Abhanga 9 :हेचि थोर भक्ति आवडते देवा । Date 27-09-2912 What is true Devotion
Readers may give their comments in the field provided in
the blog or send email on address :- rphadke45@yahoo.co.in.
ह्या अभंगाचे मराठीत स्पष्टीकरण इंग्रजी स्पष्टीकरणानंतर दिलेले आहे.
हेचि थोर भक्ति
आवडते देवा । संकल्पाची माया
संसाराची ॥ १ ॥
ठेविले अनंते
तैसेचि राहावे । चित्ति असो
द्यावें समाधान ॥ २ ॥
वाहिल्या उद्वेग
दु:खची
केवळ । भोगणें तें फळ संचिताचे
॥ ३ ॥
तुका म्हणे घालू
तयावरी भार । वाहूं हा संसार
देवा पायी ॥ ४ ॥
Verbatim Meaning:
True Devotion means the devotion in which one
surrenders everything to which one is attached in this world to the
God . God loves such devotion. || 1 ||
One should live in this world as God decides and Should
live with satisfaction for the same.|| 2 ||
If one worries for the state of his living, what one
gets is only grief and pain. , because all the grief or pain or
pleasure ( whatever it may be ) ; one gets it as per the
Prarabdhakarma ( the fruits of ones actions in the past several lives
bearing fruits in this particular life)|| 3 ||
Tuka says that he is leaving everything with God ,
surrender everything to Him ( with the view that let God decide
everything for him)|| 4 ||
Background Information :
In the previous Abhanga , we have seen that ones
enjoyments as well as sufferings are dependent on the deeds done in
the past. Some of the deeds are bearing fruits in this birth and
these are the cause of various pleasures or pains or grief one
experiences.
As seen earlier; we ourselves are the root cause of all
that we face in this birth. And this is as per the rules of this
visual world we are living in. Thus unless one develops वैराग्य
(i.e. absence from worldly desires and passions), one is definitely going to
bind himself in the vicious cycle of birth-death again again.
If one understands the true nature of our visual world,
then at least there is some chance that one will develop this attitude of ( वैराग्य) i.e. ( absence from desires and passions).
Sant Tukarama is of the opinion that the world we are experiencing
is just an Illusion.
The concept of Illusion is explained in the below
described n famous example of seeing a Snake instead of a rope.
Suppose there is a poorly lit up room, and some one
goes in this room. He sees a snake and is really afraid of the
snake. Then some body comes and switches on the light in the room.
Then it becomes clear that what was seen as a snake is actually
a rope lying in the room.
However the fear experienced is real one. Also the
relief experienced on discovery that it is not a snake is also real.
Thus the Snake was an illusion. With Light the illusion vanishes
.The true Knowledge gained because of the light removes the fear .
The Illusion of snake is always based on the presence
of Rope and insufficient light. Without Rope the illusion of Sanka
will not be experienced ..
All those who have attained the liberation ( मुक्ति)
are of the opinion that the world in which we are living is such
an Illusion. The substratum (अधिष्ठान)
for this illusion is the supreme Parabrahman ( परब्रह्म)
. The Parabrahman is the true God and ignorance of this causes us to
experience the illusion of the world .
.
Therefore we can say that since the whole world is an
Illusion , all the our experiences , our fears, problems of
Birth-Death etc, our getting attached to the transient things like
wealth, Near and Dear ones, etc ; all this will just vanish when we
get true knowledge about our true nature. Therefore this true knowledge only will free us
from many sufferings. We have seen that this is the opinion of all the Seers, Sages including Sri.Adi.Shankaracharya..
However to get this knowledge of our true nature ( Who am I ?) is not so easy. This is because our inner “ I “
does not allow this to happen. The only way is to surrender to the
God .
With this background we can get the deeper meaning of the abhanga.
Meaning of the Abhanga : -
The understanding that the world is an illusion will
make one free from all fears, grief and pain etc.
Tukaram Maharaj is saying that the simplest method is to surrender ourselves to God.
Once we surrender to Him and leave everything to his
will and wish then He will take care of everything.
In Mahabharata the incident of " Draupadi's vastraharan " is well known. She asked a question to Lord
SriKrishna that " O Krishna why did you not come to my rescue
earlier?" . Lord answered that “ You were thinking that others will
help you. When you called from your heart then I came immediately."
Tukarama Maharaj's this abhanga tells us that “ let us put ourselves in
His hands and and let Him decide what to do with our life.How to do this is ( refer Gospel of Sri.Ramakrishna) best
explained by the following teachings of Sri. Ramakrishna Paramahansa.
He says that “ Who can ever know God? I don't even
try. I only call Him as Mother. Let Mother do whatsoever She likes.
My nature is like a kitten. Kitten only cries “ Mew,Mew! The rest it
leaves to the mother. The mother cat puts the kitten sometimes in
the kitchen and sometimes in the master's bed. The young child wants
only his mother. He know only , “ I have a mother; why should I
worry? “
In the abhangas last lines, Sant Tukarama Maharaj is
asking us to develop this attitude of total surrender. Then all the
care will be taken by Him .
अभंगाचे मराठीत स्पष्टीकरण पुढे दिलेले आहे
Abhanga 9 : Date 27-09-2912 What is true Devotion
अभंगाचे मराठीत स्पष्टीकरण पुढे दिलेले आहे
Abhanga 9 : Date 27-09-2912 What is true Devotion
Readers
may give their comments in the field provided in the blog or send
email on address :-rphadke45@yahoo.co.in.
हेचि
थोर भक्ति आवडते देवा । संकल्पाची
माया संसाराची ॥ १ ॥
ठेविले
अनंते तैसेचि राहावे । चित्ति
असो द्यावें समाधान ॥ २ ॥
वाहिल्या
उद्वेग दु:खची
केवळ । भोगणें तें फळ संचिताचे
॥ ३ ॥
तुका
म्हणे घालू तयावरी भार । वाहूं
हा संसार देवा पायी ॥ ४ ॥
Verbatim
Meaning: शब्दार्थ
:
संसार
हा मायेचा खेळ आहे व भगवंताच्या
संकल्पाची निर्मिती आहे .
हे
समजून (
संसारची
आसक्ती सोडून)
जो
भगवंतची भक्ती करतो तीच खरी
भक्ती,
तीच
भक्ती त्याला आवडते.
॥
१ ॥
भगवंत
जसे ठेवील तसे माणसाने ह्या
संसारात मनामधे समजून समाधानाने
रहावे ॥ २ ॥
आपल्याला
जी दु:खे
उद्वेग चिंता लागतात ते सर्व
आपलेच संचिताचे फळ भोग आहेत
हे लक्षांत घ्यावे ॥ ३ ॥
तुका म्हणतो
की भगवंताला शरण जाऊन त्याने
सर्व संसाराची चिंता भार
भगवंतावर ठेवला आहे ॥ ४ ॥
अभंगामागची
भूमिका :
मागच्या अभंगामधे
आपण हे पाहिलेच आहे की आपल्या
सर्व दु:खांचे मूळ
आपण स्वत:च आहोत.
करावे तसे भरावे हा
ह्य जगाच नियमच आहे. म्हणूनच
जोपर्यंत अंगी वैराग्य बाणत
नाही तोपर्यंत आपण जन्म-मॄत्युच्या
बंधनातच अडकलेले असणार आहोत.
जर ह्या सॄष्टीचे सत्य
स्वरूप आपल्याला समजले तर
निदान वैरग्य आंगी बाणेल.
वैरग्य ही मनाची
अवस्था आहे ही आली की माणसाच्या
सर्व भोगेच्छा नष्ट होतात.
मनात नव्या
वासना निर्माण होत नाहीत.
संत तुकाराम
महाराजांचे असे मत आहे की आपण
हे जे जग अनुभवतो आहोत ते म्हणजे
एक भास आहे.(
जग भासरूप आहे)
भास म्हणजे
काय ते समजण्यासाठी अध्यात्मात
सर्प-रज्जूचे
उदाहरण दिले जाते.
ते खालील प्रमाणे
आहे.
समजा एक अपूरा
प्रकाश असलेली खोली आहेव त्या
खोलींत कोणितरी कांही कारणास्तव
गेला .
तेथे त्याला एक
साप दिसला व तो खूप घाबरा झाला.
नंतर खोलिमधे
आणखी कोणी आले व त्याने दिवा
लावला.
दिवा लागल्याबरोबर
स्पष्ट दिसले की खो्लीमधे
साप नव्हे तर एक दोरीच तुकडा
पडलेला होता.
त्या दोरीच्या
मुळे सापाचा भास झाला होता
हे पण कळले.
पण खरे ज्ञान की ती
"दोरीच आहे साप
नाही" होईपर्यंत
जी भीती वाटली ती ति साप
असल्याच्या कल्पनेमुळे वाटली
होती. कल्पना खोटी
आहे हे समजल्याबरोबर भीतीची
भावना नष्ट झाली. प्रकाशाच्या
अस्तित्वामुळे खरे ज्ञान
झाले व भीती नष्ट झाली. साप
दिसला तो भास होता.
जर तेथे ती दोरी नसती
व प्रकाश पुरेसा असता तर मग
सापाचा भास झाला नसता. या
उदाहरणांत दोरी हे सर्पाच
भास होण्यासाठी लागणारे
अधिष्ठान आहे.
जी मंडळी
जीवनमुक्त झाली आहेत त्या
सर्वांचा हाच अनुभव आहे की
हे जग ज्याचा आपण अनुभव घेतो
आहोत ते म्हणजे एक भासच आहे.
हा भास होण्यासाठी
जे अधिष्ठान आहे तेव म्हणजेच
परब्रह्म होय.
अज्ञाना मुळे
परब्रह्माच्या अधिष्ठनावर
दृश्य जगाचा भास होत असतो.
म्हणून आपंण असे
तात्पर्य काढू शकतो की सर्व
दृश्य हा भासच असल्याने आपल्याला
आलेली अनुभव , आपल्याला
वाटणारे भय, जन्म-म्रूत्यु
चक्रांत आपले फिरत राहाणे,
निरनिराळ्या नाशवंताची
जसे ऐहीक संपत्ती, भाऊबंद
नातेवाईक , आपले
जवळचे व ज्यांच्याबद्दल प्रेम
असते असे आपले आईवडील, पत्नी
वा पती, मुलेबाळें
इत्यादी सर्वांची आपली आसक्ती
इत्यादी . जेंव्हा
खर ज्ञान होते तेंव्हा हे
सर्व़च असून नसल्यासारखे
होतात. ह्या सर्वांच्या
संपर्कांत आल्यामुळे होणारी
सुखदु:खे ही पण भासच
हे समजल्यामुळे त्यांपासून
आपण मोकळे होतो, मुक्त
होतो. हेच सर्वच
संतांचे स्वानुभवाधिष्ठित
मत आहे.
पण असे जे ज्ञान ज्याला
आत्मज्ञान म्हणतात म्हणजे
"मी कोण? माझे
खरे स्वरूप काय आहे ? तें
होणे तसे सोपे नाही; कारण
आपल्यामधला अहंभाव "मीच
कर्ता-भोक्ता आहे
असे वाटणॆ " हा
नष्ट झालेला नसतो. एकच
मार्ग ह्या अहंभावाला संपविण्याचा
आहे तो म्हणजे भगवंतास संपूर्ण
शरण जाणे .
हा विचार पाहिल्यावर
आता अभंगाचा अर्थ कळणे सोपे
होते.
अभंगाचा
अर्थ व शिकवण :
आपण हे पाहिलेच की
जेंव्हा " हे दृश्य
जग हा भास आहे " ही
जाणीव अंत::करणामधे
स्थिर होते तेंव्हा आपण सुख
दु:खाच्या भीती,
उद्वेगा ह्यांच्या
पलिकडे जातो. मग
त्यांचा आपल्यावर बंधनकारक
परिणाम होत नाही.
तुकाराम
महाराज म्हणतात की सगळ्यांत
सोपी पध्धत म्हणजे भगवंतास
अनन्यभावे शरण जाणे.
त्याला शरण
जावे व जे जेहोते ते त्याच्याच
मर्जीनुसार होत आहे हे सम्जून
घ्यावे.
असे केले की
तोच आपल्या शरणागत भक्ताचा
योगक्षेम पाहातो.
महाभारतामधे
द्रौपदी वस्त्रहरणाच्या
प्रसंगानंतर द्रौपदीन कृष्णास
विचारले की तू यायला एवढा उशीर
कां केलास?
भगवान कृष्ण
म्हणाले "
पांचाली तुला
जो पर्यंत वाटत होते की आजूबाजूची
पांदव,
वगैरे मंडळी
मदतीस येतील.
तू जेंव्हा मला
अनन्यभावाने मला बोलाविलेस
त्याच क्षणी मी आलो"
तुकाराम महाराजांचा
हा अभंग हेच आपल्याला सांगतो
की " भगवंताला
अनन्यभावाने शरण जाऊया .
तोच ठरवेल की आपल्यासाठी
काय योग्य आहे व काय अयोग्य
आहे.
श्री. रामकृष्णपरमहंसाच्या
शब्दांत ( संदर्भ
The gospel of Sri.Ramakrishna -कथाचरीतामृत
") सांगायचे झाले
तर " भगवंत कसा
अहे हे कॊण जाणू शकेल? मी
त्याला माझी आई म्हणूनच हांक
मारतो. माझ्या आईलाच
ठरवू दे की माझ्या आयुष्यात
काय घडावे. माझी
भुमिका मांजरीच्या पिला सारखी
आहे. पिल्लू फक्त
आईला म्याव म्याव म्हणून हाक
मारते. बाकी सर्व
त्याची आईच करते. कधी
ति त्याला स्वयंपाक घरामधे
ठेवते , तर कधी आणखी
कोठेतरी घरमालकाच्या खाटेवर
गादीवर ठेवते.
पिलाला फक्त त्याची
आई हवी असते. त्याला
माहीत असते " मला
आई आहे , मग मी
इतर कसली काळजी कशाला करायची
!
अभंगाची
शिकवण :
अभंगाच्या
शेवटच्या ओळीमधे तुकाराम
म्हणतात की अशी भगवंतावर
भक्ती
करण्याची मनास
शिकवण द्या . मग तो
तुमची सर्व काळजी घेईल.