Thursday, August 9, 2012

2nd Abhanga साधू बचनाग खाती तोळातोळा

2nd Abhang साधू बचनाग खाती तोळातोळा ।  ( Date 9th August 12) 

available at http://tukaramasteachings.blogspot.com
Marathi Explanation is given at the end of the following English Version.
साधू बचनाग खाती तोळातोळा । आणिकांते डोळां न पाहवें ॥ १ ॥
साधूनी भुजंग धरितील हातीं । आणिकें कांपती देखोनियां ॥ २ ॥
असाध्य तें साध्य करितां सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ॥ ३ ॥

Verbatim Meaning: 
There are some sages who eat the poison "Bachanag " in small quantities; but there are the other people who are afraid of even watching this action.|| 1 ||
Some persons hold poisonous snakes with their bare hands; while some tremble with fear when they see a snake.|| 2 ||
Tuka says that it is possible to perform / do impossible tasks, because of practice|| 3 ||


Back ground Information for the understanding of this Abhanga.

In this abhanga Sant Tukarama is telling us what is the importance of practice in our life.

There are two different areas where practice is important.
1) For material welfare.
2) For spiritual uplifting.


Practice for any task involves following aspects to be addressed.
1) Planning: We have to plan for our practicing a task.
Planning requires that we address all the elements such as time, place, frequency, methods.etc 
2) Patience: one need to have patience since practicing require one to do certain tasks repeatedly. 
3) Adherence to a schedule : One also should adhere to specific time at which the task is practiced.
4) Monitoring: One also need to monitor what one has achieved.

It is obvious that the teachings  are both for our Material welfare and as well as for our spiritual up-lifting. 
One has make a choice for "What one  wants".

However the  Best choice  is to make the choice for both and then put the teaching into practice.

a) Teaching of this Abhanga for material welfare : 

A recently published  book authored by one british author Gladwell says 
that if one puts approximately 10000 hours of work in practice then such person becomes an expert/ an authority in the field in which he /she has practiced for 10000 hours or so.
Additionally if he is lucky then such person also gets  name and fame in the world. The book gives the examples of  Bill Gates, and likes to prove his point of view.
There are many books on the aspects of Practice for practice in for the material welfare.
One has to put repeated Efforts i.e. practice then nothing is impossible to achieve is the message here.

b) Teaching of this Abhanga for spiritual  welfare : 

All the saints and sages have advised that one should keep on doing  the process of Shravana 
(श्रवणं ), manana (मनन ) and Nididhyasa (  निदिध्यास )  continuously.

Shravana covers reading various books such as Bhagvadgita, Upanishads, etc. It also covers the discourses given by the authorities .
Only shravana is not sufficient. One must contemplate on what one has heard or read.This is manana.
When we understand the concepts these are to be put to use i.e. practiced in our daily life.
The Maya of Bhagawanta is so powerful that it always tries first to divert our mind from the chosen path. But the same Maya takes us towards GOD also when we have Faith( श्रद्धा )  in HIM and are ready to wait (सबुरी ).

an example : The square root of 2 = 1.44 is what we think. 
Actually the student of mathematics knows that the value is 1.44....... More the number of digits after the decimal point, more accurate we are toward the true value. The final number is the Ultimate singular one. Our search of " WHO AM  I " " What is my true Nature? " " How will I get freedom from the cycle of Birth-Death ? all these questions need continuous efforts .That is why one has to have the two qualities namely 1) Faith  ( श्रद्धा )  in HIM and are ready to wait (सबुरी ).


The size of efforts is more for the spiritual goal of Liberation ( मोक्ष ). 
However if our way of life becomes the one described in the explanation  in our previous abhanga then the effort  does not remain effort but one enjoyes doing it. 

This is what I have understood from this abhanga.


below given is the Marathi version  for the same explaination


2nd Abhang  ( Date 9th August 12) 


साधूनीं बचनाग खाती तोळातोळा । आणिकांते डोळां न पाहवें ॥ १ ॥
साधूनी भुजंग धरितील हातीं । आणिकें कांपती देखोनियां ॥ २ ॥
असाध्य तें साध्य करितां सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ॥ ३ ॥
अभंगाचा शब्दार्थ :
कांही साधू बचनागासारखे विष तोळा तोळा खातात. पण त्यांचे हे खाणे सुद्धा कोणाकोणाला पाहावत नाही.
कांहीजण नागाला हातांत धरतात तर कांहीची नागाला पाहूनच बोबडी वळते.
ह्या लोकांना असाध्य तेच साध्य होते कारण म्हणजे त्यांचा सतत अभ्यास हेच आहे असे तुकाराम महाराज म्हणतात.

    अभंग समजण्यासाठी लागणारी आवश्यक अशी कांही माहीती :
    ह्या अभंगामधे संत तुकाराम महाराज आपल्याला अभ्यास करातांना सराव म्हणजेच तीच गोष्ट पुन:पुन: करावी लागते त्याचे महत्व सांगत आहेत.
    सरावाचे महत्व व्यवहारामधे तर आहेच पण परमार्थामधेही सराव मह्त्वाचा आहे.
    अर्थांत १) सराव प्रपंचात करावा लागतो
             २) परमार्थामधेपण पण सराव महत्वाचा आहे.

    सराव करायचा म्हणजे खालील बाबींचा विचार करावा लागतो.

    ) योजना तयार करणे: जे काम करायचे ते कसे? ह्याची योजना करायला पाहिजे. ह्या साठी आपल्या जवळ काय काय सामग्री आहे, कोणती सामग्री केंव्हा लागेल, कोठून मिळेल, किती वेळ लागेल, कितीवेळा सराव करावा लागेल ईत्यादी सर्व बाबींचा विचार; योजना तयार करतांना करावा लागतो.

    ) सबूरी : कांही कामे अनेक वेळा करावी तेव्हाच नीट करण्य़ाची सवय होते. त्यासाठीच सबूरी महत्वाची असते.

    ) योजने प्रमाणे ठरलेली कांमें त्याच वेळेला करणे मह्त्वाचे असते.

    ) चाळणा करणे: योजनेत ठरविल्याप्रमाणे कार्य होते आहे की नाही हे सुद्धा वेळोवेळी तपासणे मह्त्वाचे असते. त्यामुळे जर कांही अडचणी आल्या तर त्यांवर उपाय वेळेवरच करता येतो.

      ह्या अशा पद्धतीने योजना करण्यालाच समर्थ रामदासांनी " दीर्घसूचना " हा शब्द वापरला आहे.
      तुकाराम महाराजांना पण हेच अभिप्रेत आहे.
ह्या वरून एक गोष्ट लक्षांत येते की तुकाराम महाराजांचा उपदेश पण व्यवहारामधे तसेच परमार्थामधे यशस्वी कसे होता येईल त्याबद्दल मार्गदर्शक आहे.

) व्यवहारामधे यशस्वी होण्यासाठीचा उपदेशाचा भाग खालील प्रमाणे आहे.
नुकतेच एक पुस्तक एका ब्रिटिश लेखकाने लिहिलेले प्रसिद्ध झाले आहे. पुस्तकाच्या लेखकाचे नांव आहे "ग्लॅडवेल". लेखक म्हणतो की जर एखाद्याने १० हजार तास सराव केला तर अशा माणसाला ज्या विषयाचा सराव केला त्या विषयांत प्राविण्य मिळते. लोकांमधे त्या विषयाचा तज्ञ म्हणून मानमान्यता मिळते याशिवाय जर नशीबाची साथ असेल तर मग विषेश प्रसिद्धी पण मिळते. पुस्तकामधे "बिल गेट" यांच्या सारख्यांची उदाहरणे दिलेली आहेत व १०हजार तासांच्या लेखकाच्या सिद्‌धांताला पुरावा म्हणून ही उदाहरणे आहेत.
व्यावहारीक जगामधे यश मिळावे ह्यासाठी मार्गदर्शन करणारी अनेक पुस्तके आहेत.
ज्याल यश हवे त्याने न थकता सतत सराव करावा व जो असे करेल त्याला अशक्य असे कांही नाही हाच संदेश येथे मिळतो.

 ब) परमार्थामधे यशस्वी होण्यासाठीचा उपदेशाचा भाग खालील प्रमाणे आहे.
आपल्या सर्वच संतजनांनी “ श्रवण क्रिया “ सतत करावी हाच मुद्दा अनेक ठिकाणी मांडला आहे. ह्यात श्रवण, मनन व निदिध्यास ह्यासर्वांचा समावेश आहे.

श्रवणामधे भगवद्‍गीता, उपनिषदे, ईत्यादी सद्‍ग्रंथांचे वाचन येते. तसेच मान्यवरांची प्रवचने कीर्तने ऐकणे हे पण येते. पण फक्त ऐकणे पुरेसे नसते तर ऐकलेल्यावर स्वत: विचार करणे , सखोल दडलेला अर्थ शोधून काढणे हे पण महत्वाचे असते.

ह्यानंतर जे समजले ते वर्तनांत आणणे हवे. तरच श्रवणाचा उपयोग होईल.

भगवंताची माया शक्ती ही एवढी शक्तिमान आहे की ती आपले मन सहजपणे इतर ठिकाणी नेते व आपल्याला पथभ्रष्ट करते. पण हीच माया जर आपली श्रद्धा अढळ असली व आपल्या मधे सबूरी असेल तर आपल्याला भगवंताकडे पण नेते.

एक गणीतांतले उदाहरण येथे घेता येते. आपल्याला माहीत आहे की २ चे वर्गमूळ १.४४ आहे. जो गणीताचा अभ्यासक आहे त्याला हे माहीत असते की हि संख्या १ .४४..... अशी अहे. जितके पुढे पुढे जाल तेवढी वर्गमूळाची किंमत जास्त खरी व बरोबर होत जाते. किती पुढे जायचे ह्याला मर्यादा नाही.
ह्याच प्रमाणे " परमार्थात "मी कोण आहे? माझे खरे स्वरूप काय आहे? मला ह्या जन्ममृत्यु चक्रामधून कशी व केंव्हा सुटका मिळेल? “ ह्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. भगवंतावर श्रद्धा असावी लागते व कधीनाकधी माझी त्याची भेट घडणारच आहे व मी वाट पाहायला तयार आहे ही सबूरी पण लागते.

जेवढे प्रयत्न व्यवहारामधे यशस्वी होण्यासाठी लागतात त्यांपेक्षा कोटीपट प्रयत्न परमार्थामधे यशस्वी होण्यासाठी लागतात.
मला ह्या अभंगामधून हीच शिकवण दिलेली आहे असे वाटते.









3 Comments:

At August 11, 2012 at 10:13 PM , Blogger mjayaram22 said...

Your interpretation and explanation has started me thinking (manana??).
First I feel that word perseverance and practice is a better alternative to the word practice as used in your description.
Second, the road to perfection must be stepwise -one step at a time. Otherwise it will be trying for something that is absurd - like wanting to get a PhD after KG class. the principle of TAE KONDO is based on this principle. In crease the exercise by one more number every day.
Last, I would like to quote KABIR when you say that "Best choice is to make the choice for both and then put the teaching into practice."
Sat Naam Kadua Laagai, Meeta Laagai Dhaam,
Dubidha mein jo dhouu gaye, Usey maya mili na Ram "
Loosely translated - Spiritual practice is taxing (tastes bitter) Pursuing wealth is satisfying (tastes sweet).But the man who is in doubt neither gets money nor Ram

 
At August 13, 2012 at 9:19 PM , Blogger Suhas said...

अभ्यासाने असाध्य गोष्टी साध्य होतात..श्री तुकाराम हे आपल्यासारखे सर्वसामान्य गृह्स्थीच होते पण परमेश्वराच्या ध्यासाने त्यांना जगद गुरु केले.. हे त्यांनी अभ्यासानेच साध्य केले ..

 
At August 15, 2012 at 11:28 PM , Blogger Ketaki Phadke said...


Yes, indeed sometimes we just need to keep on acting or rather doing our duties without any expectations. I always see the eg of a small child. for the child every step be it squatting, sitting, standing, walking is something new. but the baby in its growing process never gives up, until it reaches what it is striving for. As human some where we tend to lost our this basic background and feel disappointed and we start expecting return.

This attitude of simply striving with a direction to reach our end result is what human beings should adopt.

I remember something else what i read . It is a quote of Paulo Coelho which goes something like this "Don’t expect to get anything back, don’t expect recognition for your efforts, don’t expect your genius to be discovered or your love to be understood. Act because you need to act"

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home