Thursday, June 19, 2014

66Aवे मराठी post  भगवंताचे रूप कसे आहेह्यावरचे तीन अभंग 
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.in

 Contact mail address is rgphadke@gmail.com


भगवंताचे रूप कसे आहे? ह्यावरचे तीन अभंग :-

जयापासोन सकळे । महिमंडळ हे जाले ॥१-१ ॥
तो एक पंढरीचा राणा । न ये अनुमाना अंतरी ॥१-२॥
विवादती जयासाठीं । जगजेठी तो विठ्ठल ॥ १-३॥
तुका म्हणें तो आकळ । आहे सकळ व्यापक ॥ १-४॥

नाहीं रूप नाहीं नांव। नाहीं ठाव धराया ॥२-१॥
जेथें जावे तेथें आहे । विठ्ठल मायबहीण ॥२-२॥
नाहीं आकार विकार । चराचर भरलेंसे ॥ २-३ ॥
नव्हे निर्गूण सगुण । जाणें कोण तयासी ॥ २-४॥
तुका म्हणें भावाविण । त्याचें मन वोळेना ॥२-५॥

आहें सकळां वेगळा । खेळें कळा चोरोनि ॥ ३-१॥
खांब सूत्राचिये परी । देव दोरी हालवितो ॥ ३-२॥
आपण राहोनी निराळा । कैसी कळा नाचवी ॥३-३॥
जेंव्हा आसुडतो दोरी । भूमिवरी पडे तेंव्हा ॥ ४-४ ॥
तुका म्हणें तो जाणावा । सखा करावा आपुला ॥३-५॥

तिनही अभंगाच्या अर्थाचे एकत्रित स्पष्टीकरण :-

ईश्वर म्हणजेच भगवंत कसा आहे? त्याचे कार्य कसे चालते? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे असणारे हे तीन अभंग ह्यावेळी एकत्र घेतले आहेत. त्यांचा अर्थच येथे स्पष्ट करण्याचा प्रय्त्न आहे.
पहिल्या अभंगामधे महाराज म्हणतात की :-
" ज्याच्यापासून हे सर्व पृथ्वीमडळ म्हणजेच ब्रह्मांड निर्माण झाले आहे तोच पंढरीचा राजा आहे . तो कसा आहे ह्याची कल्पना व अनुमान श्रुतींना वेदांना सुद्धा करतां येत नाही. त्या परमात्म्याला रूपही नाही व नांवही नाही. असा हा विठ्ठल सर्व सृष्टीला व्यापणारा व्यापक आहे".
आपल्याला दिसणारी ही सृष्टी अत्यंत विराट आहे ती म्हणजेच अनेक ग्रह तारे आकाशगंगा असणारे संपूर्ण ब्रह्मांड आहे दृष्याचे नियम जर आपण पाहिले तर प्रत्येक वस्तूचा कोणितरी निर्माता असतो. जसे मातीचा घडा कुंभार निर्माण करतो. हा घडा आकाराने तसा लहानच म्हणुन ह्या निर्मात्याला आपण डोळ्यांनी पाहू शकतो. पण सॄष्टी अत्यंत विराट आहे. तिचा निर्माता हा अर्थातच तीहून मोठा विराट हे तर्कानेच समजू शकते.
साधे प्रकाशाचे उदाहरण घेतले तर प्रकाश म्हणजे कणांचा बनलेला आहे असे कोणी म्हणतात पण प्रकाश म्हणजे एक शक्ती आहे व ती लाटांच्या प्रमाणे आहे असे पण म्हणतात. सध्याच्या भौतिक शास्त्रामधे दोन्ही कल्पना बरोबरच आहेत असे धरले जाते. अर्थात प्रकाशाचे खरे स्वरूप कसे आहे ते खात्रीने कोणालाचे सांगता आलेले नाही. असो.
अशा ह्या परमात्म्याबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. प्रत्येकाला आपलेच मत योग्य वाटल्यामुळे अनेक वादविवादपण चालूच आहेत. एकूणच पहायचे झाले तर भगवंत कसा आहे ह्याबद्दल कल्पनाच करणे शक्य नाही हेच स्पष्ट होते. तसेच भगवंत सर्वव्यापी आहे असे पण पहिल्या अभंगात शेवटी म्हटले आहे.

दुसîrÉÉ अभंगामधे त्याच्या रूपाविषयी वर्णन आहे.
भगवंत तो आहेच हे तर स्पष्टच आहे पण :-
भगवंतला आकाराही नाही म्हणुन रूप नाही, नांव नाही व विकार पण नाहीत.तोसर्वव्यापी आहे म्हणुनच तो नाही अशी कोठे जागाच नाही कोणतीहि वस्तू ( सगूण) लांबी, रुंदी व खोली ह्या त्रिमितीच्या मध्ये सींमित असते. सगूण कांही काळच टिकते व नंतर नष्ट होते. भगवंत असा त्रिमिती व काळाने मर्यादित नाही म्हणुन भगवंत सगूण नाही असे म्हणता येते.

भगवंत ईंद्रियांना तो गोचर नाही कारण तो अव्यक्त आहे म्हणुनच तो निर्गूण आहे असे म्हटले आहे.

तसेच भगवंतानेच आपल्याला निर्माण केले आहे व आपल्या सर्वांचे लालन पालन त्याच्या सत्तेखाली होतच आहे अर्थात तोच आपली आई आहे. असे पण महाराज म्हणताहेत. .

पुढच्या ३îrÉÉ अभंगात अशा भगवंताला कसे ओळखायचे ते तुकाराम महाराज सांगताहेत.

ह्या भगवंताचे स्वरूप कसे आहे हे कोणालाच कळत नाही मग ह्या भगवंताला ओळखायचे कसे?
ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे त्याच्या विषयी जर योग्य असा भाव असेल तरच तो ओळखता येईल असे तुकाराम महाराजांनी अभंगाच्या दिले आहे.

अलिकडल्या काळांत झालेले संत तुकडोजी महाराजांचे एक भजन ( मनी नाही भाव , म्हणे देवा मला पाव ; देव अशाने भेटायचा नाहीरे , देव बाजारचा भाजीपाला नाहीरे ) विदर्भांत अत्यंत लोकमान्य व आवडते आहे. ह्या भजनामधे पण हेच मत व्यक्त होते. सर्व संतांचे सांगणे एकच आहे हेच खरे!

असा हा विठ्ठल सगळ्या विश्वामधे सर्वांत बलाढ्य आहे. तो सर्वांना न कळणारा आहे. सर्व उपाधींपासून तो वेगळा राहतो आहे व कोणलाही कळू न देता सर्व सृष्टीचे कार्य चालवित आहे. सर्व प्राण्यांना कळसूत्री बाहुल्याप्रमाणे हा देव प्रारब्धाची दोरी करून नाचवित असतो व जेंव्हा ही दोरी तो ओढतो त्याक्षणी देहबाहुली गतप्राण होते. हे पण येथे स्पष्ट केले आहे

श्रीमद्‍ भगवद्‌गीतेमधे भगवान म्हणतात की "
ईश्वर: सर्व भूतानां हॄद्देशे$र्जुन निष्ठति। भ्रामयनसर्वभूतानि यंत्रारूढानि मायया । गीताअ १८-श्लो ६१.
अर्थ:- हे अर्जुना , ईश्वर सर्व प्राणिमात्रांच्या हृदयांत राहून यंत्रात घातल्याप्रमाणे सर्व प्राण्यांना आपल्या मायेने फिरवित असतो.
"तुका म्हणतो की अशा ह्या देवाला त्याचेविषयी मनामधे दृढभाव असल्याखेरीज जाणता येत नाही.” ही दुसîrÉÉ अभंगाची शेवटची ओळ आहे.

हा दृढभाव म्हणजे त्यालाच सर्वभावे शरण जाणे अर्जुनाप्रमाणे भगवंताशी सख्य जोडणे .
" तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत " गीता अ १८-श्लोक ६२वा.”
भगवंताचे कर्तृत्व वर आलेल्या अभंगांप्रमाणे जाणावे. त्याच्याशी सख्यत्व करावे म्हणजेच कांहितरी नाते जोडावे व अर्जूनाप्रमाणे त्यालाच शरण जावे.
आपल्यावाट्याला आलेले प्रत्येक कर्म त्याचीच पूजा म्हणुन करावे. तो जे देईल ते फळ आनंदाने स्विकाराणे हेच भगवंतास शरण जाणे होय.

अभंगाची शिकवण :-
हे तीन अभंग महाराजांनी आपल्यासारख्यांना भगवंताचे स्वरूप समजावे. खरादेव कसा आहे ह्याची समज यावी म्हणून स्वानुभवावरून लिहिले असावेत. तिसîrÉÉ अभंगात उपदेशाचा भाग येतो. भगवंतास अनन्य भावे शरण जावे हाच उपदेश तुकाराम महाराजांनी केलेला आहे. आपण सर्व ह्या अभंगाप्रमाणे भगवंतास शरण जाऊया व त्याच्या कॄपेस पात्र होऊया.





0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home