28th post
अन्नाच्या परीमळे जरी जाय भूक ।Added to Abhanga a week of Sant Tukarama.
blogaddress :http:// tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com
Abhanga 28th Post Date 14th March 2013 ( अभंग
१९९ वा)
The Marahti version is given at the end of this following English
Version.
अन्नाच्या परीमळे
जरी जाय भूक । तरी कांहे पाक
घरोघरी ॥ १ ॥
अपुलाले हीत तुम्ही
करारें स्वहित। वाचे स्मरा
नित्य रामराम ॥ २॥
देखोनि जीवन जरी जाय
तहान। तरिं कां साठवण घरोघरिं
॥ ३॥
देखोनिया छाया सुख न
पविजे । जंव न बैसिजे तया तळीं
॥ ४॥
हित तरी होय गाता आइकतां
। जरी राहे चित्ता दृढ भाव ॥
५ ॥
तुका म्हणे होसी भावचि
तू मुक्त । काय करिसी युक्त
जाणिवेची ॥ ६॥
Verbatim Meaning:-
If one's hunger is satisfied by smelling the food, ; then there is
no need of cooking || 1||
You should remember the God and by doing so ; ensure your own
welfare.|| 2||
If one's thirst is satisfied just by looking at the water; then there
is no need to store it||3||
Unless one sits under the shadow of a tree( in Hot summer); he will
not enjoy the pleasure of
shadow.|| 4||
If there is firm and also an intense love for God, then only one
gets benefit by listening to his
Glory||5||
Tuka says that if you have right Attitude, then only you will be
liberated ; there is no use of
awareness of God without the right attitude || 6 ||
Background Information to understand the meaning of the Abhanga:-
If we see people around us, we can observe that many are desirous of
Liberation . And
therefore many are following various methods such as performing
Worships of different kinds,
going for pilgrimages, doing different types Yagnas/Homas., leaving
everything and going to
Jungle in the search of God, performing very difficult religious vows
and celebrations, reciting
the Holy books, attending Discourses on Ramayana, Bhagavata, Doing
NamasmaraNa etc.
However many are dejected since they feel that they are getting or
achieving nothing.
This only means that there
is something lacking in the efforts one has put.
Sant Tukarama Maharaja has explained in this Abhanga , what
exactly is lacking . He has
given three examples to clatrify his poind in the 1st,
2nd and 4th lines. Then he has
described the type of efforts on has to put in the 2nd
line. In the 5th and 6th line he has
explained what exacltly is lacking.
Meaning of the Abhanga:-
Tukarama Maharaj says that if one's hunger gets satisfied just by
enjoying the wonderful
smell of a Dish,then there would have been no need to cook food. Or
if one's thirst is satisfied
by the view of water body, then there was no need to store the water.
Similarly it is not enough
to see the shadow ( when one is walking under hot sun) . One must put
effort to go under the
tree giving the shadow. In short one has to put his best efforts for
achieving any target.
Similarly,
if one is desirous of Liberation then man has to put some specific
efforts.
What these efforts are is described in the 2nd line of the
abhanga.
These
efforts are :-
“Remember
God continuously, do this by reciting his name Ramarama ; and
by
doing get the best in life for you.”
Here
I would like to categorically say that Ramanamasmarana ( Remembering
the
God ) does not mean reciting of his name mechanically. One can recite
any of
His names. The real Remembrance means understanding His doing so
many
things for us for our welfare and well being, (indicating that He is
the
doer
not us). Putting our best efforts for completion of any tasks,at the
same
time;
with clear understanding that He will decide what the results should
be
and that the results are always for our welfare only. Remembering Him
also
means
to understand that that like within us He is everywhere, in all
living as
well
as non living things; hence love all.
This
way of leading life is expected to be followed by everyone who is
desirous
of Liberation. Sant Tukarama as well as other saints also expect us
to
live in this way only.
But
if one does not have intense Faith and Love for God, then all the
efforts
are
rather wasted. The Faith and Unconditional surrender are the Key
words
here.
In
order to develop such Faith and love for God, we must feel that He is
looking
after us like our mother. In order to awaken such feeling , a simple
method
is to review major and minor incidents that are occurring,and have
occurred
in our life. Such a review definitely enables one to understand that
the
God is really loving us. Everything that has happened ; has happened
for
our
welfare only and for our progress in the path of liberation.
Such
revelation automatically generates love for Him and Faith in Him.
Tukaram Maharaj has assured us in the last two lines
that we should
have of Love and Faith towards God, (when we are
putting efforts for
achieving the goal of Liberation.)and
definitely we will get the fruits we
are desiring for.
Teaching of the Abhanga;-
First of all we have to examine our own desires and
attitude. Are we
really desiring the Liberation? Are we having the
intense faith and love
for God? Have we surrendered to Him unconditionally? These are
the
questions we can ask ourselves. Then whatever the answer comes out
;
these will guide us to decide further course of action in our path of
spirituality.
This is the teachings of the Abhanga in my opinion.
मराठीत अभंगाचे
अर्थस्पष्टीकरण यापुढे
दिलेले आहे.
अन्नाच्या परीमळे
जरी जाय भूक । तरी कांहे पाक
घरोघरी ॥ १ ॥
अपुलाले हीत तुम्ही
करारें स्वहित। वाचे स्मरा
नित्य रामराम ॥ २॥
देखोनि जीवन जरी जाय
तहान। तरिं कां साठवण घरोघरिं
॥ ३॥
देखोनिया छाया सुख न
पविजे । जंव न बैसिजे तया तळीं
॥ ४॥
हित तरी होय गाता आइकतां
। जरी राहे चित्ता दढ भाव ॥ ५
॥
तुका म्हणे होसी
भावचि तू मुक्त । काय
करिसी युक्त जाणिवेची ॥ ६॥
अभंगाचा शब्दार्थ
:-
जर जेवणाच्या सुवासाने
भूक भागली असती तर घरोघरी
पाकाची काय गरज ?॥
१॥
नित्य रामराम स्मरण
करून तुम्ही आपापले हित साधून
घ्या ॥ २॥
जर पाणी पाहून तहान
भागती तर मग त्याची साठवण
करण्याची गरजच नाही.॥
३॥
जोपर्यंत छायखाली
मनुष्य बसला नाही तोपर्यंत
त्याला सावलीचे सुख कळणार
नाही ॥ ४॥
जर चितामधे दृढ भाव
असेल तर (भगवंताचे
गुण) गाऊनव ऐकून
हित होते ॥ ५॥
तुका म्हणतो की फक्त
भाव पुरेसा आहे. दृढ
भावानेच तू मुक्त होशील ॥ ६॥
अभंगाच्या मागची
भूमिका :-
आत्मज्ञान व्हावे
म्हणजेच देवाची भेट व्हावी
म्हणुन लोक अनेक प्रकारची
उपासना करत
असतात.
कोणी अनेक पूजा अर्चा
करतात. कोणी तीर्थयात्रा
करतात. होमहवन करतात.
कोणी
सर्व
सोडून संन्यास घेतात व वनामधे
जाऊन तपश्चर्या करतात. उपास
करतात. निरनिराळ्या
देवळांत जाऊन देवाचे
दर्शन घेतात. य़ोगसाधना
करतात. ध्यान करतात.
पोथ्यांची पारायणे
करतात. नामसप्ताह
, भागवत सप्ताह
ईत्यादी अनेक प्रयत्न करतात.
पण तरीही हातीं कांहीच
पडले नाही असाच अनेकांना अनुभव
असतो. ह्याचा अर्थ
हाच की
साधनेमधे
कांहितरी कमतरता राहीली असते.
ही कोणती त्रुटी असते
तेच ह्या अभंगात
तुकाराम
महाराज आपल्याला सांगत आहेत.
तुकाराम महाराजांनी
पहिल्या, तिसîrÉÉ
व
चौथ्या चरंणांत तीन
दृष्टांत ह्या अभंगात
देऊन
; माणसाने काय
प्रयत्न करावे ते २îrÉÉ
चरणात
सांगितले आहे.
हे
सांगून मग
काय
कंमी पडते
त्याचाही उलगडा
५ व ६ व्या चरणांत केलेला आहे
अभंगाचा अर्थ :-
महाराज म्हणतात की
जर उत्तम सुवासिक जेवणाच्या
वास घेण्यानेच जर भूक शमली
असती
तर मग स्वयंपाकाची
आवश्यकताच पडली नसती. किंवा
जर पाणी पाहून तहान भागली
असती तर कोणीच
पाण्याचा साठा केला नसता.
प्रखर उन्हामधे
चालल्यावर झाडाची छाया
दिसल्याने उपयोगाचे
नाही. आपण जर सावलीचे
खाली बसलो तरच थंड सावलीचे
सुख
मिळेल.
थोडक्यांत म्हणजे
योग्य तो प्रयत्न हा हवाच.
तो केला म्हणजेच अन्न
खाले, वा पाणी साठा
करून मग वापरले,
सावली पाहून ती खाली
जाऊन बसले ; तरच ह्या
सर्व केलेल्या प्रयत्नांचे
योग्य ते फळ मिळते.
तद्वतच ईश्वराचे दर्शन
अर्थात भगवताची भेट ( म्हणजेच
आत्मज्ञान ) होण्यासाटी
माणसाने
जरूर
प्रयत्न करात रहावे. हे
प्रयत्न कोणते ते महाराज
अभंगाच्या दुसîrÉÉ
चरणांत
सांगताहेत.
ते
प्रयत्न म्हणजे:-
सतत ( नित्य
) रामनामाचे स्मरण
करावे. असे स्मरण
करून तुम्ही स्वत:चे
हित करून घ्या.
येथे
हे स्पष्ट करावेसे वाटते की
रामनामस्मरण म्हणजे राम राम
म्हणणॆ नव्हे. स्मरण
कोणत्याही नामाने
करता येते. स्मरण
करणे म्हणजे भगवंताचे कर्तृत्व
लक्षांत घेणे. तोच
खरा
कर्ता आहे हे
समजणे. काम नीट
व्हावे म्हणुन योग्य ते सर्व
प्रयत्न करणे. तो
आपल्या
प्रयत्नांचे जे फळ
देईल ते आनंदाने स्विकारणे.
कोणतेही काम करताना
सतत ह्या मुद्द्यांचे स्मरण
ठेवणे. सर्वांमधे
तोच विराजमान आहे हे
ध्यानांत ठेवून सर्वांशी
प्रेमानेच वागणे. असे
वागणे तुकाराम
महाराजच नव्हे तर सर्वच
संतांना अपेक्षित
आहे..
पण जर खरा अनन्य
भक्तीभाव देवाच्या ठायी नसेल
तर सर्व व्यर्थ होते. हा
भावच अत्यंत महत्वाची
कामगिरी बजावतो. हा
भाव येण्यासाठी आपल्याला
भगवंत नेहमीच आईच्या मायेने
सांभाळतो आहे ही
जाणीव जागी होणे आवश्यक आहे.
त्यासाठी अगदी सोपी
पद्धत म्हणजे आपल्या
आयुष्यांत होऊन गेलेल्या
घटना आठवता येतात. किंवा
एका डायरीमधे अश्या छोट्या
मोट्या घटनांची
नोंद ठेवता येते. ह्या
सर्व घटनांचे सिंहावलोकनच
भगवंत आपल्यावर कशी माया
व प्रेम करतोआहे त्याची जाणिव
करून देते. अशी जाणीव
झाल्यावर आपोआपच भगवंताठायी
प्रेमभावाचा उदय होतो. तोच
सर्वकर्ता हे मनापासून पटते.
असो.
जर भगवंताठायी खरा
अनन्य भाव असेल तर तुझ्या
प्रयत्नांचे फळ नक्की तुला
मिळेल अशी ग्वाहीच
महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या
चरणांत दिलेली आहे..
अभंगाची शिकवण:-
आपण असे अनन्य भावाने
आपली साधना व प्रयत्न करतो
आहोत कां? हा प्रश्न
आपण स्वत:च
स्वता:ला विचारायचा
आहे. जे उत्तर मिळेल
त्यावरून आपण स्वता:चे
भले होण्यासाठी काय
करायचे ते ठरवून तसे वागावे
हीच माझ्यामते अभंगाची शिकवण
आहे.