्वत:च्गा उद्धार अर्थात स्वत:च्या जीवनाचे सार्थ करून घेतलेले असते. म्हणून त्यालाच वेळॊवेळी शरण जावे.
येथे वेळोवेळी हा शब्द हेच सांगतो की आत्मज्ञान कांही एकदम मिळत नाही. ते मिळवण्याचे प्रयत्न करताना चुका होतातच ज्या ज्या वेळि अशी चूक आपल्या कडून होते त्या त्या वेळि संतांना शरण जावे.संतांना  म्हणजेच ज्ञानी पुरुषालाच कां शरण जावे? ह्याचे उत्तर हेच आहे की फक्त त्यांनाच आत्मज्ञान झालेले असते . उदाहरणार्थ ज्रर आपल्याला हिंदुस्थानी गाण्याचे ज्ञान हवे असेल तर ज्याला हे ज्ञान आहे तोच ते आपल्याला शिकवू शकतो.गणीताचे ज्ञान गणित ज्याला येते तोच शिकवू शकतो.

पण संत किंवा ज्ञानी पुरूषाला ओळखायचे तरी कसे? हा प्रश्न तरीही आपल्याला पडतोच. जर आपण समजतो तो खरा ज्ञानी नसला तर फसगत होऊन आपण आडमार्गालाच जाण्याची शक्यता आहे. ह्यावरचा उपाय म्हणजे संतांचे ग्रंथ वाचणे. संत अथवा ब्रह्मज्ञानी पुरुष हा परब्र्ह्माशी अद्वैत साधलेलाच असतो. त्याचे शब्द ही परमेश्वरी वाणीच असते. अर्थात त्यांच्या ग्रंथात असलेली वाणी/ उपदेश हा त्यांचेच शब्दरूप असते. आपल्यासारख्यांचा उद्धार व्हावा म्हणुन त्यांनी ग्रंथ लिहिले आहेत.
वर लिहिलेल्याला आधार म्हणून आपल्याला संतांची चरित्रे पाहता येतात. उदाहरणार्थ समर्थ रामदासांचे चरित्रातला खालील प्रसंग बोलका आहे.
समर्थ रामदासंनी देहत्याग कधी करावा असे विचारल्यावर त्यांचा परमशिष्य उद्धव म्हणाला की माघ कृष्ण नवमीचा दिवस साधावा, समर्थांनी त्याला शाबासकी पण दिली. पण ईतर शिष्य दु:खी झाले. त्यांना समजावताना समर्थ म्हणाले की.
माझी काया गेली खरे , परि मी आहे जगदाकारे ऐका स्वहित उत्तरें। सांगेन  ती नका करू खटपट। पहा माझा ग्रंथ नीट। तेणॆ सायुज्याची वाट ठायी पडे राहा देहाच्या विसरे वर्तू नका वाईट बरे। तेणॆं मुक्तीची द्वारे चोजविती
आत्माराम दासबोध माझे स्वरूप प्रसिद्ध असता करावा खेद। भक्तजनी
हेच ईतर संतांच्या ग्रंथांबद्दल म्हणता येते. अर्थात संतांचे ग्रंथ वाचन, त्यावर मनन त्या प्रमाणे आचरण करणे हे संतसंगतीत राहणे , त्यांना शरण जाणेच होय.
अर्थात जेंव्हा आपण असे वागायला लागतो तेंव्हा अंत:करण सहजच शुद्ध होत जाते. ह्या शुद्ध अंत:करणातच भक्तीचा झरा उमटतो व वाहू लागतो .
असे म्हणतात की ज्याला आत्मज्ञान होते त्यामुळे त्याच्या २४ पिढ्यांचा उद्धर होतो. म्हणूनच तुकाराम महाराजांनी अभंगाच्या ५ व्या चरणाच्या शेवटी असे म्हटले आहे की माणसाने स्वत:च्या कुळाचा उद्धर करून घ्यावा. हा अभंगाचा ५ वा चरण आपणा सर्वांना केलेला उपदेशच आहे.

अभंगाची शिकवण:-  अभंगाची शिकवण हीच आहे  की सत्संगत धरावी व स्वत:चाच नाही तर आपल्या सर्व कुळाचा उद्धर करून घ्यावा.








0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home